माझी नवी कथा सादर करीत आहे . कथेचा आशय, पात्रे, घटना, स्थळे या बाबत साम्य आढळल्यास, निव्वळ योगायोग समजावा. Enjoy the story.  भाग १

रश्मीच देवघर

            शाळेचे दप्तर 🎒,  पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स घेऊन गाडीमध्ये  🚗 मागच्या सीट वर बसलेल्या देविशाला  🤷‍♀️ फ्लाईंग किस देऊन, बाय बाय केलं आणि  नंतर मात्र  रश्मीने तडक बाथरूम गाठले. शुचिर्भूत होऊन तिने पंचोपचारे  पूजा केली. स्वच्छ धुतलेल्या चांदीच्या मूर्ती गंध, पुष्पामुळे सुंदर दिसत होत्या. दिव्याच्या मंद प्रकाशात विविध रंगांची फुले टवटवीत दिसत होती. अगरबत्तीचा मंद सुगंध🥢, फुलांच्या  सुगंधात 🌺 🌸🌹🌷🌸🌺 मिसळला. चांदीच्या  निरंजनातील ज्योत शांतपणे तेवत होती. रश्मीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.  गालाला खळी पडली तिच्या.  देव घरात रश्मीला चिंतामुक्त आणि प्रसन्न वाटायचं. आपली नजर दत्तमुर्तीवर स्थिरावत रश्मीनं  प्रार्थना,  ह्वदायातून ❤ ओटावर  👄 आणली मंजुळ पण आर्त स्वर देवघरात घुमाले …. 

प्रार्थना देवा तुला ही 🙏
तू सदा जावळी रहा ,
मी जिथे जाईन तेथे,
प्रेम दृष्टीने पाहा || 🙏

         प्रसन्न मनाने तीनं  देवाचं रूप डोळ्याद्वारे  ह्वदयात  साठवलं आणि डोळे मिटले. मंदिरातील घंटेसारखा ह्वदयातून   आणि  अंतर्मनातून एकाच वेळी मंजुळ आवाज. झंकारला   ……. ,“श्री गुरुदेव दत्त” म्हणत तिने हात जोडले. 🙏

           देवघरातून बाहेर आली की, वास्तवता तिला उदास बनवायची. “खरंच, देव मी जिथे जाईन तिथे असतो का?” क्षणभर प्रश्न मनाला स्पर्शून गेला. प्रथमच तिच्या मनामध्ये आलेल्या प्रश्नाने ती  अस्वस्थ  झाली.  हा प्रश्न ईश्वरा बदल, त्याच्या अस्तित्वाबद्दल नव्हता तर, तिचं स्वतःच मन अस्वस्थ, उदास होत आणि म्हणूनच स्वतः वरचा विश्वास ढळल्याच लक्षणं  होत ते. दचकलीच ती मनातून …. !

            “श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधील रेषा पुसट झाली कि, आपण किंकर्तव्य मूढ होतो; म्हणून प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक निर्णय घे आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा. स्वताच्या  निर्णयाला स्वतःच जबाबदार असशील.” शिकवण जशी आईंना दिली तसाच विश्वास आणि आत्मविश्वास या मधला फरक आईनं  अगदी लीलया केला होता. कसं जमतंय हे सारं आईला?  माझ्या दोघी बहिणींना पण  छान जमतंय सार.  आई मधले कितीतरी चांगले गुण आणि सवयी सहज मिळवल्या त्यां दोघीनी.  आईचा गोड आवाज,  रांगोळी रेखाटणं, कणखरपणा,  हजारजबीपणा,  माणसांचा स्वभाव ओळखणं, माणसं जोडण,  निर्णय क्षमता  सारं सारं घेतलं चंदा आणि सईनं.  आपण मात्र मुखदुर्बल राहिलो. स्वतःची कींव  वाटली क्षणभर तिला.  विचार करता करता  सरावानं नेहमीची काम सुरु होती.  
          बाकी राहिलेली  आवराआवर  आटोपून बॅग 👜 खांद्याला लटकवली. शूज🥾🥾 चडवून कामाला निघाली रश्मी. 

काय शुभसंकेत मिळाला रश्माला?

घरातून बाहेर पडताना डोळ्याची डावी पापणी फडफडली. 
         शुभ संकेत वाटला तो तिला. चेहऱ्यावर हास्य पसरले तिच्या.  काम , काम आणि काम …  कामाला पूजा,  कामाला देव,  कामाला अन्न आणि कामाला सर्वस्व मानणाऱ्या गुरुची आवडती शिष्या होती ती.    दिवसभर कामात गढली तरी, मन वाऱ्यबरोबर झुलत होत तिचं. कारण काय माहित नव्हतं. काम संपवून बाहेर पडताना सहा वाजले होते. आता पापणी  जास्तच फडफडत होती. आज काय चांगलं घडणार आहे? आपल्या वाळवंटा सारख्या नीरस आयुष्यात ? खरंच काही चांगलं घडू शकत का?? प्रश्न ? प्रश्न ? आणि प्रश्न ??????? शंका कुशंका …पण  हा दोष परिस्थितीचा आहे हे मान्य होतं तिला. 

       तिने साऱ्या शंका- कुशंका, प्रश्न❓️ मनाच्या कप्प्यात ढकलल्या आणि चर्चगेट स्टेशन गाठण्यासाठी कार्यालय सोडले….
       दुरूनच चारही रेल्वे प्लॅटफॉर्म  माणसांनी फुललेले दिसत होते. क्षणभर तिला फ़ुलं – कळ्यांनी लगडलेल्या गुलाबाचा वेलं आठवला, दुसऱ्या क्षणी फळांनं भरलेली झाडं  दिसायची.  गर्दिशी आपण केलेली तुलना  विसंगत  वाटून विचार झटकला तिनं.  आपण गर्दीचा एक भाग बनतोय काहीच क्षणात, असा नेहमीचा विचार  रश्मीच्या मनात आलाच. 

प्रश्न ❓️ नव्हे पतंग अन्. 
 खेचू नये त्याची दोरी 
 समजा , खेचली तरी
 मिटेल का ही चिंता सारी ??? 

बाजूच्या काउंटर वरून  भजीचा वास माणसांना बोलावत होता.  🍧🍪 🥧🧁🍟🍔 बर्गर, टोस्ट सॅन्डविच,  फ्रँकी, वडापाव,  🍡🥮दाबेली, समोसे,  जिरामसाला, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम🍧🍨,  भेळ या  सर्वच काउंटरवर माणसांची गर्दी दिसली.  पाठीमागून,  ⚽🏸 परफ्यूम्स,  👠👠👞👞चपला,  की चेन,  लहान🏒🏏🎾⛸️ मुलांची खेळणी, सॉक्स🧦, कपडे, इलेक्टोनिक वस्तू 🎧📻🎼📞📲 इ.  वस्तू घेण्यासाठी फेरीवाले गर्दीला बोलावत होते.  

चर्चगेट प्लॅटफॉम

प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या  लोंकलची अनाऊन्समेंट नवखे लक्षदेऊन  ऐकत होते.   काही स्त्रिया बॅग  लटकवून गाडीत  उडी घेण्याच्या पावित्र्यात  होत्या. दिवसभराचा  कामाचा शीण गेला होता. घरी जाण्याची ओढ आणि घाई प्रत्येकालाच होती.  या मुळे प्लॅटफॉर्मवर  लोकल थांबायच्या अगोदर उडी मारणं धोकादायक असलं तरी नित्य सरावाच झालेलं होतं. काही नेहमीचे ओळखीचे  चेहरे दिसले कि,  ओठ विलग व्हायचे आणि ओळखीचं हास्य बाहेर पडायचं.  एवढ्या गर्दीत सुद्धा रश्मीला चेहरा वाचायची सवय लागली होती. पुस्तक, मासिक, वर्तमान पत्र, हातात पडलेलला कोणताही कागद ज्यावर अक्षर आहे ते वाचायची सवय असलेल्या रश्मीला वाचना बरोबर निरीक्षण करून मनाच्या कप्प्यात ठेवायची सवय जडली होती.  बरोबर गर्दी पाहून गर्दीचं  उद्दिष्ट  समजायचं तिला.  सकाळच्या गर्दीच उद्दिष्ट वेगळं असे. संध्याकाळच्या घरी परतणाऱ्या गर्दीचा उत्सlहं वेगळा. गावच्या यात्रेतील   माणस आठवायची.  शाळा –  कॉलेज सुटल्यानंतरची गर्दी,  आठवड्याचा बाजार, मंदिर,  उरूस या ठिकाणी होणारी गर्दी…. काही यात्रेच्या ठिकाणी हौसे, नवसे, गवसे असे तीन प्रकारचे लोक गर्दी करतात म्हणायची ताई आजी. पण चर्चगेटच्या गर्दीत फरक होता. सर्व लोक मेहनत करून कमावण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. चर्चगेट स्टेशन मधील लाद्या इतक्या चकाकत  होत्या की, रश्मीच्या नजरेनं स्वतःच प्रतिबिंब टिपलं. मनातली घालमेल चेहऱ्यावरील प्रतिबिबात दिसली नाही.  तिला स्वतःच आश्चर्य वाटल.  झपाझप पावले टाकताना तिला घराचा चेहरा आठवला आणि चेहऱ्यावर वेगळे भाव उमटले … 
तितक्यात पाठीमागून आवाज आला ..“रश्मी SSSSS 🗣

का उदास होती रश्मी ?

का उदास होती रश्मी? 😌

कोणी हाक मारली रश्मीला?


वाचा पुढील भागात……..

Spread the love

12 Responses

  1. I am glad that you like the story. I appreciate your compliment. It keeps me motivated and come up with more/better content. Thank you, Affiliate labz.
   Do stay in tune to find out what happens in the next part! 😄

  1. धन्यवाद 🙏…
   आपण दिलेली प्रतिक्रिया मला दर्जेदार लिखाणाची प्रेरणा देतात.
   लवकरच येत आहे “तु सदा जवळी रहा….., ” चा भाग -2

  1. Thank you Preeti. Tomorrow I m going to publish third part of, “तू सदा जावळी रहा…..”
   तुमचा अभिप्राय खूप प्रेरणादायी आहे. नमस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *