मनोगत

मतलबी या जगात,
कमीच आसतात हितचिंतक,
हितचिंतकlचा शिक्का कपाळी,
पण, पाहतात मात्र अहित ||

पैशाच्या या दुनियेत
नाही विद्येला वाली,
पैशाविना सर्व काही
भकास अन् खाली||

नाहीच अगदी असेही नाही
विद्येचा सन्मान,
फार दिवस नाही चालणार
विद्येचा अपमान ||

समाजाच्या कल्याणासाठी
ना संपत्तीचा वापर,
अ कल्याणासाठी बुध्दी
अन् संपत्तीचा उपभोग ||

देव-देवता असतात क्षमाशील
याचे ज्ञान त्यांना,
गुन्हा करून पुन्हा न करण्याचा
घेतात भाका – आणा ||

पैशाच्या वापरालही
लागते अक्कल हुशारी,
त्या साठी सरस्वतिशिवाय
नाही कुणी कैवारी||

फार काळ नाही चालणार,
चतुर मानावा तुझी चाल,
चातुरांचाही महा चतुर
आहे वर विराजमान ||

भगवान के घर देर है,
नही है अंधेर,
धीरज रखो, धीरज राखो,
याही मेरी काहावत है ||

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *