सुसंस्कृत दान

भारत माझा असा महान,
संस्कृती आपली तशी महान, जन्मणlऱ्या बाळा सारखं,
कित्येकांचे मनच लहान ||१||

रोग भरल्या हृदयात,
अन् द्वेष भरल्या मनात, साऱ्या महान गोष्टीना,
कोठून मिळणार स्थान? ||२||

चोचीला दाणा मिळो,
लज्जा रक्षाया वस्त्र मिळो,
महान सुसंसकृत भारताला
तितक्याच महान विभूती मिळो||३||

भारतीय बांधवां वराचे,
संकट आता परस्पर टळो,
सुसंस्कृत जीवनाचं,
प्रत्येकाला दान मिळो ||४||

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *