“तू सदा जवळी  रहा…..” भाग – ९  अर्थात : मतभेद

भाग -1*  एक आईं , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते…..   

    भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….

   भाग-3 * शाळा – कॉलेज ,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….

भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातिल आठवणी…
भाग -5 * रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते  निशब्द शांतता आणि प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  

भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मिच वि…..  सदृश्य जीवन.  

भाग -7 * अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग -8 * आईच मानस दर्शन, रश्मीला राजेशची प्रकर्षाने आठवण..   

भाग -9  राजेश – एक विचित्र रसायन, माणुसकी?

राजेश – एक विचित्र रसायन,

"तुझी सासू जवळ रहात नाही याचा आनंद वाटून घेऊ नको रश्मी" इति सासूबाई
रश्मी- ” ???? 🤔 ???
“समजेल तुला” सासूबाई उतरल्या.
प्रश्न मनातच राहिला. सासूबाईंना प्रतिप्रश्न केला नाही, आणि त्यांनी उत्तरही दिलं नाही.
देण्या मुळं आनंद  वाटतो त्यांना. पण “मला असं  कोणतीही गोष्ट, वस्तू घेताना बर वाटत नाही.  माझ्या गरजा खूप कमी  आहेत.  मला दागीन्यांचा इतका सोस  नाही हे समजून घेत नव्हता तो.” कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमाला जाताना अगोदर वाद, भांडण, त्याची चिडचिड आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या तोंडातील अगदी तोंडपाठ आणि अपमानकारक असलेलं वाक्य हमखास उच्चारलं जायचं त्याच्याकडून, “लंकेची पार्वती बनून येऊ नकोस माझ्या बरोबर. भिकाऱ्या सारखं येणार असशील तर नको येऊ. हे भिकेचे डोहाळे नकोत आमच्या घरात.”
आणि मतभेदाच रुपांतर वादात आणि वादाचं भांडणात व्हायचं आणि  राजेशचा आवाज टिपेला जायचा. आणि कार्यक्रमासाठी कितीही चांगल तयार झालं तरी चेहरा उदास व्हायचा रश्मीचा. तिला स्वताच्या पारदर्शी चेहऱ्याचा त्रास आता वारंवार होऊ लागला. मनातल्या भावनांचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर हमखास यायचेच. मनात एक चेहऱ्यावर एक, पोटात एक चेहऱ्यावर वेगळे भाव तिला जमायचं नाही.
परत त्यावरून पण, “का तुझं कोण मेलं का? एवढं काळ तोंड करून येतेस?”
पाऊला पाउलाला कट – कट. असा काय हा? कशीही वागले तरी वाकडा विचारच करणार. एवढं त्रासदायक बोलल्यावर कशी हसेल ती? कशी आनंदी राहील? याला मानसशास्त्र, दुसऱ्याच्या मनाचा विचार काहीच समाजत नाही का? माणूस म्हणून आपल्याशी ना चांगल बोलतो ना चांगल वागतो.
आपल्या मताचा आदर राहिलाच, परंतु आपल्या मताचा   विचार पण करायचा नाही.  आणि मग हे सर्वच  बाबतीत आणि रोजच व्हायला लागलं. त्यात रश्मीची वाचनाची आवड असो,  कपड्यांची निवड असो,  फावल्या वेळातिल छंद असो,  जेवणातील पदार्थ असो.  नुसती  जबरदस्ती.  डोक्यात,  मनात भिनायाला लागल त्याच वागणं.  उपद्रव मूल्य वाढतच चाललं त्याचं.  समोर असताना तर दादागिरीच होतीच  पण समोर नसताना पण मनभर  आख्खा  वेळ त्याचाच विचार. राजेश काय म्हणेल?  त्याला आवडेल का?  तो रागावेल का?  त्याची प्रतिक्रिया काय असेल?  फक्त राजेश,  राजेश आणि राजेश… 

राजेश बरोबरचे आनंदाचे क्षण आठवताना खरोखर आजची सद्यस्थिती विसरून आठवणीत रममाण झाली रश्मी.   काळा  शर्ट,  ऑफ व्हाईट पॅंट,  काळा गॉगल,  आणि ख्रिस्तन डायरच परफ्यूम,  त्याचं अस्तित्व तन आणि  मनावर  मोहिनी टाकून रुंजी घालत राहायचं. लग्नानंतर आपला प्रत्येक  शब्द  झेलायचा. आपल्याला मात्र रुळायला वेळ लागला.   आपण मात्र या सगळ्यात थोडं मिळून मिसळून थोडं अलिप्त राहायचा प्रयत्न  करायचो. एक अनामिक भीती वाटायची तिला. कशाची भीती समजायची नाही.  राजेश आणि सासू – सासरे, दीर – जाऊ,  नणंदI या सर्वांनी आणलेल्या  महागड्या वस्तू,  गिफ्ट म्हणून स्वीकारताना दडपण वाटायच. या सर्वांनी त्यांच्या पसंतीने दिलेल्या वस्तू वापरताना आपण आपल्या  पसंतीच काहीच करु  शकत नव्हतो. आणि एक दिवस सर्वांसमोर आपण तस स्पष्ट बोललो.  कुणाला दुखवायचं नव्हतं  आपल्याला.  पण  खेळीमेळीच्  वातावरण एकदम  गंभीर झालं.  पण राजेश मात्र नाराज झाला.  आपलं कविता करण, साहित्य लिखाण, वाचन,  नाटक पाहणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, मित्र मैत्रिणींना भेटणं,खळखळून हसण, नदीकाठी वाहत पाणी पाहात तासंतास बसणं, समुद्राच्या लाटा न्याहाळणं सगळंच बंद. पहिल्यादा आपल्याला वाटायचं तो त्याची इच्छा व्यक्त करतोय. आपण त्याच मन मोडायचं नको, त्याला वाईट वाटेल म्हणून गप्प राहत होतो. पण तो सांगत होता. विचारात नव्हता. आणि आपण नकारात्मक उत्तर दिल कि एकदम अनपेक्षित प्रत्यय यायला लागला. त्याला समजाऊन सांगितलं आपण. पण त्याचे आई - बाबा आणि ताई दुखावले गेले आणि तो कित्येक दिवस मनात ठेऊन असे आणि मग टोमणे मारायचा आपल्याला. त्याच्या स्वभावात काही खाष्ट बायकी दुर्गुण हमखास होते.

         आपल्याला काही मत आहे कि नाही?  आपण आपली आवड विसरलो का?  कि आपण मन मारतो ? का  स्वताचे विचार दडपून टाकतो?  भांडणाला कारण  नको  म्हणून गप्प बसलो तर तो गृहीतच धरायला लागला. आणि  मग त्याची मुक्ताफळं …  तुला काय कळत?  अक्कल  आहे का तुला?  गप्प बैस. मी सांगतो ते ऐक.  मला आवडतात तेच कपडे घाल.  आमच्या घरात हे नाही चालत. ते नाही चालत.  मी आईला सांगतो.  मी ताईला सांगतो.  माझ्या बहिणी कशा व्यवस्थित राहतात?  माझ्या  वाहिनी कशा राहतात?  तू तशी राहा.    

                 त्याला समजावलं दोन माणसाची आवड सारखी कशी असेल?  भिन्न व्यक्ती समान कशा दिसतिल?  पण ऐकून घ्यायची इच्छा असेल तर विचारांची देवाण घेवाण होऊ शकते. पण  इथं  राजेशला फक्त मी,  माझं,  मला यांच्या पलीकडे काहीच दिसत नाही.  नुसता अडेलतट्टू  होता. प्रत्येक गोष्टीचा इगो.  आणि आमच्यात संवाद कमी झाला.  काही वेळेस  एकतर्फी संवाद किंवा  संवाद नाहीच राहिला.  अख्खावेळ दडपण.   विचारात कितिवेळं गेला समजलच नाही तिला. 

 तिला आठवलं  अशाच वातावरणात  एक दिवस………    
  “मम्मी,  माणूसकि म्हणजे काय ग?” लहानग्या  देविशान  विचारलं.  

“मम्मी,म्हणजे काय ग?” लहानग्या  देविशान  विचारलं.  

 “माणुसकी म्हणजे  माणसानं  माणसाशी माणसासारखं  वागण,” रश्मी उतरली.  “अग  देवी,   तुला हा प्रश्न का  पडला?  रश्मीने प्रति प्रश्न केला. मम्मी,  प्रति प्रश्न हे माझ्या प्रश्नाच उत्तर  असू  शकत का?” 🙄देवीशान पृच्छा केली.    “देवी,  मी तुझ्या प्रश्नच उत्तर अगोदर दिलं आणि मग प्रश्न विचारला?”   जरा नरम स्वरात रश्मी उतरली.   राजेश आणि आपल्या मधील  वादाची झळ  देविशाला बसता  कामा नये, याची दक्षता रश्मी घ्यायची.  देविशाने विचारलेल्या  शंका  आणि प्रश्न कधी कधी रश्मीला बुचकळ्यात टाकायची.     “आणि कसला विचार करतेस मम्मी ?  मी कितीदा हाक मारली तुला? ”   देविशाचा प्रश्न आणि तिचं  हात लावून जोरजोरात  हालवण्यामुळे रश्मी भानावर आली. “मधु काकू  तुला बोलावताहेत.”  देविशा शेजारच्या घराकडे बोट दाखवत बोलली. “नाही ग माझी बबडी. मी कुठं विचार करते?”  आणि   मी भेटते  मधूला म्हणून रश्मीने  मधुला हाक मारली.  

 “हा बोलो मधू,  कैसे याद किया? ” रश्मीनं मधूला विचारलं “अरे कुछ नाही यार, ये देखो, ये नयी ट्युशन टीचर लिली | सिम्मी के लिये रखा है | देविशा को भी शिकायेगी | तू भी रख इसी ट्युशन टीचर को|” मधु आग्रहाने बोलली.

  “मधू वैसे  तो मै ट्युशन के खिलाप हू| बचोन्की सोचनेकी, सवाल पुच्छनेकी क्षमता मार देते हैं 🤷‍♀️
हम लोग| बच्चे एक लेसन चार बार पढते हैं |” 📖
“वो कैसे भला?” मधुने पूछा
“देखो स्कुल मे पढते हैं | फिर उपरसे होमवर्क करते हैं |”
“ट्युशनमे भी, सेम टॉपिक पढते हैं |और फिर होमवर्क करते हैं| क्या हमारे बच्चे ईतने डम हैं क्या?”

इसके बावजुद भी  देविशा को पढाने  के लिये पहलेसेही एक सर आते है|”  मधु ऐकायला तयार नव्हती. ती बोलता बोलता शेवटी बोलून गेली. “अरे इसको और एक ट्युशन मिलेगी तो फीज कम करेगी लिली|” आणि रश्मीला मधूचा आग्रह आणि त्यामागील कारण कळलं. रश्मीनं, मधूला आणि पर्यायाने लिलीला स्पष्टपणे नाकार देऊन आपल्या घरी आली.

देविशाची ट्युशन टीचर

         जाड भींगाचा चष्मा,  आपर  नाक,   जाड ओठ,  काळ्या रंगाकडे झुकणारा वर्ण,  उत्तान  टॉप आणि स्कर्ट,   लाल भडक लिपस्टिक,  तिची यस  मॅम,  नो मॅम वाली  भाषा.  हिला कुठं पाहिलंय आपण? रश्मी डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होती.  तिला काही केल्या आठवेना……. 

              संध्याकाळचे 5-00 वाजले होते. तीन सासऱ्याना चहा आणि डार्क फँटसीची बिस्किट्स  दिली.  पप्पाची आवडती बिस्किटे  बघून ते खूष वाटले. चहा घेऊन ते फिरायला निघाले.

         दुसरे दिवशी  ऑफिस मधील सर्व काम उरकून घरी येता येता 7-00 वाजले.  तीन बेल वाजवली.  दार राजेशन उघडलं.  इतक्या लौकर राजेशला घरी बघून  खुश झाली ती.  घरात पाय ठेवते तर, ….  काल मधू आग्रह करूनं करून सांगत असताना आपण स्पष्ट नकार दिलेली ट्युशन टीचर लिली, देविशाल शिकवत होती. लो कट भडक टॉप, ओडून ताणून अर्ध्या मांड्या झाकतिल एव्हडं लांड स्कर्ट, आणि डोळ्यांतले भाव बघून, रश्मी जागच्या जागी खिळली.   
रश्मीला नॉर्मल मूड मध्ये यायला काही क्षण गेले.

“Hello, ma’am Lily,  if I am not wrong,  yesterday we met at Madhu’s house?  Am I right?”
रश्मीने लिलीला विचारलं?
समोरून प्रतिसादाची अपेक्षा पण
……………………………..

 ‘”And I have  clearly told   Madhu and you that,   already tuition teacher is there to teach Devisha” 
रश्मीन चिकाटीनं उत्तराच्या अपेक्षेने लिली कडे पाहिलं. लिली काहीच बोलली नाही. लिलीन राजेशकडे कटाक्ष टाकला.

“तू फातिमाला पाणी दे अगोदर आणि  चहा टाक” इति राजेश.आदेशच दिला त्यानं

रश्मीचा प्रश्न, ” कोण फातिमा”?   

“सॉरी,  लिलीला पाणी आणि चहा दे”. इति राजेश  

  राजेशच, शिकवणी चालू असताना रोजच  काही ना  काही कारण कडून तिथं घुटमळंत राहण्याचं प्रमाण वाढत होत.  रश्मि आणि राजेशचे  त्यावरून खटके उडायला लागले.   अचानक घरात नवीन टी.व्ही. पाहून रश्मी बुचकळ्यात पडली. सहा महिन्यापूर्वी आपण आणि राजेशनं घेतलेला टीव्ही का बदलला? रश्मीला उत्तर मिळालं नाही. ओव्हन कुठे गेला नाही समजलं?

त्या दिवशी लिलींनं डायमंडची आंगठी दाखवली आपल्याला. 
दोन महिन्यापूर्वी आपण राजेशच्या मित्राच्या, मुलाच्या  बारशाला गिफ्ट आणण्यासाठी गेलो होतो.   तेव्हा पहिली होती तिचं अंगठी   आपल्याला आवडली होती पण किंमत बघून गप्प बसलो आपण.  फक्त गिफ्ट  घेऊन बाहेर पडलो.  आठेचाळीस हजाराची अंगठी लिलीच्या बोटात.  (Maanequin ) दुकानातील  पुतळ्यावरचे ड्रेस आता लीली वापरात होती.   आता देविशाची शाळेची फी भरणं राजेशला जड जातं होत.

         घरी अचानक पाऊणे आले. देविशाची परीक्षा जवळ आलेली.  ट्युशन कशाला बुडवायची म्हणून  लिलीला फोन करून सांगितलं कि,  आज देविशाची शिकवणी तिच्याच घरी घे.  रश्मी जेव्हा लिलीच्या घरी गेले तेव्हा लिलीचे वडील भेटले.  पूर्वी  पेक्षा घर अद्ययावत दिसत होत. 
"पूर्वीपेक्षा खूप छान आणि अद्यवत ठेवलय घर " रश्मी बोलली. तसें लिलीचे बाबा बोलले, "ये सब तो राजेश जी कि मेहेबानी है !"

लिलीं मधेच  बोलली, 

“I will drop Devisha after finishing tution.” 

 “No, ma’am Lily. I myself or Rajesh will come after an hour”. Rashmi replied. 

” Rajesh, is coming?” Then it’s ok”

 Rashmi,  ” Rajesh sir will come”.

Rashmi purposely emphasized on the word “sir”.

     लिलीच्या बोलण्याचा विचार करत  रश्मी जिना उतरून खाली आली तर लिलीचे वडील दिसले.  त्यांना बाय  करून रश्मी निघाली तर तिच्या कानावर अस्पष्ट शब्द पडले. 

“संभाल अपने घर को |”  तीन वळून पाहीले.  ते आकाशाकडे पाहत होते.  

कित्तेक दिवसांनी आज  रश्मीला लवकर घरी यायला मिळालं.  खुशीने घरी आली तर वेगळच  वाटलं तिला.  आपल्या घरात आपण परकं असल्याच भासल.  

“अरे तुम  सिर्फ  बोलो,  कल ही कलरवाले को भेज देता हू |  बाकी टाईल्स  और  बाकीका कांम भी करेगा मेरा आदमी |”  राजेश आणि लिली एकमेकांशी बोलण्यात एकदम गुंग होते.   रश्मीच आणि देविशाच अस्तित्व विसरली ती दोघ.  

         आता रश्मीची कोणतीच गोष्ट  राजेशला आवडतं नव्हती.  अगदी तिचं आस्तित्व सुद्धा.  विशेष करून लिली जेव्हा देविशाला  शिकविण्यासाठी घरी येत असे त्यावेळी रश्मी असली कि लिली आणि राजेशच्या कपाळावर अट्या दिसत.    

        त्या दिवशी असह्य होऊन रश्मी लिलीला बोलली,  ” तुम्हाला जर गप्पा ठोकायच्या असतील  तर अगोदर ट्युशन पूर्ण करा.

Rashmi: ” Lilly ma’am,  first finish her tuition,  you can talk afterwards “.  “At least give her some work”.  

…………. 

“Devisha called you twice.  Please  attend her first.” 

…………

Rashmi continued, 

“And from tomorrow onwards come with salvaar kameez”. Don’t wear your low cut top and mini skirt.  Better you concentrate on teaching”. 

    “घरात शिकवणीला आल्या दिवसापासून नुसती भिरभित्ती नजर. नुसतं टीव्ही  पाहिजे,  ओव्हन पाहिजे,  आंगठी,  दागिने,  कपडे,  हे,  ते सगळं  पाहिजे.   काम कमी आणि गप्पा जास्त”.  रश्मीचा संयम सुटला आणि बडबडली.  

राजेशचा  पारा चङला. तो गरजला,  “ए ,  रश्मी गावंढळ,  गप्प बस.  लिलीला,  पाणी दे.  चहा आणि खायला कर.  तोंडातून शब्द नको तुझ्या. माद…..त ” घाणेरडी शिवी हासड्ली 

“काय बोलतोस तू राजेश?  शिसारी येते तुझ्या अशा  वागण्याची. लिलीचे कपडे बग कसे असतात.  आणि आईवरून शिवी.  ते पण  छोट्या देविशा समोर.  जिभेला लगाम घाल तुझ्या.”  'थांब तू अशी गप्प बसणार नाहीस" म्हणून अंगावर धावला रश्मीच्या. छोट्या देविशाला रडू कोसळलं. आता रागातच राजेश देविशाकडे वळला आणि हात उगारून जोरात ओरडला तिच्यावर, तशी देविशा जोरजोरात रडायला लागली. "भोकाड पसरलीय तर कानफाड फोडीन." राजेश जोरात ओरडला. आता हिंस्र दिसत होता तो. रश्मी, देविशाल घेऊन बेडरूमध्ये गेली आणि दरवाजा बंद केला.

नंतर हॉल मधून कितीतरी वेळ हसण्याचे आवाज येत होते.  त्यानंतर कुजबुज आणि  फक्त  जोरजोरात श्वासांचा आवाज.

रश्मीचं काय होणार ?

      जिवंत प्रेतच झाली रश्मी. काहीच जाणवत नव्हतं. मृत मन, मृत तन.आत्मा होता, जीव होता म्हणून जिवंत म्हणायचं.

  जन्मभर जळाली ती,
जन्मभर मेली ती,
जन्मभर भोगली दुःख,
याहून भयानक आणखी
काय राहिलाय का?
जगणं, मरण, दुःख, भोग?

तिला आता मरणापेक्षा जगणं भयानक वाटत होत.

“होऊन होऊन काय होईल? मरणा पलीकडे तर काही होणार नाही ना?” म्हणून संकटाला भिडणाऱ्या विनिताच, ” आईच आपल्याला या अवस्तेत पाहणं मरणाहून भयंकर होत” रश्मीच्या दृष्टीने

            वासनांध मनुष्य विचार करत नाही.  कोणाचं ऐकत नाही.   मन आणि शरीर फक्त 

वासनापूर्तीच्या दृष्टीने  अनुकूल गोष्टी जवळ करत असतें.  आता लिली आणि राजेश दोघांना  रश्मीच आणि देविशाच अस्तित्व  बोचत होत. 

जेव्हा शांतपणे रश्मीने राजेशला विचारलं, ” तुला लिलीबरोबर लग्न करायचं असेल तर मला डिवोर्स दे. मला नाही राहायच तुझ्याबरोबर”.
एवढं बोलायला रश्मीला खूप दिवस लागले. विचार करून करून थकली ती. पोरकी निष्पाप देविशा दिसें आणि न बोलता खुप बोलणारी, न प्रश्न विचारता खुप प्रश्न विचारणारी आईची आर्त नजर दिसें.
शेवटी धीर करून विचारला प्रश्न. पण सोडलं तर पळतंय हा राजेशचा स्वार्थी हव्यास दिसलाच. आणि याच उक्तींचा प्रत्यय आला. रोमा रोमात स्वार्थ होता राजेशच्या. राजेशला रश्मीपासून आजिबात दूर व्हायचं नव्हतं. राजेशच वागणं माहीत असूनही या निर्णया प्रत् यायला रश्मीने खूप वेळ घेतला. अतिरेकी वासना आणि सगळ्याच अतिरेकी भावनांचा एकत्र संगम असलेला राजेशच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. एकदम आगीत रॉकेल ओतल्या प्रमाणे भडका बाहेर आला राजेशचा आणि जे राजेशच्या तोंडून बाहेर पडलं ते ऐकून बॉम्ब फुटल्याचा आवाज झाला रश्मीच्या कानात आणि बधिर झाली ती, “तू मुंबईत जिवंत कशी राहतेस तेच बघतो? तू , तुझी आई आणि बहिणी सगळे संपले म्हणून समझ. खुनच करतो तुमचा”.

ना आश्रू, ना बाहेरची वाट, ना स्वतंत्र् श्वास……….
पण त्या नंतर लिली कधी दिसली नाही.

 “हाय  रश्मी,   कैसी है तू?”  आज कल दिखाई नाही देती हो|”  मधू दिसली रश्मीला.   

“हाय मधु ! मै ठीक हू | तू बोल, ट्युशन कैसी चल रही है बेटी कि?” रश्मीन विचारलं 

  “अरे यार ट्युशन टीचर नही मिल रही है. तू ढुंढ ना  रश्मी?  तुम तो बाहर जाती हो| सर्व्हिस करती हो| तुम्हे जरूर मिलेगी |”  मधुन पृच्छा केली.

“लिली है ना? कितने टीचर्स रखवायेगी ट्युशन के लिए? ” रश्मीने प्रश्न केला.  

“उसे तो आठ दिन मे  ही निकाला मैने”|  छोटे छोटे कपडे पेहेनके आती थी | साली कि नजर पुरे घर और  मेरे हजबंड पर | पढांना कम और पूछ  ताछ ज्यादा | घर मे  कौन हैं?   काम क्या करते है?  कितने कमाते  हैं? टीव्ही कितनेमे लिया?……   पागल साली…  उसी  दिन बोला,”        “लिली,  कल से आना  नाही  पढानेको”. मधू बोलली

 ट्युशनचे काही पैसे वाचवण्यासाठी मधू बार्गेन करत होती. 

“आपलं  वैवाहिक जीवन खळबळून निघाल,  मधुच्या फालतूपणामुळं,” रश्मी  पुटपुटली.  

“नही यार, रश्मी| मैने नही बुलाया था लिलिको|  तेरा हजबंड, राजेशने लाया था लिली को |” 

Spread the love

1 thought on ““तू सदा जवळी  रहा…..” भाग – ९  अर्थात : मतभेद”

  1. Seema Shiledar

    रश्मीचा झालेला कोंडमारा अप्रतिम वर्णन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *