“मेरीटाइम एक्झीबिशन – एक समुद्री अनुभव”

शाळा भेटीसाठी गेले असता एक दिवस अहिरे सरांचा फोन आला.  मिस्टर आणि मिसेस  भंडारकर  यांची भेट घेऊन त्यांना प्रदर्शनाकरिता मदत करा.  आमच्या बिझी दैनंदिनी मधून  दोघीना योग्य वेळ आणि ठिकाण ठरवलं आम्ही.  आणि  आमची  दोघींची पहिली भेट झाली.  पहिल्या भेटीत आमची ओळख परिचय, त्याच्या कामाविषयी जाणून घेतलं. माझा रोल काय? त्यांची अपेक्षा काय? त्यांना नेमकं काय करायचं आहे याबद्दल जाणून घेतलं. आमच्या सन्माननीय सचिव वंदना कृष्णा मॅडमनी दिलेलं पत्र दाखवलं आणि मला नेमक्या कार्यक्रमाची कल्पना आली.  त्यांना माझ्याकडून नेमकी काय मदत हवी आहे हे समजलं. आणि दुसरी सभा ठरवून आही एकमेकींचा निरोप घेतला.

मेरी टाइम प्रदर्शनाची पाश्र्वभुमी

शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता नवीन, “मेरी टाइम एक्झिबिशन,” ही संकल्पना घेऊन मिस्टर आणि मिसेस भांडारकर आपल्याला भेटायला आल्या होत्या. मिस्टर भांडारकर हे निवृत्त नेव्ही अधिकारी असून नेव्ही मध्ये उपलब्ध असलेली माहिती…. होतकरू विद्यार्थ्यांना मिळावी हा खालील उद्देश्य ठेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टचे श्री संजय भाटिया, श्री आणि श्रीमती भांडारकर आणि टीम बरोबर आम्ही कामाला लागलो.

मेरी टाइम प्रदर्शनाचा उदेश्य

1. Display of various models of ships and maritime artefacts.
2. Standees explaining the world and maritime history.
3. Skill development and hospitality opportunities
4. Career counselling session.
5. Wellness and meditation,
6. Climate change awareness and effect of climate change on shipping
6. Speech by a historian about Mumbai port trust
7. Photo booths
8.book reading on maritime

मेरी टाइम प्रदर्शनाची
तयारी

आमच्या दक्षिण विभागातील ईयत्ता 8 वि ते ईयत्ता 12 विच्या होतकरू वयोगटातील विद्यार्थ्यांची सदर प्रदर्शनाचा लाभ व्हावा हा उद्देश्य मुख्याध्यापक आणि कॉलेज प्रिन्सिपॉलना विदित करण्यात आला. सभेच्या दिवशी कॅप्टन भांडारकर यांनी सर्व माहिती सांगितली, उदघाटनाच्या वेळीं अपेक्षित विद्यार्थी संख्या, पुढील दोन दिवसांचा पूर्ण कार्यक्रम कसं असेल या बाबत कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा सांगितली. आता आमचा टर्न होता. कोणत्या शाळा – कॉलेजच्या वेळी किती विद्यार्थ्यांना भाऊचा धक्का येथे पाठवायचे?
मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात करण्या अगोदर आमच्या काही मुख्याध्यापक भगिनींनी दळण वळणाचा मुद्दा उपस्थित केला आणि जवळ जवळ 90% लोक आडून बसले.
भंडारकर दाम्पत्यांनी बेस्ट व्यवस्थापनाशी, शाळांच्या मुख्यांशी, काही सामाजिक संस्थाशी बोलणी करून पहिली. पण बजेट मध्ये जमेना.
शेवटी आम्ही निवडक 100 शाळां आणि कॉलेज ऐवजी सर्व 426 शाळा – कॉलेजीसना आव्हान केलं. त्यामध्ये अनुदानित , विना अनुदानित, कोएड, खाजगी, शासकीय, एस. एस .सी मंडळ, इतर मांडळाच्या शाळा आणि कॉलेज सर्वांना काही भाऊचा धक्का जवळील आणि ज्या शाळांना खरोखर आवड आहे अशा मुख्याना विश्वासात घेऊन योजना आखली. आव्हान केल. पुन्हा सभा झाल्या. शाळा कॉलेजच्या याद्या विद्यार्थी संख्या ठरविली. पालक, शिक्षक, मुलं, मुख्याध्यापक, आणि ईतर लोक ज्यांना प्रदर्शनाबाबत आवड आहे यांना व्हाट्स अँप मेसेज गेले. आणि स्मरण निरोप गेले (reminder ) .
दरम्यान मुख्य अतिथी, नेव्ही मधील अधिकारी, मनपाच्या सन्माननीय महापौर, शिक्षण विभागातील अधिकारी यांना कार्यक्रमाची निमंत्रण कार्यक्रमाच्या संचालकानी पाठविली . वॉट्सअप ग्रुप वर लिव्ह लोकेशन पाठवण्यात आले. मुलांना उत्सुकता प्रदर्शन पाहण्याची. प्रचंड उत्साह. त्यांची एनर्जी दांडगी.

मेरी टाइम प्रत्यक्ष प्रदर्शन सोहळा


प्रत्यक्ष प्रदर्शनाचा दिवस उजाडला. ओपन थिएटर असल्याने किमान 500 मुलांची आवश्यकता होती. तशा प्रकारे भायखळ्याच्या सेंट मेरी शाळेच्या फादर ज्यूड आणि ह्यूम हायस्कूलच्या त्रिभुवन सरना सांगण्यात आले. Ab, cd, gsn, efs, fn या वार्डमधील शाळांना तसेच काही वेस्ट झोनमधील बांद्राच्या शाळा कॉलेजचे विद्यार्थी स्वेच्छेने भेट देणार होते. मी लवकरच कार्यक्रम स्थळी पोहोचले. आमच्या अगोदर होस्ट पोहोचले होते. आता आमचे डोळे विद्यार्थ्यच्या वाटेवर होते.
आणि बसेस मुलांना घेऊन कार्यक्रम स्थळी यायला लागल्या. 50, 100, 150………… करता करता उदघटनाला 3500 मुलं जमा झाली. मिस्टर आणि मिसेस भांडारकर, नेवीमधील अधिकारी, सन्माननीय किशोरी पेडणेकर- मुंबईच्या महापौर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन श्री संजय भाटिया, शिक्षण उपसंचालक- मुंबई विभाग, दक्षिण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि आमचे लाडके विद्यार्थी सारे वेळेवर पोहोचले.

ओपन थिएटर एकदम फुलून दिसत होतं. मुलांचा ओघ बघून माझं मन आनंदानं भरून आलं. कार्यक्रमाची सुरवात जबरदस्त झाली.

दोन दिवसच्या प्रदर्शनात जवळ जवळ 10,200 मुलांनी कार्यक्रमाला भेट दिली. अहिरे साहेबांनी दाखविलेला विश्वास आणि त्याच्या मार्गदर्शनाने माझ्या सहकाऱ्यां बरोबर मेरीटाईम एक्झिबिशन यशस्वीपणे पार पडले.
भांडारकर दाम्पत्यांची अपार मेहनत, कार्यक्रमातील सुसंगत व्यवस्थापन अप्रतिम. आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आमच्या विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिलेल्या संधीसाठी. भविष्यातील नागरिकांसाठी नेव्हीचे नवीन क्षितिज खुणावतेय, दर्या हाक देतोय…. प्रदर्शनाचा हेतू साद्य झाला. आतां त्याचा लाभ या उगवत्या ताऱ्यानी घ्यावा ही आशा ठेऊन आहोत. आम्ही आमच्या नव्या कामाकडे वळलो.
मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन,”पाणी सुरक्षा”, आणि, “सुरक्षित धरती, ” यावर नाविन्यपूर्ण कलाकृती बनविल्या.
नेव्ही मधील अधिकाऱ्यांसाठी क्रूझवर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला पण आम्हाला खुप मजा आली.
कार्यक्रमाची काही क्षणचत्रे सोबत देत आहे.  

Spread the love

1 thought on ““मेरीटाइम एक्झीबिशन – एक समुद्री अनुभव””

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *