“तू सदा जवळी रहा… ” भाग -14 अर्थात रुजवणूक देशभक्तीची

 आत्ता पर्यंत आपण वाचलात,  

भाग -1*  एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. 

 भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….

 भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….

भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….

  • भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते नि:शब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  

भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचे वि…..  सदृश्य जीवन.  

भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सारं ? अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना.   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग-  8* आईच, मानस  दर्शन,  
राजेशची प्रकर्षाने आठवण आली. 

भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? 

भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.

भाग -11* मालिनी वहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.

भाग- 12*  सुचिताची  प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कसं टिकवतात❓️ रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  
भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली ? @ चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारतात ?
भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? सर नी पेढे का मागितले?

“तिरंगा🇮🇳, राष्ट्रगीत, वंद्य वंदे मातरम”🙏

“तिरंगा” 🇮🇳 हुन सुंदर रंग दुसरा कोणता असू शकेल का ? “राष्ट्रगीता” पेक्षा दुसरं कोणत गीत मधुर असू शकेल का? प्रश्नच उद्भवू शकत नाही. प्रार्थना झाल्यावर रोज सावधान स्थितीत म्हंटल जाणारं राष्ट्रगीत आणि त्यानंतर, “भारत माता की जय” म्हणून खांद्यापासून आकाशात उंचावलेला हात आणि त्यानंतर जयहिंद म्हणून राष्ट्र ध्वजाला केलेला सॅल्यूट… लहानपणापासून गुरुजींनी रुजवलेली राष्ट्रभक्ती होती. अमूल्य ठेवा होता रश्मी आणि सर्वाना मिळालेला. रोज दोन मुलं प्रार्थना सांगत व बाकीचे त्यांच्या पाठीमागे प्रार्थना म्हणत असत. सर्वांकडे रेडिओची सोय नसल्याने, ज्यांच्याघरी रेडिओ आहे, त्यांनी शाळेत प्रार्थना झाली की, बातम्या वाचून दाखवायच्या असा नियम केला होता. त्यामुळे प्रार्थना झाली की रोज महत्वाच्या बातम्या वाचून दाखवल्या जात. एक सुंदर भारावलेलं वातावरण निर्माण करून मग मुलांना अभ्यासाकडे वळवत. मळ्यात रेडिओ नसल्यामुळे; गाणी, बातम्या, श्रुतिका, किंवा कार्यक्रम सुट्टीच्या कालावधीत पुट्टू काका रेडिओ घेऊन येत, तेव्हा ऐकायला मिळायचे. कोणाचं लग्न असलं की मोठमोठया आवाजात मराठी, हिन्दी गाणी ऐकायाला मिळायची.

गुरुजींनी मुलानां मैदानात का बोलावलं?

आज शाळेत तीन वाजता गुरुजींनी एक गंम्मत सांगितली आणि सगळेजण एकदम खूश झाले. “गणिताचा तास झाल्यानंतर पाच किंवा दहा पैसे वर्ग प्रमुखाकडे जमा करावेत आणि बरोबर संध्याकाळी चार वाजता गावदेवी मंदिरासमोरच्या पटांगणात जमावं” या गुरुजींच्या वाक्याने आज सर्व वर्गामध्ये एक खुशीची लहर फ़िरत होती. गणिताचा तास संपला, तसे रश्मी आणि सर्व मुलं मैदानात जमले. बाकीच्या वर्गातील मुलं अगोदरच जमिनीवर बैठक मारून ओळीनं बसली होती. मुलांची चुळबुळ सुरु होती.. आणि अखेर पाहुण्यांना घेऊन मुख्याध्यापक पवार गुरुजी मैदानात आले. गुरुजींबरोबर असलेल्या पाहुण्यांची पेटी एका बाजूला टेबलावर ठेवली होती.
आज शाळेत देशभक्तीपर गाण्यांचा एक कार्यक्रम ठेवला होता.
सन्मानानं गुरुजींनी त्यांची ओळख करून दिली.
थोडेसे सावळे, वयस्कर, खालचे दोन दात पडलेले गृहस्थ जेव्हा पेटीवर सरावानं बोटं फिरवायला लागले तेव्हा गोड स्वर बाहेर पडू लागले. त्यांच्या गळ्यातून निघालेले स्वर पेटीच्या स्वरात मिसळले तेव्हा मुग्ध होऊन सारी मुलं डोलू लागली.
साऱ्या देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भरून गेलं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कर्ण्यावर ऐकलेली गाणी आज प्रत्यक्ष ऐकायला मिळात होती. आणि यामध्ये खुप फरक जाणवत होता. देशभक्तीने ओथंबलेले स्वर आम्हा सर्वांना चिंब भिजवत होते.

भारत देश महान आमचा
भारत देश महान,

वेद मंत्राहून आम्हा, वंद्य वंदे मातरम,
वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम ||
माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भरती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती,
आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम
वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम||1||

यहा डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा, यह भारत देश हैं मेरा🇮🇳🇮🇳

ने मजशी, ने परत मातृ भूमीला,
सागरा प्राण तळमळलाsss सागरा🌊🌊

भारत स्वातंत्र्याच्या वेळी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलं बलिदान, त्यांचं देशप्रेम गाण्यातून प्रत्यक्ष समोर उभं केलं. राजगुरू, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, चाफेकर बंधू, महात्मा गांधी, नेहरू चाचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर….. कसलं भारी वाटायच❗️ आपण एकदम या साऱ्या देशभक्तांच्या प्रेमाने भारावून जायचो. आज आपण त्यांच्यामुळे स्वतंत्र आहोत याची जाणीव व्हायची.

एक एक करून
गाणी म्हणताना त्या काकांनी आम्हाला केवढी मोठी देणगी दिली हे त्यांना माहीत नव्हतं. स्वातंत्र्य मिळवले आणि पुढच्या पिढीकडे दिलं. आता आपण ते सांभाळायचं आहे …. त्याचं जोमानं याची जाणीव जागृती केली जात असे. पण मग आपण नेमका काय करायचं ? ते नव्हतं माहीत……

तुम्ही लहान आहात. खुप अभ्यास करा, खेळा, आई वडिलांचा, मोठ्यांचा आणि गुरुजींचा मान राखा. आपलं काम चोख करा. तुम्हाला देशाची सेवा कशी करायची ते आपोआप समजेल, अशी शिकवण पवार गुरुजी आणि इतर सर्व शिक्षकांनी दिली तसेच त्या गाणे म्हणणाऱ्या काकांनी पण दिली.
त्या वातावरणाचा असर मनावर घेऊन, ‘वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ म्हणत रश्मी, चंदा आपल्या जननीकडे निघाल्या …

पालखी आणि सरकार…

मळ्यात प्रत्येक वर्षी जमिनीचा कस वाढवविण्यासाठी शेणखत वापरलं जायचं, तागाच पिक घेतलं जायचं. युरिया, सल्फेटचा वापर असायचा पण बागाईत/ पाण्याखाली असलेल्या शेतीची विशेष काळजी घेतली जायची. ज्या जमिनीतून ऊस, गहू, भात, ज्वारी ई. पीकं घेतली जात असत. तिथं “बकरी बसवणं” हा जमिनीचा कस वाढवण्यासाठी केलेला उत्तम उपाय असे. मार्च ते मे महिन्या दरम्यान “बकरी बसवणं” कार्यक्रम चाले. धनगर आपली तीनशे ते सातशे बकरी घेऊन येत असे आणि सात, आठ दिवस – रात्री बकऱ्या शेतात राहत असत. त्यासाठी संबंधित बकऱ्याच्या मालकाला अगोदर सांगावे लागत असे आणि खुप पैसे द्यावे लागत, जी एक प्रकारची शेतीवर केलेली गुंतवणूक होती.

आज रविवार, पालखी मळ्यात आली होती. सरकारांनी गावदेवाची पूजा केली. विनिता, रश्मी, चंदा, सई, वाटेकरी, त्यांची मुलं, कल्लापा धनगर आणि त्यांच्या बरोबर असलेले इतर लोक सगळेच खूश होते. ही तिसरी वेळ होती की, तिसऱ्या वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कल्लापा बकरी 🐏🐑🐏🐑🐐 घेऊन मळ्यात आला आणि गाव देवाची पालखी नियमाप्रमाणे मळ्यात आली. गुडी पाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदेच्या दिवशी ज्यांच्या शेतात बकरी असतील त्याच्या शेतात गावदेवाची पालखी येते आणि गावचे सरकार शेतात जाऊन पालखीची, गाव देवाची पूजा करून प्रसाद दिला जात असे. कल्लापा त्या दिवशी बकरीची पूजा करीत असे. हा अलभ्य लाभ सर्वानाच मिळत नसे. तो आज विनिताला मिळाला होता.

खुप सारी मुलं का जमली होती?

केंद्र परीक्षेची तयारी झाली. तीन किलोमीटरवर असलेल्या प्रशस्त केंद्र शाळेत जाऊन रश्मी आणि मुले तिथल्या प्रशस्त पटांगणात थांबले. रश्मी आणि इतर मुलांसारखेच असंख्य विद्यार्थी 🎎👧🧑👱🙅‍♀️🙆‍♂️🙋‍♀️🤦‍♀️🙋‍♂️🙋👨‍🏫👩‍🏫जवळच्या वेगवेगळ्या गावाहून परीक्षा देण्यासाठी आलेले होते. पांढरा शर्ट, खाकी हाफ पॅन्टमध्ये मुलं आणि पांढरा ब्लाउज आणि निळा स्कर्ट घालून मुली हातात पॅड घेऊन परीक्षार्थी बनून आले होते. गुरुजींनी सर्व मुलांना वर्गाकडे नेले आणि सर्व विद्यार्थ्यानी पाहिल्यांदा अशी परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी गुरुजींनी एका हायस्कुलकडे बोट 👉 दाखवलं आणि सांगितलं, आता जूनमध्ये तुम्ही सर्वजण इथे प्रवेश घेणार आहात.


आता पूर्णपणे सुट्टी पडली होती. हुंदडायला रश्मी आणि मित्र मंडळी मोकळे होते. ना चिंता निकालाची ना भविष्याची. रश्मीच्या पूज्य गुरुजींनी, सात वर्षाच्या सहवासात प्राथमिक शिक्षण, खुप सारे संस्कार आणि आशीर्वाद देऊन रश्मी आणि इतर मुलानां पुढच्या शिक्षणाची दिशा दाखविली.. 👏🌹

गुरुजींनी कोणती दिशा दाखवली ?

जूनमध्ये पावसाच्या निसर्ग सुंदर वातावरणात रश्मीने हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. लोचन अक्का आणि नववी, दहावीच्या मुलीनी रश्मीला इथली पद्धत सांगितली. गावामध्ये पहिली ते सातवीचे प्रत्येकी एक एक वर्ग होते. एका वर्गात 25/30 मुले होती आणि सात शिक्षक होते.

आता प्रत्येक यत्तेच्या चार तुकडया होत्या. कन्नड आणि मराठी माध्यमाचे शिक्षक मुलाना एकाच स्कुल कॅम्पसमध्ये शिकवत होते. आणि हजार मुलं होती. इथं तासिका पध्दत होती. प्रत्येक पंचेचाळीस मिनिटाला बेल झाली की, वेगळे सर येत. विज्ञानामध्ये जीव, रसायन, पदार्थ असे तीन भाग होते तर गणितामध्ये भूमिती वेगळी केली होती. इतिहास, भूगोल वेगळे होते. मराठी शिकविण्यासाठी प्रथमच आम्हाला मॅडम होत्या. शाळेला दोन खुप मोठी मैदाने होती. दोन गार्डन्स होत्या. मोठी मोठी चिंचेची झाडं 🌳 गार सावली देत. हिरवी पालवी लेऊन आठवीच्या मुलांचं स्वागत आणि दहावीच्या मुलांना निरोप देत उत्साहात उभी असत. एक मोठा हॉल होता. पाऊस आला की हॉलमध्ये प्रार्थना, राष्ट्रगीत होत असे. खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत करून शिक्षण सुरु झालं. वर्गात श्रीपादकाका नोटीस आणत असत आणि इंग्लिशमध्ये असलेली नोटीस सर वाचत असत.

मूर्ती लहान पण…

स्त्री शिक्षिका म्हणजे कशा असतात❓ हे रश्मीला आणि तिच्या शाळेतील सर्व मुलांना हायस्कुलमध्ये गेल्यावर समजलं. रश्मीला मराठी भाषा विषय शिकविणाऱ्या शिक्षिका रोज तालुक्यातून येत असत. त्यानी मराठी भाषा विषय शिकवायला सुरुवात केली की, वेळेच भान राहत नसे. कधी त्यांचा पिरियड संपूच नये असचं वाटत राही. कविता असो किंवा धडा, एखाद्या लेखकाविषयी, कवींविषयी, एखादा संदर्भ काहीही असले तरी मॅडमकडे अफाट शब्द, वाक्ये, संदर्भ, आणि ते व्यक्त करण्याची पध्दत …. मुले कानात पंचेंद्रिये जमा करून ऐकत राहत असत. “सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी” आपल्याच जखमेवर मीठ लागल्याचा भास होई आणि मन आणखी कणखर बनवी, “रायगडाला जेव्हा जाग येते” मधला प्रयोग, वाचनातून असा उभा करत की, “राजे तुम्ही कसले पोरके! पोरके तर आम्ही झालो आहोत”, डोळ्यात💧💧 पाणी यायचं. मैडम कडून “चाफेकर बंधूंचे बलिदान” प्रसंग उभा करत, “लोक साहित्यातील बहीण भाऊ” रश्मीला नेहमी उमेश दादाची 🙋‍♂️आठवण करून देई. परीक्षेतच काय अजून इतक्या वर्षांनंतर सुद्धा शब्द, शब्द रश्मीला आठवत होते. रश्मी, मॅडमचा क्लास आतापण मनानं अनुभवत असते. त्यांनी शिकविलेल्या कोणत्याही प्रकरणावर पुन्हा अभ्यास करायची गरज भासली नाही. अशा रश्मीच्या मॅडम गॅदरिंग आलं की एकदम वेगळ्या भासत. त्यांचं नृत्य कौशल्य जबरदस्त होतं. त्यांच्या पायातील चपळाई पाहू की, त्यांच्या चेहऱ्यवरचे हावभाव? असा प्रश्न पडे …त्या बोलत पण एकदम मंजुळ आवाजात… मुलांना त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांचा अभिमान वाटे. गॅदरिंगमध्ये मुलींची टीम अत्यंत सफाईदारपणे समूह नृत्य, एकपात्री, गायन, नाटिका सादर करीत असे. मुलींमध्ये सभाधीटपणा आणि स्टेजवर सादरीकरण, बोलणं, वावरण्यासाठी लागणार कौश्यल्य मॅडम द्वारे आत्मसात केलं जायचं.

“आज गोकुळात रंग खेळतो हरी”
या गाण्यावरच टिपरी नृत्य असो

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या
सासरा हे नृत्य असो,

“शालू हिरवा पाचूंनी मडवा वेणी तीपेडी घाला” हे एकल नृत्य असो

“चिंगी महिन्याची झाली नाही तोच..”
एकपात्री


प्रॅक्टिस करताना, पाहताना मजा यायची. सुभद्रा, उजाला, वंदना, लीला👧👩🙅‍♂️🏃‍♀️💃 यांचं पद लालित्य नजरबंद करणार असायचं
नंदाचं 💃एकल नृत्य खिळवून ठेवे, एकपात्री हसू आणायचे आणि समूहनृत्य ठेका धरायला लावायचे.
आणि गॅदरिंगच्या दिवशी धमाल, मजा,
“मला बी जत्रला येऊ द्या की र… “🕺नृत्य
“आई तुझे उपकार ध्यानात येई
..” 🧍‍गीत
ग्रुप डान्स, एकपात्री, नाटिका मुला, मुलींची जुगलबंदी आणि मस्त निवेदन… संपूर्ण हायस्कुल.. मुलांची फुल होऊन सजलेलं आणि पाखर होऊन मुक्त विहार करणार आकाशचं व्हायचं. आणि तारे, तारका स्टेजवर उतरून कला सादर करत.

आणि एक दिवस अचानक आमच्या मॅडम आम्हाला सोडून गेल्या.
त्या दिवशी अश्रूंचा 😭😭😭पाट वाहत होता..

इंग्रजी पोएम, “solitary Reaper”, Behold her single in the field,
“The Mountain and the Squral”🦨🦨

“Noman” lesson, One eyed man आणि इतर

जीवशास्त्रातील कशाची, मेंदूची🧠, कानाची👂 आकृती, झुरळ, पान, कांदा, बेडूकचं 🐸 प्रयोगशाळेतील निरीक्षण
ड्रॉईंग शिक्षकांचा तास, आणि
त्यांचे good, v.good ✔️रिमार्क्स
या सर्व गोष्टी मनावर कोरल्या गेल्या.

विनिता, रश्मीच्या सरना का भेटली?

विनितान, रश्मीचा आठवी पासचा रिपोर्ट पाहिल्यावर लक्षात आले की, रश्मीला गणित विषयात जेमतेम मार्क्स मिळाले होते. म्हणून गणितासाठी शिकवणी ठेवायची ठरवली आणि सराना भेटुन आली आणि जून पासूनच क्लास सुरु झाला. कच्चा विषय पक्का करण्याचा चंग बांधला. सरांच्या मिसेस ना रश्मी आणि मुलं, मामी म्हणत असतं. मामी खुप प्रेमळ होत्या. विशेष करून दूर गावच्या मुलांची आस्थेनं चौकशी करत. घरच्या आई, भावंडांची विचारपूस करत. सर, मामी आणि त्यांच्या लहान मुलांबरोबर एक आपुलकीच नातं निर्माण झालं. सर आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर असलेले नातं दृढ झाले. जेव्हा त्यांना आईच्या परिस्थितीची कल्पना आली तेव्हा आई आणि मामीच नातं चांगल्या मैत्रीत झाले होतं. कधी कधी शिकवणीची फी दोन महिन्यांनी दिली जायची.

काका आजोबांचा दिलासा


साखर कारखाना सुरु झाल्याने गावांत मोठ्या प्रमाणात दळण वळण वाढलं होतं. गुऱ्हाळापेक्षा शुगर फॅक्टरी जवळ असल्याने ऊस तिकडेच पाठवला जायचा. ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी ई. रहदारी वाढली होती. जवळपासच्या लोकांना काम मिळत होते. फॅक्टरीमध्ये ताईआजीचा पुतण्या काम करत होता. ते दुसऱ्या गावातून कुटुंब कबिला घेऊन रश्मीच्या गावात सुळ्यांच्या वाड्यात स्थायिक झाले आणि आईला अजून एक शुभचिंतक, नातेवाईक, मैत्रीण मिळाली. दोघी एकमेकीला वाहिनी संबोधत. आणि त्यांची मुलगी, सईची वर्ग मैत्रीण झाली. मुलगा चंदाच्या वर्गात होता. त्यांचं केव्हातरी मळ्यात येण आणि आईच कामानिमित्त गावात गेलं की त्यांना भेटणं चालू होतं. अशातच ताई आजीचे काका आले गावात. पूर्णपणे कमरेत वाकलेले आजोबांचा गौर वर्ण होता व शुद्ध वाणी होती. त्यांची भविष्य सांगण्याची हातोटी जबरदस्त होती. मोठया काकूंनी सांगितल्याप्रमाणे नेहमी वाड्यात गर्दी असे. त्यात काकां आजोबानी लहानपणी संन्यास घेतला आणि काशीलाच मुक्काम ठोकला होता. संन्यास घेऊन तपश्चर्या खुप केली होती. त्यांचा ज्योतिष शास्त्राचा आभ्यास जबरदस्त होता. त्यांच्या आई, वडिलानी त्यांना काशीहून परत आणलं. काकाआजोबानी लग्न नाही केलं. त्यांच्या प्रचंड संपत्तीला कोणी वारस नाही म्हणून दामा काकांना दत्तक घेतलं. ते काका फॅक्टरीत काम करत होते.

एक दिवस गावातील तलाठी काकांकडून सात बाराचा उतारा काढल्यानंतर, विनिता मुलींना शाळेबाहेर भेटली. शनिवारची शाळा सुटल्यानंतर रश्मी आणि चंदा, सई, विनिता आईबरोबर काका आजोबांना भेटायला वाड्यात गेले. काकांनी, आईला शुक्रवारी, तांब्या आणि ताम्हण मांडून लक्ष्मीची पूजा करायला सांगितली आणि तिघींच्या कुंडल्या तपासल्या. आईच्या आरोग्यविषयीच्या तक्रारींवर औषधाबरोबर मृत्यूंजय मंत्र, विनितावर आलेलं गंडांतर टळेल असही सांगितल. विनिताला आपल्या पेक्षा आपल्या तीनही मुली, त्यांच शिक्षण आणि भवितव्य यांची काळाजी होती. आपल्या वाटेला आलेलं खडतर जीवन, वैधव्य, हलाखी आपल्या पुरतीच असुदे. ही मनातली इच्छा काका आजोबांना नं बोलताच समजली होती.

“तुझ्या मुलींचे जीवन, शिक्षणांन समृद्ध आणि स्वावलंबी असेल याची ग्वाही भविष्यात असल्याच आजोबानी ताडलं आणि तिला आश्वासित केल. मुलीच्या शिक्षणामध्ये आलेले अडथळे तू स्वत: दूर करशील हे दिसतय. बस❗️ तू खंबीर रहा,” असं सांगितले.

कन्नड समजलं का रश्मीला?

बेळगावहुन आलेली विनिता आईची, मावशी आणि काका आईची जिद्ध बघून आवाक झाले❗️ मुलींच्या शिक्षणासाठीची धडपड पाहून त्यांनीपण विनिताला भरभरून आशीर्वाद दिला. ते पूर्णपणे कन्नडमध्ये बोलत असतं. मावशी आजीचं खुप कडक सोवळं असायचं. आठ दिवसाचा पाहुणचार घेऊन मावशी आजी आणि काका आजोबा निघून गेले. ते गेल्यावर सई त्यांची नक्कल करायची. “विनता, औलक्की कूडबुड, कूडबुड. विनिता चाई कूडबुड कूडबुड.”असं सई बोलली की, रश्मी आणि सर्वजण हसायचे. रश्मी आणि भावंडाना ला कन्नड थोडं बहुत समजत असे पण बोलताना बोबडी वळे.

सावी मावशीचा मुलगा आला की, तो आणि विनिता आई कन्नडमध्ये बोलत आणि रश्मीला नेमकं काही समजायचं नाही. पण रश्मीला कन्नड समजून घेण्याची उत्सुकता तर जबरदस्त असायची. एक, दोन वाक्ये झाली की रश्मी विचारायची, काय म्हणतोय दादा? हे सरख विचारलं की, तो विनिता आईला म्हणायचा, “हं हेळ इकिगे.” आणि रश्मी त्यांच्या संभाषणात खंड पाडत असे.

छोटू काका, आता बदलीने दत्त स्थान असलेल्या गावाजवळ आले होते. रश्मीच्या आबांचे श्राद्ध तेच करत होते. कधी विनिताची तब्बेत ठीक नसेल तर रश्मी आणि चंदा, आबांच्या श्राद्धासाठी पुट्टु काकांकडे जात, तेव्हा दत्त दर्शन घेऊन येत. पुट्टु काकांनी रश्मीला एक लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीचा रंगीत आणि श्री दत्त गुरूंचा फोटो घेऊन दिला होता.
काकूंची अपंग बहीण होती. त्यांना एक मुलगा पण होता. काका, काकू मे महिन्याच्या सुट्टीत त्यांना मळ्यात घेऊन आले होते. काकू नेहमी ग्रंथालयातून सुट्टीसाठी चांगले ग्रंथ घेऊन येत असतं. श्रीमानं योगी, स्वामी, महारथी कर्ण ई. शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, मतकरी आणि खूप सारी मोठया लेखकांची मोठी, मोठी आणि चांगल्या पुस्तकांचं मोठ्यानं, सार्वजनिक वाचन केलं जायचं. सर्व कामाची आवरा आवर झाली की, सर्व घरचे लोक चिंचेच्या सावलीत बसून सगळे एकदम वेगळ्या वातावरणांत जातं असत. कधी शिवाजी महाराजाच्या राज्यात, कधी महाभारत काळात, कधी ययाति – देवयानीच्या काळात, स्वातंत्र्य पूर्व काळात, रामराज्यात जातं असत. महिनाभर रेडिओ, पुस्तकं वाचन आणि काका, काकू, मावशींच्या सहवासात समृद्ध अनुभव घेऊन सुट्टी कशी संपली ते समजायच नाही.
जूनमध्ये नवे युनिफॉर्म, कोरी पुस्तकं, वह्या कंपास बॉक्स, पेन, चप्पल खरेदी केली जायची. आणि नवे स्वप्न आणि उमेदीने रश्मी आणि बहिणी पुढच्या वर्गात जायच्या.

ई. दहावीला कर्नाटक शासनाने सर्व मराठी शाळांमध्ये कन्नड कंपलसरी केल आणि राश्मीच्या हातात, “कन्नड कलितीवरीगागी” असं कन्नडमध्ये लिहिलेलं पुस्तकं आलं. सगळ्यात सुपरफास्ट बोलणारे जगदाळे सर वर्गात यायचे. वंदू, यरडु पासून नूर आणि अ आ पासून वाक्य लिहिणं, स्वतःच नाव लिहिणं सार शिकवायचे. त्यांच्या हातात वेताची छडी असे पण कधी मारण्यासाठो उपयोग नाही केला त्यांनी.

सरनी पेढे का मागितले?

आता दहावी सुरु झाली होती. विनितानं रश्मी, चंदा व स्वत:साठी मनगटी घड्याळ आणलं होतं.

कॉलेजसाठी तालुक्याला जावे लागायचे. ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा, पंचवीस वर्षांपासून शेतात काम करणारा पिढीजात वाटेकरी, विनिताचा काळजीने बळावणारा आजार, मुलींची फी, पास, शाळा कॉलेजचा खर्च, थकलेली उधारी, कर्ज… विनिता सर्व बाजूनी विचार करत होती. हिशेब करून खर्चाची घडी बसायचं काही लक्षण दिसेना. कॉलेज सुरु झालं की शिक्षणासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मुली, विचारानं ती बेचैन झाली. तिला पुढील प्रश्न सतावायला लागले. माळ्यात राहुन काळजी करण्यामुळे उत्तर मिळेना.

आता मुली वयानं आणि शरीरानं मोठया होतं होत्या. रश्मीने टिन एज गाठलं होतं. रश्मी, चंदा हायकूलमध्ये आणि सई प्राथमिक शाळेत जाऊ लागल्या. दहावीचं वर्ष म्हणजे सगळीकडे ” कसा चाललाय अभ्यास?” अशी विचारणा केली जायची.

नववीत असताना, सर्वाना डान्स, गाणी, मराठी भाषा विषय शिकविणाऱ्या एकमेव मॅडम सर्वाना, सोडून देवाघरी गेल्या.
निरोप समारंभाच्या दिवशी सगळ्या मुली धाय मोकलून रडत होत्या. रश्मीच्या आईनं हायस्कुमध्ये निरोप समारंभाच्या वेळी भेट म्हणू काही वस्तू देण्यासाठी रश्मीला पैसे दिले होते. मैत्रीण वैजू बरोबर भांड्यांच्या दुकानातून रश्मीने स्टिलचा तांब्या आणि फुलपात्र खरेदी करून शिक्षकांसाठी भेट दिली. रश्मी आणि सर्व दहावीच्या वर्गाने
तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कर्नाटक मंडळाची दहावीची परीक्षा दिली.

“नाडकर्णी, पेढे घेऊन ये ! पेढे!” हे सरनी बोललेलं वाक्य रश्मीने आईला सांगितले तेव्हा विनिता जून महिन्यात आलेला दहावीचा निकाल समजली. विनिताची प्रचंड मेहनत आणि कष्ट याचं यशात रूपांतर झालं. रश्मीची शाळा, परीक्षा यश हे साऱ्या घराचं यश होतं. रश्मी मेहनती आहे. चंदा, सई मेहनती आणि हुशार आहेत हे विनिता जाणून होती. आणि एक टप्पा यशस्वी झाला. वेळोवेळी, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केलेल्या सर्वांना नमस्कार 🙏करून पेढे वाटण्याचा कार्यक्रम सुरु झाला.

Ranjana rao

One Response

  1. मी आधीचे सर्व भाग वाचलेले आहेत, तुम्ही वर्णन खूप उत्तम करता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More