“तू  सदा जवळी  रहा…..” भाग-११. अर्थात: कलाकार विनिता

  भाग -1*  एक आई , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते..   भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण.. भाग-3 * शाळा – कॉलेज ,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट. भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत कुसुम ताईची,  सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….भाग -5  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते  नि:शब्द शांतता, प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीच वैधव्य  सदृश्य जीवन.  भाग -7 * अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग -8*  आईचं मानस दर्शन, रश्मीला राजेशची प्रकर्षाने आठवण..   भाग -9  राजेश एक विचित्र रसायन. देविशाची टयुशन टीचर,
भाग -१० * साखळी-> कोंबडा, खो – खो -> राजू , तुलसी वृंदावन, बोकड, मंदिर, राजेश, रश्मी गावी जातात.
“तू सदा जवळी रहा…,” भाग – ११ *

मालिनी वहिनी – विनिता भेट !

आज सर्व काम उरकून विनिता कामाचे कांही पेपर्स चाळत बसली होती. संजू अक्का, “काकू sssss” म्हणून धावत आली. तिला धावत येताना पाहून सूची पण धावत जाऊन अगोदर विनीता काकूला मिठी मारली. आज एकदम दोघी पुतण्यांना पाहून विनिता खूश झाली. आपल्या दोनही बहिणींना पाहून रश्मी आणि चंदा खुप खूष झाल्या. संजु आणि सुची दोनही बहिणी आणि पाठीमागून आलेल्या काकूंना आणि सानुकली लोचनला पाहून धावत जाऊन हाताला धरून खोपी जवळ घेऊन आल्या. “या वाहिनी ” म्हणून विनितानं हसून स्वागत केल, आपल्या मालिनी वहिनीं चं. विनीला पाहून मालिनी काकूं हसल्या पण आंनदापेक्षा ओशाळवाणं वाटलं त्यांना. एका अर्थाने बरं वाटलं की लहान मुली पूर्वीच्या सारख्या एकत्र खेळत होत्या. संजू, सूची, रश्मी, चंदा, लहानग्या साई आणि लोचन जवळ बसून एकत्र खेळत होत्या.
पाणी प्यायल्यावर बरं वाटलं विनिताच्या मालनी वहिनीनां “आज रविवार, सूची ऐकायला तयार नव्हती. तिला तुझी खुप आठवण येत होती, विनिता. माझ्या कडून वेणी घालून घ्यायला तयार होईना.” म्हणते, “तुला, विनिता काकू सारखी छान, केस न खेचता वेणी घालायला येत नाही. मला काकू पाहिजे. बोलावं काकूला. ते सगळे वाडा सोडून मळ्यात राहायला का गेले? सांग ना आईss?” म्हणून सकाळ पासून प्रश्न विचारतेय. आजीबात ऐकेना. “लगेच संजू पण काकूला बोलावं, काकूला बोलावं” म्हणून आज हट्टाला पेटून बसल्या. “आज काकूला भेटायला मळ्यात जाऊ” म्हंटल्यावर शांत झाल्या दोघी.” मालिनी वहीनी एका दमात बोलल्या. “मुलांचं बरं असतं. मनातलं बोलून दाखवतात, हट्ट करतात”. विनिता कडे पाहून मालिनी वहीनी बोलल्या. “आपल्याला साऱ्या गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात.” ( भाऊजींच्या अपघातानंतर माणसं वेगळी झाली हे पचनी नाही पडलं मालिनी वहिनींच्या.) स्वगत बोलल्या वहीनी पण विनिताला त्यांच्या मनाची घालमेल समजली. आता घर सोडून विनिताला महिना झाला होता.

नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी …, …?

गावापासून दूर मळ्यात रहायला येऊन महिना झाला. कोणत्याही गरजेच्या वस्तू आणण्यासाठी विनिताला स्वत:ला गावात जायला लागत होते किंवा छोट्या रश्मीला शाळेतून येताना आठवणीने रोज काही गोष्टी दुकानातून आणाव्या लागत होत्या. मळ्यात अपुरी भांडी, अत्यावश्यक साहित्यासाठी करावी लागणारी पायपीट, खोपीत राहणं, कसं करत असेल विनिता? बांबूच्या भिंती, त्यावर माती आणि शेणाचा लेप. वर काळी कौलं, दक्षिण दिशेकडे तोंड करून घराचा दरवाजा होता. प्रत्यक्षात हा जुगारच होता. समोर आंघोळीसाठी बांबूची छोटी बाथरूम. त्या पलीकडे नारळाची बाग आणि बाजूला केळीची बाग. बाजूला चिक्कू, पेरू, लिंबूची झाड दिसत होती. भांडी ठेवायला लाकडी कपाटवजा पेटी. बाहेर एक लाकडी कॉट, अंथरुण, पांघरूण घडी करून कोपऱ्यात ठेवलेली. एक पत्र्याची ट्रंक, धान्याची पोती एकावर एक रचून ठेवलेली. सुक्या मिरच्यांची पोती, तंबाखूचे बोद दरवाजा समोरच्या शेड खाली रचलेली होती. खोपीच्या पाठीमागे लक्ष्मीचं मंदिर होतं. मंदिरा पलीकडे विहीर होती. विहिरीचा गाळ, माती, खडक विहीरीच्या बाजूला पडून होता.
छोट्या जाऊकडे करुणा भरल्या नजरेंनं पाहिलं मालिनी वहिनींने.

एकच जेवण, तीन वेळेस कसे जेवले पूट्टू काका?

त्यांना आठवलं, लग्न होऊन आली तेव्हा घर हसरं बनवलं विनिताने. डोळ्याद्वारे प्रश्न विचारायची आपल्याला. बोलका चेहरा, मोठे डोळे, पाटीवर रुळणाऱ्या दोन जाड वेण्या, आणि सर्वांशी आदरानं बोलण्याची लकब. अगदी थोड्याच दिवसांत घरात रुळली आणि लहानांपासून सर्वांना आपलसं केल विनिताने. आपल्या दोनही मुली काकू – काकू म्हणून तिच्या भोंवती घुटमळत राहात. कधी तिच्या लांब वेणीत माळायला गजरा बनव, कधी मेंदीची पान वाटून मेंदी लाव, कधी विणकाम करतानां प्रश्न ❓️विचार, तर रांगोळीत रंग भरायला मदत कर घर भरलेलं होत. संजू आणि सुचीला पण काकूंचा लळा लागला. अगदी विनीता लग्न होऊन घरी आल्यानंतर तीने पहिल्या दोनचं दिवसानंतर प्रश्न केला? “वैनी, येल्लारू एकत्र उटा एके माडांगिल्लरी?”( वहिनी सर्व एकाच वेळी का जेवत नाहीत?) प्रश्न समजला आणि आपण मराठीतून उतरलो, “या घरात अशीच पद्धत आहे. जो, जेंव्हा येईल, तेंव्हा त्याला वाढायचं.”
आणि विनिताचं लग्न होऊन आल्यानंतर तिसऱ्या दिवशीची घटना, मालिनी वहिनींना आठवली.
मुलांसाठी, ताईआजी आणि पुरुष मंडळी साठी तब्बल अकरा लोकांची ताटं तयार केली विनिताने. ताटामध्ये मीठ वाढलं. मिठाच्या डाव्या बाजूला लिंबूची फोड, लोणचं, कोशिंबीर, पापड वाढले. उजव्या बाजूला भाजी, उसळ, आमटी आणि खीर ठेऊन, “उटा तयार आद री, उटा माडलि के बन्नीरी”. म्हणून सर्वांना हाक मारली. कोपऱ्यात अगरबत्ती लावून ठेवली. स्वयंपाकाच्या छान सुगंधात उदबत्तीचा सुवास मिसळला. अन्न ग्रहणासाठी सुंदर वातावरण निर्मिती झाली. भूक आणि भुकेची भावना दोन्ही चाळवली.
आपल्या सहित ताई आणि घरातली सर्व मंडळी एकदम खुश होतो. मालिनी वहिनीनां पूर्वीचे दिवस आठवले.
जसे सर्वजण पाटावर बसले तसं, गरम वाफाळलेला भात, वरण वाढले गेले आणि शेवटी गरम भातावर तुपाची धार धरली. मुलं आणि ताईसहित मोठी मंडळी, पाटावर ताटा समोर बसून डोळे मिटून, प्रार्थना सुरु केली.
सूचीनं हळूच एक डोळा उघडून पानातला पापड तोडला. आई मालिनीने मोठे डोळे केले. आपल्या कडे आई पाहते हे पाहून डोळे गच्च बंद करून सूची प्रार्थनेत सामील झाली.

“उदर भरणं होता,
नाम घ्या श्री हरीचे|
सहज हवन होते,
नाम घेता फुकाचे |
जीवन करी जीवित्वा,
अन्न हे पूर्ण ब्रह्म | |
उदर भरणं नोहे,
जाणिजे यज्ञ कर्म ||
जय जय रघुवीर समर्थ ||” 🙏

खुप गप्पा मारत जेवत होते सर्वजण. प्रत्येकाला चार घास जास्त जेवण गेले त्या दिवशी. तृप्तीची ढेकर देऊन, “अन्नदाता सुखी भव”, म्हणून आशीर्वाद दिला सर्वांनी. मग रोजचं रात्रीची पंगत बसत असे. जेवणाच्या वेळी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होऊ लागल्या. मोठ्या मुलांचं शिक्षण, दिरांची, नणंदेचे लग्न, जमीन, शेतसारा, इन्कम टॅक्स, धान्य, खत, मळयात बकरी बसवणे, उसाच गुऱ्हाळ, साखर कारखान्यातील गळीत हंगाम आणि गावातील घडामोडी, देशामध्ये चाललेल्या महत्त्वाच्या कितीतरी गोष्टी ….
“आज आम्ही तीन वेळेला जेवलो वहिनी साहेब,” पुट्टू भाऊजी म्हणाले. सूची, संजूनी काकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं???
“जेवणाचा सुग्रास वास घेऊन अगोदर नाका ने जेवलो.”
“ही sss ही sss
ही sss” सूची, संजू फीदी, फीदी हसल्या.
“हसू नका चंड्यानो,” पुट्टु काका लाडात बोलले.
“मग जेवणाची सुंदर मांडणी पाहून डोळ्यांनी जेवलो, आणि शेवटी प्रत्यक्ष अन्न ग्रहण केलं.” पूट्टू काकांच् सविस्तर सांगणं मोठ्यांना कळलं तसं सर्वांनी माना डोलाव
ल्या

सणासुदीला, मुलांचे वाढदिवस अशा विशेष कारणांनी ताटाभोवती सुंदर रांगोळी काढली जायची, औक्षण केलं जायचं.

विनिता – रांगोळी कला

मालिनी वहिनीनां पूर्वीचे दिवस आठवले. जेवणाची आवरा आवर झाल्यावर

दुपारच्या वेळी आपण आराम करत असू तेव्हा विनिताचं विणकाम, भरत काम चालत असे. लग्नानंतर विनिताने घरातील सर्व खिडक्या, दरवाज्यांसाठी स्वतः विणलेली तोरणं, पडदे लावले होतो. आकर्षक, नाजूक शुभ्र, तोरणं सुंदर दिसत. वेगवेगळ्या आकारातील रेखीव, रंगीत नक्षीकाम केलेले पडदे आणि तोरण सर्वांचे लक्ष वेधून घेत असतं. कधी ती नाचऱ्या मोराचं विणकाम करी, कधी धावणार हरीण, कधी कळया, कधी उमललेल्या फुलांबरोबर पानं असत. डिझाईन आखीव, रेखीव, प्रमाणबध्द, आटोपशीर, तोलून मापून एकदम इतके सुंदर असे की, नजर कैद होऊन जाई पाहणाऱ्यांची ! दारात काढलेली रांगोळी अप्रतिम असे. गाठीची रांगोळी कुठून सुरु केली, कुठे संपली कोणालाच ओळखता येत नसे. प्रत्येक वेळी वेगळी, सुंदर आणि नावीन्यपूर्ण डिझाईनची रांगोळी काढून, सुंदर रंग भरले जायचे. चैत्रांगण काढावं तर विनितांनच. तोरण, पताका, शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ, डमरू, धनुष्य-बाण, कासव, समई, गौरी, गौरीची पाऊले, गाईची पाऊले, स्वस्तिक, तातपिर – तंतीपिर, सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, नागजोडी, शिव पिंढी, सरस्वती, गरुड, हत्ती, तुलसी वृंदावन आणि रांगोळी तयार. रांगोळी खराब न करता हळद, कुंकू, फुलं रांगोळीला कसं वाहायचं हे संजू, सुचीला शिकवलं. “अंगठा आणि तर्जनीमध्ये रांगोळी किंवा हळद /कुंकू घट्ट पकडून हळूहळू चिमटीमधील रांगोळी सोडून रेषा, टिपके बनवायचे. आपल्या बोटावर, लिहिताना जसा कंट्रोल असतो तसा अंमल ठेवशील तर सुंदर अक्षर, सुंदर रांगोळी निर्माण होईल. रांगोळी रेखाटतानां मध्येच विनिता कन्नड हेल् काढून मराठी बोलायची. दरातील रांगोळीला पाय लागून पुसू नये म्हणून जाता – येता प्रत्येक जण काळजी घेत असे. शेवटी रांगोळी दरवाज्या समोर न काढता बाजूला काढायला सुरुवात केली.

विनिता – गायन कला

विनिताचा गळा तर इतका गोड की, काचेच्या बांगड्याची किण किण वाटे, पैंजणांची छुम छुम वाटे. कंठातून बाहेर पडणारा आवाज, गाण्यातील प्रत्येक शब्दांचा उच्चार करण्याची पद्धतच वेगळी. वाटायचं जिभेवरून कांही शब्द येतात तर कांही कंठातून, कांही हृदयातून, कांही पोटातून, आणि काही वेळेस जणू नाभीतूनच आवाज येतो. आपण जीभ, टाळा, दात आणि ओठांच्या साहाय्याने शब्दोच्चार करतो. कधी नाकाचा उपयोग होता. त्या पलीकडे शब्दोच्चाराचे प्रकार माहि त नव्हते आपल्याला. पण साक्षात सरस्वती बसलिय हिच्या जीभेवर ! आपणच नव्हे तर ताई, भाऊजी, मुले सगळेच सोप्यामध्ये जमलो, अगदी आवाज न करता.
त्या दिवशी कंदिलाच्या दिव्याची काच साफ करताना गुणगुणत होती…

पापीय जीवन, पावन ग्वळे सूव
पर शिव लिंग नमो, हर हर शंभो महादेवा ||
हेळ दे, केळ दे बरूवदू मरणा, कालन पाशद कंठा भरणा, ब्यळद कुडले निन्नोळु भक्ती, क्वडू जीवन मुक्ती,
हर हर शंभो महादेवा||

जशी चाहूल लागली तसा आवाज बंद केला तीनं आणि कामात गढुन गेली. पण संजू, आणि सूची गाणं म्हणण्यासाठी आग्रह करायला लागल्या पण त्यांची विनी काकू ऐकेना. “विनिता आज शुक्रवार, लक्ष्मीचं भजन म्हण संध्याकाळी दिवा लावतेवेळी,” ताई बोलल्या.
आणि अप्रतिम भजन झालं…
भाग्य द लक्ष्मी बारम्माsss,
भाग्य द लक्ष्मी बारम्माsss ,
हेज्जेय मेलिन हेज्जेय नि कुत
गेज्जेय काल गोळू ध्वनिया तोरुत,
सज्जन, साधू पूजेय वेळिगे
मज्जगी वळगीन ब्यणी यंदु
भाग्य द लक्ष्मी बारम्मा ||

“गाणं म्हणताना साक्षात सरस्वती बसलिय हिच्या जीभेवर,” ताई आणि मोठया सासूबाई बोलल्या. कोणतीही गोष्ट मन लावून करत होती विनिता.

-“पतीय प्राण वनू उळीसुव तनका, अंधकार वनू इळीसुव तनका
बिडेन निंन्न पादा, नन्न कर्म वेदा,
राघवेंद्र, राघवेंद्र……….”,

हां हां म्हणता मुलींचा अभ्यास घेत, घेत मराठी भाषा आत्मसात केली आणि अस्खलित मराठी शिकली. गाणी म्हणताना मराठी उच्चारावरून स्पष्ट जाणवत होते.

-रामा कधी रे धावून येशी, व्याकुळ सीता वनातssss

-गजरी, गजरी तोडीत बोरे शबरीssss

-पूर्व दिशेला गुलाल उधळून, उष:काल जाहला, उठी, उठी गोपाळाssss

-घे जन्म तू फिरोनि, येईन मीही पोटी, खोटी ठरो ना देवा ही एक आस मोठी..

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचा

आणि मुलांच्या कवितांना तालात म्हणायला शिकविले.

-देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो….

-येरे घना, येरे घना,
न्हाऊ घाल माझया मना..

-हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,…

-गे माय भू, तुझे मी
फेडीन पांग सारे,
आणीन आरतीला,
हे चंद्र, सूर्य, तारे …..

यादी लांबच लांब…

लोचन, रशमीचा जन्म‼️

खेळीमेळीच्या वातावरणातच थोड्या अंतरानं दोघी जावांकडे आनंदाच्या बातम्या होत्या. पण सुचिता नंतर इतक्या लवकर आपल्याला आणि विनिता खूप लहान आहे म्हणून दोघीनाही इतक्या लवकर बाळ नको असं घरच्या मंडळींनी परस्पर ठरवलं. तालुक्याच्या डॉक्टर कडून गोळ्या आणल्या, मोकळ होण्यासाठी. घाबरली विनिता आणि, “वाहिनी” म्हणून गळ्यात पडून आसवं गाळत होती. शेवटी परसदारी झाडाच्या बुंद्याखाली टाकून दिल्या गोळया आणि, “गोळ्या खाल्ल्या, परंतु काही उपयोग झाला नाही,” म्हणून कांगावा केला दोघीही जावानीं मिळून. कांही महीन्या नंतर गुटगुटीत, मोठे डोळे, खुप सार जावळ असलेली बाळ, लोचन जन्माला आली.
मोठ्या वन्सनी विनिताला कोल्हापूरला नेलं. आणि गणपती- गौरी विसर्जनाच्या दिवशी, तुळतुळीत डोक्याच्या, गुटगुटीत, गोलसर मोठ्या डोळ्याच्या रश्मीचा जन्म झाला. सारं घर लहान मुलांच्या बाललीलात रममाण झालं. नेहमी लहान मुलांपासून चार हात दूर राहणाऱ्या पुट्टू भाऊजीनी रश्मी बाळाला उचलून घेऊन बोबड्या बोलात बोलू लागले, तशा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मुली वाढत असताना चंदा, सईचा जन्म झाला. सगळं ठिक चाललं होत. मुलांची शाळा, अभ्यास, शेतीवाडीत सुधारणा, शेत सारा, सात – बारा, शेत- सारा जास्त बासू नये म्हणून सात बारा वरील नावं बदलून घेतली. लहान भाऊजींची लग्न झाली. नाडकर्णी कुटुंबाच गोकुळ झालं होतं.

🦜😊🤦‍♀️🤷🙆‍♂️🙆🙅‍♂️🙋👨‍👩‍🎨👶🧒👦👨🧑👱‍♂️👨‍🦰👨‍🦳👨‍🦲👱‍♀️👩‍🦰👩‍🦱👩‍🦳

कोल्हापूरहून कुंतल, नणंदेची मुलगी
घरी आली की थट्टा, मस्करी, हास्य विनोद, खेळ सुरू व्हायचे. आल्या आल्या विनिता मामीच्या गळ्यात पडली आणि गुगली टाकली कुंतलनं,
मामी, निंद पोट तुंबी ह्यण मक्कळ अद री,” (मामी तुमचं पोट भरून मुलीचं आहेत. ) , कुंतल विनिताच्या पोटाला हात लावून बोलली आणि जोरजोरात हसायला लागली. तिच्या बरोबर सगळेच हसायला लागले. विनिता तिची आवडती मामी होती. दिले उतर विनीनं” मी पण कोणाची तर मुलगीच आणि तू पण. काय फरक पडला का त्यामुळे? तुला पडतो का? उलट तुझे लाड होतात सर्वच मामा – मामीकडून”. “हां, ते बाकी खरं आहे हं मामीटली” असं म्हणून लाड लाडानी विनी मामीची हनुवटी पकडली. “माझी लाडकी, भोळी मामी, म्हातारपणी कोण बघेल तुला आणि मामाला?”
म्हणून पळाली मुलांबरोबर खेळायला.

धुसपूस नव्हती की, किटकिट नव्हती.
भाऊजी गेले विनीताला एकटीला टाकून आणि विनिता एकटीच नाही तर नाडकर्णींचं गोकुळ स्तब्ध झालं.

आज कशी पोक्त वाटते पोर. रयाचं बदलली विनिताची.

कसं होणार रश्मीचं शिक्षण?
विनिता परिस्थितीला शरण जाणार का? आशा सोडणार का?

One Response

  1. खूपच सुंदर गुंफण रश्मीच्या आयुष्याची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 53* अर्थात स्थित्यंतर पुर्व स्थिती

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More