“तू सदा जवळी रहा…” भाग – 18 (भावनिक )

भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात सुखावते भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण…. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….
भाग 4.* “कुसुम ताई”, -अनुभूती सई, चंदाच्या बालपणातिल आठवणी…. भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना…🙏.   भाग – 6* रश्मीच्या, आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि….. सदृश्य जीवन.   भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी… भाग- 8* आईचं मानस दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली.  भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?  भाग – 10* साखळी, मंदीर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* मध्ये वाचा, सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कसं टिकवतात ? रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?   भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…. ? @ चंदा कुठे राहिली? @ चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलनं का मारते?  भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबाचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना का भेटली? सर नी पेढे का मागितले?   भाग -15 वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी, पुतळी लायब्ररीत का बसत होती?  भाग-16 * विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या डोळ्यातं काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17 @ दिवाळी म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18 कोणी हाक मारली रश्मीला? काय झालं रश्मीच्या परीक्षेचं ?  रश्मीची खंडाळा भेट. कोणाच्या आठवणीत रमली रश्मी?

वाचा, share करा, अभिप्राय द्या नक्कीच आवडतील मला 🙏🌹

कोणी हाक मारली रश्मीला ? 


सतत आलेला तणाव कमी झाला. तणावा मुळे दुर्मुखलेल्या चेहऱ्यावर प्रथमच आलेल्या निर्मळ हास्यामुळे रश्मी, काका, काकूं असे तिघेही एक, एक पायरी चडून वर येत होते. प्रत्येक सोपान चढताना मन प्रफुल्लित होऊन शरीराबरोबर धावत होतं. 
दत्त पादुकांचे दर्शन 🙏घेऊन अतिशय प्रसन्न मनाने 😊बाहेर पडताना काका, काकूना; रश्मीचा तणावमुक्त चेहरा पाहून समाधान वाटलं. काकूंनी सांगितलेली अईडिया आणि त्यावर त्वरीत काकांनी केलेल्या अंमलबजावणीमुळे रश्मी मनोमन दोघांचे आभार मानत होती. रश्मीनं काकूंचा हात पकडून डोळ्यांनी 👀 बोलली. काकू तिच्या स्पर्शातून समजल्या, रश्मीला काय म्हणायचंय ते. धूप, अगरबत्तीचा सुवास पेढ्यांच्या विशिष्ट सुवासात मिसळून एक वेगळं वातावरण सर्वत्र भरून राहील. 
आणि मंदिराच्या कमानीजवळून बाहेर पडताना आवाज आला.  “रश्मी sss,”हाकेच्या दिशेने काका, काकु आणि रश्मीनं पहिलं. काकूंचा हात सोडवून घेऊन,  
“तुम्ही…..! ” म्हणून रश्मी समोर धावली.  
दत्त गुरूंच्या दर्शनानंतर सोमण सरांच दर्शन झाले. मामींना पाहून तिला बर वाटलं. काका, काकू आणि रश्मी खुश झाले. पहिला प्रश्न आई , चंदा, साई बद्दल? दुसरा प्रश्न ई. 12 परीक्षेच्या फॉर्म बद्दल? थांब रश्मी ! एकदम,  सर आणि मामींना किती प्रश्न ❓️विचारतेस?, “विनिता वहिनी,  पुढच्या आठवड्यात येणार आहेत !.” काका उतरले.  काका, काकू आणि रश्मी खुश झाले. पण 12 वी परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख निघून जाईल. प्रश्न? , शंका 🙄 मानत ठेऊन गप्प राहिली. 
आणि असेच दिवस निघून जात होते. मनातली भीती कमी व्हायला बरेच दिवस गेले. पण पूर्वीसारखं हसणं बंद झालं. परीक्षेचं काय? शिक्षणाचं काय? भवितव्य काय? काय होणार आपलं? असं किती दिवस रहावे लागणार? सगळंच अनिश्चित का वाटतंय?  अशा असंख्य प्रश्नांची मालिका मानत ठेऊन वाट पाहत होती. तिला माहित होतं, उत्तर फक्त्त आईच शोधणार. आणि फॉर्म भरण्याची तारीख? त्याचं काय ? हे सारं थोडं होतं की काय? काकांकडे ओळखी, अनोळखी लोकांकडून रश्मीच्या लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले. काकु, काका धास्तावले. काका आणि काकु ; विनिताची तितक्याच आतुरतेने वाट पाहू लागले, जितक्या आतुरतेने रश्मी वाट पाहत होती. 

         घरातून बाहेर पडलेला माणूस वेगळ्या वातावरणात असतो त्यामुळे त्याची विचारपद्धती बदलते. रश्मीचं तसंच झालं. पण इकडं काय झालं? इकडे विनितानं स्वतःला मनानं आणि शरीरानं सावरायला वेळ घेतला. रश्मी सुरक्षित असल्याने तिला धीर आला. पहिल्यांदा माझ्या मुलींची सुरक्षितता म्हणताना विनिताला स्वतःचं आरोग्य टिकवणं पण खुप महत्वाचं होतं.


 सर्वात अगोदर घर बदललं. विनितानं सबुरीने घेतलं. सर्व खात्री झाल्यावर तीनं निर्णय घेतला आणि मगच रश्मीला भेटायला गेली. विनितानं ठरवलं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. दरम्यान काकांनी सर्व स्थळां बद्दल सांगितलं. त्यांना आपल्या विनिता वहिनींचा जिद्दी स्वभाव आणि ठरविलेल्या मार्गावरून जाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष माहीत होता. विनिता वाहिनी साऱ्याची तयारी करूनच आल्या होत्या हे पण काका, काकूं समजून चुकले. कोणी रोखू शकत नव्हतं वहिनींना, ना कोणी त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत होतं. त्यांना त्या धूसर असलेल्या वातावरणात पण रश्मीच उज्वल भविष्य दिसलं. त्यांनी मूकपणे संमती दिली आणि त्यांच्या वाहिनी साहेबांच्या निर्णयाला मनोमन प्रणाम केला. 

छोटू काकांनी रश्मीसाठी आलेल्या स्थळांना परस्पर नकार का दिला? विनितानं, रश्मीला परीक्षेस बसवण्याबाबतचा विचार का बदलला? काय होता निर्णय? आपण वहिनींना सल्ला द्यावा असं का वाटल नाही काकांना? विनिता वहिनींनी घेतलेल्या निर्णयाला छोटू काका आणि काकूंच्या असलेल्या मूक संमतीचा अर्थ काय होता? विनिताचा निर्णय सर्वाना मान्य होता का? 
“विनिता”, समजण्यासाठी तिच्या सहवासात राहीलं  पाहिजे. तिच्या धोरणी स्वभावाचा अंदाज काका आणि काकू दोघांना होता. प्रश्न होता रश्मीला हे समजवायचं कसं? आणि कोण?  
पण त्याची पण चिंता नव्हती विनिताच्या दीर आणि जावेला. ते कामं विनिता वाहिनी स्वतः करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत हे पण होतं माहीत काका, काकूंना.  

काय झालं रश्मीच्या परीक्षेचं ?  

एकदा नेमकं काय ❓️ आणि कसं करायचं? हे ठरवल्या नंतर विनितानं त्या दिशेने कामं सूरु केलं. 
 इकडं आपलं वर्ष वाया गेलं म्हणून, रश्मी मनोमन दुःखी होती, हळहळत होती. या साऱ्याला आपण जबाबदार असल्याची बोच घेऊन दिवस घालवत होती. रश्मी, एक अती विचारी, प्रौढा वाटत होती आता. पूर्वीचा खेळकरपणा, खट्याळपणा नाहीसा झाला होता. वागण्यात आणि बोलण्यात पोक्तपणा जाणवत होता. आपल्या मुळं आईला होतं असलेला त्रास मनात खोलवर उतरून, वागण्यातून स्पष्टपणे जाणवत होता. काका – काकू प्रेमानं वागून पण रश्मीच्या वागण्यातील बदल, अलिप्तपणा सहज जाणवण्याइतपत नजरेत येत होता. पण या साऱ्या गोष्टीकडे सदया दुर्लक्ष करणं योग्य वाटल विनिताला. विनिता आई इतक रश्मीला कोण ओळखत होतं? स्वभावात स्थित्यंतर तर होणारच. विचार करणारच रश्मी. गंभीर तर होणारच. टीन एज मध्ये शारीरिक, मानसिक बदल होतातच. आता तीची बुद्धी आणि एनर्जी योग्य प्रवाहाकडे वळवणे गरजेचे होतं. विनिता हे सारं जाणून होती. आणि म्हणून तीनं आल्या परिस्थितीला अतिशय धैर्याने सामोरं जायचे ठरवलं आणि रश्मीकडून पण तिच अपेक्षा होती. सतत अभ्यास, शाळा, कॉलेज आणि कामात व्यस्त असणाऱ्या रश्मीला एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकामा वेळ पहिल्यांदाच मिळाला. सतत उदयोग मग्न व्यक्तीला, जेव्हा एकदम काहीच कामं नं करता सक्तीनं रिकामं राहावं लागत तेव्हा वेळ आणि बुद्धीचा योग्य वापर करणं आणि योग्य मार्गावर ऊर्जा वाळविणे आवश्यक असते. टीनएज मध्ये मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा प्रवाह सतत वाहत असतो. नेमकं त्याच वेळी खेळ, अभ्यास आणि शिक्षणाची महत्वाची वर्ष असतात. त्यामुळं फारसा प्रयास नं करता युवाशक्तीच्या ऊर्जेचा योग्य वापर होतो. पण इथली परिस्थिती वेगळी होती. विनिता जाणून होती. मुख्य म्हणजे, आपण रश्मीला कधीच स्वयंपाक, निवड, टिप्पण, विणकाम, भरतकामं किंवा तत्सम गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिल नाही हे पण तितकच सत्य होतं.  
रश्मी अशी रिकामी किंवा शांत बसणाऱ्यांपैकी खचितच नव्हती. आता रश्मी आपला वेळ आणि बुद्धीचा वापर कशा पद्धतीने करतेय ते येणारा काळ ठरवेल. काही गोष्टी नं ठरवलेल्या बऱ्या.  
बालक असो वा वृद्ध , स्त्री असो वा पुरुष “ग्रहण क्षमता” आणि “स्मरण शक्ती” या दोन्हीची आवश्यकता असतेच. फरक इतकाच की कोण त्याचा किती प्रमाणात? कशासाठी? आणि कशा पध्दतीनं ? वापर करतंय. किंबहुना कोणतीही गोष्ट वापरात राहिली तर चांगली, अन्यथा गंज चढतो. म्हणून “ग्रहण” केलेल्या “बौद्धिक”ला “स्मरणा”च (ऑइलिंग) वंगण लावलं तर “शिक्षण प्रवास” आणि “जीवन प्रवास” दोन्हीही स्वहिता बरोबर “देश हिताचं” असेलं. “ग्रहण- क्षमता”, “स्मरण-शक्ती” “वृद्धी” ला कधीच खीळ बसता कामा नये

  अन्यथा पर्याय भरपूर होते. पळवाटा भरपूर होत्या. आणि विनिताला माहीत होतं त्या फालतू पर्यायातून निष्पन्न काहीच होणार नव्हतं.  
“रश्मीला, मुंबईला, आपल्या नातीला सांभाळण्यासाठी पाठवं,  विनिता. नाहीतरी  नुसती बसून काय करणार आहे रश्मी?  रिकामं मन सैतानाचं घरं” दूरच्या दीरांनी फुकटचा सल्ला दिला.  त्यांना रश्मीच्या रिकाम्या वेळेची चिंता होती की नातू सांभाळायला मोलकरीण हवी होती❓️ बालमजूर नियमाबाबत अनभिज्ञ होते जणू. 
“एखादं स्थळ पाहून लग्न करून टाक रश्मीचं! शिक्षणाचं खूळ डोक्यातून काढून टाक”, न मागता आदेश दिला अनाहूतपणे.  
“शेवटी स्वयंपाक घरात तर जाणार आयुष्य. काय दिवे लावले? डोक्याला त्रास नुसता” आणखी एक विचार व्यक्त झाला.  
 हे सारे सल्ले देणारे विनिताचे आपले लोकं होते.  मदत काहीच नाही पण सल्ले फार. “एखाद्या व्यक्तीच्या, चांगल्या विचाराचं खच्चीकरण कसं कराव ? हे कोणाला, कोणत्याही शाळेत शिकवलं जातं नाही, ना त्याच्याबद्दल पुस्तकं उपलब्ध आहेत.” तरीपण अगदी अनाहूतपणे किंवा जाणून बुजून या गोष्टी मुलींच्या बाबतीत होतच असतात. 
  ‘”निष्कारण हसणाऱ्या मुलीवर आणि विनाकारण रडणाऱ्या मुलावर विश्वास ठेऊ नये असं म्हणतात”. “तुला अजूनही वाटत, रश्मीला पुन्हा कॉलेजला पाठवावं?” असं शेवटी एकानी विचारलच. “आणलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देतेस, कारण तरी काय?” एकजण जरा वैतागून बोलले विनिताला.  
“रश्मी, तू लग्नाला तयार आहेस?” विनितान सर्वां समोर रश्मीला स्पष्ट विचारलं 
“नाही, मी लग्नाला तयार नाही, मला पुढ शिकायचं आहे”. रश्मी स्पष्ट शब्दात बोलली. तसें समोरचे गृहस्थ वैतागले. “तुमचं नशीब, आम्ही प्रयत्न केले. आता या पुढ आजिबात नाही करणार मदत”. शेवटी स्पष्ट नाराजी व्यक्त केली त्यांनी.  
पण खरं सांगायचं तर, मदतीच्या नावावर जी स्थळं त्यानी दाखवली होती ती आगीतून, फोपट्यात टाकणारी आणि कोणतही भवितव्य नसलेली होती. मुख्य म्हणजे विनितानं स्थळाची अपेक्षाच ठेवली नव्हती. सुमारच काय कसलीही स्थळ नको होती आता. रश्मीच्या शिक्षण घेण्याच्या इच्छेविरुद्व कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता विनिताला.   

नावं ठेऊन खच्चीकरण करणाऱ्या व्यक्तींना मागे ठेवले विनितानं. तिला मदत करणारे काहीही नं बोलता, न प्रश्न विचारता, विना अट फक्त मदत (unconditional) करत होते. अशाच काही मोजक्या वंदनीय व्यक्ती भक्कमपणे पाठीशी उभ्या होत्या विनिताच्या.
मुलींना शिक्षण देण्याबाबत एवढा तकलादू विचार असता तर तीनं मळा विकायचा निर्णयचं घेतला नसता. “ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान” या वृत्तीची विनिता नाही हे वारंवार सिद्ध कराव लागत होतं. माणसं तर माणसं पण, परिस्थिती पण तावून सुलाखून काढत होती विनिताला. रश्मीसाठी वारंवार सांगूनही आणि नकारात्मक भूमिका स्पष्टपणे घेऊनसुद्धा, लोचट माणसांच्या लग्नासाठी पाठपुराव्याच्या काटकटीमुळं टुकार स्थळांना छोटू काका वैतागले आणि एक दिवस बोलून गेले. 
 “तरुण मुलगी घरात असंण, वैताग आणणार आहे. काय करायचं आता?” काका बोलले.    
“छोटू मामा ! कसे आहात तुम्ही?” काय झालं मामी? मामा, का वैतागले आहेत?” प्रभास दादा दारातूनच बोलले. तस काकूनी दारात जाऊन, हसतमुखानं प्रभास दादाचं स्वागत केलं. “ये प्रभास, आत ये” काकू बोलल्या. 
   आपल्या सर्व नातेवाईकांना रश्मी पत्राद्वारे नेहमी भेटत होती. प्रत्यक्षात भेटी काही वेळेस होतं असतं.  पण शिक्षणातील प्रगती,  दिवाळी,  आणि विशेष गोष्टी हमखास पत्राद्वारे कळविण्याची सवय विनिताने लावली होती. मोठी,  मधली,  छोटी आत्या,  काका,  दादा यांना हमखास पत्रव्यहार केला जाई.  त्यामुळं प्रत्यक्षात भेटणं,  पाहणं कमी प्रमाणात होतं असे.     प्रभास  दादा आत आला. मोठ्या आत्याचा मुलगा, प्रभास दादाला कितीतरी वर्षानंतर पाहत होती रश्मी.  

“असं मधेचं, रश्मी कॉलेज सोडून इथं काय करते?” दादाला प्रश्न पडला. दादा कोल्हापूर मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या आसपास नोकरी करत होता. प्रभास दादाचा मोठा मुलगा पहिलीत होता आणि दुसरा मुलगा दोन महिन्याचा होता. मोठी आत्या, कधी सुधांशु दादाकडे भोपाळला जाई, कधी प्रभास दादाकडे राही, तर कधी कुंतल अक्काकडे. आता सध्या ती प्रभास दादाकडे खंडाळ्याला राहत होती. काका काकूंशी गप्पागोष्टी करता, करता त्याला बऱ्याच गोष्टी समजल्या. आणि जेवता, जेवता छोटुकाकांनी दादाला आपली अडचण संगीतली. थोडावेळ विचार करून दादा बोलला, “मी रश्मीला खंडाळ्याला घेऊन जातो!” 
“रश्मीसाहेब, प्रभासदादा बरोबर खंडाळ्याला जातेस का?” काकूंनी विचारलं.  
काका काही बोलले नाहीत. आबा गेल्यापासून सातत्याने मदतीचा हात देणारे छोटू काका आणि काकूंचा आशीर्वाद घेऊन रश्मी निघाली.

रश्मीची खंडाळा भेट.

“अरे मामा, तिला काय विचारतो आहेस?” दादानी छोटू काकांनाच प्रश्न विचारला आणि रश्मीकडे पाहून बोलले, “चल रश्मी, बॅग भर, आपण उद्या सकाळी निघू खंडाळ्याला.” दादांनी सांगितलं.  काका आणि काकूंचा आशीर्वाद घेऊन रश्मी निघाली खंडाळ्याला.
दुसरे दिवशी संध्याकाळी दादांबरोबर रश्मी खंडाळ्याला मोठ्या आत्याच्या दारात उभी राहिली.  
“ये आई ! हे बघं, तुला भेटायला कोण आलायं?” दादानी आत्याला हाक मारली 
आत्या खरंच किचनमधून बाहेर आल्या, पाठोपाठ वाहिनी आणि छोटा चिनू पण आईचा पदर धरून उभा होता. 
“रश्मीssss!” आत्या एकदम जोरात ओरडल्याचं.
“ए म्हातारे, हळू बोल, बाळ दचकेल.” दादानं आईला प्रेमानं रागावलं.😇😂
“मी?? म्हातारी??” आत्यानी दादाकडे डोळे वटारून पाहिलं 🙄
“एकदा नव्हे दोन वेळेस आजी म्हणून प्रमोशन दिलं हिला पण स्वतःला अजून म्हातारी समजत नाही, ही म्हातारी आई.” दादा मुद्दामहून आत्याला चिडवतं होते.  
“प्रभ्या, मला म्हातारी म्हणतोस होय? थांब तुला फटकाच देते”. आत्यानी दादाच्या पाठीत हळूच चापटी मारली. वहिनी, चिनू, रश्मी, आत्या, प्रभास दादा सगळे हसतं राहिले. दादा आणि आत्यानी वातावरण एकदम हलकं बनवलं.  😛
“चिनू, उद्यापासून रश्मी आत्या तुझा अभ्यास घेईल हं, मम्मीला त्रास द्यायचा नाही!” दादानं सांगून टाकलं.  
चिनू, रश्मीला आपाद मस्तक न्याहाळत होता.  
चिनू काही बोलला नाही, पण त्याला रश्मी आत्या अभ्यास घेणार, हे काही फारसं रुचलं नसावं. 
प्रभास दादा, ई. बी. च्या क्वार्टर्स मध्ये दोन मुलं, वहिनी आणि आईबरोबर राहत होता. वाहिनी चिनुचा अभ्यास, लहान बाळ आणि घर व्यवस्थित सांभाळत होत्या. सर्वजण बऱ्याचदा गप्पा मारत असतं. आत्या, दादा, वाहिनी सारेच एकदम प्रेमळ होते. चिनू सकाळी शाळेत जायचा आणि दुपारी परत येऊन जेवण करून अभ्यास करत असे. संध्याकाळी खेळायला जातं असे. रात्री जेवण झालं की, गोष्टी ऐकता, ऐकता चिनूची स्वारी झोपी जात असे. दादा सकाळी कामाला निघायाचे ते संध्याकाळी परत येत होते. कधी कधी आत्या बहेरं घेऊन जायची रश्मीला. वेळ अगदीच संथ गतीने जात होता. 
काही वेळेस रश्मी, चिनुबरोबर पुस्तक घेऊन बसायची, गोष्टी सांगायची. आता चिनू, रश्मी बरोबर बसून शाळेतील गंमती, मित्र, मैत्रिणीं, टीचर यांच्याबद्दल सांगायचा. आता दोघांचं मेतकूट चांगलं जमलं होतं.  
“रश्मी आत्या,” चिनूनं आपल्याच नादात खेळता खेळता हाक मारली
“हं, बोल चिनू बाळा”, रश्मी बोलली 
आत्या, मला बाळा म्हणू नको”, इति चिनु 
“का ले, काय झालं आमच्या चिनू बालाला?”रश्मीनं मुद्दामहून बोबड्या बोलात प्रश्न विचारला 
“आत्या, सगळे बाळाचे लाड करतात. त्याच्याकडे सगळ्याचं लक्ष असतं. खेळणी पण त्यालाच आणतात.” चिनूने आपल्या मनातली खंत बोलून दाखवली. आपलं मत स्पष्टपणे मांडत होता.  

“मम्मी, आता माझा अभ्यास पण घेत नाही”, त्यानं संदर्भ दिला 
“मम्मी, बाबा मला पुर्वीसारखं फिरायला पण नेत नाहीत,” चिनूनं अजून पुस्ती जोडली.  
“बाळ उठला. बाळ झोपला. बाळाची अंघोळ, बाळाचं रडणं, बाळाचं खेळणं हेच चालू असतं. मम्मी, बाबा, आज्जी सगळे बाळाचे लाड करतात. 
“बघतेस ना तू रश्मी आत्या? चिनुचे प्रश्न आणि त्याचा रोख लक्षात आला रश्मीच्या.  
“हं, तुला कोंडा देऊन घेतलाय विकत घेतलाय,” आत्या चिनुला चिडवून बोलली 
किती बालसुलभ प्रश्न होते त्याच्या मनात. सर्व प्रश्न आणि संभाषण, एकदम खरं होतं त्याच. घरात नवीन बाळ आलं की, काही वेळेस प्रश्न नं विचारता वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात मुलं. बालकाची मानसिकता; आपल्याकडे एकदम होणारं दुर्लक्ष, मम्मी, बाबांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अचानक एक दिवस बदलतो आणि आपल्या प्रेमात नवीनच वाटेकरी येतो. या साऱ्या गोष्टी, मनातील प्रश्न आणि आपल्याकडे होणार दुर्लक्ष कारणासहित मोजक्या आणि स्पष्ट शब्दात मांडणं जमतं कांही मुलांना. चिनुला ते उत्तमरीतीने जमलं होतं.


“आज्जीटले sss, तुझ्याशी कट्टी” गाल फुगवून मधलं बोटं तर्जनीवर ठेऊन आजीच्या दिशेने पहात, चिनूनं नाराजी व्यक्त केली. आता त्याच्या डोळ्यात पाणी चमकत होतं. पण तेवड्यात दादांच्या गाडीचा आवाज आला तसा, “बाबा sss, ! डुर्रर्र, डुर्रर्र ” करत बाबांकडे धावला. त्याला माहीत होतं, स्टँडला गाडी लावण्याअगोदर जवळ गेलंतर गाडीवर बसवून, बाबा मस्त राउंड मारणरं.
पंधरा दिवस राहिल्यावर रश्मी परत जायला निघाली… 
पण रश्मी, आता ना आई कडे गेली ना काकांकडे. 
मग कुठे जायचं होतं आता? दादा, वाहिनी आणि मोठ्या आत्याचा आशीर्वाद घेऊन रश्मीचा पुढचा प्रवास सुरु झाला.

कोणा बद्दल ? कोणत्या जागे बद्दल आठवणी आल्या?

  प्रशस्त,  या मोठ्या रस्त्या पासून त्या रस्त्यापर्यंत, या गल्ली पासून त्या गल्लीपर्यंत भलं मोठं चार खाणी, उंच चार मजली घर. गोरीपान, सहा फूट उंच,  गोल चेहरा, घारे डोळे,  प्रेमळ नजर, लांब सडक केस गोल, गोल करून मानेवर रुळणारा मोठा अंबाडा,  आंबाड्यावर कधी अबोली, कधी मोगरा कधी वेग वेगळ्या सुवासिक फुलांचा गजरा,  पंचवीस पैशाच्या नाण्याइतके गोल लाल कुंकू,  गळ्यात मंगळसूत्र आणि बोरमाळ, कानात सोनं आणि मोत्याच्या कुड्या, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या बरोबर पाटल्या, बिलवर,  गोल सहावारी  कधी काठा पदराची तर कधी नक्षीदार सुंदर वेगळ्या पोताची साडी,  सतत कामात मग्न,  हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. जाणू चालती, बोलती कोल्हापूरची महालक्ष्मी. घरी येणाऱ्याचं आग्रहानं स्वागत केलं जाई. पाहणाऱ्याचं  मन आदरानं आणि प्रेमानं प्रसन्न होऊन नैसर्गिक स्मित हास्य चेहऱ्यावर येई. म्हणून माहेर आणि सासरच्या माणसांची नेहमी वर्दळ असे.  प्रणवचे आजोबा आणि बाबानी या प्रेमळ व्यक्तीच्या हातात घराची सूत्र सोपवून खूश आणि निर्धास्त होते.  कोणी होती घराची सारी सूत्र हातात घेणारी व्यक्ती?

“काय ठेवलंय ग रश्मी तूझ्या गावच्या जत्रेत?  इथं रोज जत्रा भरत असते. प्रणव, ओंकार आणि आदित्यsss,”  तिघांना हाक मराली गेली. “हं, बोल आई”,  प्रणव बोलला.  रश्मीला,  उद्या  महाद्वारात न्या  फिरायला”,  गावची जत्रा  संपतेय,  मला गावी परत जायचंय म्हणते”. समोरून भारदस्त आवाजातून  सांगितलं गेलं, आणि रश्मीच गावी परतणं पुन्हा लांबणीवर टाकलं गेलं. “असं होय,  उद्या तुला महाद्वाराची जत्रा दाखवतो आम्ही” प्रणवदादा थोडंसं नाकातून बोलला. आणि खरोखरचं   प्रणव, ओंकार आणि आदित्य बरोबर त्या भारदस्त आवाज आणि प्रेमळ व्यक्तीबरोबर फिरून आली  रश्मी. 

लिंबू रंगाच्या कपड्यावर सुंदर फुलांचं डिझाईन असलेलं स्कर्ट आणि ब्लाउज घेतलं रश्मीकरता.  कोणी होती रश्मीचे लाड करणारी व्यक्ती?

रोज तांब्याच्या कलशातून देवपूजेसाठी नळाचं ताज पाणी आणि फुलपुडीतून ताम्हणात फ़ुलं,  दुर्वा,  तुळशी पत्रं आणि त्रिदल देवघरात तयार ठेवली जायची. कधी आजोबा,  कधी बापूराव (काका) पूजा करायचे.

पूजेसाठी रश्मीनं देवघरात पाण्याचा कलश ठेवताना अंधार पाहून लाईटच बटण  दाबलं.  “ए,  प्रण्या मला का लाथ मारलीस,  पायात झिणझिण्या आल्या की!” एका हातात पूजेसाठी लोट्यातून पाणी घेऊन येताना रश्मी आपला हात इलेक्ट्रिक लाईटच्या बटनाजवळून मागे घेत ओरडली.  ए !  अग ए! मी इथं आहे रश्मे,  माझ्या नावानं का ओरडतेस?  ओल्या हातानं इलेक्ट्रिक बटण दबतेस, शॉक नाही का बसणार?” प्रणवदादा रश्मीच्या आरोपांनी वैतागुन बोलला. 

चैत्रा गौरीची पूजा मांडली.  कैरीचं पन्ह,  आणि डाळ – कैरीची कोशिंबीर तयार ठेवली गेली. फुलांच्या तोरणांनी घराचा कानाकोपरा सजवला होता.  ती इतकी सुंदर दिसत होती ठराविक दागिने,  आंबाड्यावर अबोली गजरा  आणि हिरव्या पैठणी मध्ये, डोळ्यात काजळ एक वेगळी चमक आणत होती चेहऱ्यावर. डोळे मोठे करून रश्मी समोरचं रूप डोळ्यात साठवत होती.  आलेली प्रत्येक सुहासिनी अगोदर तिला न्याहाळत होती आणि मग गौरीचा आरास पाहत होती.  संध्याकाळी काका जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची पण स्थिती तिचं होती.  कोण होती ती व्यक्ती आपल्या सौंदर्याचा वेगळा पैलू दाखविणारी?  

“आयस्क्रीम पेरीना sss,  आईस्क्रिम फेमिना sss.”  म्हणत रोज दुपारी दारासमोर मुद्दाम रेंगाळायचे फेरीवाले. आणि  रोज आईस कॅण्डिची सवयचं लावली तिनं. कोण होती ती रश्मीचे इतके लाड करणारी व्यक्ती?  

“कल्लू का कालिया बन जायेगा !” म्हणून आपले घारे डोळे फिरवत,  गोबरे गाल फुगवून आदित्य  अगदी जोशात कालिया ह्या अमिताभ बच्चनच्या पिक्चरचा डायलॉग म्हणून जमेल तशी स्टोरी सांगायचा प्रयत्न करायचा.  तो साधारण सईच्या वयाचा होता.  त्यामळे त्याचं कौतुक वाटायचं.. 

रश्मीला, सात वर्षांपूर्वीचे  प्रसंग जसेच्या तसे  आठवले.  हे सारं आठवून रश्मीच्या चेहऱ्यावर आपोआप ख़ुशी दिसत होती.  शेवटी कोणाबद्दल बोलतेय रश्मी समजलं आपल्याला? आणि सारं तसंच होतं का आता पण?  

घरं तसंच होतं.  चार  खाणी, चार मजली उंच इमारत या  गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत पण   घरातील आजोबा वयोमानानुसार देवाघरी गेले होते. आणि लहान तीनही मुलांची जबादारी बायकोवर टाकून बापू काका अर्ध्यावर डाव मोडून निघून गेले होते.  तीच सहा फूट,  उंच गोरी,  घाऱ्या  डोळ्याची,  लांब केस गोल, गोल फिरवुन मानेवर सैलसर आंबाडा बांधणारी,  गोल साडी नेसणारी करारी,  स्पष्ट वक्ती,  प्रेमळ व्यक्ती.  आता ती गळ्यात कोणताही दागिना घालत नव्हती,  कपाळ मोकळ,  हातात फक्त काचेच्या बांगड्या आणि फिक्या रंगाच्या साड्या नेसत होती.  आता आंबाड्यावर गजरा कधीच दिसत नसे. न कपाळावर कुंकू.  कोण होती वैराग्ग्याच जीणं जगणारी व्यक्ती?  ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती रश्मीची लाडकी छोटी आत्या होती.  अलिप्तपणे स्वतःची जबाबदारी शांतपणे पार पडणारी माझ्या तीनही भावंडांची आई होती ती.  
छोटी आत्या आणि  तीनही  भावंडानी हसत स्वागत केलं रश्मीचं. आपल्या वयाची भावंड पाहून निम्मा तणाव कमी झाला रश्मीचा.  
प्रणव,  मोठा दादा,  कामाला जायचा सकाळी. मधला भाऊ ओंकार, बारावीला होता आणि छोटा भाऊ आदित्य शाळेत जाई. आई,  म्हणजे दैवतच होतं तिघांचं. घरातून बाहेर पडताना आईला नमस्कार करून बाहेर पडत.  
 आपल्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात दोघे. दिवसा, कॉलेज आणि घरी मदत करत  आणि रात्रभर घरी मित्रांबरोबर बसून अभ्यास. रश्मीला त्यांचा मेहनती आणि अभ्यासू स्वभाव आणि अभ्यासाबाबतची तळमळ फारच भावली

  रश्मीच निरीक्षण सुरु झालं.  हात नाही आता विचार चालू होते.  आपली स्फूर्ती तशीच ठेवेल का?  तितक्याच तळमळीनं नव्या शैक्षणिक वर्षाची वाट पाहणार का?  काय आदर्श घेणार आपल्या आत्या आणि भावंडांकडून?  काय करणार होती रिकाम्या वेळेच रश्मी?  गॅलरीत बराच वेळ उभं राहून वेळ व्यतीत करणाऱ्या रश्मीला पाहून, काय विचारलं ओंकारनं?

  वाचा पुढील भागात  

9 Responses

  1. Though it takes time to read n understand in Marathi but yes Ma’am you are a superb writer. Its indeed so meaningful n d Lang used is quite simple for people like us to understand 👌👍

    1. प्रिय संजीत मॅडम, आपण, “तू सदा जवळी रहा” भाग-18 वाचलात आणि आपलें अभप्राय दिलेत. मला खुप आनंद झाला की तुम्ही वाचून, समजून त्या वर दिलेले अभप्राय नक्कीच प्रशंसनीय आहेत. धन्यवाद 🙏🌹 कोल्हपूर निवासिनीचा आशीर्वाद लाभो 🙏🌹

  2. Realy it’s s vry wonderful heart touching story and i am eagerly wating for next part of story Thanks for sharing me

    1. Ilyas sir, I am glad to see that you have read the 18 part of “tu sada javali raha…. ” thank you for your views expressed here. Sure will share the next part on next friday. 🙏🌷

  3. रश्मीच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी या तिला खरंच ताऊन सुलाखून एक वेगळी रश्मी घडवत आहेत. भक्कम आधार आणि पक्का विचार नक्कीच तिला योग्य मार्ग दाखवेल. खूप वळणांचे चढ उताराचा प्रवास पाहत आहे ती.
    आपले लेखन असेच वृद्धिंगत होवो.

    1. ” आपण तू सदा जवळी रहा…” भाग -18 आणि पूर्वीचे सर्व भाग वाचल्यामुळे रश्मीचा जीवन आणि शिक्षण प्रवास समजू शकलात. आपलें अभ्यासपूर्ण अभिप्राय मला प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद. कोल्हापूर निवासिनीचे आपणांस आणि परिवारास आशीर्वाद लाभो. 🙏🌹

  4. प्रिय नंदा, आपण, “तू सदा जवळी रहा… ” भाग 18 वाचून आपण दिलेले “नंदा – अभिप्राय” नंदानंद देणारे व उत्साह वाढविणारे आहेत. माता लक्ष्मी आपणा सर्वाना ( सतत) नंदाशीर्वाद देवो. 🙏🌹जय लक्ष्मी माता

  5. तुम्ही खूप छान लिहिता. वर्णन करण्याची तुमची style ओघवती असल्यामुळे ती जागा, तो प्रसंग, ती व्यक्ती हुबेहूब डोळ्यासमोर येते. मॅडम ब्लॉगची कल्पना छानच आहे पण कादंबरी प्रकाशित करण्याचा विचार असुद्या. भविष्यात त्यावर चित्रपटसुद्धा काढला जाइल. मॅडम, तुमच्या लॉक डाउन वरील लेखात तुम्ही स्वामींच्या मठाचा उल्लेख केलाय तो मी वाचला. तुमची दत्तगुरुंवर श्रद्धा आहे हे जाणवलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More