“तू सदा जवळी रहा….” भाग -16

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. 

 भाग -2*  बालमैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….
 भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….
भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई …अनुभूती घेतलीत  कुसुमताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….
* भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  
भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वि…..  सदृश्य जीवन.  
भाग -7 *  एक सक्षम महिला असून पण रश्मीने गप्प राहून का सहन केलं सारं — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?  अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8*  आईचं  मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली. 
भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? 
भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका ? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12*   सुचिताची  प्रश्नावली, श्री… आणि  विनिता,  घराचं घरपण कसं टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली ? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का ? चंदाला आकाशात काय दिसलं ?  

भाग -13* @ रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली ? @  चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलने का मारतात ? 
भाग -14 *    काय दिल गुरुजींनी ? कोणती दिशा दिली गुरुजींनी ?   काका आजोबांचा   दिलासा,  सुट्टी कशी गेली ? विनिता रश्मीच्या सराना  का भेटली?  सरानी पेढे का मागितले?  
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतकं सोपं होतं का ? रश्मी बद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला ? रश्मी, पुतळी लायब्ररीत का बसत होत्या ? 
भाग-16 *   विनिताला कसली काळजी होती ?  काय उपाय मिळाला शेवटी ?  का वेगळं वाटलं वातावरण ? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी ?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी ?

😌विनिताला कसली काळजी होती ?

रश्मीचं  पी. यु. सी. चं पाहिलं वर्ष अर्थात इयत्ता अकरावी पार पडली. वर्षभरामध्ये असं काहीच वेळेस झालं की, तालुक्यातून परत गावाकडे जाणारी  संध्याकाळी  सहा दहाची 🕕 गाडी 🚒🚎 चुकली. पण त्यामुळे विनिताची जी अवस्था व्हायची न ते शब्दात व्यक्त करू शकत न चेहऱ्यावरील भावनांमध्ये दिसू शकत होतं. तिच्या हृदयाची ♥️ घालमेल  फक्त आणि फक्त दोन जीव जाणत होते ते म्हणजे रश्मी आणि खुद्द विनिता.  “मन चिंती ते वैरी न चिंती” या उक्ती प्रमाणे उशीर झाला की विनिताचा जीव वर खाली होत राही.  पण आता परत काळजी चिंता नको होती विनिताला, ज्या मूळे प्रकृतीवर ताण पडेल. अस्थमा उफाळला की, दोन पावलं चालणं कठीण व्हायचं विनिताला.   तालुक्याच्या डॉक्टरकडे जायचं म्हणजे, रश्मी एका हातात बॅग दुसऱ्या हाताने आईचा हात हळुवारपणे पकडून आईच्या चालीने चालत राही. हाताला धरून चालत स्टॅन्डपर्यंत  आणायला लागायचे. एस. टी. च्या चार पायऱ्या चढताना होणारा त्रास चेहऱ्यावर स्पष्ट दिसे.  तालुक्याला पोहोचलं की पहिलं बस स्थानक होते गावाची वेस. कमानीवर हिरवा रंग दिलेला असे. त्यावर 🕍🌜☀️ चंद्र चांदणी कोरलेली होती. वेशीच्या गेटमधून जवळ, जवळ 7 मिनिटं चालत जावं लागे.  एकदा का डॉक्टरनी 🩺 तपासून औषध 💉💊दिलं की दुसरे दिवशी तब्बेत  बरी व्हायची.  पूर्वी बऱ्याच वेळेस विनिताच्या आजारपणात विनीताला डॉक्टरांकडे घेवुन जाण्यासाठी कल्लापा आणि अनु   बैलगाडी  काढत. रश्मी,  विनिता, अनु आणि कल्लापा तालुक्याला डॉक्टरकडे जातं. कल्लाप्पाकडून एकाच वेळी शेतीसाठी आवश्यक ईतर कामं पण केली जायची. अलीकडे परीस्थिती बदलली होती. “कसेल त्याची जमीन” या कायद्यामुळे वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला. या साऱ्या बदललेल्या परिस्थितीचं, काही न बोलता येणाऱ्या गोष्टी, न व्यक्त करता येणाऱ्या चिंता वारंवार विनिताची तब्बेत बिघडवायला कारणीभूत होत होत्या. तीन वेळेस ब्लड प्रेशर वाढून, विनिताला चक्कर आली होती. तीची बसलेली दातखिळी खुप घट्ट असे. तिचं बेशुद्ध पडणं लहान रश्मी, चंदा, सई तिघीनांही एकदम संकटग्रस्त बनवी. हे असच चालत राहील तर, “माझ्या तिन्ही मुलींचं कसं होणार?”❓️❓️ याची चिंता रात्र्ंदिवस  विनिताला हैराण करायची.  😴

 “मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ”, हे माहित असूनही अती तणावामुळे विनिताची प्रकृती वारंवार बिघडतं होती.

  रश्मी तालुक्याला कॉलेजला जाणार. त्यात बारावीच वर्ष.  प्रवासात खुप वेळ जातो. चंदा हायस्कुलला तीन किलोमीटर चालत जाणार आणि सई गावात जाणार. विनिता एकटी मळ्यात राहणार. सारा विचार करून आपलं इप्सित साध्य करण्यासाठी जोर लावला आणि मळा विकण्यासाठी शेवटी सौदा पटला. मळ्यातील घरात तालुक्याच्या ठिकाणी हलविण्यासाठी खुप सामान नव्हतं. अक्कून मदत केली आणि तालुक्यात स्थलांतर झालं. 

💐आणि स्थलांतर झालं ! ✅️

 तीन खोल्यांचं घर आता संसार झाला. प्रशस्थ जागा, अंगण, हुंदडायला कित्येक एकर मळा हा मोकळेपणा संपला. आता तालुक्याला जाण्या, येण्यासाठी लागणारा वेळ अभ्यास आणि काही नवीन शिकण्यासाठी वापरता येणार होता. कॉलेज सुरु व्हायला वेळ होता. टायपिंग येत असेल तर एम्प्लॉयमेन्ट एक्सचेंज मध्ये नाव नोंदवता येईल असं सूची अक्का म्हणायची म्हणून टायपिंग क्लासला प्रवेश घेतला. कॉलेज घरापासून दहा पंधरा मिनिटावर होतं. रश्मीला कळायला लागल्यापासून असं पहिल्यांदा घडत होतं.  जेव्हा साधारण कळायला लागलं तेव्हापासून मळ्यात राहायला गेली होती. त्यामुळं प्राथमिक,  माध्यमिक शिक्षणासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत होती.  कष्ट, मेहनत याला तिचा कधी विरोध अथवा कंटाळा नव्हता, पण आईची  चिंता पाहवत नव्हती.  मोठी आत्या म्हणायची,  “चिता  जाळी  मृताला पण चिंता जाळी  जित्याला“.  अगदी बरोबर होतं आत्याचं म्हणण. पण रश्मी कशी दूर करणार होती आईची चिंता आणि काळजी?   आता सध्या तिच्या हातात फक्त इतकंच होतं की घरकामात मदत करणं,  आणि मन लावून अभ्यास करणं. 

  कॉलेज सुरु होण्यापूर्वी विनिताने तिघीना कपडे खरेदी केले. बॉम्बे स्टोअरमध्ये कपड्यांची विविधता होती. सर्व प्रकारचे कपडे, साड्या, रेडिमेड कपडे एकत्र मिळत. कपड्याचे दुकानदार शॉ भाई खुप बोलके, प्रेमळ होते. जातीनं स्वतः ग्राहकाची विचारपूस करायचे. मॅक्सीच्या कपड्या बरोबर दुकानदारानं बाबांचं एक कॅलेंडर दिलं. भगवी वस्त्र परिधान केलेलं आणि डोक्याला भगवी वस्त्र बांधलेलं साधू  बाबांचं एक कॅलेंडर दाखवलं दुकानदारानं. “रश्मी,  ए लो, बाबाजी का कॅलेंडर,” शॉ भाई बोलले. कपड्या बरोबर कॉर्नरच्या दुकानातून अत्तर, पावडर, नेल पॉलिश, हेयर बँड, क्लिप आणि बऱ्याच गोष्टींची खरेदी झाली.

कॉलेज सुरु होण्यापूर्वी विनितान, रश्मीसाठी मॅक्सी व चंदा सईला मिडी शिवली.   सुंदर शिवले कपडे सांगिता देसाई या तालुक्याच्या टेलरन. रश्मी, चंदा,  सई एकदम खूष झाल्या.  नवीन युनिफॉर्म, पुस्तकं, शाळेसाठी लागणारी स्टेशनरी हजारी काकांच्या दुकानातून केली. जवळच्या शाळेत दोघीचे प्रवेश झाले.  प्राथमिक, माध्यमिक शाळा एकाच कॅम्पसमध्ये होती आणि शाळेची वेळही एकच होती. लवकर रुळल्या नवीन शाळेत दोघी. एकत्र जात येत होत्या.  

🙋‍♀️🙋का वेगळं वाटल वातावरण? 🙆‍♂️🙋‍♂️

तालुक्यातल वातावरण थोडे वेगळे आणि विचित्र वाटत होते रश्मीला.  कॉलेजच्या रस्त्यावर खडूने मुला – मुलीच नाव लिहिलेलं दिसायचं.  कधी जाता, येता मुलींना जाणून बुजून टॉन्ट  मारले जायचे. मुलीकडून तिकडं दुर्लक्ष करून कॉलेजचा रस्ता कापला जायचा.  एक,   दोनदा अनाहूतपणे   मिळालेल्या शेऱ्यामुळं डिस्टर्ब वाटलं रश्मीला पण तीनं दुर्लक्ष केलं.  कधी कन्नड नटीच्या नावाने हाक मारत. जय ललिता,  मंजुळा,  आरती,  आणि काही सवंग नृत्यांगनांची💃💃 नाव उच्चारत ज्यामुळं अपमान वाटेल असंच वातावरण निर्माण होई. रश्मीला नवीन न रुचणार होतं.

वर्षा 🏃‍♀️एकदम गोरीपान आणि उंच होती. तिला पांढर पडवळ म्हणायचे तर  सांगिता सावळी आणि थोडी गोल होती तिला भरताचं वांग म्हणायचे. बेबी, पाटीला पोक काढून चालायची तर तिला हंचबॅक 🕵️‍♀️म्हणायचे. रंगीताचे ओठ पुढे होते तर तिला चीचुंद्री 🐻अशी मध्येच हाक मारायचे. तरुण, प्रौढ🧟💆🧝🧝‍♂️🧖‍♂️ एकत्र घोळक्याने असल्याने नेमकं कोण बोलतय हे समजायचे नाही. सर्व मुली, मान खाली घालून झप, झप पाऊले टाकत कॉलेज गाठायच्या. रंग, उंची, शारीरिक व्यंग यावर जाहीरपणे टीका करून एखाद्या व्यक्तीला त्यावरून वेगळ्या नावाने संबोधण माणसाच्या मनातील विकृतीचं प्रदर्शन वाटे. आपला वेळ आणि शक्ती अशा तऱ्हेने, वाईट हेतूने वापरतात याचं त्यांना काहीच वाटत कसं नाही? प्रश्न पडे रश्मीला. हे सारच नवखं आणि विचित्र वाटे. “पण, तुम्ही असं टॉन्ट ऐकून गप्प का बसतात? त्यांना जाब का विचारत  नाही?”, रश्मीने असं विचारलं की, ” रश्मी, तू गप्पचूप खाली मान घालून कॉलेजला जायचं आणि तसच काहीही न बोलता घरी जायचं,  हे तुझं गाव नाही.” वर्षांने दटावले. संगीतानं स्वतःच्या ओठावर बोट ठेऊन, गप्प राहण्याची खुण🤫 केली. कॉलेजच्या रस्त्यावर जरा जास्तच मुलं,  माणसं दिसायची ठराविक वेळेस. त्यातील बऱ्याच लोकांचा कॉलेजशी काही संबंध नसे. पण हे लोक कॉलेजला जाणाऱ्या मुलींकडे पाहतात असं वाटे. बऱ्याच वेळेस वर्षा,  बेबी या तालुक्यातील वर्ग मैत्रिणींनी रश्मीला सांगितलं की, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष कर.  

आता पोर्शन संपवण्याची घाई होती, करण  रिविजनसाठी वेळ हवा होता. बऱ्याच वेळेला समजण्याअगोदर टॉपिक संपला😇😨😇❓️⁉️⭕️❌️ असं वाटायचं. मग मैत्रिणीची त्यावर चर्चा व्हायची. काही गोष्टी चर्चेने पण समजायच्या नाहीत म्हणून रश्मी, पुतळी, सीमा, गीता, सांगिता या लोकांनी शिकवणी लावली आणि हा हा म्हणता दिवस, आठवडे, महिने चालले. कॉलेज,  ट्युशन,  टायपिंग क्लास, अभ्यास यामध्ये दिवस संपायचा.  टायपिंग मध्ये काहीच प्रगती दिसेना. बोर्ड परीक्षा म्हणून शेवटी टायपिंग क्लासकडे दुर्लक्ष होतं होतं.  वेळ, पैसा वाया जातोय वाटल. अभ्यास एके अभ्यास चालू होता. सहामाहीचा पोर्शन संपून रिविजन झाली आणि परीक्षा पण संपली होती. त्यामळे सगळे रिलॅक्स होते. फार रिलॅक्स राहून चालणार नाही याची जाणीव सर्वानाच होती. प्रत्यक्षात बारावीच्या विदयार्थ्यांचा प्रत्येक दिवस महत्वाचा होता. पण चार मुली एकत्र आल्या की बोलता बोलता काही तरी नवीन फॅड एखादीच्या डोक्यातून बाहेर पडलं की बाकीच्या उचलून धरतं. आता पण तसच झालं. तालुक्याजवळ असणाऱ्या देवाची यात्रा होती. रविवार आहे म्हणून  बाहेर गावाहून येणाऱ्या  मैत्रिणींच्या ग्रुपने यात्रेला जायच ठरलं. रश्मीच्या साऱ्या मैत्रिणी बाहेर गावाहून तालुक्याला येत. त्यामुळं रश्मीच्या घरी बऱ्याच वेळेस साऱ्या एकत्र जमत.  

दिवाळी 🌈☀️तोंडावर होती. सणाची तयारी  सुरु होती. ही तालुक्यातील पहिली 🎆🎇दिवाळी. रविवार प्रत्यक्षात कपडे 🧥👚💄खरेदीसाठी साठी विनितानं वेळ राखून ठेवली होती. पण रश्मीचा जत्रेच्या प्लॅनमुळं  कपडे खरेदी शनिवारी संध्याकाळीचं झाली. दिवाळीसाठी मस्त चुडीदारचा कपडा घेतला रश्मी, चंदा आणि  सईनं. विनितासाठी ऑफ व्हाईट डिस्को पॉलिस्टर साडी घेतली.  अत्तर,  पावडर, 💄 नेल पॉलिश, आणि दिवाळीची बरीच खरेदी झाली.  सगळे एकदम खूश 💅होते. प्रत्येकीनं आपल्या पसंतीचा रंग निवडला ड्रेससाठी.  विनिताच्या चेहऱ्यावर बोलके भाव दिसत होते.  दिवाळी मस्त खुशीत घालवूच्या स्वप्नात, रोज आनंदाचे दिवस घेऊन येत होते.   बाजूला राजूच्या किराणा दुकानातून वाण सामान, आणि फराळासाठी लागणार सामान आणलं. दिवाळीचा फ़राळ बनवायला मदत करायच्याऐवजी रश्मीन यात्रेच काय डोक्यात घेतलं? विनिता विचार करत होती. आज सर्वजण आनंदात होते म्हणून विनितानं रश्मीला टोकलं नाही. सर्वजणी  मनापासून खूष होत्या. दिवाळीची स्वप्न बघत झोपी गेल्या शनिवारी रात्री.

  रविवारी कुठे गेल्या रश्मी आणि मैत्रिणी?🏃‍♀️🚶🚶‍♂️🚶‍♀️💇‍♀️💆💇 

  सकाळी सगळ्या मैत्रिणी रश्मीच्या घरी जमल्या आणि ठरल्याप्रमाणे निघाल्या जत्रेला. निसर्गरम्य वातावरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड आणि घनदाट छाया देणारे वृक्ष होते. मध्येच कधीतरी एखादं सूर्यकिरण दिसें. मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या विविध वयोगटातील माणसांनी रस्ता फुलला होता. लहान मुलं खुशीत उड्या मारत पुढे, पुढे धावत होती. आईवडील त्यांना पकडून वेगावर काबू करू पहात होती. 💆‍♂️💆💃🧘👬👫”हौसे” प्रकारात मोडणारी मुलं दिसली सर्व. काही वृद्ध लोक अनवाणी चालत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. देवदर्शनाची 👩‍🦳👩‍🦲👱👨‍🦳आस घेऊन नामस्मरण करत सर्व “नवसे ” रस्ता कापत होते. बरीच मंडळी वस्तु विकण्यासाठी येताना दिसत होती. ती सर्व मंडळी “गवसे” प्रकारात मोडत होती. त्यामध्ये रंगीबेरंगी फुग्यापासून लाकडी खेळणी, लाकडी रंगवलेली फळं, फ़ुलं आणि बऱ्याच आकर्षक वस्तू लक्ष वेधून घेत होत्या. रश्मीला आपली बाल मैत्रीण वैजूची आठवण आली. एकदम साधी सरळ, प्रांजळ मैत्रीण. आज तिची कमी भासत होती.

सुरुवातीला सगळ्या हसत खिदळत निघाल्या पण नंतर रश्मी जरा अस्वस्थ झाली. शांती मागे, मागे राहताना दिसली. ती कुणाशी तरी बोलत होती. पूर्ण अनोळखी माणसांशी ही का बोलतेय? रश्मीला प्रश्न पडला. ती खरं पाहता पुतळी बरोबर असे. जाड भिंगाचा चष्मा, सावळा रंग, आणि साधारण पाच फूट उंची, लाल परकर पोलकं घालणारी शांती कधीच चष्मा काढत नसे. तिला वर्गामध्ये बोर्डवर लिहिलेली अक्षर वाचता येत नसत म्हणून बाजूला बसलेल्या मैत्रिणीच्या वहीत डोकावून लिहायची सवय होती तिला. रश्मी आणि तिची काही खास मैत्री नव्हती. पण मैत्रिणीची मैत्रीण, ती पण आपली मैत्रीण म्हणून इतक लक्ष नाही दिलं. आपल्या घोळक्याचा चार पाच लोकांच्या टोळीद्वारे पाठलाग होतोय हे लक्षात यायला वेळ लागला नाही रश्मीच्या. मगाशी शांती त्यांच्यापैकीच कोणाशी तरी बोलत होती, हे पण लक्षात आलं. हा हा म्हणता समोर मंदिर दिसलं आणि सारे विचार झटकून दर्शनासाठी आत शिरल्या सगळ्या. आता रश्मीचा जत्रेत फिरण्याचा अजिबात मूड नव्हता. थोड्याच वेळेत त्या सर्व परत फिरल्या. आता मात्र हद्द झाली. त्या लोकांना जत्रेत इंटरेस्ट नव्हता न मंदिरात दर्शन घेण्यात. परत जाताना पण पाठी पाठी येत राहिले. मधेच मोटर बाईकचा जोर वाढवून पुढ जाताजाता घोळक्यावर नजर टाकत होते. म्होरक्याच्या बाईकच्या पाठी असलेल्या रबरवर हिरव्या रंगात चंद्र चांदणी दिसली. काय होता हा प्रकार? प्रौढ वाटली लोकं. कॉलेजची मुलं नव्हती वाटत. गावात पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली.

शांतीच्या डोळ्यात👀काय वाचलं रश्मीनं

घरच्या वळणावर रश्मी आणि बाकी सर्व मैत्रिणी बस स्टॅन्ड कडे वळणार होत्या, तेव्हा शेवटी रश्मीनं विचारलं. “कोण होतं आपल्या घोळक्याच्या मागावर?” कधीच न पाहिलेले शांतीचे डोळे चष्म्या शिवाय दिसले. रश्मी, बटबटीत आणि 👀 तेज हीन डोळ्यात शांतीच्या मनातले भाव वाचायचा प्रयत्न करत होती. डोळे कधी खोटं बोलत नाहीत म्हणतात. साऱ्या भावना व्यक्त होतात डोळ्याद्वारे. म्हणून डोळे बोलके असतात असं म्हणतात. काम, क्रोध, मद, मत्सर, वात्सल्य, हेतु मानात ठेऊन व्यक्त केलेली कोणतीही भावना डोळ्याद्वारे दिसते आणि भाव अधोरेखित होतात. हे सारे भाव शरीरात, मनात, हृदयात, मेंदूत वास करत असले तरी पंचेंद्रियांपैकी नजरेद्वारे प्रथम दृश्य स्वरूपात दिसतात. म्हणून नजर वाचायला शीक हे आईचे वाक्य आठवून रश्मीनं डोळ्यात पहिलं शांतीच्या. तेवढ्यात शांती बरळली, “अरे, ते तर तुझा रोज पाठलाग करतात.” आणि एक डोळा 😉 बारीक झाला तिचा. किळस वाटली रश्मीला आणि संपूर्ण शरीरातून शिरशिरी बाहेर पडली तिच्या. “आपण जत्रेला जाणार हे, त्या अनोळखी माणसांना कस समजलं”? या विचारात घरी पोहोचली.
मैत्रिणींना भेटली की नेहमी खेळकर मूडमध्ये असलेली रश्मी घरात पाऊल ठेवली तेच डोळ्यात पाणी घेऊन.

विनितानं काही विचारायच्या आधीच, तिच्या गळ्यात पडून रडायला😭 लागली रश्मी. रश्मीला सहसा रडताना पहिलं नव्हत. कितीही कष्ट पडले, आई आजारी असली, काही झाले तरी हिम्मतीनं सामोरं जायची. मळा विकताना पण घालमेल दिसत होती रश्मीच्या चेहऱ्यावर. पण व्यक्त नाही झाली. “जे होतं ते बऱ्या साठी”, म्हणून कॉलेज आणि अभ्यासाकडे लक्ष्य दिलं. मग आज काय झालं हिला ? ही तिन्ही संध्याकाळची रडतेय का? विनिताला प्रश्न पडले. हातातलं काम सोडलं विनितानं. विनिता काही न बोलता रश्मीच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. रश्मी आणि विनिता बराच वेळ बोलत होत्या झोपण्याअगोदर. आईशी बोलल्यावर हलकं वाटलं रश्मीला. विनितानं धीर दिला रश्मीला. काही वेळानं रश्मी झोपी गेली, आईची झोप🥺 उडवून. बाजूला सई आणि चंदा शांत झोपी 😊😊गेल्या होत्या. सर्वांची पांघरूण सरळ करून विनिता निद्रादेवीची विनंती करत कूस बदलत राहिली.
दोनच दिवसांनी दिवाळीची सुट्टी सुरु झाली.
तालुक्याच्या ठिकाणी कुसुमताईचं घर विनिताच्या घराजवळच होतं. विनिताला भाड्याने घरं मिळवून देण्यासाठी कुसुमताईनं मदत केली होती. “विनिता, तू चकल्या, लाडू, चिरोटे आणि करंज्या खूप स्वादिष्ट बनवतेस, दिवाळीत हे चारही जिन्नस मला तूच बनवून दे”. कुसुमताईंनी हक्काने सांगितले.
विनिताला खूप आनंद झाला. दिवाळीच्या आदल्या संध्याकाळी डबे भरून ताईच्या घरी गेली. चकलीच्या सुग्रास घमघमाटाने सर्व खोली भरली. तेव्हाच ताईच शेंड्येफळ चिंटू आला. “काकू, नमस्कार करतो”, म्हणून विनिताच्या पाया पडला चिंटू. ” श्री गुरुदेव दत्त” म्हणून विनितानं त्याच्या मस्तकावर हात ठेवला.
“चिंटू, मला तुझ्याशी आणि ताईंशी काही बोलायचं आहे.” विनिता म्हणाली खरी पण त्याच वेळेस चिंटूचे वडील बाहेरून आले आणि औपचारिक बोलणं करून विनिता निघाली परत आपल्या घरी.”विनी,
नंतर बोलू आपण, फ़राळ छान झालाय गं ? कुसुमताई खूश होऊन बोलल्या.

चिंटू, रश्मीपुढे एक वर्ष होता. त्याचा प्री युनिव्हर्सिटी कोर्स पूर्ण झाला होता. त्यानं डिग्री कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं.

दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?🏃‍🏃‍🏃‍

सुट्टीत सई, चंदा, रश्मी तिघीही गावी जाऊन अण्णाकाका आणि नानाकाकांची भेट घेतली. आईनं दिलेला फराळाचा डबा काकूंच्या हातात दिला, तिघींनी काका, काकूंना वाकून नमस्कार केलं. चुडीदार मध्ये चंदा खूपच सुंदर दिसत होती. नानाकाकानी तिची फिरकी घेतलीच.
“हे काय सोंग घेतलं चंदा?” नानाकाकानी चहाचा भुरका मारता मारता चंदाला विचारलं.
चंदाने काकांच्या चहा पिण्याच्या आवाजाची नक्कल केली, “सूर sssss गट्टक”…. चंदा पुटपूटली☕️
“आणि नानाकाका, याला सोंग नाही, चुडीदार म्हणतात, चुडीदार ” इति चंदा
“चहा घेतेस का? ” काकांनी दुसऱ्यांदा चहाचा कप भारता भारता विचारलं. अगोदर प्यायलेल्या चहाचे कप तसेच बाजूला पडलेले होते.
“अबब! नानाकाका, हे काय?” चाहांच्या रिकाम्या आणि भरलेल्या कपांकडे बघत चंदान विचारलं. ☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️तसं प्रश्नार्थक मुद्रेनं सर्वांनी तिच्या कडे पहिलं. काकूच्या चाणाक्ष नजरेन, चंदाला काय म्हणायचंय ते टिपलं. “तुझ्या काकांना चहा खूप आवडतो”, काकू चंदाकडे पाहत उतरल्या
चंदा, काकांच्या जवळ जाऊन बसली, “ये चंदा, बस माझ्या जवळ”, नानाकाका बोलले.
“नानाकाका, एक उपाय सांगू का?” चंदानं प्रश्न विचारला.
“हं बोला चंदालाणी, काय आणि कशावल उपाय शांगणाल आम्हाला?” नानाकाका खेळकर मूड मध्ये येऊन बोबडे बोलले.
“नानाकाका मी कुठं बोबडं बोलते? मग तुम्ही का बोबडं बोलता माझ्याशी ?” चंदानं काकांच्या बोबड्या बोलावर टिप्पणी केलीच.
“मला असं म्हणायचं आहे…” चंदाचं बोलणं पूर्ण करण्याअगोदरचं
“कसं ssss?” उमेशआणि गणेश दादा एकदम बोलले.
“अरे, मला बोलू तर द्या अगोदरsss” चंदा आपल अपरं नाक फुगवून दोघा भावंडांच्या दिशेने हात करत बोलली.
“बोला, चंदाराणी साहेब, बोला” काका, उमेश आणि गणेश एका सुरात बोलले.
“आपण, घंगाळात चहा बनवू, बादलीचा कप आणि परातीची बशी करू, आणि नानाकाका; तुम्ही, चहा प्यायचाच प्यायचा, सोडायचाच नाही” चंदा बरळली.
“चंदे ! कार्टे, माझी मस्करी करतेस होय?” नानाकाकानी हळूच लाडानं एक धपाटा 🤜✋️घातला पाटीत.
नानाकाका आणि आम्ही सर्वजण हसत होतो खुप वेळ. हसतच निरोप घेतला सर्वांचा.
दोघी काकू घरातील सर्व मुलांची नाव घेऊन त्यांच्या नावे औक्षण करत व भलं चिंतत. विनिता पण घरातील सर्व मुलांच्या नावे आरती ओवाळून अक्षता वाही सर्व मुलांच्या नावे. कधी निरांजन असे कधी पुरणाच्या छोट्याशा गोळ्याला अंगठ्याने खोल छोटी वाटी करत आणि त्यामध्ये फुलवात

आणि तूप घालून पंचारती बनवत. प्रथम देवाची आरती झाली की मुलांना औक्षण केलं जायचं. अशा आरतीचं पूरण रश्मीला आणि सईला आवडत असे. गरम गरम पुरण पोळी आणि तूप रश्मी, सई आवडीने खायच्या तर चंदा कट्टाची आमटी आणि भातावर ताव मारायची.

7 Responses

  1. Really it’s Good to read i got many informations i promise to impart it in my students Thannx

    1. धन्यवाद इलियास सर 🙏. आपण व्यक्त केलेलं मत मला नवीन आणि गुणवत्तापूर्ण साहित्य निर्मितीस प्रेरणादायी आहे. पुनश्च्य आभार 🙋‍♀️

    1. Thank you Madhuri madam. “तू सदा जवळी रहा…” भाग 16 कथेबाबत आपले आपण व्यक्त केलेलं मत मला प्रेरणादायी आहे 🙏🌹

  2. पुढील भाग कधी वाचायला मिळतो अस वाटत. खूप छान आणि ओघवती लिहिण्याची शैली आहे.
    कादंबरी प्रकाशित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More