- निसर्ग रीती, देवाची भीती आणि समाज निती अशा क्षेत्रात धर्माची चलती असते. 🙏 म्हणून ज्ञानाची आस आणि विज्ञान कास पकडून पुढे जाण्यास प्रवृत्त व्हा. “ज्ञान – विज्ञान मय”सुविचार .
🙏🌹
- बालक असो वा वृद्ध , स्त्री असो वा पुरुष “ग्रहण क्षमता” आणि “स्मरण शक्ती” या दोन्हीची आवश्यकता असतेच. फरक इतकाच की कोण त्याचा किती प्रमाणात? कशासाठी? आणि कशा पद्धतीनं ? वापर करतंय. किंबहुना कोणतीही गोष्ट वापरात राहिली तर चांगली, अन्यथा गंज चढतो. म्हणून “ग्रहण” केलेल्या “बौद्धिक”ला “स्मरणा”च (ऑइलिंग) वंगण लावलं तर “शिक्षण प्रवास” आणि जीवन प्रवास दोन्हीही स्वतःच्या आणि देशाच्या कामी येतील. “ग्रहण- क्षमता, स्मरण-शक्ती वृद्धी” सुविचार
🙏🌹
- ‘भविष्य’ आणि ‘निर्वाह’ या दोन गोष्टीभोवती विचार फिरवत ठेऊन, ‘वर्तमान’ चिंतेत व्यतीत करण्यापेक्षा, ‘आज’ निश्चिन्त आणि प्रामाणिकपणे व्यतीत केल्यावर तुम्हाला उद्या कडे जायचे नाही, तर उद्या आज बनून तुमच्या समोर येणारच आहे. “शुभ वर्तमान, सुविचार”
🙏🌹
- “स्नेह,” भावातून हृदयात निर्माण झालेली “आर्द्रता,” वर्तन आणि नेत्रावाटे द्रवली तर, शत्रू ही मित्र होऊ शकतो आणि याच भावनेतून हे “विश्वची माझे घर”चा प्रत्यय येण्यास वेळ नाही लागणार आणि मग “विशाल मन”; आपलं-परकं, रंग- रूप, स्थळ-काळ, देश – परदेश या पलीकडे पाहू शकतं. “स्नेहार्द्र सुविचार “
🌹🙏
- “आरोग्यम धनसंपदा” ही म्हण खरी करायची असेल तर योगा आणि योगाभ्यास, योगा योगाने करण्याची गोष्ट नाही. योगा नित्यनेमाने करणाऱ्यांना ना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो ना मानसिक तणावाला समोर जावं लागत. किंबहुना त्यांना अनारोग्यावर उपाय माहित असतो ‘नित्य – नियमित योगी’ “आरोग्यवान भवः ! हा आशीर्वाद धारक” असतो. 🙏🌹