5 जबरदस्त प्रेरणादायी सुविचार 2020 | Ranjana Rao

  1. निसर्ग रीती, देवाची भीती आणि समाज निती अशा क्षेत्रात धर्माची चलती असते. 🙏 म्हणून ज्ञानाची आस आणि विज्ञान कास पकडून पुढे जाण्यास प्रवृत्त व्हा. “ज्ञान – विज्ञान मय”सुविचार .
    🙏
    🌹

  1. बालक असो वा वृद्ध , स्त्री असो वा पुरुष “ग्रहण क्षमता” आणि “स्मरण शक्ती” या दोन्हीची आवश्यकता असतेच. फरक इतकाच की कोण त्याचा किती प्रमाणात? कशासाठी? आणि कशा पद्धतीनं ? वापर करतंय. किंबहुना कोणतीही गोष्ट वापरात राहिली तर चांगली, अन्यथा गंज चढतो. म्हणून “ग्रहण” केलेल्या “बौद्धिक”ला “स्मरणा”च (ऑइलिंग) वंगण लावलं तर “शिक्षण प्रवास” आणि जीवन प्रवास दोन्हीही स्वतःच्या आणि देशाच्या कामी येतील. “ग्रहण- क्षमता, स्मरण-शक्ती वृद्धी” सुविचार
    🙏🌹

  1. ‘भविष्य’ आणि ‘निर्वाह’ या दोन गोष्टीभोवती विचार फिरवत ठेऊन, ‘वर्तमान’ चिंतेत व्यतीत करण्यापेक्षा, ‘आज’ निश्चिन्त आणि प्रामाणिकपणे व्यतीत केल्यावर तुम्हाला उद्या कडे जायचे नाही, तर उद्या आज बनून तुमच्या समोर येणारच आहे. “शुभ वर्तमान, सुविचार”

    🙏🌹

  1. “स्नेह,” भावातून हृदयात निर्माण झालेली “आर्द्रता,” वर्तन आणि नेत्रावाटे  द्रवली तर,  शत्रू ही मित्र होऊ शकतो आणि याच भावनेतून हे “विश्वची माझे घर”चा प्रत्यय येण्यास वेळ नाही लागणार आणि मग “विशाल मन”;  आपलं-परकं, रंग- रूप, स्थळ-काळ,  देश – परदेश या पलीकडे पाहू शकतं.  “स्नेहार्द्र  सुविचार “
    🌹🙏

  1. “आरोग्यम धनसंपदा” ही म्हण खरी करायची असेल तर योगा आणि योगाभ्यास, योगा योगाने करण्याची गोष्ट नाही. योगा नित्यनेमाने करणाऱ्यांना ना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो ना मानसिक तणावाला समोर जावं लागत. किंबहुना त्यांना अनारोग्यावर उपाय माहित असतो ‘नित्य – नियमित योगी’ “आरोग्यवान भवः ! हा आशीर्वाद धारक” असतो. 🙏🌹

14 Responses

    1. Thank you for your openion Rose madam. माझ्या सुविचारातून विचार प्रवृत्त होणं अपेक्षित आहे. आपले अभिप्राय मला प्रेरणा देतील. धन्यवाद 🙏🌹

  1. मॅडम खूप छान विचार आहेत तुमचे. त्यामुळे लेखन सुद्धा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले

Read More

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे,

Read More

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More