भाग -1 एक आईं , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते ……. भाग -2 * बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….भाग – 4 * विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत कुसुम ताई, सई, चंदाच्या बालपणातिल आठवणी….भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏. 🙏 भाग – 6 * रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मिच वि….. सदृश्य जीवन. भाग -7* एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग- 8* आईच, मानस दर्शन, राजेशची प्रकर्षाने आठवण आली. भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार? भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12 * मध्ये वाचा, सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं? भाग -13* मध्ये वाचा, @रश्मी खोटं बोलते पण…. ? @ चंदा कुठे राहिली? @ चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते? भाग -14 * वाचा काय दिल गुरुजींनी? कोण दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबाचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? सर नी पेढे का मागितले? भाग -15 * मध्ये आपण वाचलात, वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसत? भाग-16 * विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17 @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18 * तरुण मुलगी घरात असणं? खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न, भाग -19* आत्या की मैत्रीण, फिरकी? अतरंगी बंटी, भाग -20 * कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? भाग -21* विनिताच नेमाक काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..! भाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन, लायब्ररी…, हास्य , आनंद म्हणजे … वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24 * परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणी विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2 श्रध्दा असेल तर भाग -25 * वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिश पॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ… भाग – 26 *, दुसरं वर्ष आणि बरंच काही , आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे नात्यांची चिरफाड, सईच कॉलेज.
भाग – 27 * मध्ये वाचा नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली?
काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं?
नेत्राने उपोषण का केलं ?
“टक टक” आवाज आला म्हणून सईनं दरवाजा उघडला आणि आश्चर्याचा धक्का बसला तिला. एकदम खुश झाली, “आई, आक्का, सर आणि मामी आले आहेत!” म्हणून खुशीतच “या मामी, या सर,” म्हणून मामी आणि सोमण सरना पीण्याचं पाणी आणण्यासाठी आत गेली. “रश्मी, दोन दिवसांत रिझल्ट येईल. हातात डिग्री येईल. पुढे काय? विचार केला आहे का? काय करायचं ठरवलंय?” सोमण सर विचारते झाले. “सर, मला एम. ए. करायचंय.” रश्मी उतरली. डिग्रीचा रिझल्ट हातात आला आणि रश्मी हट्टाला पेटली. “एम. ए. ला ऍडमिशन घेते,” तिचा एकच नारा चालू होता.परत दोन वर्षे कॉलेज आणि पुढे काय करणार? या विनितानचं काय कोणीही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर रश्मीकडे नव्हतं. मग ज्याचं उत्तर नाही किंवा ज्या शिक्षणामुळं पुढंची दिशा पक्की होतं नाही, आणि स्वावलंबी होता येत नाही ते पुढं चालू ठेऊन फक्त डिग्र्या वाढवत बसणं येवढचं दिसतं होतं. माणसानं परिस्थित जाणून घेणे आणि त्या नुसार निर्णय घेऊन अंमलबजावणी कारण गरजेचं असत. रश्मी सुशिक्षित होती. आता तिला पुढची दिशा ठरवण खरोखर गरजेचं होतं.
“आता असं काहीतरी कर ज्या मुळं तू स्वावलंबी बनशील.” सर आणि मामी असूदेत, विनिता असुदे किंवा तारका वहिनी असूदेत, रश्मीनं आता आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनण्याच्या दिशेने कांही तरी करणं आवश्यक होतं. सर्व जण याच मतांवर ठाम होते. नेत्रा, लता, सुजा या आणि इतर वर्ग मैत्रिणींनी एम. ए. ला अडमिशन घेतलं होतं. नेत्रानं पुढं शिकण्यासाठी घरात संघर्ष केला. अबोला आणि उपोषण दोन्ही अस्त्र उपसली आणि स्वतःच्या आई कडून एम. ए. साठी परवानगी मिळविली होती.
अती राग, अती लोभ किंवा कोणतीही टोकाची आणि आग्रही भावना विचारांमध्ये अडथळा बनू शकते. भावनेचा अतिरेक, भविष्य काळात संकट उभ करू शकतो. आपल्या भावनांवर आपला कंट्रोल हवा. व्यक्त होण्या अगोदर संयम हवा. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं केव्हाही चांगलं, ही विनीताची शिकवण बऱ्याच वेळेला मोठ्या संकटातून वाचवणारी आहे, हे रश्मीला समजून चुकलं होत. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो त्याचा फायदाच होतो. प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घेऊनच शिकली पाहिजे, असं काही नाही.
रश्मीला निर्मलाची आठवण का आली?
विचारत गाढलेल्या रश्मीला दोन महिन्यापूर्वीच घटना आठवली … “हॅलो रश्मीss” असा आवाज आलेल्या दिशेने पाहिलं तर समोर निर्मला दिसली. निर्मला रश्मीच्याच कॉलेज मध्ये एक वर्ष सिनिअर असलेली मैत्रीण. पांढऱ्या शुभ्र साडीत सावळी, उंच निर्मला सुंदर दिसतं होती. “हॅल्लो निर्मला, आहेस कुठं? पूर्ण वर्षभर दिसली नाहीस. काय करतेस सध्या?” निर्मलाला पाहून रश्मी एकदम एक्साइट झाली. मॉडर्न बेकरी मध्ये; ब्रेड आणायला आलेल्या निर्मलाला, घरी घेऊन आली रश्मी. “आई, ही निर्मला माझी कॉलेजमधील मैत्रीण,” म्हणून आईला निर्मलाची ओळख करुन दिली. “काकू, माझं बी एड झालं नुकताच. आज शेवटचा पेपर देऊन आले आहे.” निर्मलानं माहिती दिली. विनितान दिलेला चहा घेतला रश्मी आणि निर्मलान. “एक वर्ष वाया घालवायचं नसेल आणि बी. ए. पाठोपाठ बी. एड. करायचं असेल तर कर्नाटकातल्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा लागतो.” निर्मलानं आणखी माहितीची भर टाकली आणि कुतूहलापोटी बरीच माहीती जमा केली रश्मीने. परीक्षा झाल्यावर रिझल्टची वाट नं पाहता लगेच शाळेमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतात. उद्या पासूनच जवळपासच्या शाळेत अप्लिकेशन देणार असल्याच निर्मलान सांगितलं. निर्मला, आपल्या आई आणि भावाबरोबर रहात होती. वडिलांच्या मृत्यूनंतर भावांन घर सांभाळलं होतच आणि निर्मलाच्या शिक्षणा साठी तिचा भाऊच मदत करत असल्याच रश्मीला माहित होतं. रश्मीला, दुसरे दिवशी भेटायचं ठरवून निर्मला निघाली.
रश्मीला दोन महिन्या पूर्वीचा प्रसंग आठवला. तडक निर्मलाच घर गाठलं. निर्मलाची आई, एकट्याच घरी होत्या. जुजबी बोलून, मैत्रिणीस निरोप ठेऊन रश्मी परत फिरली. संध्याकाळी निर्मला, रश्मीच्या घरी आली. ती आज जवळच्या तालुक्यातील शाळेमध्ये मुलाखतीसाठी गेली होती. “कसा झाला इंटरव्ह्यू; निर्मला?” रश्मीने पृछा केली. “छान! छानच झाला इंटर व्ह्यू. दोन दिवसांत समजेल. इथ पण टफ कॉम्पीटेशन आहे, रश्मी. परत ओळख, वशिला काही नाही ग आपल्याकडे.” जरा नराज सुर निघाला निर्मला कडून. “आल्या, आल्या आईनं निरोप दिला. बॅग ठेऊन तशीच आले तुझ्याकडे.” निर्मला बोलली. बराच वेळ दोघींच्या गप्पा चालू होत्या. निर्मलाला बाय करून रश्मी वर आली. तर रश्मीची आई आणि वहिनी गप्पा मारत गॅलरीत उभ्या होत्या. गॅलरीतून खाली पाहिलं तर राणी येताना दिसली. बऱ्याच दिवसांनी राणीला पाहून रश्मीचा चेहरा खुलला. आईला सांगून रश्मी; आपल्या मैत्रिणी लता, नेत्राला भेटायला राणी बरोबर गार्डन मध्ये गेली. कॉलेज सुरू व्हायला वेळ होता त्यामुळे लता, नेत्रा दोघींचं लिझर रिडिंग आणि घरी आई, बहिणींना मदत करणं एवढंच काम असल्याचं बोलत होत्या. बराच वेळ गप्पा मारून झाल्या. रश्मीने धड एम. ए. करण्यासाठी कॉलेज कन्टिन्यू केलं नाही आणि पुढं काय करायचं?? ते पण पक्क केलं नाही म्हणून लतान विचारलेला “पुढं काय करणार रश्मी?” हा प्रश्न अनुत्तरित ठेऊन आम्ही मैत्रिणी घरी परतलो. रिझल्ट आला, आता वेळ घालवणयापेक्षा पुढचं काम करण गरजेच होत. आणि रश्मीने अखेर ठरवलं.
“आणि दिशा मिळाली.. “
काय ठरवलं रश्मीने? तिच्या मनात काय चालू होत? तीन वाहिनिंशी काय चर्चा केली? ती सर ना भेटायला का गेली? विनीताला कोणती तयारी करायची होती? रश्मीच्या निर्णयाने तिला करिअरची दिशा मिळणार होती का? रश्मी कडे वैचारिक प्रगल्भतेचा आभाव होता का? एक पाऊल मागे घेणे म्हणजे हार मनण असं म्हणायचं का?
चांगल्या गोष्टीसाठी नकंटाळता सातत्याने प्रयत्नशील असणं, ध्येयाप्रती नेण्यास मदत करू शकतं. थोड्याशा अपयशाने गळून जाण किंवा माघार घेणं, थांबून राहणं हे आशावादी दृष्टीकोन बोथट करणारं ठरु शकतो. परंतु ठेचं लागल्यानंतर येणारा सावधपणा जसा रस्त्याकडे पाहून, जपून चालायला मदत करतो तसंचं एखाद अपयश, टर्निंग पॉईंट ठरवू शकतो आणि सारी जिद्दी एकवटून न भूतो नं भविष्यती असं यश संपादन करू शकतो हेही तितकंच खरं आहे. स्वतःचे विचार आणि ईतरांकडून मिळालेले सल्ले याचा परिपाक असा निघाला की, रश्मी बी. एड. ला ऍडमिशन घ्यायला तयार झाली. मनातील साऱ्या शंका – कुशंका दूर ठेऊन आता नव्या दमानं, नव्या उमेदीने, नव्या उत्साहानं विनिता आणि रश्मी तयार झाल्या पुढच्या कोर्स साठी. नेहमीसारखं सर मदतीला धावून आले आणि त्यांनीच रश्मीची प्रवेश प्रक्रिया पार पडली. सुरु झाला नवा अध्याय.
आज पहिला दिवस सर्व लवकर आटोपून बस स्टॅण्डवर पोहोचली. सहा वीसची गाडी सहा पंचवीसला आली आणि रश्मीचा नवा प्रवास सुरु झाला. नव्या शैक्षणिक वर्षाबरोबर नवा उत्साह, नवी उमेद आणि प्रचंड आशावाद मनात साठवून रश्मी, दिवास्वप्नात दंग असताना गाडी विजुच्या गावा जवळ आली. भात शेती आणि ऊस शेतीचं पीक तरारून आलं होतं. भाताच्या कोवळया पात्यावर दवबिंदू दिसतं होते. झुंज मुंज प्रकाश जाऊन आता बरंच स्पष्ट दिसतं होतं आणि ड्राइवरन ब्रेक लावला.
समोरच विहंगम दृश्य पाहून एस. टी. ड्रायवर सहित सर्व प्रवाशी चकित झाले.
इतके सारे भारद्वाज पक्षी आणि एकच वेळी समोर शांतपणे आपलं अन्न शोधत होते. “कुबुक, कुबुक” आवाज करत होते. सकाळच्या शांत वातावरणात लाल पंखाचे कुंभार कावळे आणि त्यांचा “कुबुक” आवाज कानाला गोड वाटत होता. शुभ संकेत डोळ्यद्वारे मनात साठवत असताना आणखी एक नजाऱ्याने रश्मी आणि सह प्रवाशाची नजरबंदीच केली. एकाच वेळी इतके सारे मोर रस्ता क्रॉस करत होते. बाजूच्या भात शेतीत एक मोर आपल्या लांब आणि सुंदर पंखांचा पिसारा फुलवून नाचत होता. अप्रतिम नजराणा आणि शुभ संकेत. डोळ्यात साठवू की मनात? हृदयात कुठे जपू हे दृश्य! भाव विभोर झाली रश्मी, समोरची ही दोनही दृश्य पाहून ! आणि हळू हळू सारे भारद्वाज पक्षी आणि मोर बाजूच्या शेतात आपल्या आहाराच्या शोधात निघाले. कंडक्टरने बेल दिल्यावर ड्रायवरने गाडी पुढील प्रवासासाठी सुरु केली.
संध्याकाळी घरी आल्यावर आई, सई आणि चंदाला ही सुंदर घटना सांगताना तिचा आनन्द ओसंडून वहात होता. चंदा आणि सई आपला आनंद लपवू शकल्या नाहीत. त्यांची वेगळीच कुजबुज सुरु होती. शेवटी त्या तिघींनी भली मोठी बॅग कॉटवर उलटी केली आणि रश्मीने डोळे विस्फारले. समोर एकाच वेळी सहा नव्या साड्या आणि मॅचिंग. खूप सारी ख़ुशी घेऊन आलेला दिवस रश्मीने पुस्तकात ठेवलेल्या मोरपिसासारखा मनात जपून ठेवला.
पहिल्याच दिवशी भेटलेली विजू आणि रश्मीची मस्त गट्टी जमली. विजू पूर्ण कन्नड भाषेत शिकलेली होती. तिचे आई, वडील दोघेही शिक्षक होते. तिला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. धाडशी, हुशार आणि मनमोकळी विजू सर्वात पुढे असे. बी. एड. म्हणजे जेमतेम नऊ महिन्याचा कोर्स पण पोर्शन प्रचण्ड. माद्यमिक शिक्षण आणि त्या संदर्भात, त्या अनुषंगानं आलेल्या सर्व गोष्टीची सखोल चर्चा केली जाई. शिक्षक आणि त्याची जबाबदारी या गोष्टी नव्याने समजल्या. सगळ्या होऊ घातलेल्या शिक्षकांमध्ये परफेक्टनेस आणण्यासाठी तेथील प्रोफेसर मंडळींची चाललेली धडपड वाखाणण्या सारखी होती. शिक्षण आणि शिक्षक याबद्दल आपल्याला खूप माहित आहे असं वाटायचं पण साऱ्या गोष्टींची नव्याने ओळख झाली आणि शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवणं आणि जबाबदारीं व्यवस्तीत सांभाळणं हे एक व्रत आहे हे समजलं. एक उत्तम शिक्षकांसाठी आवश्यक असणारी आयुष्यभरा साठीची शिदोरी आणि शिस्त बी. एड. कोर्स करत असताना इथंच मिळत राहिली.
रोज पहाटे पांच वाजता उठायचं, पटापट आवरून सहा – दहाची एस. टी. पकडायची आणि बावीस किलोमीटरवर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायचं. कॉलेज स्टॅन्ड पासून दहा मिनिटाच्या अंतरावर होतं. लेक्चर अटेंड करायचं आणि लेसन प्लॅनिंग आणि प्रत्यक्षात लेसन घेणं अशी एकूण कामकाज चालायचं . लेसन प्लांनिंग जर समाधानकारक वाटलं नाही तर अक्षरशः फेकून द्याचये आणि कांही वेळेस ओरडून कांही वेळेस समजावून पुन्हा तयार करायला सांगायचे. कोणी ओरडून बोललं की, रश्मी गर्भगळीत व्हायची. एक, एक प्रोफेसर आणि त्यांची कामं करुन घेण्याची पद्धत जबरदस्त खतरनाक, विद्यार्थ्यांमधून जबरदस्त क्वालिटी पोटेन्शल बाहेर काढत होते. त्यांना माहित होतं नेमकं काय केल तर, या होऊ घातलेल्या शिक्षकांमधून चांगले गुण आणखीन चांगले आणि ताशीव आणि रेखीव बनवून बाहेर येतील. उत्तम शिक्षक आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकाऊ उमेदवारामध्ये कशा उतरवायच्या ते पक्के ज्ञात होते. सर्व स्टाफचा एकच उद्देश, कॉलेज मधून बाहेर पडणारा प्रत्येक उमेदवार – शिक्षक डिग्री आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व पात्रता गुण आत्मसात करूनच बाहेर पडायला हवा. त्यांचा उद्देश साफ होता. त्यांचं उद्दिष्ट, कर्मध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत कॉलेज स्टाफ, स्वताच्या दृष्टीनं आग्रही होते. होऊ घातलेल्या शिक्षक उमेदवारा मधून जबरदस्त, (पोटेन्शल क्वालिटी अपडेट) अव्यक्त गुणवत्ता व्यक्त करण्यायोग्य बनवून अद्यावत बनवत होते.
डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला ?
“रश्मी, हा डोस घेतल्यावर जर तुला बरं नाही वाटलं नाईलाजाने तुला ऍडमिट कराव लागेल,” डॉक्टर अंजना शहा गोळ्यांची पूडी रश्मीच्या हातात देतादेता बोलत होत्या. चंदाला जूजबी सूचना देऊन डॉक्टरनी रश्मी ही तुझी बहीण आहे का? असं विचारलं. पण पाच वर्षात एकदाही दवाखान्यात आली नाही. तुम्हा तिघीना मी ओळखते. रश्मीला नाही. डॉक्टरना पण आश्चर्य वाटलं. चार पाच वार्षत एकदाही दवाखान्यात नं गेलेली रश्मी अचानक काय झालं तिला? सतत पहाटे पासून रात्री पर्यन्त कॉलेज लेक्चर, प्लॅनींग आणि लेसन आणि जेवण खाण्याच्या वेळात बदल, प्रवासाचा ताण आणि अभ्यासाचा ताण…. परिणामी पोटं, पाटीला लगलेलं, डोळे खोल, बसलेले गाल: रश्मीची पार रयाच गेली. बेडवर पडलेल्या रश्मीकडे पाहून विनिता मनातून हादरली. आपल्या पोरीची काय ही अवस्था ! त्यात मधेच परीक्षा हातात पुस्तकं पकडून वाचायची ताकद पण नाही राहिली. चंदा पुस्तकं वाचन करी आणि बेड वर पडल्या पडल्या रश्मी ऐकत असे. विनिता, रश्मीला मऊ भात भरावी. आता आणखी तब्बेत बिघडली म्हणून डॉक्टरनि ऍडमिट करायचे संकेत दिले. अती अशक्तपणा नडला होता. विनिताला हातपाय गाळून चालणार नव्हतं. पदर खोचून उभी राहिली विनिता सई आणि चंदाबरोबर. इलेक्ट्रॉल पावडर, नारळ पाणी, फळांचा ज्यूस, डॉक्टर अंजनाचं औषधं आणि आई बहिणीचं प्रेम. सारं कुटुंब एक झालं रश्मीच्या टोकाच्या आजारपणात. आणि या सर्वाचा परिणाम असा झाला, पंधरा दिवसात रश्मी आजारातून खडखडीत बरी झाली.
सर्व ठिकाणी रश्मीला इतक सावध का राहायला लागायचं?
वेळ कमी, खूप कामं आणि कामामध्ये भरपूर वैविध्य होत. त्यामुळं शिकविण्यात वकबगार स्टाफ खूपच नियोजनबद्द पद्दतीने सर्व वर्षाचं कामकाज पाहत होता. गुणवते बाबत कुठेच तडजोड नव्हती. वेळेचं नियोजन बी. एड. मधील महत्वाचं अस्त्र होतं. अन्यथा इतक्या कॉम्पक्ट केलेल्या बाबी आणि लिमिटेड वेळेत सर्व गोष्टी बिंबवणे कठीण होत. बिंबवलेलं तपासल जायचं. कुठं काय कमी आहे? याचा शोध घेऊन मदतीचा हात पुढं केला जायचा. आमचीच परीक्षा नव्हती तर कॉलेज प्रिन्सिपॉल, आणि स्टाफची पण परीक्षा होती. जेवढे परीक्षार्थी यशस्वी, तेवढा आनंद स्टाफला व्हायचा. बी.एड.चे सिलॅबस बुक्स, रेफरन्स बुक्स, पाचवी ते दहावीचे सिलॅबस बुक्स, त्यांचे रेफरेंस बुक्स, लेसन प्लॅन आणि ऍक्चुअल टीचिंग विथ टीचिंग एड्स या आणि इतर गोष्टी गृहीत असायच्या. आपलं शिकवण त्यामध्ये अद्यावतपणा आणणं आणि प्रभावी बनविण्यासाठी आपण काय करू शकतो ते पण विध्यापीठानं दिलेल्या अटी व शर्थीच्या अधीन राहून सर्व कामं व्यवस्तीत सुरु होतं. आणि हा हा म्हणता सहा महिने संपले आणि
घरात रश्मी मोठी असल्याने तिला सर्व अनुभव नवीन होते. सर्व गोष्टी पूर्णपणे नवीन असल्याने समजून, शिकून घेणं हे क्रमप्राप्त होतं.
कॅम्प, शॉर्ट एज्यूकेशनल ट्रिप, को – करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या आणि अशा इतर गोष्टीबरोबर वर्ष संपलं आणि परीक्षेसाठी स्टडी लिव सुरु झाली.
आणि आता बी. एड. परीक्षा आली.
आता दिन – रात एकच आस, परीक्षा अन् आग्रही ध्यास. त्या दृष्टीनं सुरू प्रयत्न सारे, खुलतील आता यशाची द्वारे 🙏
सर्व पेपर मस्त गेले. अशा तऱ्हेने बी. एड.ची परीक्षा पार पडली.

मँडम “तु सदा जवळी रहा” कथा फारच सुंदर आपण मांडली आहे, पुढील भाग वाचण्यासाठी लवकर पोस्ट करून दयावेत,आपणाकडून असेच सुंदर लेखन होत राहो ही परमेश्वर चरणीं प्रार्थना करीत आहे.
धन्यवाद🙏 जयवंत पाटील सार. मी आवश्य प्रयत्न करेन. आपण पूर्ण कथा वाचून दिलेल्या अभिप्राया बद्दल मी आपली आभारी आहे.