भाग -1  एक आईं , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. भाग -2  बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….भाग-3  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….भाग  – 4. विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातिल आठवणी….भाग -5  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  भाग – 6  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मिच वि…..  सदृश्य जीवन.  भाग -7   एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना.   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग  8  आईच,  मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली. भाग -9  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार? भाग – 10  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.भाग -11  मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.भाग- 12 मध्ये वाचा,  सुचिताचि  प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  भाग -13* मध्ये वाचा,  @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते? भाग -14 * वाचा   काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबाचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना  का भेटली?  सर नी पेढे का मागितले?  भाग -15 * मध्ये आपण वाचलात,  वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसत? भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीन?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17 @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18 * तरुण मुलगी घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न,भाग -19*   आत्या की मैत्रीण,  फिरकी? अतरंगी बंटी,  भाग -20,   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा?  उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? भाग -21* विनिताच नेमाक काय आणि कोठे चुकलं?    श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  भाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण  कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन, लायब्ररी…, हास्य , आनंद म्हणजे … वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24 * परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणी विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2 श्रध्दा असेल तर भाग -25,वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिश पॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ… भाग – 26, दुसरं वर्ष आणि बरंच काही , आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे नात्यांची चिरफाड, सईच कॉलेज

दुसरं वर्ष आणि बरंच काही , आमिष

क्रिया आली की प्रतिक्रिया आलीच. एखाद काम केलं की त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी, घटना या पण आल्याच. “न कळत प्राशिता अमृत, अमर काया होतं यथार्थ || औषध नेणता भक्षित परी रोग हरे तात्काळ||”. तसंच आहे याच पण. मला रस्ता क्रॉस करण्याचे नियम माहित नाहीत म्हणून लाल सिग्नल असताना रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला तर अपघात होऊ शकतो. खुप साऱ्यां चांगल्या घटना बरोबर घेऊन आलेल्या वर्षाने एकच अप्रिय घटना देऊन गेलं दुसरं वर्ष पण खुप काही शिकवून गेलं. आता तिसरं आणि महत्वाचं वर्ष सुरु झालं. आता तिसऱ्या वर्षाच्या तयारी बरोबर पुढे काय हा प्रश्न ❓️ बोलता बोलता वहिनींनी उपस्थित केला आणि विचार✳️ चक्र फिरायला लागली. आणि हे सगळं चालू असताना बँकेत लिव वेकेंसी वर काम करण्याची ऑफर आली. महिना रुपये तीन हजार आणि ते पण तीन महिन्यासाठी! काम शिकायला मिळत आणि पैसा पण. आता काय निर्णय घ्यायचा???? “काही गरज नाही अशी लिव वेकेंसी वर नोकरी करायची. कॉलेजचं महत्वाचं वर्ष आहे अभ्यासात लक्ष घाल.” हा आई, विनिताचा सल्ला कम आदेश शिरोधार्य मानून, सध्या नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाकला. रश्मी पेक्षा विनिताला माहित होती रश्मीची कॅपॅसिटी. रश्मी मेहनतीनं पुढ जाऊ शकते. पण ती मेहनत, अभ्यासात कमी पडेल तर पूर्ण वर्ष वाया जाणार होत. ते परवडणार नव्हतं. रश्मी अभ्यास आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकेल का? या प्रश्नच उत्तर नाही असच मिळालं. विनिताला त्या करिता रश्मीला विचारायची गरज नव्हती. विनिता एवढं कोण ओळखत होतं रश्मीला❗️ त्या मुळे एवढ्या महत्प्रयासाने आतापर्यंत सुरु असलेलं शिक्षण मधेच काही पैशासाठी दुर्लक्षित झालेलं, पुन्हा खंड पडलेलं चालणार नव्हतं. म्हणून विनिता, रश्मीच्या नोकरी करण्याच्या विरोधात होती. आणि याच विचारावर ठाम होती. आपली आई जे सांगते ते आपल्या भल्या करताच आहे, आणि त्या वर पुन्हा विचार करण्याची, प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता नाही असं म्हणून तो विषय तिथंच संपला..

पाणी ❗️ पाणी ❗️❗️ पाणी ❗️❗️❗️


चार  वर्षा पूर्वी जेव्हा आशिष बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर विनिता राहायला आली, तेंव्हा प्रशस्त गॅलरी, सकाळी संध्याकाळी गॅलरीतील नळाला असलेलं पाणी यामुळे खूष होती. पण नंतर बिल्डिंग मध्ये भाडेकरू पण वाढले आणि दिवसातून दोन वेळेला येणार पाणी एक वेळेला येऊ लागलं. बऱ्याच वेळेस छोटी सई पाणी भरण्याचं काम करत असे. आणि अवघड काम आणखी अवघड झालं होतं. आता पाण्याचा जोर कमी झाल्यामुळे खालून पाणी पहिल्या मजल्यावर आणावं लागे. पण तेही कमी झालं आणि एक दिवस आड पाणी येऊ लागलं. पाण्याच दुर्भिक्ष त्रस्त करू लागलं. जवळच्या पाणपोई कडे मोर्चा वळवावा लागे. समोर बाबा मंजिल मधील बंगल्यातील विहिरीत अखंड पाणी असे आणि बडी भाभी रश्मी, चन्दाला बोलावून पाणी देत असतं. हे पाण्याचं स्त्रोत संपूर्ण गावाला त्रस्त करत होतं पण त्यावर उपाय काहीच नव्हता. पाणी – दोन अक्षरी शब्द अर्थगर्भ. कितीतरी वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं पाण्याला❗️ किती उपमा❗️ त्याच असं स्वतंत्र आणि प्रचंड महत्व. पाणी म्हणजे जीवन ही उपमा देऊन त्याच महत्व अधोरेखित केलं. पाण्या सारखं निर्मळ, पाण्यासारखं पातळ, स्वच्छ वाहत, रंगहीन, जल हेच जीवन, सर्वाना आवश्यक. पाणी पाणी होणं, आकाश भरून येण, डोळे भरून येण या उपम पण दिल्या जातात. पाण्या वरून म्हणी पण किती तरी आहेत. एकदा लोचन या बहिणीच्या तोंडून ऐकलं, वळणाच पाणी वळणावर जाणार म्हणून मस्करित छोट्या दोन महिन्याच्या बाळाला अंघोळ घालत होती. “तीच जाणे, तिला काय म्हणायचय ते,” म्हणून दुर्लक्ष केलं. डबक्यात, पाणी ओढ्यात, तलावात, विहिरीत, नदीत, समुद्रात, नारळात: पाणी सर्वत्र……. कोणतीही गोष्टी आवश्यकते पेक्षा कमी असेल तर, मागणी पेक्षा पुरवठा कमी असेल तर त्याच महत्त्व जास्त होतं. आणि मागणी पेक्षा पुरवठा जास्त असेल तर वेगळीच समस्या निर्माण होते. उत्पादन मागणीच्या प्रमणा पेक्षा कमी असेल तर, साठवण केली जाते. पण पाण्या सारखी गोष्टी थोडीच साठवता येते??? कांही मर्यादेत. पण कमी असेल किंवा नसेल तर…???? आणि आता हा प्रश्न विक्राळ रूप धारण करू लागला. आणि एकाचे दोन, तीन, चार म्हणता पाणी नळाला येण्याचे दिवस आणि वेळ लक्ष्यवेधी झाले. सीमा भाग म्हणजे, “धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का |

⛈️🌊💧जल जीवन💧🌊⛈️

जल हेच आहे जीवन.
कधी होत से जलमय ही धरा,

कधी रखरखीत उन्हाचा मरा |

वनस्पती अन् जीव सारे  

निसर्गापुढे हतबल पाचोळा ||

नारेची केला घोटाळा,  

झाडांची केली कत्तल|

मानव वस्ती सारीकडे,

मग निसर्ग नियमन कोणीकडे? ||

प्रकृतीचा नको नाश,

करूया रक्षण वनांचे |  

नाचू बागडू दे, निसर्ग वनचंर,

जलचर विहरू द्या,  नीज धमी |

सुखेनैव सोबत,  ना जलमय, ना दूर्भिक्ष्य

 निसर्ग स्त्रोत साधेल समतोल. 

आई आणि वहिनीचा सल्ला 


इकॉनमिक्सचे सर, मागणी तसा पुरवठा आणि त्याबद्दल शिकवत असताना इकडे वहिनी वेगळा पाठ घेत होत्या. “मला हा विषय आवडतो, मला हा विषय सोपा जातो , मला अमुक विषयात मार्कस चांगले मिळतात, माझ्या मैत्रिणीनं हा विषय घेतला म्हणून मी तोच विषय घेते वगैरे विचार करण्यापेक्षा कोणता विषय घेतल्यामुळे पुढे जाऊन त्याचा उपयोग होऊ शकेल”, हा विचार मनात पेरला. आणि विचारला चांगलं खतपाणी घातलं. हे सारं ठीक आहे. पण ग्रॅज्युएशनला विषय निवडताना भेड – बकऱ्यासारखे निवडू नको.  त्यानं करियर करताना समस्या निर्माण होईल. “विनिता वहिनी आणि तुझ्या बोलण्यावरून अस दिसतय की तू नोकरी करणार. नोकरी करायचं  जर पक्क असेल तर डिमांडेड विषय घे !”
 कधी रागावून, कधी गोड बोलून, कधी कान उघडणी करून मार्गदर्शन करणाऱ्या वहिनीनी इथ पण मदतीचा हात पुढं केला. “ठीक आहे,  संप झाला. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्या बद्दल चर्चा कारण, दोष देत बसणं, हळहळ व्यक्त करणं यातून काहीही साद्य होणार नाही. आता उपाय शोधा आणि पुढच्या कामाला लागा.  नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती आल्या तर, डगमगून जायचं नाही तर, ताठ मनेन समस्येला भिडायच.  डोकं शांत ठेऊन उपाय काढायचा.  समस्येला किती महत्त्व द्यायचं? आलेली  समस्या किती मोठी करायची? हे आपल्यावर अवलंबून असत. हा विनीतचा विचार वहिनींनी पुनश्च धृड केला. आई प्रमाणेच तारा वाहीनिंबरोबर बरोबर बोलल की हलकं वाटायचं किवा उपाय शोधण्यासाठी मदत व्हायची.  बारावीनंतर विषय निवडताना मदत केलीच पण ग्रॅज्युएशनला विषय निवडताना सल्ला दिला. एकदा दिशा पक्की झाली की, त्या दृष्टीने तयारी आणि वाटचाल सुरू करता येते.  आता डोक्यात असलेले नकारार्थी विचार झटकून पुढे चालत राहायचा विचार पक्का झाला. आणि तिसरं वर्ष संपत आलं.  दुसऱ्या वर्षाच्या संपाचा परिणाम थोडाबहुत परिणामकारक होताच. चालतंय की,  म्हणून चालत राहायची शिकवणं घेऊन पुढे चालत राहिलो. 

कोर्ट की,   नात्यांची चिरफाड ? 


मर्यादित उत्पन्नाचं स्त्रोत आणि वाढणाऱ्या गरजा यातून वाट काढताना विनीताची दमछाक होत होती. पण तिनं आपल्या तीनही मुलींना त्याबद्दल कधीच मुद्दामहुन जाणीव करून दिली नाही.   परिस्थिती माणसाची गुरु बनते आणि बऱ्याच गोष्टी शिकविते. रश्मी परिस्थिती जाणून होती. आईची होत असलेली ओढाताण तिला दिसत होतीच ना. मनावर नुसते ओरखडेच नव्हे तर मन घायाळ करणारी घटना वाटे. कोर्टा मुळ कुणाचं भलं होतंय ? आर्थिक परस्थितीबरोबर मन आणि मनातील नातेसंबंधांच्या भावनांची चिरफाड होते,  कोर्टात पाऊल ठेवण्याने. वितुष्ट चव्हाट्यावर येत.  आपल्या मध्ये  असलेले वाद तिसऱ्या व्यक्तीनं सोडवावे म्हणून पैसे देऊन विनंती करायची पद्धत. नेमका कोणाचा फायदा?  ज्याची विनीताला धास्ती होती तेच न कळत घडत होत.  विनिताच्या मनात होत असलेली  कालवा कालव आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यायानं त्यासाठी लागणारं  औषधं पाणी,   रश्मी आणि बहिणींना सारं दिसत होता. कळतही होतं. विनिता काही वेळेस हतबद्द व्हायची.  आपलेच दात आणि आपलेच ओठ, त्या मुळे दाद मागणार कोणाकडे?   एकाच आईची मुलं. एक सारखेच संस्कार. एकाच परिस्थितीतून वर आलेली भावंडं. पण श्री.. आणि इतर भावंडांच्या विचारात जमीन आस्मनाचा फरक वाटायचा कधी कधी. परक्या व्यक्तीला पण गरजेला मदत करायचा श्री…. चा स्वभाव.  साऱ्या पंचक्रोशीतून श्री …. च्या  अंत्य विधीला आलेल्या  स्त्रिया आणि पुरुष, एक चांगलं, आपल्यातलं माणूस गेल्याच दुःख हृदयात घेऊन  परतले होते.  माणुसकी जपणारा,  प्रेमानं माणसं बांधून ठेवणारा आणि मदतीला धावून जाणारा श्री…! आणि आज श्री…. ची बायको, श्री…. चा चांगुलपणा,  पुण्याई आणि पदरात पडत असलेलं दान याचा विचार करत राही…  स्वतःलाच प्रश्न❓️ विचारत राही आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करी.  
आणि मऊ दिसेल तर ऊस मुळापासून खायचा हा स्वभाव. एका भावाला मुलं नाहीत म्हणून आणि एका भावाला  साऱ्या  मुलीचं म्हणून त्यांच्या संपत्तीवर हक्क हवा हा अट्टाहास आणि  वृती,  निर्मळते पासून कोसो दूर होती. जर मनातली स्वार्थी इच्छा पूर्ण झाली नाही तर  समोरच्या माणसाचा वेगळ्या प्रकारे चालवलेला छळवाद कशाच द्योतक होत?    न कळत तुलना होत राही. कर्त्या व्यक्तीचा दर्जा ताई आजीला देऊन घराण्याची भरभराट करणारा श्री… आणि ताई आजी द्वारे घरातीलच  व्यक्ती विरूद्ध  कोर्टात केस करून घरात वाद निर्माण करून ते चव्हाटयावर आणणारी घरातील व्यक्ती …. संस्कार एकाच आईन केले. म्हणजे देणारा समान देत असला तरी घेणारा निवडतो,  मला नेमकं काय घ्यायचे ते.  वाढत्या वयात घडणाऱ्या घटनांचा परिणाम मनावर  कोरला जातो आणि त्यानुसार माणूस घडत असतो.   हे पिढ्यान् पिढ्या चालत. लहानपणी एक मेकाच्या गळ्यात हात टाकून फिरणारी भावंडं मोठे पणी तेच हात गळ्याभोवती आवळू शकतात? नाही नाही. हे कुठं तर थांबायला हवं. पण कसं?  विनिता  मान हलवून स्वतःशीच संवाद साधतं होती.  आता वारंवार एक दुखणं डोकं वर काढत होत आणि आर्थिक घडी विस्कळीत होत होती, ती म्हणजे कोर्ट केस. विनिताला नाईलाजाने आणि  जड अंतःकरणाने करावी लागलेली गोष्ट म्हणजे मळा विकण. चार वर्षांपूर्वी जेव्हा मळा विकला तेव्हा पासून दिरानी कोर्टात केस टाकली होती. “मळा विकलास न,  तर  आता आलेली रक्कम पाच  वाट्या मध्ये विभागणी कर आणि तीन नणंदा आणि ताई आजी असे चार वाटे त्यांना दे आणि पाचवा वाटा विनिता आणि तीन मुलींसाठी ठेव.” ही मागणी होती केली होती कोर्टात.  केस चालवण्यासाठी वकिलाला एक रक्कमी पैसे तर द्यावे लागले होतेच पण वारंवार येणाऱ्या केस साठी तालुक्याला जायचं आणि प्रत्येक वेळी  उपस्थिती साठी वकिलांना पैसे द्यावे लागायचे. तरुण, वाढत्या वयाच्या मुलिंच्या तोंडातून घास काढुन वकिलाची भर करावी लागत होती. भाऊ आणि भाऊ बंदकी  अशी चव्हाट्यावर आणली गेली होती.  आणि घराचं कुरुक्षेत्र केलं होत श्री… असताना त्याची झळ नव्हती पण श्री…. गेल्यानंतर विनिता या घरात चाललेल्या राजकारणाला वैतागली होती. जेव्हा शेत आणि घरातील इतर गोष्टींचे वाटे झाले तेव्हा तीनही भावांना, ताई आजी आणि  बहिणींचा  वाटा द्यावा असे नाही वाटले आणि विनीतान स्वतःच्या वाट्याची जमीन विकल्यावर काकांना, आई व बहिणींच्या वाट्याची आठवण झाली होती आणि त्यासाठी कोर्टातच दाद मागितली.
श्री… च्या तीनही बहिणी स्वतःच्या मोठ्या घरात रहात होत्या.  त्या सुखवस्तू प्रकारात मोडत होत्या. दोन दिर महाराष्ट्र सरकारची नोकरी करत होते आणि एक काकू भारत सरकारची नोकरी करत होत्या. त्यामुळं शेती आणि नोकरी मुळ घरात सुबत्ता होती. पण आपल्या वाट्याची शेती बहिणींना आणि आजीला द्यावी अशी इच्छा, सुखवस्तू परस्थितीत राहणाऱ्या भावांना वाटलं नाही.  पण आपल्याच भावाची बायको, विनितांन मात्र  वाटा द्यावा म्हणून चाललेली धडपड कोणत्या विचाराची पातळी गाठली होती? हे तर्का पलीकडे होत. श्री … गेल्यापासून ताई आजी विनिता जवळचं रहात होती. पण सात, आठ वर्षात, ताई आजीसाठी, नणंद किंवा दिरांनी खर्च करावं, अशी विनीतान कधीच आपेक्षा केली नव्हती.  ताई आजीचा स्वभाव आणि त्यांचं आपत्य श्री … गेल्यापासून त्यांनी दिलेला आधार विनीताला दुःखातून सावरायला केलेली मदत अमूल्य होती. पण आताची परिस्थिती पूर्ण वेगळी होती.    निसर्ग असो नाहीतर मानव, समोर निर्माण केलेल्या परिस्थितीला  भिडण आणि त्यातून वाट काढून पुढे चालत  रहाणं क्रमप्राप्त होत. 

मिडी… ! नव्हे संस्कार बोलत होते.


अशातच आली दिवाळी. दिवाळी नेहमी आनंद घेऊन येते. प्रकाश घेऊन येते. नव्या अशा निर्माण करते. आणि नेहमीच्या चाललेल्या रूटीन पेक्षा वेगळी असते. घरात  चाललेल्या ओढाताणीचा परिणाम समोर दिसत होता. रश्मी बरोबर चंदा आणि सई पण समजूतदार झाल्या होत्या. पण त्या तशा लहानच होत्या.  घरी खुशीतच आली चंदा कॉलेज मधून.  सुप्रितनं दिवाळीला  सिलेक्शन एम्पोरियम मधून नव्या डिझाईनचा ड्रेस घेतला होता दिवाळीसाठी. आणि मैत्रिणींमध्ये आज दिवाळीच्या खरेदी आणि गंमती जमतीची चर्चा चालू होती. त्याच मूडमध्ये आईला विचारलं तीन, “आई,  आपण  केव्हा जाणार दिवाळीच्या  खरेदीला? ” ……………………………..”
विनिता काहीच बोलली नाही. 
 तेवढ्यात दरवाज्यावर टकटक आवाज  झाला 
“बेलीफ sss” म्हणून आवाज आला. दरवाज्याबाहेर  पांढरे शुभ्र कपडे घालून एक माणूस उभा होता.  त्याच्या हातात  रिसीट होती.  ती घेऊन विनितान सही केली.  रश्मी आणि विनिता त्या दिवशी गप्प गप्पचं  होत्या.  संध्याकाळी सई आली ती पण उद्यापासून दिवाळीची सुट्टी म्हणून खूष होती.  रश्मीच्या डोक्यात विचाराचा गोंधळ होता.  विनिताचं अवघडलेपण रश्मीलाअस्वस्थ करणार वाटलं.  कपडे   फक्त्त सणासुदीच्या निमित्ताने घेतले जायचे.  त्यात भपकेपणा आजिबात नसे.  

 सई तशी लहानच होती आणि चांदपण.  बाल हट्ट होता.  साधी नव्या कपड्याची तर अपेक्ष केली  चंदाने. अगोदरच स्वतःची वेगळी मतं, स्वतःची अभिरुची जपणार व्यक्तिमत्व  आणि ठाशीव विचार असलेली चंदा आणखी प्रगल्भ झाली होती.   ती कॉलेज मध्ये ज्या मैत्रिणींच्या ग्रुप बरोबर वावरत होती तो  उच्चभ्रू गटात मोडणारा होता.  त्या मुळे चंदाची अभिरुची पण तशीच  उच्च प्रतीची  झाली होती. हळूहळू तिचं व्यक्तिमत्व आग्रही बनत होतं. रात्री झोपताना पुस्तकाच्या बाजूला लाल मातीचं गोल भांड रश्मीला खुणावत होतं. रात्री उशिरा झोप लागली  शांतपणे.  सकाळी दहा वाजता चंदा आणि सईला  मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन थिओ  ऍस्थलीनच्या गोळया आणि  भाज्या आणायला पाठवलं विनितानं.  दरवाजा बंद करून रश्मी “लाल गोल” घेऊन विनिता समोर आली.  “अग रश्मी sss….. ” तोंडातुन शब्द बाहेर पडायच्या आत “फट्टsss” आवाज झाला  आणि  लाल गोळ्या सहित नाणी आणि नोटा किचन भर   विखुरल्या.  विनिता काही बोलायच्या आतच रश्मी एक रुपया,  दोन रुपये,  पाच रुपयाचे क्वाइन्स वेगळे करत होती आणि आईला पैसे मोजायला सांगत होती. “तुला पॉकेट मनी म्हणून दिलेले शंभर रुपये खर्च नं करता तसेच ठेवलेस रश्मी? ” विनितानं  भिशीतून बाहेर पडलेल्या शंभर रुपयाच्या नोटेच्या घडीकडे पाहून रश्मीला विचारलं. “आई,  डबा असतो जेवणाचा आणि लता,  नेत्रा पण डबा आणतात.   त्यामुळे पैसे तसेच राहिले होते.” रश्मी उतरली. विनिता,  “………… “. “आई, एकशे साठ रुपये आहेत  एकूण”,  रश्मीने  सर्व पैसे छोट्या पाकिटात ठेऊन  विनिताकडे दिले.  “आज संध्याकाळी चंदा आणि सईला नवीन कपडे घेऊ!” विनिता आणि रश्मीन ठरवलं.  दिवाळी नंतर जेव्हा सई आणि चंदा आपल्या मैत्रिणींना  भेटतील तेव्हा घोळक्यामध्ये त्यांचे चेहरे ओशाळवाणे नसतील करणं त्या पण नवीन कपडे घालून कॉलेजला गेलेल्या असतील, या कल्पनेनं रश्मीच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित विनितानं आपल्या नेत्रांनी टिपलं.   अन्न, वस्त्र ही गरज होती. चैनीची गोष्ट नव्हती.  संध्याकाळी  मार्केट मध्ये जाताना चंदा आणि सई दोघीही विनिताच्या कानात काहीतरी कुजबुजल्या आणि देवघरातील हळद कुंकू लागलेली मळकी नोट  विनितानं चंदाच्या हातात दिली. खांडके काकांच्या दुकानात गेलो आम्ही.  राणी कलरवर  बारीक आणि नाजूक नक्षीकाम असलेलं आणि हिरव्या रंगवर बारीक नक्षीकाम असलेलं कापड सई आणि चंदान मिडी साठी  पसंत केलं. स्वतःचा  पॉकेट मनी पुरेसा नव्हता म्हणून चंदा आणि सईनं आई कडून थोडे पैसे घेतले होते आणि आपल्या लाडक्या आनंद दादासाठी शर्ट पीस घेतला.  येताना मिडी शिवायला देऊन घरी परतलो.   प्रेमाची उधळण करत आमची दिवाळी मस्त झाली. आनंदच पण ग्रॅड्युएशनच वर्ष होतं म्हणून तो जास्त दिवस राहिला नाही. 

समजूतदार चंदा

आज चंदाच्या मैत्रीण,   सुप्रित आणि स्वामींनी यांची वेगळीच चर्चा चालू होती. एकदम खुश होता चंदाच्या मैत्रिणींचा ग्रुप. कारण बातमी पण तशीच आनंदाची होती. स्वामींनीच लग्न ठरलं होत आणि आज ग्रुप मध्ये तीच चर्चा चालू होती. स्वामींनीला बाय करून बाकीच्यांनी काहीतरी गुपित ठरवलं आणि खुशित   आपापल्या घरी गेल्या. स्वामींनी ग्रुप लीडर होती. हुशार, गोरीपान, डॉक्टर वडीलांची लाडकी आणि मोठी मुलगी. जवळच्या तालुक्यातून कॉलेजला यायची.  स्वामींनी आणि भाग्योदय  प्रेमळ बहीण – भाऊ . कधी कधी लुटूपुटूची भांडण करत कधी मस्करित एकमेकाची खेचाखेची चाले. 
आज, कॅन्टीन मध्ये सर्व मैत्रिणी मिसळ पाव आवडीने खात होत्या. स्वामींनी गाल धरून बसली होती. “स्वामींनी,  झणझणीत मिसळपाव तुला खूप आवडतो, आम्हाला माहीत आहे. पण आज तुझा मुड  दिसत नाही. का ग,  नेमक काय झालं? अं, सांग ना?” भिवया उंचावून चंदान हसत विचारलं. 
कॉलेज मध्ये प्रीतनं छेडल, “स्वामींनी  काय झालं? आज गप्प गप्प का? बोलत नाहीस ते?” “माझ्या हिरड्या दुःखत आहेत. मला जास्त बोलायला लाऊ नको ना, ” स्वामींनी हिरडी दुखीनं खरच बेजार झाली होती.  सर्वजणी कॅन्टीन मधून बाहेर पडून आपापल्या घरी गेल्या. स्वामींनीला घरी पोहचायला दीड तास लागला होता. तो पर्यंत दुखणं वाढलं होतं. स्वामिनीची आई आणि भाऊ भाग्योदय डायनिंग टेबल जवळ गप्पा मारत बसले होते. “आई, माझी हिरडी खूप दुखतेय”,  आपल्या गोबऱ्या गालाला हात लाऊन स्वामींनी दुखऱ्या चेहऱ्यानं सांगत होती. तितक्यात बाजूच्या क्लिनिक मधून स्वामिनीचे वडील पण आले. “काय झालं आमच्या स्वामींनी बाळाला?  गाल पकडून का बसलीय आज?” डॉक्टर आत येता विचारते झाले. “स्वामींनीची  हीरडी दुखतेय बाबा,” भाग्योदय बोलला.  “अरे, ही तर चांगली गोष्ट आहे . तूला अक्क… येणार !” बाबा मिश्कीलपणे  बोलले. “म्हणजे बाबा, हीला  आक्क.. दाढ उगवताना,  दाढ  तीन दिवसच  सतावणारा  हिला आणि ही  जन्मभर दुसऱ्याना ….” म्हणत भाग्योदयनं   बाबांना टाळी दिली. “भाग्या sss” म्हणत स्वामींनी त्याला फटका द्यायला पाठी धावली आणि नेहमी सारख लुटूपुटुचं भांडण सुरु झालं.
चंदाला घरी येताना वरील प्रसंग आठवून हसू आलं.  आपल्या लाडक्या मैत्रिणीचं लग्न ठरलं म्हणून ख़ुशी मानावी की,  लग्न होऊन  दूर जाणार म्हणून दुःख मानावं या द्विधा मनःस्थितीत असताना सुप्रित आणि इतर मैत्रिणींनी मिळून ठरविलेली गोष्ट आठवली.  आणि घरी येऊन मैत्रिणीला लग्नात साडी देण्याचं ठरवल्याचे जाहीर करुन पैसे मागितले.  कधी कधी समजूतदार पणे वागणारी चंदा कधी अल्लड तर कधी हट्टीपणे वागे.  कधी विनिताला उत्तर नं देता येण्या सारखे  प्रश्न? विचारी.  बरीच हिरमुसली चंदा,  पण स्टीलच तसराळ आणलं आणि  भेट म्हणूनं मैत्रिणीला दिलं.  वस्तू पेक्षा ती देण्या पाठीमागची भावना महत्वाची असते, स्वामींनीला बाय करून घरी आलेल्या चंदाकडे पाहत रश्मी बोलली.  “रश्मी अक्का,  या गोष्टी पुस्तकात वाचायला ठीक आहेत” चंदा उतरली.  पण स्वामिनीला भेट आवडली म्हणून खुश झाली होती चंदा.  

इंग्लिश विंग्लिश

“A sentence should not begin with because because because is connective.” “A mother beats up her daughter because she was drunk.” Question : who was drunk?

“Doubt and faith are states of mind. Doubt creats the darkest moments in our finest hours, while faith brings finest moments in darkest hours”

म्हणून सर ग्रामर आणि thoughts पक्कं करत होते.  पार्टस  ऑफ स्पीच, definitions ऑफ sentence, kinds ऑफ sentences आणि त्यातल्या गमती  आर्टिकल आणि काही मर्यादित grammar points शिकताना आणि समजाताना आणि त्याचा उपयोग करताना वाटायचं, यापुढ काय असेल? पण ग्रामर हा विषय  किती   vast आहे हे लक्षात येतं होत. Wren and Martin चं ग्रामर बुक आणि ऑक्सफर्ड डिक्शनरी मागे राहिली आणि त्या बरोबर एंसायक्लोपेडिया आणि reference बुक्स घ्यायला लागले.

Bilabial,  labiodental, nasal, palatal म्हणून सर फोनोलॉजी पक्की करत होते. दहावी नंतर आकृती काढायचा चांस फ़ोनॉलॉजी मुळ मिळाला   आणि तोंडानी बोलताना, तोंडातील अवयवांचा उपयोग: शिकताना आम्ही विषय एन्जॉय करत होतो. शिकताना प्रोफेसर मंडळींच्या शिकविण्याच्या शैलीमुळे आवडणारा विषय असो किंवा क्रीटीसीझम सारखा अवघड वाटणारा विषय असो, क्रिटिकल अॅप्रिसिएशन, पोयट्री असो किंवा ड्रामा असो परीक्षेच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणे क्रमप्राप्त होते. शेवटचं वर्ष म्हणून सर्वजण गंभीरतेने घेत होते. आणि हा हा म्हणता वर्ष संपलं. रश्मी जेव्हा बारावीला कॉलेज मध्ये आली तेव्हापासून मुलींची गळती लागली होती. कोणी नापास झालं म्हणून, कोणी लग्न ठरलं म्हणून काही मैत्रिणी मध्येच निघून गेल्या पण मनात मात्र घर केल. त्यामध्येच राणी होती. तिला कशी विसरेल रश्मी. 

तिसर वर्ष संपलं पण मनात खूप प्रश्न निर्माण करून. सतत पंधरा वर्ष शिकतोय पण याचा नोकरी किंवा चरितार्था साठी काय उपयोग? काय मी आर्ट ग्रज्यूएट होऊन काम करू शकते?  करू शकते तर कोणतं काम?  पुढं काय? पोस्ट ग्रॅज्युएशन? त्याच्या पुढे काय?  पुढे काय ❓️❓️❓️❓️हा प्रश्न मनात घेऊनच परीक्षा हॉल मधून बाहेर पडलो आम्ही सारे. बऱ्याच जणांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचा पर्याय निवडला. त्यामध्ये नुसतं घरी बसून काय करणार? लग्न होई पर्यन्त जाऊ कॉलेजला, हा जसा विचार होता, तसाच उच्चतम शिक्षण घेऊनच बाहेर पडू हा पण विचार होता आणि आम्ही आपापले मार्ग शोधले. 
 सर्वात जास्त आनंद झाला तो विनीताला. अखेर स्वतःच्या जिद्दीनं तीनं नाडकर्णी कुटुंबात रश्मीला पहिली ग्राजुएट बनवलं.  विनितची काही प्रमाणात इच्छा पूर्ती झाली होती. खडतर प्रवास डोळ्यासमोरून सरकत होता. श्री… च्या अचानक जाण्याने अंगावर असलेली जबाबदारी आणि ती पेलत असताना आलेल्या अडथळ्यांवर करत असलेली मात आणि नातेवाईकांकडून मिळतं असलेली  कौतुकाची थाप पुढील वाटचालीस प्रोत्साहित करीत होती. सर्वांचं लक्ष होत विनिताकडे आणि तिच्या तीन मुलींकडे. आलेली आव्हान पेलताना पाटीचा कणा वाकु नाही दिला. रश्मी पाठोपाठ चांदाच  पदवीचं वर्ष आल्.   

सईच कॉलेज

सई कॉलेजला जायला लागली. आबा गेले तेव्हा सई जेमतेम अडीच तीन महिन्याचा बळ होत.  बाबा कसे असतात?  ते कसं बाळाचं संरक्षण करतात? त्यांच्या असण्यानं नेमकं काय घडलं असतं? हे आणि या सारखे प्रश्न मनातच ठेऊन मोठी झाली सई. विनिताच आई, विनितच वडील, विनीताच बंधू आणि वितीताच गुरु. रश्मी, चंदा बरोबर सई पण जाणून होती गावच्या शाळेत शिक्षणाचा पाया कच्चा होता. प्रत्येक मुलाला समजे पर्यंत शिकवण्याची पद्धत विकसित झाली नव्हती आणि प्रत्येक वर्षी पुढच्या आणि अवघड अभ्यासाची भर पडे. पुढचं पाट मागचं सपाट ….. गणिताचा वात आणि अवघडलेपण  दहावी बरोबर मागे ठेऊन  रश्मीने सुटकेचा श्वास सोडला कॉलेज एडमिशन नंतरच. तसचं होत असेल कदाचित बऱ्याच मुलांचं अस म्हणून समाधान मानत पुढे जात राहिली. आणि आता छोटुकली सई, मोटुकली होऊन कॉलेजला जाणार होती.

 लांब सडक केस, उंच आणि शिडशिडीत बांधा, लांब नाक आणि बोलके डोळे. सई आता खूप सुंदर दिसत होती. कॉलेजच्या पहिल्या दिवशी रश्मी आक्का कडून चारोळीतून   शुभेच्छा मिळाल्या. प्रिय सई … “उंच तुझ्या काये सारखी, उंच मार भरारी,भरारीच्या जोशाने,  अज्ञान होईल फरारी.”❗  छोटुकली सई दहावी संपऊन कॉलेजला जाणार होती. 

भाग 27 मध्ये वाचा, पदवी नंतर पुढं काय करणार??? रश्मीचा, एम ए ला प्रवेश घेण्याचा रश्मीचा हट्ट पुरवणार का विनिता ? कोणतं पाऊल उचलणार विनिता?

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020 Ranjana   Rao
Spread the love

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *