भाग -1*  एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते… भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण.. भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…

भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या  कुसुम ताई च्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी…. भाग – 5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते  🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…  भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मिच वि… सदृश्य जीवन. भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार ?अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग-  8* आईच मानस-दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण  भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार? भाग – 10 * साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो-खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवाच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.भाग -11 * मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* मध्ये वाचा, सुचिताचि  प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  भाग -13* मध्ये वाचा, रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते? भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दाखवली ज गुरुजींनी? काका आजोबांचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? सर नी पेढे का मागितले?  भाग -15 * मध्ये आपण वाचलात,  वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत? भाग-16*   विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते? पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? कुसुमताई,  सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी  कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮फिरकी? अतरंगी😂 बंटी  भाग -20   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? भाग -21* विनिताच नेमाक काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  भाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤पद्मिनी, 1श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच भाग -25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ.. भाग – 26, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईच कॉलेज.

भाग – 27 *  नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली? 

काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं? भाग – 28* वाचा 👉  अंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे? महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी, सुकलेलं बकुळ फ़ुल

 अंडं, कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे? 

बसनं गाव सोडला,  तसं रश्मीला पूर्वीचा बी.एड. नंतरचा  खडतर मे पासून सप्टेंबर पर्यंतचा  काळ आठवला.  इतके इंटर व्ह्यू देऊनही आपल्याला  किंवा समोरच्याला रुचलं नाही. कोणी म्हणे अनुभव नाही.  हे अनुभवाचं गणित,  “कोंबडी पहिली की अंड पाहिलं”,  “नोकरी पहिली की अनुभव”  ह्या त्रांगड्यात अडकलेलंचं  राहील.  कोणी म्हणे तीन वर्षे पगार मिळणार नाही. कोणी विचारे  संस्थेला देणगी किती देणार?  

दत्त दर्शन घेऊन रश्मी  मंदिराबाहेर आली. समोर भेटलेल्या व्यक्तीने आवाज दिला,    

“नाडकर्णी मॅडम,   तुम्ही परत का भेटल्या नाहित? ”  

रश्मीने, पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या व्यक्तीला  आपाद मस्तक न्याहाळलं तरी लक्षात येईना. कोण आहेत हे गृहस्थ? प्रश्नार्थक मुद्रा करुन रश्मी तशीच समोर उभी राहिली. शेवटी त्यांनाच प्रश्न  विचारला,   “आपला परिचय?” 

“मी म्हात्रे, ….  विद्या मंदिरचा ट्रस्टी. इंटरव्ह्यू,  मार्क्स आणि  शिकवणं तिनंही गोष्टीत तुम्ही टॉप होतात मॅडम.  आम्ही  अजून वाट पाहतोय. मानवी सरांनी तुमच नाव रिकमेंड  केलंय.  तुमच्या बी. एड.च्या कँम्प मध्ये त्यांनी तुमचे लेसन ऑबझर्वेशन केल्याचं सांगितलं.” 

“हं.” रश्मीने हुंकार भरला. 

“ते, डोनेशन थोडं कमी करू”.  म्हात्रे सरांनी पुनःश्च ऑफर दिली. रश्मीने  हात हलवून निरोप दिला समोरच्या व्यक्तीला. 

 “मंदिरातील,  जगाच्या ट्रस्टी कडे पहिलं” आणि खाली मान घालून आपल्या रस्त्याने निघाली.” ओळखीच्या वाटेवरून अनोळखी प्रवाशा सारखी. हे नं थांबणार चालणं,  महाराज्यांच्या भूमीपर्यंत घेऊन आलं होतं. 


लाल पिवळी   गाडी चालू झाली तशी,  खिडकीतून येणारा गार वारा  चेहऱ्यावर घेत,  रश्मीने डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटून घेतल्या. क्षणभर मळ्यातील प्रजाक्ताच्या झाडाखाली आपण उभं असताना फुलानी  लगडलेलं झाडं, आपली छोटी बहीण, सई गदागदा हलवतेय आणि शुभ्र केशरी  देठाची सुगंधित फ़ुलं चेहऱ्याला स्पर्शून शरीरावरून घरंगळताहेत असा भास झाला. आई आणि चंदा हसून हा पुष्पवृष्टीचा सोहळा पाहात असल्याचा भास अर्धोन्मीलित डोळ्यांना धूसरपणे दिसत होता आणि तनाला जाणवत होता.  सई आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही वेळेस सोबत असते मनात असते. मन संवादात असते रश्मीच्या. सई प्रेमळ बहीण आहेच पण मनकवडीपण आहे.

ज्या  मातीत,  जिजाऊच्या  शिवबांनी  राष्ट्र  उभारणीची धडपड केली. अखंड,  अहोरात्र केलेल्या मेहनतीनं उभं केलंय अजेय साम्राज्य.  या पवित्र भूमीत कामं करण्यासाठी रश्मीने  पाऊल ठेवलं तेच प्रतिज्ञा करुन. “आपण महाराजांचा मावळा होऊन झोकून देऊन कामं करू.  अगदी  “खबरदार जर  टाच मारुनी जाल पुढे  चिंधडया,  उडवीन राई राई एवढ्या” अशा जोशात.  आपली कांही पुण्याई असेल म्हणून इतर ठिकाणी इतके इंटर व्ह्यू देऊनही आपल्याला  किंवा समोरच्याला रुचलं नाही आणि थेट महाराजांच्या चरणांनं पुनीत झालेल्या मातीत कामं करण्याची संधी मिळाली. 

आत्या घाबरून बोलली होती, “कोकणात जाऊ नको,  रश्मी.”  रश्मीनं न समजून विचारलं, “का?  काय झालं आत्या?”  दोनही  करणं फारशी रुचली नाहीत रश्मीला.  तिथं घरं दूर दूर असतात,  करणी  करतात लोक. रश्मी, तुझी आई इतक्या दूर पाठवायचं धाडस कसं काय करते देव जाणे. आत्यानी काळजी पोटी विनिता आणि रश्मी वर नाराजी व्यक्त केली. 


महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी 

नुकताच पावसाळा संपला होता.  सर्वत्र हिरवाई पसरली होती.  डोळ्यांना,  या हिरवाईच्या विविध  छटा आल्हाद आणि थंडावा देत होत्या आणि मन प्रसन्न  होतं. आसपास भातशेती होती. डोंगर, दऱ्या, खडक,  खड्डे, उंच चढ,  सखल,   उतार,  लाल पाण्याने दुथडी  वाहणारी नदी,  मोठं वडाच झाड, करवंद, जांभूळ, बोरीची झाडं, वेगवेगळ्या आकाराची, रंगाची जंगली फ़ुलं आणि वेगवेगळे सुगंध, हिरवाईत गहिरे पणा भरत होते.  नजर जाईल तिथं पर्यंत हिरवाई दिसतं होती. नटलेला निसर्ग आणि या निसर्गाचं निसर्गपण जपणारी माणसं होती तिथं. 
ही संस्था  आदिवासी विकास संस्था म्हणून जवळ, जवळ दहा वर्षापूर्वी पासून कामं करत होती.   सदर संस्थेमध्ये दहा / आकरा वेगवेगळे प्रोजेक्ट्स होते. सर्व प्रोजेक्ट प्रमुख आपापल्या क्षेत्रात तज्ञ आणि झोकून देऊन कामं करणारे होते. या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी संस्थापक,  संस्था सचिव  आणि ट्रेझरर हे पूर्णवेळ काम पाहात होतेचं पण त्यांनी आपलं जीवन या कार्यासाठी वाहून घेतलं होतं.  सर्वजण आपल्या कामात चोख होते. सर्वांचा उद्देश एकच  तालुक्यात असणाऱ्या आदिवासींसाठी  काम करणे. अधिवास म्हणजे त्या भागातील माणसे, मूळ रहिवाशी. राज्याच्या राजधानीपासून  शंभर सव्वाशे किलोमीटरवर  राहणारे लोक. तिथे कोणत्याही आधुनिक सुविधा, दळणवळण नव्हते. लोकल आदिवासी आणि जवळपासच्या नागरी विभागातील लोकांना घेऊन संस्था सुरू केली आणि हळूहळू वेगवेगळे प्रकल्प सुरू केले जाऊ लागले. सदर प्रकल्प संशोधन, फळं प्रक्रिया प्रकल्प,  आयुर्वेदिक दवाखाना, आयर्न वर्कशॉप,  केन – बांबू पासून वस्तू बनविणे,  भात संशोधन केंद्र,  जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रयोगशाळा, औषधी  वनस्पती बाग, हॉस्टेल, मेस, शाळा ई. प्रकल्प एकमेकाच्या हातात हात घालून प्रगती करत होते.

भारताच्या कानाकोपऱ्यातून एक वेगळी प्रेरणा घेऊन तरुण मूल, मुली कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामध्ये  केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश , कर्नाटक, कलकत्ता, दिल्ली आणि फॉरेन वरून पण तरुण सहभागी झाले होते  आणि त्यांची झोकून देऊन काम करण्याची इच्छा होती आणि तशी संधी उपलब्ध होती. लोकल प्रगतीसाठी विविध ठिकाणाहून लोक  एकत्र येऊन सेवाभावी वृत्तीने कामं करत होते. 

अशा उर्जित अवस्थेत असताना एक शिक्षिका म्हणून रश्मीनं शाळेमध्ये
प्रवेश केला. ऑक्टोबर,  नोव्हेंबरचा काळ होता तो. नुकताच वर्षा ऋतु संपल्यामुळे सर्वत्र हिरवा शालू नेसून भातशेती, जंगल, डोंगर नटलेले होते. प्रफुल्लित मनाने कामाला सुरुवात झाली. शालेय विषयांबरोबरच केन- बांबू वर्क, दवाखान्यातील औषधी,  औषधी वनस्पती, संगीत, योगा ई. बाबत मुलाना पायाभूत माहिती दिली जात होती. आदिवासी मुलांबरोबर  आधिकारी, कर्मचाऱ्यांची मुले त्याच शाळेत जात असत.

 हर्बल गार्डन,  आयुर्वेदिक औषधाचा दवाखाना, फळं प्रक्रिया केंद्र,  केन – बांबू पासून फर्निचर बनवणे,   आयर्न वर्कशॉप,  भात संशोधन केंद्र,  जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रयोगशाळा, 
आणि नर्सरी, छोटा, मोठा शिशु महाराष्ट्र शासन मान्य पहिली ते दहावीपर्यंतची शाळा. कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक आदिवासिंच्या मुलांसाठी खास वातावरणात आणि वेगळा उद्देश्य ठेऊन सुरु केली. औपचारिक – अनौपचारिक शिक्षण,  चार भिंतीत,  भिंतीबाहेर शिक्षण दिलं जायचं. शालेय विषयाबरोबर जीवन – शिक्षण एकाच ठिकाणी एकाच वेळी

देण्याची सोय होती. ठराविक अंतरावर बांधलेली चारशे फुटाची घर, वेताच्या आणि बांबूच्या छप्प्या पासून  बनवलेली दार,  घरावर लाल कौलं अशी साधी सुबक बांधणीची घरं होती. सकाळ पासून कामाला बाहेर पडणारा कार्यकर्ता दार ओढून तकलादू कडी ओढे. संध्याकाळी  कामावरून परते तेव्हा वस्तू आणि वास्तू सहीसलामत असे.  कुलूप हा प्रकार नव्हता तिथं. राम राज्य होतं तिथं.  ना चोरी – मारी,  ना भांडण – तंटा,  ना हेवे – दावे,  ना राग – लोभ,  ना धुसपूस.  सार आलबेल होतं.  

तिथं तामिळ राज्यातून आलेले सोमाणी अंकल होते, कर्नाटकातून आलेल्या डॉक्टर होत्या, आंध्र प्रदेश मधून आलेले कामगार होते,  सीमा भागातून आलेले प्रोजेक्ट इन्चार्ज होते.  पश्चिम बंगाल मधून आलेले अधिकारी होते,  उत्तरप्रदेश दिल्लीहुनं  आलेले अधिकारी होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सेवाभावी वृत्तीनं अधिकारी, कार्यकर्ते आलेले होते. तिथं निरक्षर होते,  साक्षर होते उच्च शिक्षित होते, आय. आय. टीयन्स होते.  तिथं परंपरा जपून नव्याचे स्वागत आणि नवनवे प्रयोग व्हायचे. तरुण पिढीनं जुन्या नव्यांचा संगम उत्तमरीत्या जमावाला होता. निर्बंध नसून पण प्रत्येकाचं अस्तित्व,  स्वातंत्र्य आणि हक्क,  संधी आणि प्रगती,  कर्तव्य तत्परता आणि कार्यकारण भाव हातात हात घालून प्रगती पथावर वाटचाल करत होते.  म्युच्युअल अंडरस्टॅण्डिंग / समोरच्याला समजून घेण्याची क्षमता प्रत्येकजण जपत होता.  आपल्या सहकाऱ्यांबरोबर हॉस्टेल,  मेस,  शाळा परीक्षा आणि लायब्ररी या सर्व गोष्टीत दिवस कसा संपायचा हे रश्मीला समजत नव्हते.  आणि रश्मी बरोबर नवीन हिस्ट्री टीचर पण जॉईन झाल्या ….  

रश्मी काकी????

“काकी सलाम” म्हणून आलेल्या आवाजाच्या दिशेने रश्मीनं पाहिलं आणि आपल्या आजूबाजूला पाहिलं कोणी आहे का ते.  कोणीच नव्हतं. मग ही अर्धी साडी नेसलेली केसाच्या आंबाड्यात रानफुलं खोचून  चालता बोलता फ्लॉवर् पॉट “काकी,  सलाम” कोणाला म्हणतेय?  या प्रश्नाच उत्तर पवित्रा मॅडमनी दिलं. “रश्मी मॅडम तुम्हाला नमस्कार करतेय लोभी  काकी.”  “मला?  मी कशी काकू असेन?” रश्मीने अस्वथ पणे पवित्रा मॅडम आणि लोभी काकींकडे पाहत विचारलं.

“आदिवासी लोकांमध्ये  लहान मुलीला पण काकी म्हणतात”, पवित्रा मॅडमनी नवीन माहितीची भर टाकली.

पवित्रा  मॅडमनी त्यांच्या घरासमोर शिरवळीचा वेल लावला होता आणि  जर्द हिरव्या पानांच्या गर्दीत  डवरलेली पिवळी फ़ुलं मंडपावर डोलत होती. आणि खाली लांब लांब शिरवळ्या लोम्बत होत्या.  बाजूला वेगवेगळी गुलाब फुलांची कलम अभिमानानं रंगीं बेरंगी गुलाब मिरवत होते.  शुभम सर  आणि पवित्रामॅडम  यांची  छोटी शुभ्रा जवळच बागडत होती. 


सुकलेल बकुळ फ़ुलं

 

 “कोठून आलात हो ताई ssss”? 

असा हेल काढून आलेल्या आवाजाच्या दिशेनं रश्मीने पाहिलं. ती एक चोवीस – पंचवीस वर्षाची युवती वाटत होती.

मला प्रश्न विचारला की काय आपण ? रश्मीने तिच्या रोखान पहात विचारलं. तीनं हुंकार भरला. रश्मीने   हसत  उत्तर दिलं. ” पी …हून आलीय मी”  पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून जाणले की हिला माझा गाव ऐकून वगैरे माहित नाही . मी पुष्टी जोडली ,”पी …… हे शहर कर्नाटका – महाराष्ट्राच्या  सीमेवर आहे.”
या संस्थेमध्ये बकुळनं नुकतच कामं सुरु केलं होतं.

 मग मात्र आमच्या गप्पा आणि ओळख परेड झाली… 

  ती होती बकुळ. आठरा वर्षाचं कोवळी मुलगी अकालीच प्रौढत्व आलेली.  तिच्या गळ्यातील काळया मण्याची पोत सुंदर दिसण्या ऐवजी रश्मीला कशिशीच भासली. चेहरा सुकलेला, जणू आवडते खेळणे अचानक  कोणीतरी हिसकावून घेतलेल्या लहान मुलासरखा. अन् डोळे काहीतरी वेगळेच बोलत होते. काळ्याभोर मोठ्या डोळ्यातून तिच्या हिमती आणि धाडसी स्वभावाची चमक दिसत होती. मनावर आणि शरीरावर झालेल्या अन्यायाची चीड बोलक्या डोळ्यातून बाहेर पडत होती. 

माझा अंदाज नुसताच बरोबर नव्हे, तर शंभर टक्के खरा  ठरला.

       “ती”  आता आईचा आधार होती. निर्भिडपणे दारुड्या बापाला जाब विचारणाऱ्या त्या युवतीची कहाणी,  हृदय हेलावून सोडणारी वाटली. 

      बकुळच्या आई वडिलांना पाच मुले.  मोठ्या मुलीचे लग्न होऊन ती मुंबईला आपल्या पतीच्या घरी गेली होती. लहान वयामध्ये लग्नाची पद्दत असलेल्या त्या जमातीमध्ये चौदा वर्षांची बकुळ मोठी वाटू लागली. पंधरा एकर  जमिनी मधील पाच एकर शेती बावीस हजार रुपयांना   विकली.  आईनं  लाडक्या मुलीच, बकुळच अगदी थाटात लग्न  लाऊन दिलं. उगाचच जबाबदारीतून मुक्त झाल्याचा निःश्वास सोडला बीचारिन जो पूर्णपणे बाहेर पडायच्या अगोदरच जबाबदारी वाढल्याचे दिसून आले.  अगदी अभावितपणे. 

        लग्नात जावयाची जात समजाऊन घेण्याच्या फंदात न पडता, बापानं चांगली दारू ढोसली आणि शिगरेट फुंकत बसला.  त्याला ना चिंता पोटाच्या गोळ्याची, ना जाणीव कर्तव्याची.  तो आपला, दारूच्या घोटाने आपल्या अंतड्याला शांत करण्याचा प्रयत्न  करत होता.

                 इकडे मात्र वेगळीच आग धुमसत होती. फुलांच्या पाकळ्या झाडून जातात, मागे राहतात ते काटे, आनंदाचे क्षणही असेच निघून जातात, मगे राहतात त्या हृदय हेलावणाऱ्या  आठवणी. पण बकुळच्या जीवनात आनंदाचे क्षण आलेच नाहीत. फक्त दुःखाचे आणि दुखाचेच कड आले. आपल्या भवितव्याबाबत  सुंदर स्वप्न रंगवलेल्या बकुळच्या पदरी मात्र अपेक्षेपेक्षा वेगळच काहीतरी पडले. सुंदर कळी फुलण्यास अगोदरच कडाक्याच्या उन्हात सुकून गेली. बकुळ फुल फुलण्या अगोदर आळीने त्याला कुरतडले. आणि बकुळला उंबरठ्यावरचे माप ओलांडताच नवऱ्याच स्वरूप अगदी  समोरच दिसले. 

               भूक आणि भुकेची भावना यामध्ये फरक असतो. खरोखर अतिशय भूक लागलेली असावी, स्वयंपाक घरामध्ये पाऊल ठेवावे. जेवणाची मोठी – मोठी भांडी व्यवस्थित झाकण ठेवलेली पाहून, हातात ताट  घेऊन भांडे उघडावे तर रिकामेच. काय अवस्था होईल त्या व्यक्तीची? कल्पनेनंच वाईट वाटत  ना आपल्याला? नेहमी काहीतरी भेट देणाऱ्या वडिलांनी लहांन मुलाच्या वाढदिवशी  त्याला विचारावे, ” बाळ, ओळख पाहू?  मी काय आणलं आहे तुझ्या साठी, ओळख पाहू?  बिच्चारे बाळ, आपल्या आवडीच्या वस्तूंची नावे सांगून थकते. पण   भेट वस्तू न ओळखल्या मुळे, तेवढेच उत्सुक आणि आशेनं शेवटी म्हणते,” बाबा मी हरलो, तुम्ही सांगा ना आता.” आणि जर बाबांनी सांगितलं की, “काहीच नाही आणलं” तर बाळाचा निष्पाप चेहरा कसनुसा दिसेल. अगदी बकुळच पण तसच झालं होत. अपेक्षा भंगाच दुःख बकुळच्यl  पदरी पडलं.
छळण्यासाठी, सूड घेण्यासाठी आसुसलेलं मूर्तिमंत रूपं सासू म्हणून समोर आलं. तिला सून मिळाली छळायला. सासूला तिच्या तरुणपणी भोगलेल्या दुःखाचा सूड, आपली सून बकुळवर उगवायचा होता. बकुळ पुष्पाची अवस्था अगदी वाघा समोर शेळी सापडावी तशी झाली. ही झाली एक बाजू….
नवऱ्याचं खाटिकाच रूपं पाहून ती हादरलीच. ज्याच्या आधारावर नवीन घरात पाऊल ठेवायला धजली तोच असा….???

स्त्रीचं जीवन असं का? बालपणी आपल्या प्रिय मातेवर प्रेम करायचं. त्यानंतर बाहुली, शाळा मित्र, मैत्रिणी… ज्या घरात खेळते, बागडते, वाढते ते सोडून सर्वस्वाचा त्याग करुन कोणत्या तरी परक्या गावी, परक्या घरी, परक्या पुरुषाला, जीवन भराची साथ हवी म्हणून आपलं सर्वस्व वाहायचं. आणि नव्या नावालाइतचं असे खाटिकाच रूपं समोर आलं तर काय अवस्था होईल नव वधूची? लग्न झालं की माहेर परकं आणि परकं माणूस जवळ येण्या अगोदर दूर sss, दूर sss आहे याची जाणीव. एखाद्या भयाण जंगलात, सात – आठ वर्षाचं अजाण लहान बाळ कसं करेल स्वतःच संरक्षण? तशीच अवस्था झाली बकुळ पुष्पाची.
तिचा सर्व बाबतीत अपेक्षा भंग झाला. अपेक्षा भंगाच दुःख असहनीय असतं हेच खरं. पण मधून कधी तरी नवरा प्रेमानं बोलला, ओला स्पर्श केला तरी तिला खूप समाधान वाटे. वाळवंटातील प्रवासात ओयासिस पाहणाऱ्या प्रवाशासारखं. आज ना उद्या तो आपल्या मनाला जाणेल अशी वेडी समजूत घालून नेहमीच आनंदी राहायचा प्रयत्न करायची बकुळ.
कधी कधी आपल्या नशिबाबद्दल खूप वाईट वाटायचं तिला. नाजूक गोऱ्या गालावरून असावं टपकायची. अर्थ होता का तिच्या आसवांना? मला तर वाटतं सारंच व्यर्थ होतं.
डोळ्यातुन घरंगळलेले अश्रू
कोणी पुसणार असेल तर त्याला अर्थ होता. तिच्या अश्रू वाहण्याने कुणाचं मनं द्रवणारं नव्हतं ना तिच्या जिवंतपणीच्या मरणानं कुणाचे डोळे भरून वाहणार होते. सारं व्यर्थ वाटतं होतं.
परिस्थिती पाहून ती आता जरा सावरायला लागली. अचानक एक दिवस वेगळी घटना घडली. रश्मीच्या अंगाचा थरकाप होतं होता ऐकून. जणू हे सारं रश्मी समोर घडतयं. स्वतः सावरू की बकुळला सावरू? या संभ्रमात रश्मी दिङ्मुढ झाली. आठवणीने पण बकुळचं सारं शरीर थरथर कापत होतं. ओठ घट्ट दाताखाली पकडून तीनं स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. आसवं मागे परतवत, तीनं ती घटना सांगितली. तिच्या बोलण्यातून तीनं प्रसंग उभा केला.
काय झालं होतं बकुळच्या शरीर आणि मनाचं इतक संतुलन बिघडायला? आणि आपण हतबद्ध : काहीही करू शकतं नव्हतो. रश्मी खंतावली.

“स्त्री” हेच एक मोठं नात आहे. ते नातं प्रत्येक वेळी, वेगवेगळ्या स्वरूपात नातं जगत असते, नातं आणि कर्तव्य पार पाडत असते.
वाचा पुढील भाग 29 मध्ये रश्मीच्या नजरेतून “सुकलेल बकुळ फ़ुलं…”, “राम नाम सत्य हैं..” आणि “तेथे कर माझे जुळती…🙏” आणि बरंच कांही.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020 Ranjana   Rao
Spread the love

11 Responses

 1. सत्याशी नाते सांगणारे आपले लेखन खूप समृद्ध आहे.
  अनुभव विश्व अगाध आहे, त्याला शब्दांची सहज सुंदर लय आहे.
  जीवन हे वेगवेगळ्या रागात गायलेले गाणे आहे.
  सरस्वतीची आराधना मनोभावे करता अहात याची जाणीव वरांवर होत रहाते.
  जेवढे विचार शुद्ध तेवढे लेखन समृद्ध.👌🏻

  1. “तू सदा जवळी रहा…” भाग – 28 वाचून आपण दिलेले अभिप्राय खूपच बोलके आणि प्रेरणादायी आहेत. आपलें अभिप्रायाचे विचारमोती माझ्यासहित वाचकांना प्रेरणादायी आहेत. मी आपली ऋणी आहे 🙏💐🌹

  1. धन्यवाद जयवंत सर. आपण पूर्ण एपिसोड वाचून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेरणादायी शब्द मला नवीन आणि चांगलं साहित्य बनवण्यास प्रेरणा देतील. 💐🙏

  2. जयवंत सर भाग 28 वाचून आपण दिलेले अभिप्राय आणि पुढील एपिसोड साठी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी ऋणी आहे. 🙏💐

  1. Sartaj sir नमस्कार. तुमच्या नावाप्रमाणे तुमचे अभिप्राय सर आंखो पर. आपण माझा ब्लॉग वाचून दिलेल्या अभप्रायाबद्दल पुनःश्च धन्यवाद 🙏💐

 2. You are doing a wonderful job dear Mrs Rao.

  Very inspirational.
  Do keep up this good work for society at large

  1. Thanks a ton for your insperational words. तुमच्या प्रेरणादायी अभिप्रायामुळे मला नवीन आणि चांगल्या कलाकृती निर्मितीची प्रेरणा मिळेल. पुनःश्च धन्यवाद 🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *