“तू सदा जवळी रहा…” भाग – 38मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

👉भाग -31* अर्थात अडचणींवर मात मध्ये,  पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺,  कैलास पैसे चो..  समस्या,  ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,  

👉भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू,  मेस मधली गजबज,  रश्मीचं भरलं वांगं,   कांदे पोहे.  

👉भाग – 33* फरक : एका वेलांटीचा फरक – दोन्ही प्रिय,  रश्मीला हातात काठी का घ्यावी  लागली❓️  सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️

👉भाग – 34* बोबड कांदा , स्ट्रिक्ट टिचर, मीच शहाणी झाले❗️❗️

👉भाग- 35*वाचन ‼️ वचन ‼️पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️

👉भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, वंदे मातरम 🙏 नाटकी रश्मी❓️
सई का नाचली ❓️ आणि .


👉भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात..❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले❓️


भाग – 38* क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही….,लोकल, फेरीवाले, किन्नर, लोकल रेल्वे मधील प्रसाद… 

1. क्षण चित्रे

‘बालपणाचा काळ सुखाचा’, म्हणतात. बालपण संपलं, तरी रम्य आठवणी मनात घोळत राहतात. अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत, काही गोष्टी आठवतच राहतात. त्या बालपणीच्या गोष्टी आठवण्यासाठी फारसे सायास, प्रयास करावे लागत नाहीत. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागत नाहीं. काय असेल अशा गोष्टी आठवण्या पाठीमागचे विज्ञान, ज्या आठवण्यासाठी कोणताही प्रयत्न करावा लागत नाहीं ? घटना, प्रसंग घडून जातात. बालपणीच्या बऱ्याच गोष्टी सहज असतात. त्यात सहजभाव, ओघवतेपणा आणि प्रसंगानुरूप घडलेल्या घटना असतात. त्या घटनांमध्ये शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ, वस्तुनिष्ठ आणि असचं काहीसे असते.
अभ्यास लक्षात ठेवायला, विशेष करून आपल्याला न आवडणाऱ्या विषयाच्या बाबतीत प्रयत्न पूर्वक, जाणून बुजून लक्षात ठेवायला प्रयास करावे लागतात. परीक्षे पुरती पोपटपंची असेल तर परीक्षा सम्पली की विसरले जाते. म्हणून अभ्यासातील संकल्पना आणि अभ्यासक्रमातील साखळी ( स्टडी कन्सेप्ट अँड चेन इन सिलॅबस ) या दोन गोष्टी आणि त्यांचा योग्यवेळी केला जाणारा वापर – शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे दोन्हीही क्रिया फलदायी होऊ शकतात. समजून; उमजून, जाणून शिकण्यामुळे (learning with understanding ) ही आनंददायी क्रिया होते. संकल्प सिद्धीसाठी शिकण्याच्या प्रक्रियेत, समजणं खूप महत्वाचे असते. अगदी लहानपणापासून समजून घेऊन कृती करण्यावर भर देण, आणि त्या साठी आवश्यक साधनांचा योग्य उपयोग करणे;
जाणून बुजून आत्मसात करायला हवं. शिक्षण प्रक्रियेत मुलांच्या मनात ‘का’❓️ ‘कशासाठी’❓️ हे प्रश्न उपस्थित व्हायला हवेत. प्रश्नांची उत्तर शोधण्याची तळमळ हवी, धडपड हवी. ती एकेरी चालणारी क्रिया नसावी. पॅसिव्ह लिसनर, समोरच्या व्यक्तीचा मूड घालवणारे ठरतेच, पण एक तर पूर्ण समजलंय किंवा काहीच समजलं नाहीं असा अर्थ काढला जातो. या दोन्ही पैकी काहीही असू शकते. जर पूर्ण समजलं तर ठीक पण काहीच समजले नाहीतर? शिकविलेले समजले नाहीं आणि न समजणाऱ्या टॉपिकवर प्रश्न विचारलेच नाहींत तर शिकविणाऱ्याला कसं समजणार? शिकवण असं असावं की, शिक्षणार्थीच्या बुद्धीची द्वारे खुलवीत. एकदा का ज्ञानार्थीला ज्ञान कण वेचायची सवय लागली की, मग हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी वाग देवीच्या अशी अवस्था होते.

✏️📜📜📜📜✒️✒️✒️✒️📜📜📜📜✒️✒️✒️✒️

सहामाही परीक्षा तोंडावर आली होती. पोर्शन शिकवून संपला होता.

प्रश्नपत्रिका काढून झाल्या आणि गोपनीय साहित्य शिवम सर आणि मास्टरजींच्या ताब्यात दिलं होते. पहिली ते चौथीची परीक्षा वर्गातच घेतली जाई. आता इयत्ता पचवी ते दहावी पर्यन्तच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याचे काम चालू होते. रजिस्टर घेऊन आराखडा तयार करण्यासाठी रश्मीने सुमनला रजिस्टर विशिष्ट पद्धतीने आखायला सांगितले .
“सुमन, तुझं रजिस्टर पूर्ण होई पर्यंत मी या चार पेपर्सना बॉर्डर लाईन्स तयार करते. तुला नंतर स्केल 📏✏️पेन्सिल देते” रश्मीने सुमनला सांगितले.

दोघी आपापल्या कामात मग्न असताना समोरून प्रश्न आला.
“काय करताय मॅडम? जरा काम होतं”, संस्कृत मास्टरजी आणि शिवम सरांनी हॉल मध्ये येता, येता विचारलं.
नेहमीसारखं कामात मग्न असलेल्या रश्मीचं लक्ष्यच नव्हतं. “मॅडम लाईन मारताहेत…❗️” सुमन पटकन बोलून गेली.
समोरून सुमन असं कांही बोलली की, रश्मी टिचर ताडकन जागेवरच उभी राहिली.
📏📏📏📏📏📏📏📏📏

ओम सहनाववतु सहनौभुनक्तु सहावीर्यम करावावहै,
तेजस्वीना वधीतं मस्तु मा विद्विषावहै | ओम शान्ति: शांतिः शांतिः | 🙏🙏
जेवण वाढून झाल्यानंतर मुलांनी डोळे मिटून😞 हात जोडले 🙏 आणि प्रार्थना केली. सपाटून भूक लागल्याने मुलांनी जेवायला सुरवात केली. पाणी पिऊन झाले. नामा हातात घास घेऊन जेवायला सुरुवात करणार, इतक्यात जोरात सुरु झालेल्या वाऱ्यामुळे झाडाचे एक पानं 🍃 उडत येऊन बरोबर त्याच्या ताटात पडलं. “मॅडम, माझ्या जेवणाच्या ताटात हे बघा काय पडलय ❗️ पान आणि त्या पानावर🍃🐛 आळी पण आहे.” नामा कुरकुरला.
“बाजूला काढ आणि खा❗️” शेजारी बसलेल्या रंगीताने सहज उपाय संगीताला.
😳 आँ  😮😫 नामचं तोंड उघडचं राहिलं आणि कपाळावर अट्ट्या आल्या.
“आरे नामा, तिला म्हणायचंय पानं बाजूला काढून टाक आणि भात खा.” छोटी ऋचा बोलली.
🍚🍚🍚🍃🐛🍃🐛🍃🐛🍃🐛🍚🍚
या आणि अशा विचारात हरवल्यामुळे कांही प्रसंग पाहताना हसू येत होतं, कांही वेळेस चेहऱ्यावर वेगळे भाव उमटत होते.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

दिदी ती दीदींच❗️👌👌

रश्मी, मुंबईला चार-पाच वेळेस जाऊन आळी होती. नेहरू विज्ञान केंद्र, पुस्तकं खरेदी, शाळेचं साहित्य खरेदी, मुलांचा, नाटकाच्या स्पर्धेतील सहभाग आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या चौकशीसाठी. आता मुंबईत काम करण्यासाठी रश्मी हजर झाली होती.
🥎🏏🏒⌛️📋📃📒📙📚🌟⭐️🌖🌕🌜☀

संगीत सर आणि तिथल्या प्रोजेक्ट ऑफिसर्सनी तात्पुरती रश्मीची राहण्याची सोय केली. रश्मी आणि शिवानी दिदी पुन्हा भेटल्या. वेगळ्या वातावरणात, वेगळ्या ठिकाणी. वेगळ्या कारणाने. शिवानी दिदी देवदूत बनून रश्मीला मदत करायला आली.
सुरुवातीला लोकल, वेळापत्रक, इंडिकेटर समजून घेतानाच रस्ते, माणसं आणि कामाचं स्वरूप समजून घेणे महत्वाचे होते. ते सारे ओघाने होतं गेले.

नवीन जागा, नवीन काम, नवीन माणस आणि त्यामध्ये रूळण्याचा प्रयत्न सुरु होता. रश्मीचं काम तिच्या कॅडरच्या इतर लोकं करतं असलेल्या कामापेक्षा वेगळं होतं. प्राप्त पद आणि काम यामध्ये खूपच तफावत होती. प्रत्यक्षात ज्या कामासाठी तिची नेमणूक झाली होती ते काम सोडून वेगळं काम वाट्याला आलं. तिथं अस्तित्वात असलेली सर्व पद रश्मी येण्याअगोदर पूर्णपणे भरलेली होती. वाट्याला जें काम आलं ते नियमित कामापेक्षा खूपच वेगळं होतं. एकदम गंभीर स्वरूपाचं काम. काम समजून घेणं, त्यावर कृती करणं, रिपोर्टींग करणं आणि त्याचं बोरोबर नव्या वातावरणात स्वतःला अड्जस्ट करणं मोठंच आव्हान होतं. मनावर ताण घेऊन रोजच काम करताना शरीर कमजोर होऊ न देण हे आव्हान होते. स्वतःला व्यक्त होण्यासाठी कोणी जवळ नाहीं ही भावना कातर बनवायची.
अशा वेळी शिवानी दिदीनं दिलेली साथ आणि तिचा मदतीचा हात त्याला तोड नव्हती.
पहिल्याचं दिवशी अगदी स्टेशन वर सोडून पास काढून दिला. स्वतःची बॅग कशी सांभाळायची ? ईथपासून, इंडिकेटर कसा वाचायचा ? गाडीत चढायचे कसे ? उतरताना कोणत्या बाजूला थांबायचे?

कोणत्या लोकल मध्ये बसायचे, कोणत्या स्टेशन वर उतरायचे? बस कोणती पकडायची सारे समजावून सांगितले.

आपण विज्ञान संस्थेत पाहिलेली शिवानी दिदी आणि आता पाहतोय त्या दिदी मध्ये फरक जाणवला. लग्नानंतर राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सोडून दिली आणि आपल्या नव्या संसाराची सूंदर स्वप्नं रंगवत दीदीने विज्ञान संस्थेत प्रवेश केला. दीदीने स्वतःला खूप लवकर संस्थेत आणि तेथील कार्यकर्त्यांमध्ये मिसळवून घेतले. काहीच दिवसात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये चालणार काम समजून घेतले. रश्मी बरोबर इतर सर्व संस्थेतील कार्यकर्त्याची दिदी झाली. दीदींचे प्रेमळ आणि आदराने बोलणे, उच्च विधविभुषित असणे, 🤝कामाबद्दल ओढ आणि शुद्ध हेतू पाहून रश्मीच्या मनात शिवानी दिदी बद्दल एक प्रकारचा आदर भरून राहिला. उणापुरा तीन महिन्याचा संसार झाला असेल तिचा. अपघाताने पतीच्या जाण्याने उन्मळून पडलेल्या दीदीने स्वतःला सावरून एम. बी. ए. ला ऍडमिशन घेतलं होतं. महानगरात रश्मीला याच दीदीने मदतीचा हात दिला.

वेगळ्या प्रकारच काम आणि त्यातून येणारा तणाव दीदींच्या नजरेतून सुटला नाहीं. कामाचा तणाव घेऊनच होस्टेलवर पोहोचणारी रश्मी आणखीन गंभीर राहू लागली. आपण, आपला ताण आपल्याबरोबर ठेवणे बरे. आपण काम समजून घेऊन करतो आहेच . वरिष्ठ अधिकारी तेवढी संधी देताहेत. हेही नसे थोडके म्हणून, व्यवस्थित जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न करून रश्मीने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. चेहरा हा अंत: प्रवृत्तीचा आरसा असतो. मनातले भाव चेहऱ्यावर दिसणार नाहीत असं होणं रश्मीच्या बाबतीत अश्यक्यच.
“रश्मी तू चिंता मतं कर | तुम मेहनती हो, शिक जायेगी | कुछ सोच समझ कें, ये जिम्मेदारी तुझंपर सौपी होगी | जो होता हैं वो भले के लिए होता हैं ❗️ काम तो तुझे कारनाही हैं | तू हंस के कर, या टेन्शन लेके | फिर क्यूँ सोचके तुम्हारा खुद का मूड खराब कर लेती हो❓️” शिवानी दिदीनं रश्मीला चार गोष्टी सांगीतल्या आणि रश्मीच्या आहारावर स्वतः लक्ष्य देऊ लागली.
“शिवानी दिदी, ऐसी कोई गोष्ट नाहीं हैं | कौन सा भी काम करते टाइम, उस काम को गंभीरता से लेना, मेरा स्वभाव हैं | यहां तो शीख ने को बहुत मिळेल | काम मे व्हरायटी हैं | खूप अलग स्वरूप के अलग, अलग काम रेहेते हैं | बस, ऍंड्जस्ट होने मे थोडा वेळ लगेगा | आप अजिबात चिंता ना करो | ” आपल्या स्टाइलच्या हिंदीमध्ये रश्मी बोलली
सकाळी नाश्त्याला दूध, बोर्नव्हिटा, प्रोटिनेक्स, चहा कॉफी आणि ब्रेड- बटर, मध – टोस्ट, उपमा, पोहे, दही – आलू पराठे, मुली पराठे, ठेपले, इडली, डोसे आणि असेच काहीसे पदार्थ ठेवले जातं. दिदी रश्मीला दूध आणि बिकॉसुल गोळ्या आग्रहाने द्यायची. दिदी खरोखर दिदी होऊन काळजी पूर्वक मोजक्याच शब्दात समजवायची. तिच्यामुळे रश्मीला महानगरात येऊन काम करताना बरीच मदत झाली. किंबहुना दिदी होती म्हणूनच रश्मीला कामाच्या ठिकाणी रुळायला मदत झाली.
शिवानी दीदीने, रश्मीला; शुभ्र रंगाचा आणि वर ग्रीन🍀 कलरची फ़ुलं, पानं असलेला सुंदर, सोबर कॉटनचा पंजाबी ड्रेस स्वतःच्या पसंतीनं घेऊन दिला🧥👖. दीदींच्या रूपाने जिवाभावाची मैत्रीणच मिळाली रश्मीला.

🍀🍀🌺🌺🍀🍀👩‍🦱👩🍀🍀🌺🌺🍀🍀

कार्यालय आणि बरंच कांही….

तो भाग कार्यालयासाठीच होता. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची बरीच कार्यालये एका ठिकाणी होती. मोठे बैठे हॉल पार्टीशन घालून विभागवार रचना केली होती. कौलारू टाईप पत्र्याचं छत होते. फाईल्स ठेवण्यासाठी लाकडी कपाटे ओळीने अशा तऱ्हेने ठेवली होती की, एकावेळी दोन्ही गोष्टी साधल्या जातं. एक स्टोअरेज आणि दुसरे पार्टीशन. ठराविक ठकाणी व्यवस्थित पार्टीशन बनवून केबिन्स बनविलेली होती.
जवळ कँटीन होतं. मुंबईतील प्रसिद्ध आणि डिमाण्डेड कॉलेजीस जवळच होती.
कार्यालयात सकाळी लेडीज स्टाफ टायपिंग मशीनचा आवाज सुरु करीत. लंच टाइम सोडला तर दिवसभर टिकल्या फुटत राहतं. स्टेनो जेव्हा

दोन स्टेनो एकत्र टायपिंग करायला बसत तेव्हा तडतड ताशाचा आवाज भरून राही. दिवसामध्ये खूप पत्रे बाहेर जातं असतं. त्या काळी टायपिंग हा एकमेव उपाय होता. परिपत्रक पाठविण्यासाठी सायक्लोस्टाईल मशीनचा वापर केला जाई.

“ए, इकडे ये”. चौघींपैकी एकीनं रश्मीला हाक मारली. गळ्यातल्या काळ्या धाग्याकडे पाहात विचारलं, “तुझं नाव काय? लग्न झालाय का तुझं ❓️” अगदी पहिल्याच दिवशी आलेल्या प्रश्ना मुळे, रश्मीला आश्चर्य वाटलं.
“माझं नाव रश्मी. तुम्हाला काय वाटतं? गळ्यातील काळ्या धाग्याला हात लावत रश्मीने प्रतिप्रश्न केला?
“समजलं नाहीं ना, म्हणून तर विचारलं ?” समोरून पुनः प्रश्नच आला.
“चला❗️ रश्मी मॅडम, साहेबाना भेटून येऊ. आज कामावर जॉईन करून घेतो तुम्हाला”, सुपरिंटेंडंट साहेब हातातील फाईल सांभाळत बोलले. रश्मी त्यांच्या पाठोपाठ केबिनमध्ये गेली.
समोरच्या खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांनी ओ. एस. च बोलणं ऐकून घेतलं आणि आणि पत्रावर सही केली.
“नमस्कार सर, मी रश्मी नाडकर्णी. आज ऑफिसला जॉईन होण्यासाठी आले आहे”. रश्मीने स्वतःचा परिचय करून दिला.
“स्वगत आहे तुमचं नाडकर्णी मॅडम.” नाकावर आलेल्या चष्म्यातून वर पाहात अधीकारी बोलले. ओ. एस. कडे वळत साहेब बोलले. “यादीतील शेवटची कॅन्डीडेट आहे ना नाडकर्णी मॅडम? आजच जॉईन झाल्या आहेत. याचं कार्यालयात राहु देत. त्यांना, त्यांचे काम समजावून सांगा.” असं बोलून साहेबांनी टेबलावरच्या फाइल्स कडे मोर्चा वळवला.
सकाळपासून सुरु होणारा दिवस, दिवसभराचं काम, जिने चडून उतरून शरीर गाळून जाई. संध्याकाळी थकवा जाणवे. शनिवार आला की संस्थेत जाऊन राहिलेला पोर्शन कम्प्लिट करणे, पुन्हा सोमवारी पहाटे निघून कार्यालय गाठणे सुरु झाले. अशा धावपळीत, नवीन जागी शिफ्ट झाली रश्मी. प्रचंढ उन्हाळा, घामाच्या धारा काढत होता.
🌺🌺🌺🌺🌺
कोणी आपली बुद्धी विकतं, कोणी आपली बोटं विकतात.” टायपिंगचा कडकडाट ऐकून एक अधिकाऱ्यांनी अतिशय समर्पक टिप्पणी केली. अगदी खरंच होत ते.
शासकीय कार्यालयात रश्मीच्या शब्दात, अनुभवात, आणि माणूस मेळाव्यात भरचं पडत राहिली. विश्व समृद्ध होत राहिले.

🌞🌝🌞🌝🌞🌝🌓🌝🌞🌝🌞🌝🌞

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला, रिकाम्या जागेवर सांडपाण्यातून पिकविलेल्या भाज्या पाहून रश्मी हैराण झाली. पालक, भेंडी, लाल माठ या भाज्या रोजच्या आहारात येणार. काय होईल आपल्या आरोग्याचं ❓️ भलं मोठं प्रश्नचिन्ह रश्मीच्या मनात शंका निर्माण करून राहिले.
कधी नाहीं तेवढी रश्मीला जेवणाची शिसारी येऊ लागली.
🍃🍃🍃🍃🍀🍃🍃🍀🍀🍃🍃🍀🍀

परीक्षा आणि भटकंती, वेगळं काम, वेगळे लोकं भेटत रोज, रश्मीला वेगळाच अनुभव मिळाला. लेडी अधिकारी एकदम प्रेमळ आणि लाघवी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या बरोबर काम करताना वेगळाच आनंद मिळे. ग्रुपने भेटी होऊ लागल्या. उन्हाचा मारा कमी व्हावा म्हणून कोल्ड ड्रिंक्स रिचवले जाऊ लागले. अनहेल्दी खाण, जेवणाची हेळसांड, प्रचण्ड ऊन आणि उन्हात फिरणं आरोग्याला घातक ठरलं. “रश्मी, तुम एकदम यंग हो | कुछ नाहीं होगा | ले लो कोल्ड्रिंक I रश्मी, चाय ले लो I” म्हणून नको, नको म्हणताना, सहकाऱ्यांकडून आग्रह केला जाई. भिडे, भिडे पोटात ढकलले गेलेलं कोल्ड ड्रिंकस आणि चहा, कॉफ़ी आणि प्रचंड उन्ह, दुपारचं कँटीन मधील जेवण, साधं पाणी यांनी बरोबर परिणाम दाखवला. सर्दी, खोकला, ताप हे हलक्या पावलांनी शरिरात प्रवेश करून ठाण मांडून बसले. मैत्रिणी आणि इतरांच्या सल्ल्याने पेंजॉन घे, नाही तर अशीच कोणतीतरी गोळी घे करून प्रसंग निभावला.
पण प्रत्यक्षात तो टायफाईड निघाला. लोकल डॉक्टर शोधून त्यांच्या कडून तपासून इंजेकशन, गोळ्या घेतल्या. तात्पुरतं बर वाटलं. नियमित कामं सुरू होतीचं. पुन्हा टायफाईड उलटला. नवीन ठिकाणं, नवीन नोकरी, नवीन काम, बाहेरच खाण आणि येणाऱ्या अडचणी, रजेची अडचण, तब्बेतीची हेळसांड सुरु झाली. आता हॉस्टेल मधील मैत्रिणी मदतीला आल्या. जेव्हडा वेळ सकाळी आणि संध्याकाळी मिळेल तेव्हढया वेळेसाठी मैत्रिणी जीवे भावे रश्मीच्या आसपास राहून काळजी घेऊ लागल्या. वेळेवर औषधं, पौस्टिक आहार आणि पुरेशी झोप याचा चांगलाच परिणाम झाला. हा हा म्हणता रश्मी बरी झाली.

🌺🌺🌞🌞🌺🌺🌞🌞🌺🌺🌞🌺🌞🌺🌞🌞

लोकल, फेरीवाले आणि किन्नर

“यात्री, कृपया ध्यान दे. प्लाटफॉर्म क्रमांक चार पर आनेवाली, छे बजकर तीस मिनिटं की लोकल ट्रेन, —— जानेवाली स्लो लोकल हैं. ए ट्रेन सभी स्टेशनोपर रुकेगी.”
अनाऊन्समेम्ट व्हायच्या अगोदर लेडीज डब्यात उडी घेण्यासाठी बायका पदर खोचून तयार राहतं. ट्रेन पूर्णपणे थांबायच्या अगोदरच सर्व सीट्स फुल झालेल्या असतं. उप नगरात राहून महानगरात काम करणाऱ्या महिलांना आधुनिक आणि अत्यावश्यक अशी पासाष्टांवी कला आत्मसात करणे अनिवार्य असते. अन्यथा काय बावळट आहे ही मुलगी असा शिक्का बसतो. पासाष्टांव्या कलेची उप कला लोकल मधून उतरताना करावयाच्या कसरती. जींला ही उतरण्याची उपकला जमत नाहीं तिला गर्दी हवं तिथं उतरवते. आणि गर्दीला हवे तिथे चढवते. काहीच करायचे नाहीं फक्त दरवाज्या मध्ये उभं रहायचं. आणि चढताना आणि उतरताना बायकांकडून जीं हडतूड पुष्पांजली मिळते ती गंभीर चेहरा करून ऐकायची. चेहरे बनवायचे नाहीत, तोंडातून शब्द काढायचा नाहीं. अन्यथा मागच्या आणि पुढच्या बारा पिढ्यांचा उद्धार झालाच म्हणून समजायचे. त्या नंतर खालील वाक्ये ऐकण्याची सवय ठेवायची.
ए, धक्का क्यूँ मारती हो | ( गप्प), सामनेवाली नीचे गीर जायेगी | क्यूँ ढकलती हो ¿, ट्रेन क्या तेरे बाप की हैं क्या ? देखो बीच मे महारानी, कैसी खाडी हैं | उतरनेका नाहीं हैं तो काय के लिये दरवाजेपे खडी हो | तुम स्पेशीअल ट्रेन क्यूँ नाहीं लेती | तुझे धक्का पसंद नाहीं हैं तो मर्सिडीज मे जा | इधर काय को आई हो | बडी महाराणी बनती हैं शाणी | कांही वेळेस दुनिया भरातल्या शिव्यांची माहिती आणि त्या उच्चारतानाचा आवेश कोणत्या पटीत हवा ते समजत. अन्यथा त्या शब्दाची किंमत रस काढलेल्या चिपाडा सारखा होतो. रं—-, छि…. , पागल या शब्दांना तितकाच उग्र, कठोर चेहरा हवा….
लोकल मध्ये कधी पाट दाबून मिळते, कांही व्यायाम न करता पोट सपाट राहते, ट्रेन मधून उतरताना अनुलोम, विलोम, दीर्घ श्वास आणि शेवटी सुटकेचा निश्वास…… बस, आजचा दिवस संपलाची सुखद कळ.
बिना तेलाचा मस्त मसाज मिळतो.
महिलांच्या या पासाष्टांव्या कलेचा विकास महानगरात प्रवेश केल्या नंतर लगेचच सुरु होतो. ती कला जितकी लवकर आत्मसात कराल तेवढा रोजचा लोकल प्रवास सुखाचा होईल.

दिवसभर, वर खाली जिने चढून, उतरून आणि उभं राहून थकलेले पाय दुखून यायचे आणि पुन्हा ट्रेनमध्ये उभं राहायला पूर्ण नकार द्यायचे. तासभर उभं राहून आपलं ठिकाणं गाठायला साडेसात, पावणेआठ वाजायचे. आता रश्मी इतर बायकांसारखी ट्रेन मध्ये सीट पकडण्यात काही वेळेस यशस्वी व्हायची पण खुप कमी उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिने आपलं, ” दुर्घटना से, देर भली” हे तत्व अंगीकारले. चौथी सीट, अगोदर सांगून ठेवणे, कोण कुठे उतरणार❓️ याचा आढावा घेणं, धक्के सहन करून शांत राहणे जमायला लागले. माणसांचा कलकलाट, ट्रेनचा खडखडाट, घामाचे दर्फ, गर्दीत वाट काढणारे
फेरीवाले, वेगवेगळ्या भाषेत ऐकू येणारे संवाद,
भांडण, ओरडून बोलणं आणि खाद्य पदार्थांचे वास
या आणि अशा घटना, प्रसंग, माणसे निरीक्षण करता, करता वेळ निघून जाई आणि इप्सित ठिकाण पोहोचून जाई.

लोकल ट्रेन मध्ये कानातले लोलक, रुमाल, किचन मधल्या वस्तू, चापा, पिना, कपडे, पुस्तके, मासिके, भेळ, समोसे, वडापाव, चिक्की, भाज्या, फळे या आणि इतर असंख्य वस्तू विकण्यासाठी फेरीवाल्याचा कल्ला चाले. कांही बायका भाज्या घेऊन ट्रेन मध्येच साफ करतं बसायच्या आणि कचरा तिथंच टाकायच्या. अर्धवट खालेले पदार्थ, फळांची आवरणे, बिया, खाण्याचे पदार्थ गुंडाळलेले पेपर्स यांचा कचरा सर्रास बसल्या जागी टाकून ट्रेनच्या डब्याचा उकिरडा करतं. लोकल मधील प्रवाशांनी केलेला कचरा, ओंगळवाणे मळलेल्या कपड्यनी प्रवेश केलेला भिकारी धूळ उडवत, झाडू मारून साफ करे आणि “ताई, द्या ना पैसे.” म्हणून हाताला, कपड्यला स्पर्श करून मागणी करे. स्वच्छ शुचुर्भूत होऊन आपल्या कामासाठी निघालेल्या रश्मीला हे सारे कांही समजायच्या पलीकडचे होते, बसायच्या जागी घाण करायची. किंबहुना बसण्यायोग्य, स्वच्छ ठेवायचीच नाही. दुसऱ्या कडून साफ केलं जावं अशी अपेक्षा ठेवायची. “इधर बिलकुल झाडू नही लागानेका | सब धूल, मिट्टी कापडोंपे आती हैं | चलो निकलो यहांसे | रश्मीने एक दिवस त्याला ट्रेनमधून उतरायला भाग पाडले. “गंदगीसे वातावरण ही नही बल्की आत्मा भी मैली होती हैं |” असं लिहिलेल्या राष्ट्रपिता गांधीजींचे चित्र असलेल्या बोर्ड जवळ गुटका खाऊन पिचकारी टाकणाऱ्या माणसांकडे बघून अक्षरशः शहारे येत. आणि ही जाणून बुजून केलेली घाण आपल्या हाताने साफ करताना त्या सफाई कामगारांच्या मनाचा विचार कोण करणार ❓️

या साऱ्या गोष्टी कमी होत्या की काय❓️ म्हणून आता रश्मीपुढे वेगळीच समस्या उभी राहिली……..

कांही वेळेस अचानक रश्मीच्या मस्तकात कळ जाई आणि दोन, दोन दिवस डोके दु:खत राही. फट, फट तोंडासमोर टाळी वाजवून, हात डोक्यावर ठेवतं आणि समोर हात पसरून पैशाची मागणी करतं, भडक रंगाची साडी नेसलेला स्त्री वेशातील पुरुष … किन्नर. ज्या क्षणी अशी व्यक्ती डोक्यावर हात ठेवी त्या क्षणी रश्मीच्या मस्तकात कळ जाई आणि असंख्य वेदना होत. बीभत्स वाटे. रश्मीला नं टाळता येणार दुखणे होते. ना त्यावर उपाय मिळे, ना ते टाळू शके.
नंतर, नंतर ट्रेनमध्ये चढतानाच रश्मी स्वतःच्या हातात कांही पैसे ठेवत असे. समोर किन्नर दिसला की, अगोदर त्याच्या हातात पैसे ठेऊन देई, जेणेकरून त्यांचा स्पर्श होणार नाहीं. वास्तविक पाहता, रश्मीने किन्नराशी संबंधित पुस्तकं आणि कथा वाचल्या होत्या. पण पुस्तकातील किन्नर आणि प्रत्यक्षातील किन्नर यामध्ये तफावत दिसें. प्रत्यक्ष्य व्यक्ती आणि वाचनामुळे मनात निर्माण झालेली प्रतिमा या मधील फरक समजून येई. विशिष्ट लयीत आणि विशिष्ट प्रकारे टाळी वाजवणं, निसर्गानं केलेल्या चमत्कारिक अन्यायामुळे असं जिणं प्राप्त झालेल्या जीवावर पोट भरण्यासाठी करावी लागणारी सहज क्रिया होती ती. त्यात किळस वाटावा, मस्तकात कळ जावी असं काहीच नव्हतं. पण रश्मीला स्वतःची समजूत घालायला कांही कालावधी द्यावा लागला आणि आता रश्मी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष्य करू लागली.

लोकल रेल्वे मधील प्रसाद… 😳

आज खूप कामामुळे कॅन्टीन मध्ये जाऊन जेवायला वेळच मिळाला नाहीं रश्मीला. पोटातील भूक आणि मनात भुकेची भावना एकाच वेळी अन्न मागू लागले. स्टेशन गाठेतो पर्यंत साडेसहा वाजून गेले होते. श्यक्यतो बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळणाऱ्या रश्मीवर आज भुकेने विजय मिळविला. भेळ विकत घ्यायचा विचार करतं, ट्रेन मध्ये बसल्यावर लगेच पैसे काढण्यासाठी पर्स समोर धरली. पर्सची चेन उघडी दिसली तिला. “आपण चेन बंध करायला विसरलो वाटतं.” रश्मी स्वतःशीच बोलली.
आज एक तारीख. पगाराच्या नव्या, अस्पर्शित, करकरीत नोटा; रिझर्व्ह बँकेतून कार्यालयात आणि संध्याकाळी रश्मीच्या हातात मिळालेल्या होत्या. कांही नोटा, रेल्वेचा तीन महिन्याचा पास, कार्यालयाचे ओळखपत्र, पायातून गळून पडतात म्हणून काढून ठेवलेले पैंजण आणि इंदिरा विकास पत्र या आणि अशाच कांही गोष्टी छोट्या पर्स मध्ये ठेऊन, पर्स बॅगेतील वरच्या कप्प्यात ठेवली होती. भेळवालीला हाक मारून रश्मीने बॅगेतून पर्स काढायला हात घातला आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ट्रेन मध्ये चढताना बरोबर कुणीतरी संधी साधून डल्ला मारला होता. ट्रेनमध्ये सर्वजण आपल्याच नादात होते. कोणी ग्रुप करून गप्पा ठोकत होते, कोणी भाज्या साफ करतं होते. कोणी बसल्या; बसल्या डुलकी घेत होते, कोणी उभ्या; उभ्या वस्तू विकत घेत होते. कांही वेळेसाठी एकत्र आलेले सहप्रवाशी एवढाचं संबंध. कोणाशी देण – घेणं नाहीं. कोणाच्या सुखं – दुःखाशी कोणाचा संबंध नाहीं. फक्त्त आणि फक्त लोकल मुळेच एकत्र आलेले लोकं दिसले. “पर दुःख शीतलम” या उक्तीचा अनुभव होता तो. चेहरा नसलेली गर्दी. भाव नसलेली गर्दी. भावनाहीन गर्दी. स्वतःतच हरवलेली गर्दी. स्वतःच्या पलीकडे, विचार नं करणारी गर्दी…… कदाचित, आपण पण असेच असू दुसऱ्याच्या नजरेतून…. आणि या विचारा बरोबर रश्मीचे मन चरकले.
“दीदीने बॅग कशी सांभाळायची?” हे आवर्जून का सांगितले❓️ यांचा बोध रश्मीला आता झाला. पर्स चोरीला गेल्यामुळे बरंच नुकसान झालं होतं. रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. रश्मीने दुसरे दिवशी कार्यालयत नवीन ओळख पत्रासाठी अर्ज दिला.

“रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….

जेव्हा रश्मी होस्टेलच्या गेटजवळ पोहोचली तेंव्हा आठ वाजले होते. जिना चडून वर आली, तशा हॉस्टेल सांभाळणाऱ्या काकूंनी प्रश्न? विचारले.
“काय गं रश्मी, नक्की काय करून आलीस तू ❓️ नेमकं काय काम करतेस तू ❓️ हॉस्टेल मध्ये पोलीस चौकशीसाठी का आले ❓️ रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का ❓️असं विचारत होते. दुपार पासून आम्ही टेन्शन मध्ये आहोत. तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर फोन केला होता आम्ही. तू कामानिमित्ताने बाहेर गेल्याचे सांगून फोन ठेऊन दिला त्यांनी.” काकु एका दमात बरंच बोलल्याने त्यांना दम लागला होता. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी भरून राहिली होती.
शांतपणाने रश्मीने काकूंनी विचारलेले प्रश्न आणि माहिती ऐकून घेतली. “काकु, माझ्यासाठी पोलिसांनी तुमच्याकडे कांही निरोप दिलाय का ?” शांतपणाने रश्मीने प्रश्न विचारला. “हं, होय. तुला पोलीस स्टेशनला बोलावलंय आजच.” काकूंनी उत्तर दिलं. “ठीक आहे, मी जाऊन येते पोलीस स्टेशनला. विचारते त्यांना, का आले होते हॉस्टेलमध्ये? काय काम होतं? साऱ्या प्रश्नांची उत्तर तेच देऊ शकतील.” रश्मीने खांद्याला बॅग अडकवून, पायात सॅंडल घातले आणि तडक पोलीस स्टेशनला निघाली.

ओळीने तीन टेबल्स मांडलेले होते. आणि समोर बसलेल्या खुर्ची वरील व्यक्तींपैकी कुणी एफ. आय. आर. फाइल करतं होते, कोणी चोरीची तक्रार करतं होते. एक पोलीस खुर्चीत बसून कान कोरत होता. एक नवाकाळ मधलं कोडं सोडवता, सोडवता जबडा पसरून जांभई देत होता. एक पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस स्टेशन बाहेरच वॉकीटॉकीवर रिपोर्टींग करत होते. त्या एरियात सर्व कांही ठीक असल्याचं सांगून व्हरांडयातील पोलिसाने रश्मीकडे मोर्च्या वळवला.

“सरं, आज दुपारी होस्टेलवर चौकशीसाठी, पोलीस ठाण्यातून शिंदेसाहेब आले होते. त्यांना भेटायला आलेय मी. मी रश्मी नाडकर्णी.” रश्मीने स्वतःचा परिचय करून दिला आणि पोलीस स्टेशनला रात्री येण्याचं करणं सांगितलं.
“हो, रश्मी नाडकर्णी मॅडम तुम्हीच का? कांही नाहीं हो मॅडम, हे तुमच्या ऑफिसचं पत्रं मिळालं होत.
बसा खुर्चीवर. रुटीन वेरिफिकेशन होत. तुम्ही ऑफिसला दिलेल्या पत्यावरच राहतात का? हे विचारायला मीच गेलो होतो आज दुपारी. पी. एस. आय. श्री शिंदे, समोरच्या खुर्चीकडे निर्देश करतं बोलले.
“आरे, ए दोन कटिंग चहा सांग त्या पोऱ्याला” शिंदेसाहेबानी बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला हाक मारली.
“बस, तेवढंच ना साहेब? कुठे सही करायची आहे का? रिपोर्ट, अर्ज वगैरे कांही हवा आहे का माझ्या कडून?” रश्मीने तिच्या ऑफिसने पोलीस स्टेशनला अड्रेस केलेलं पत्रं परत करत पी. एस.आय. शिंदेना प्रश्न❓️ विचारले.
“रजिस्टर वर सही करा मॅडम. सकाळी रिपोर्टींग केलं असत तरीबी चाललं असतं. एवढ्या रात्री येण्याची गरज नव्हती.” शिंदे साहेब काळजी पोटी बोलले.
“ए चहा आला का रे? मॅडमना चहा दे लवकर”. शिंदेसाहेबानी आवाज चढवून पोऱ्याला विचारले.
“साहेब, जेवणाची वेळ आहे ही. मी रात्री चहा घेत नाहीं. माझं काम झालं असेल तर मी निघते.” रश्मी खांद्याला बॅग अडकवत बोलली.
“कसं जाणार तुम्ही? वाघमारे रिक्षा मागवा मॅडम करता.” बोलता; बोलता वाघमारे रिक्षा घेऊन आले.
“ही घ्या, तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला रिपोर्ट केल्याची कॉपी.” शिंदे साहेबानी रश्मीच्या हातात पेपर दिला. रश्मी होस्टेलला पोहोचली तेंव्हा बरोबर दहा वाजले होते. मेन गेट बंध करण्यासाठी काका खाली आले होते. रश्मी रिक्षातून खाली उतरली आणि काका, काकूंनी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला.
“गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जॉइनिंगच्या वेळी रेसिडेन्सील एड्रेस चेक करणं, हे रूटीन काम असतं. काकु मी सकाळी सर्व पेपर्स देते तुम्हाला.” रश्मीने काका, काकूंना पोलिसांच्या हॉस्टेल भेटीचं कारण सांगितलं. आणि स्वतःच्या रूम मध्ये प्रवेश केला. रेक्टर काका, काकूंनी काटेकोरपणे दहाच्या ठोक्याला गेट आणि लाईट बंध केले.

हॉस्टेल लाईफ एन्जॉय करायला पाहिजे असं ऐकलं होत. पण हे वर्किंग विमेन्स हॉस्टेल होत. कोणी केरळ मधून आल्या होत्या, कोणी गुजरात मधून, कोणी आंध्र, तामिळ, कर्नाटकातून तर कोणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब येथून आल्या होत्या. बऱ्याच मुली महाराष्ट्राच्या विविध भागातून आल्या होत्या. बऱ्याच लेडीज प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतं होत्या. बँकेत आणि शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक सुद्धा राहतं होत्या. कोणी पिक्चर, सिरीयल मध्ये काम करतं होत्या. एक वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती. कोणी पोंगल साजरा करतं, कोणी दसरा, कोणी लोडी कोणी आणखी कांही. स्वप्नं डोळ्यात, स्वप्नं मनात ठेऊन, आहे त्या जॉब पेक्षा चांगला जॉब मिळावा यासाठी प्रयत्न करतं होत्या.

रश्मी जेव्हा पहिल्यादा रूम बघायला गेली त्या दिवशी रविवार होता. रूम मध्ये प्रवेश केल्या, केल्या दचकलीच. तिला ज्या मुली बरोबर रूम शेअर करायची होती, तीला पाहून मनातून चरकलीच. अर्धवट पांढरे झालेले केस, विस्कटल्यामुळे कसेतरी दिसत होते. डोळ्याखाली गालाच्या उंचवट्या पर्यंत काळेपणा मुरला होता. विटलेल्या रंगाचा गाऊन, भकास नजर पाहून रश्मीच्या काळजात चर्र झालं. मी यांच्याबरोबर राहायचं? रश्मीने नाराजीने प्रश्न विचारला. “हं”, काकु बोलल्या. “परम, ये रश्मी हैं | तुम्हारी नाई रूम पार्टनर | आज से तुम दोन्हो साथ रहोंगे | हॉस्टेलके बाकी के रूल्स, रश्मी को समझा देना”, काकूंनी ओळख करून दिली. रेक्टर काका – काकूंना राहण्यासाठी रश्मीच्या रूमच्या बाजूलाच तीन रूमच घर होत. बऱ्याच मुलींनी मुध्दामहून ती रूम घ्यायचं टाळलं होतं. तिथं जरा जरी आवाज झाला तरी रेक्टर काकूंना समजत असे.
किती दिवस इथं राहावं लागेल ? माहित नाहीं. इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. रश्मी स्वतःशीच संवाद बोलत राहिली.

🍚🍚🍤🦈🐳🦈🐳🐋🦈🐳🐋🦈🐳🐋🐟🐠🐬🍚🍚

लहानपणापासून मासे आणि भात खाऊन मोठी झालेली रोजा, डाळ -भात, पोळी – भाजी खाऊन कंटाळत असे. ब्राह्मण रेक्टर एकदम स्ट्रिक्ट होते. रोजा, मास्यांच्या कालवणासाठी नुसती तरसत राही. सायन्स ग्रॅज्युएट रोजा, प्रायव्हेट फर्म मध्ये काम करतं होती. दिसायला एकदम गोरीपान, पाच फूट सात इंच उंची, केतकीचा रंग, काळे कुरळे बॉब केलेले केस. लांब नाक, गुलाबी ओठ. काळेभोर डोळे, लांब धनुष्यकृती भिवाया. आणि थोडंसं नाकातून बोलणं. बोलण्याला थोडासा कोकणी हेल होता. रश्मीची आणि रोजाची एकदम घट्ट मैत्री झाली. “मेलं, लॅब मध्ये पगार तो कितीसा असणार गं ? रश्मी, प्रायव्हेट नोकरी आहे माझी”, स्वतःवर नाराज होऊन बोलायची. आताशा तिच्या डोळ्याखाली काळं दिसायला लागले होते. पण होस्टेल मधल्या मुली एकमेकींना मदत करतं असतं. कुठे चांगला जॉब असेल तर एकमेकीला आवर्जून सांगत.

“रश्मी तुझे पाय दुखतात न? ही पेंजॉन घे आणि अराम कर.” समोर गोळी आणि पाण्याची बाटली पकडून गीत उभी होती.
“गीत, रोजा प्लीज बसा इथं. गीत तू कशाला त्रास करून घेतेस? मी कढत पाण्याने अंघोळ करते. एकदम हलक आणि फ्रेश वाटेल मला,” रश्मीने पाउलो कोएल्होचे, दि अलकेमिस्ट पुस्तकं बाजूला ठेऊनं, गीतच्या हातातली पेंजॉन गोळी गिळून, पाणी प्यायली. टॉवेल आणि गाऊन घेऊन रश्मी, अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली.
गरम पाणी पायावर घेऊन शेक दिला. कढत पाण्याने अंघोळ केल्या मुळे रश्मीला खरोखर बरंsss वाटलं. नेहमीसारखी तिघींची मैफल जमली.
गोरा रंग, पुढे थोडं बाकी आलेलं पोपटाच्या चोचीसारखं लांब नाकं, भुरे डोळे, कुरळे पण लांब आणि काळेभोर केस, कानात मोठया आकाराच्या सोन्याच्या रिंग्स आणि पुढच्या दोन दातांपैकी एका दाताचा छोटासा उडालेला छकळा. मान हलवून बोलायची सवय होती तिला. “आईकडे आपण खरोखरचं आपण मनातल्या साऱ्या गोष्टी बोलू शकतो. जगामध्ये आई इतकी जवळची मैत्रिणी दुसरी कोण असू शकेल का ? श्यक्यच नाहीं. पण कधी, कधी कांही गोष्टी आईच्या आवाक्या बाहेरच्या असतात. अशावेळी मला देव जास्त जवळचा वाटतो”, गीताचे डोळे किंचित पाणावलेले दिसले.
“असं का बोलतेस तू आई बद्दल ? नेमकं काय म्हणायचं आहे तुला? प्रत्येक रविवारी, तू मावशीला भेटायला जातेस. कधीतरी आई कडे जा. तिच्याशी मन मोकळे पणाने बोल. तुला आणि तुझ्या आईला दोघीना पण बरं वाटेल.” गीतानं आईबद्दलची मनातली अढी काढून टाकावी असं वाटून रश्मी आग्रहाने बोलली.

गीताकडे बोलायला बरेच विषय असतं. कधी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा झडे, तर कधी दिवसभरातील घटनांवर, कधी राजकारण, कधी समाज कारणं, कधी खैरनार साहेबांनी अनधिकृत बांधकामावर बेधडक चालू केलेली कारवाई, कधी आपल्याला आलेल्या अनुभवाबाबत, कधी मुंबईचा वडापाव आणि उसाचा रस, कधी फेरीवाले. चर्चेला असंख्य विषय असतं. रात्री लाईट बंद झाले तरी अंधारात गप्पा चालू राहतं. शेवटी रेक्टर काकु आवाज देत, “रश्मी sss, रोज sss, गीत sss बारा वाजले तरी गप्पा संपत नाहीत तुमच्या. खुसुर फुसूर चालूच आहे अजून. बाकीच्या मुलींना त्रास होतो. झोपा आता.” काकूंचे कान शार्प होते. बारीक आवाजात बोललं तरी, कोणाचा आवाज आहे? हे त्या अचूक ओळखायच्या. गीत कधी माणसाचा स्वभाव, कधी माणसाचे एकमेकांशी असलेले नाते संबंधावर बोलत राही. ग्रॅज्युएशन नंतर, रोज आणि गीत यांनी डायरेक्ट जॉब जॉईन केला होता. घरापासून दूर राहावं लागल्यामुळे आपल्या माणसांची किंमत समजते. गरजेला मदत करण्याची त्यांची वृत्ती खरोखर वाखाणण्या जोगी होती. रश्मीला टायफाईड मध्ये गीत आणि रोजनं केलेली मदत रश्मी कधीच विसरू शकणार नाहीं.
एका महिन्यानंतर जीत आली हॉस्टेल मध्ये.
साऱ्या जगावर राग होता तिचा. लग्न होऊन काहीच महिन्यात लग्न मोडलं. पण मनावर झालेला आघात शब्दातून व्यक्त होई. ती बँकेत नोकरी करतं होती. दिसायला सुंदर असलेली जीत कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर लगेच बँकेत नोकरी करायला सुरुवात केली होती.
सुंदर, स्वावलंबी, स्पष्टवक्ती आणि स्वतंत्र विचाराच्या जीतला खेड्यातील एकत्र कुटुंबातील कुरघोडीचे राजकारण बिलकुल रुचलं नाहीं. लग्नात तिच्या आई, वडिलानी जीत करिता दिलेले दागिने सासू आणि नवऱ्याने काढून घेतले आणि भांडणाची ठिणगी पडली. प्रत्येक महिन्याला नवरा त्याच्या आईकडेच पगार देई. जीतचा पगार झाला की सारे पैसे काढून घेतले जातं. सासू रोजच्या खर्चासाठी दहा, पंधरा रुपये जितच्या हातात ठेवीतं असे.
“ऑफिसला जाताना रोज जेवणाचा डबा घेऊन जातेस. पास काढलेला आहे. तुला पैसे हवेतच कशाला?” एके दिवशी सकाळी, घरून बँकेत निघताना, जितच्या हातात दहा रुपये ठेवताना सासूबाईनी किटकिट केली.
“आहो आई, मी मेहनत करून आणलेले सगळे पैसे पगार झाल्याबरोबर काढून घेतात तुम्ही. काल माझ्या मैत्रिणी शॉपिंग साठी गेल्या होत्या. मला स्वतःला पण साडी खरेदी करावी असे वाटतं होते. पण माझ्याकडे पैसेच नसतात. मला आज एक हजार रुपये दया. मला साडी खूप आवडलंय. आज घेऊन येते”
कांही गरज नाहीं साडी बिडी घ्यायची. चिंट्या बघ बाबा, सांभाळ तुझ्या बायकोला.” सासून जाणून बुजून दोघींच्या वादात मुलाला ओढलं.
काय गं जिते, काय झालं सकाळी, सकाळी किटकिट करायला❓️ गपचूप कामावर जा की आता. आई बरोबर वाद कशाला घालतेसं❓️” डोळे मोठे करून चिंतन, जीतवर ओरडला.
“ए, मला कशाला सांगतोस ? तूझ्या आईला सांग. नुसतं पैसा, पैसा करते थेरडी. माझे दागिने तिच्या ताब्यात. बाबांनी मला आणि तुला दिलेले पैसे तिच्या ताब्यात. तुझा पगार तिच्या ताब्यात. माझा पण पगार तिच्या ताब्यात. मला आताच्या आतां हजार रुपये पाहीजेत. सांग तुझ्या आईला.” आता जीतचा आवाज वाढला होता. सासरे, दीर, जाऊ, नणंद लहान मुले सारेच एकत्र आले. अक्षरशः सगळे तुटून पडले एकट्या जीत वर . कधीच नं मिटणार भांडण मन आणि अस्तित्व दुभंगून टाकणारी घटना होती ती . आठवणीने आता पण अस्वस्थ झाली जीत.

🌓


रश्मी, जीत, गीत आणि रोजची गप्पांच्या ओघात ताण तर दूर झालाच आणि चौघींची मस्तच गट्टी जमली मस्त गट्टी जमली.

.


कोंडी फुटली पण घाव देऊन. मन: संतुलन बिघडून. आज जीतला, रश्मीजवळ व्यक्त झाल्यानंतर बरंच शांत वाटलं.
रश्मी, जीत, गीत आणि रोज चौघींची मस्त गट्टी जमली.


इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

This image has an empty alt attribute; its file name is vratwork-logo-1.png

Artwork by VRatwork
Website: http://vratwork.in/portfolio
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020 Ranjana   Rao
Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *