“तू सदा जवळी रहा…” भाग – 35 अर्थात: वाचन आणि बरचं कांही..

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

अगोदर चे भाग वाचण्या करता लिंक वरती क्लिक करा 👉 भाग (क्रमांक)

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा -दोन्ही प्रिय, रश्मीला हातातं काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.

1. वा च न❗️ वा च न ❗️

जशी मिनी बस शाळेच्या आवरात शिरली तशी, “रश्मी मॅडम आल्या, बाजू हटो, बाजू हटो”, म्हणत खेळणाऱ्या मुलांना बाजूला केलं गेलं. गाडी जशी थांबली तशी मुलं गाडीभोवती जमली. लायब्ररीसाठी आणलेली नवी पुस्तकं, चार्ट्स, नकाशे, ग्लोब, एनसायक्लोपिडिया, कलर आणि व्हाईट चॉक बॉक्स, पेपर रिम बॉक्स आणि खेळासाठीचं साहित्य उचलून शाळेच्या कार्यालयात पोहोचवलं.
“आत येऊ का मॅडम ?” पुस्तकं वाचायला कधी मिळतील?” श्रियाने The Adventures of Huckleberry Finn हे पुस्तकं हातात घेत विचारलं.

“मॅडम, मला Arabian Nights हे पॉकेट बुक द्या. मी रविवारी वाचून काढतो” विकीनं उतावळेपणानं पुस्तक उचललं.
“Panchtantr” इंग्लिश, मराठी दोन्हीमध्ये आहे मॅडम मी मराठी वाचलंय, इंग्लिश द्या ना मला”, सुमननं हातात धरुन पुस्तक हलवतं विचारलं.
“Mothya madam, I am borrowing ‘Akbar Birbal’ story book” ज्योतीनं पूस्तकं उचलून हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली.
“Oxford dictionary हातात घेऊन योगेशनं शब्द सांगितला, आणि “nationalize” शब्दाला suffix लावून शब्द बनव राजू” आपल्या वर्ग मित्राला ग्रामरचं खाद्य दिलं.
“राजून, ज्योतीला, nation शब्दाला prefix आणि suffix लावून किती अक्षरी शब्द बनवू शकशील सांग मला? म्हणून प्रश्न केला.
“Mothya Madam तुम्ही सांगु नका त्याला.” ज्योती आणि शोभा या दोन्ही मुलींनी सूचना वजा आदेशचं दिला. प्रशांत आणि गुरूनं अमेरिकन एन् सायक्लोपीडिया उचलून तिथंच उभं राहून मोठ्यानं वाचायला सुरुवात केली.

“छोट्या madam आपण मॅप reading आणि travel from one कंट्री to the other, through plane and boat खेळूया ना.” नामा आणि ज्ञानाने हिस्टरी मॅडमना जगाचा नकाशा दाखवत विनंती केली.
बालान शेक्सपिअरचं 36 drama असलेलं बुक उचलून, ‘ Romeo Juliet शोधून काढलं आणि वाचायला सुरुवात केली. “Madam destiny over rule” हा message याचं drama मध्ये आहे नं?” विचारलं.

एका हातात Charles Dickens च Oliver Twist आणि दुसऱ्या हातात Treasure Island पुस्तकं घेऊन महेशनं कोपऱ्यात जाऊन शांतपणे पुस्तक उघडून, वाचायला सुरुवात केली.

Gulliver’s Travels उचलून एक, एक letter उच्चारत तिसरीच्या वर्गातील रितूनं “T r a v e l म्हणजे काय सर?” विचारलं.
“श्रीया, विकी, राजू, सुमन, बबन, योगी, बाला, ज्योती, शोभा आणि रितू बाकीचे तुम्ही सर्व पुस्तकं खाली ठेवा. ए मन्या चल, ग्लोबनंतर वाच. संगीता मॅप गुंडाळून ठेव होता तसा. आज मॅडम कोणालाही पुस्तकं किंवा इतर साहित्य देणार नाही आहेत. आणलेलं साहित्य रजिस्टर करू द्या. सोमवारी तुम्हाला पुस्तकं मिळतील. चला खेळायला निघा. चला बाहेर.” शिवम सरांनी आवाज चढवून मुलांना बाहेर काढलं. सर्व मुलं थोड नाराजीनं बाहेर पडली. आणि शिवम सरनी सर्व साहित्याची: कॉमन डेड स्टॉक रजिस्टर मध्ये नोंद घेऊन संबंधित शिक्षकांच्या ताब्यात दिलं आणि संबंधितांना नोंदी अद्यावत कारण्यास सांगितलं.

नवीन पुस्तकं पाहून वाचण्याचा झालेला मोह आवरून उद्या नोंद करू मगच वाचायला घेऊ असा विचार करून रश्मीने पुस्तकं जागेवर ठेऊन दिली. बेल झाली तशी मूल दप्तर घेऊन बाहेर पडली. सर्व शिक्षकांबरोबर रश्मी पण बाहेर पडली.

पाव भाजी..

“मॅडम आज घरी चला नं. हॉस्टेल कुणाला तर सांभाळू द्या? सोमवारी पण सुट्टी आहे. हॉस्टेलमध्ये मुलं कमी असतील. उद्या शनिवार, आश्रम शाळा बंद आहे. शाळेच्या मुख्यानी तसा निरोप दिलाय. परवा रविवार आहे. आपण कॅननची पाव भाजी खायला जाऊ.” सहा महिन्यापूर्वी नव्याने जॉईन झालेल्या हिस्टरी टिचर बोलल्या.
“कॅनन पावभाजी काय प्रकार आहे? आणि कुठं जायचं?” रश्मी टिचरनी विचारलं.
“व्ही. टी. ला आहे पावभाजीचं सेन्टर. खूप टेस्टी असते तिथली पावभाजी.” जिओग्राफी टिचर बोलल्या. रश्मीला आपल्या अज्ञानाची किंवा वाटली आणि मॅडमच्या रसिक पणाचं कौतुक वाटलं.
फक्त पाव भाजी खाण्यासाठी शंभर सव्वाशे किलोमीटर प्रवास करून जाणे हे कांही केल्या रश्मीचे मन मानायला तयार नव्हतं. समोर नवीन पुस्तकांचे राजिट्रेशनचं करून लायब्ररी रजिस्टर अपडेट करण्याचं कामं दिसत होतं. विशेष कामं सुट्टीच्या दिवशी केलं की दैनंदिन कामं करताना ताण येत नाही.
वेळेचं महत्व ओळखून त्याचा योग्य वेळी, योग्य वापर केला, वेळेचं व्यवस्थापन केलं की वेळ आपल्या हातात हात घालून नवनिर्माण कामासाठी उपलब्ध होऊ शकतो. म्हणून वेळेच्या अगोदर किंवा वेळच्या वेळी कामं हातावेगळी करण्याची सवय जाणून बुजून रश्मीने जडवून घेतली होती. कामं पेंडिंग ठेवून अराम करणं म्हणजे स्वतःला फसवणे अशी धारणा बनवून नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यावर भर दिला जाई.
पाव भाजीखाण्यासाठी व्ही. टी. ला जाण्याचा प्रस्ताव रश्मीने हसून टाळला खरा, पण त्यामुळं मॅडम नाराज होतील हा विचार पण मनात सलत राहिला.

पुस्तक हातात घेणं आणि न वाचता, नं चाळता ठेवण म्हणजे अरसिकतेचं लक्षणं.
ज्ञान भांडार समोर असताना बाकी कसलाही विचार करायला वेळ कुणाला❓️ पुस्तकं वेडी रश्मी आणि तशीच मुलं. अभ्यास तर अभ्यास, अवांतर वाचन पण तितकंच मन लावून वाचायची. पुस्तकं म्हणजे, खरे मित्र होते रश्मी आणि मुलांचे. बोलून अबोल असणारे . न बोलता सातत्याने बोलणारे मित्र म्हणजे पुस्तकं. पुस्तकं आणि वाचकाच अबोध नातं; जसं जसं पानं वाचत, वाचत प्रत्येक पानाला स्पर्श करत अंतिम पान परतवत शेवट करताना पुस्तकं वाचकाला धन्यवाद देत की ऋण व्यक्त करत हे तो वाचकच जाणतो. पण वाचक पुस्तकाला नक्कीच म्हणेल, “बा मित्रा ❗️ तूझ्या सहवासात मी रुळलो, हुरळलो, नवरसांचा आस्वाद घेतला. तुझ्या पानांपानावरचे शब्द, वाक्य, अर्थ, मतितार्थ, अनुभव विश्व् समृद्ध करणारे, वेळेचं भान हरपवणारे, वास्तवापासून दूsssर कल्पनेच्या जगात घेऊन जाणारे आहेत. आपण आणि पुस्तकं, नदीकाठी खडकावर बसून वाचा, किंवा वडाच्या झाडाखाली, व्हरांड्यात बसून वाचा किंवा स्टाफरूम मध्ये, मुलांबरोबर सार्वजनिक वाचन करा किंवा घरी एकट बसून वाचा. आपण बरं; आपलं पुस्तकं वाचन बरं. काही पुस्तक माहिती देत होती, कांही आकाशात, जमिनीवर, पाण्यामध्ये आणि कांही वेळेस दुसऱ्या विश्वाचा प्रवास घडवत होती, कांही मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करत होती, कांही गरीबाच्या झोपडीत चटणी भाकरीची चव चाखायला लावत, घामाचा दर्फ देत. कांही राजवाडयातील पक्वान्नाने जिव्हा चाळवत, सुवासिक अत्तरे फवारात. कांही पुस्तकं जीवन म्हणजे काय ❓️चा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. कोण म्हणतं व्यसन चांगल नव्हे? जीवन एकदाच मिळत ते कसं जगायचं? मौज मजेत दिवस घालवायचे याचेच धडे देत तर, “कर्म करा”, फळं आपोआप मिळेल म्हणून गीताज्ञान देई. सर्वांचा धागा एकच अनुभव समृद्ध करणं सर्वांचा उद्धेश एकचं याची देही याची डोळा, “ब्रह्मानंदी लागली टाळी तेव्हा देहातें कोण संभाळी ❗️” वाचना सारखं सुख नाही. वाचना सारखा आनंद नाही ❗️ वाचना सारखं छंद नाही ❗️ वाचनासारखं व्यसन नाही❗️
कोण म्हणत व्यसन चांगलं नव्हे? कोण म्हणत कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये?
पुस्तकं वाचनाचं व्यसन चांगलंच की❗️
पुस्तकं वाचनाच्या आहारी जाण उत्तमच की ❗️
व्यावस्थित अभ्यास करून वर्षाकाठी जास्त पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार केला जाई. मुलांचे वाढदिवस पुस्तक भेट देऊन साजरे करावेत आणि वर्गाची फिरती लायब्ररी असावी ही संकल्पना शाळेत राबविली जाई.

इंटरव्ह्यू… ❓️❓️ का आठवला ❓️

बेल झाली तशी आवराआवर करून रश्मी बॅग लटकवून निघाली. मॅडम बरोबर थोडावेळ रूमवर जाऊन, परत होस्टेलवर येत असल्याच सांगून निघाली. शाळेच्या ऑफिसमधून निघून संस्थेच्या कार्यालयाला वळसा घालून गेट पर्यंत आली आणि ओळखीचा आवाज आला.

“मॅडम,  अभिनंदन.  ही  घ्या तुमची ऑर्डर.” आपली पत्नी सुमुखीaa कडे पाहून हसत सुरेशजीनी रश्मीच्या हातात पत्र दिलं.  रश्मी डोळे मोठे करुन हातातील पत्र पाहत होती. महाराष्ट्र शासनाचा  लोगो असलेल्या  लेटर हेड वर काळ्या शाईने  टाईप केलेलं,  रश्मी श्रीराम नाडकर्णी हे नावं  आणि नावापुढे लिहिलेलं पद – अक्षरे वाचून अर्थ लावत होती,   आणि सुरेशजी आणि त्यांची पत्नी सुमुखी,  रश्मीच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या हातातील पात्राकडे पाहूनं  हसत होते. हातातील पत्र तिला भूतकाळात घेऊन गेलं…..

**********************

“Good morning,  Miss Rashmi Nadkarni !

So,  on behalf of the Interview Panel, I welcome you for the day’s scheduled interview.  बसा खुर्चीवर”, तीन  ऑफिसर्स समोरच्या खुर्च्यांवर  बसले होते. मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याने रश्मीला पाहून  खुर्चीकडे बोट दाखवलं 

“Thank you, Sir. Thank you, Madam.
With humility, I present to the Jury my testimonials…
म्हणून रश्मीने  आपली लाल रंगाची फाईल जुरी
समोर ठेवली. 

“It is mentioned in your experience certificate that you are a good interpreter, poet, and a narrative story writer. Can you summarize any one of the stories for us?”  समोर  बसलेल्या madam नी रश्मीकडे पाहत विचारले.  

“Sure Maam,  “Mother’s Love” is one of my favourite stories. I wrote the story when I used to go to college. It’s about the bond between a college-going girl and the woman who meets her every day en route to college.”

  एक नंबरच्या खुर्चीत बसलेल्या लेडी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाहत रश्मी बोलली.


 डोळ्यावर सोनेरी चष्मा घातलेल्या आणि किंचित पांढरे केस असलेल्या व्यक्तीने नाकावर आलेला चष्मा वर सरकवत प्रश्न केला, 

Q: “Name the most important  document,  the school headmaster has to  maintain for years?”  

 A: “There are many important documents,   but the most important document is General Register. The school head  has  to maintain General Register for hundred years, Sir.” रश्मीने  प्रश्न कर्त्याकडे पाहत उत्तर दिले.  

Q. Who is the appointing authority of a teacher in a private aided school?
A. Management, the school management is the appointing authority of the teacher in private schools for both which are government-aided and government-unaided. Infact in all types of schools.

Q: What is the Probation period of a teacher ❓️
A: Two years, Sir.
.
Q: Who updates the Service book of the head master?
A: The school management should keep and update the service book of the head master.

Q: Which book in your opinion is considered as the sacred book and followed in depth in schools?” काळेभोर केस सावळा रंग आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या स्थूल व्यक्तीने रश्मीकडे रोखुन पाहतं विचारलं. अनपेक्षित प्रश्नांनं  रश्मी थोडी गोंधळली पण प्रश्नकर्ता रश्मीच्या चेहऱ्यावरील भाव टिपत असल्याच   लक्षात आलं आणि ती   क्षणात सावरली.  

A: “I think S.S. code,  means  The Secondary   School Code…”
आणि समोरचे तीनही जणानी “yessssss…” म्हणून दाद दिली. आणि हा प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरु राहीला….  

…………

…………

………….


 “Though you haven’t worked as a head mistress, it’s great that you are aware of the duties and responsibilities, Miss Rashmi.”  पुन्हा नाकाच्या शेंड्यापर्यंत घरंगळलेला  चष्मा वर सरकवत अधिकाऱ्याने कॉम्प्लिमेंट देत फाईल रश्मीकडे सरकवतं बोलते झाले.  

 

Q: Miss Nadkarni, “Why do you want to change your job?”

A: I have worked for four years as a teacher and enjoyed my tenure. Moving forward l would like to take up challenging roles, apply solutions, and evolve a new learning curve in the field of education.” रश्मीनं  आटोपशीर आणि स्वतःला रुचेल असं उत्तर दिलं.

“Ok” उत्तराने समोरच्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर  समाधान झाल्याचे भाव   झळकले. आणखीन एक शेवटचा प्रश्न म्हणून 

Q: Do you know,  this job profile involves field  work which is different and challenging ?” एक शेवटचा प्रश्न म्हणून पुनःश्च  प्रश्न आला     

A: “Yes  Sir,  I am aware.
Shall surely do my best.” रश्मीच्या उत्तरात निर्धार होता.  

“Thank you Miss Rashmi Shriram Nadkarni. If shortlisted the office will connect with you,” म्हणून  दुसऱ्या उमेदवाराला आत पाठवायला  सांगण्यासाठी  मॅडमनी टेबलावरची चिमणीचा चिवचिवाट करणारी  बेल दाबली. आणि रश्मी फाईल आणि पर्स सांभाळत बाहेर आली.  हॉलमध्ये जवळ जवळ पासष्ट,  सत्तर उमेदवार बसले होते.   

काय प्रश्न विचारले गेले?  हे विचारण्यासाठी रश्मीभोवती  आठ,  दहा जणांनी कोंडाळं केलं. तसं, सर्वांना जागेवर बसण्याचा दटावणीच्या सुरात हुकुमच केला पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीने.  

*************************


हातात निवडपत्र होते.  आणि आठ, नऊ महिन्यापूर्वीची मुलाखत आठवली रश्मीला.  

“हॅलो,   रश्मी मॅडम,” हा  आवाज आणि वाजवलेल्या  चुटकीने रश्मी intervew मधून बाहेर आली. समोर तिचा विद्यार्थी सुनीलचा भाऊ सुरेशजी आणि त्यांची पत्नी सुमुखी  समोर उभे होते.  

“चला, चहा घेऊ सुरेशजी,  सुमा जी,” म्हणून  समोरून  धावत येऊन रश्मीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या जिम्मीच्या पांढऱ्या रेशमी  केसावरुन हात फिरवत बाजूला केलं सगळे कँटीन कडे वळले.  जिम्मी आपली शेपूट हलवत रश्मी पाठोपाठ चालू लागला.

सोमा मावशीला चहा करायला सांगितला. तिथंच रश्मीला,  संस्कृतचे मास्टरजी आणि गणिताचे भार्गव सर भेटले.  सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  


चहा घेता घेता सुरेश – सुमा जोडी, भार्गव सर आणि मास्टरजी बरोबर  चर्चा करत असताना बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या आणि शेवटी ठरलं तसं  रश्मीने बॅग भरून ठेवली. पुढील मदतीसाठी संगीत सर आले. बऱ्याचं दिवसांनी दिदीची आठवण आली.

*****************************
मन मतलबी, बरोबर
कळतं त्याला .
माटे काका मला रिलीव्ह
   सर्टिफिकेट हवे आहे.” रश्मी सेक्रेटरी कम ट्रेझरर असलेल्या माटेना बोलली.  त्या वसाहतीमध्ये सर्व लोक त्यांना  माटे  काका म्हणून हाक मारत असत.  

“हं,  देतो की, रश्मी मॅडम,  उद्या सकाळी रिलीव्ह सर्टिफिकेट देतो सही करुन.” 

माटे काका बोलले.  शांतपणे घरासमोरील व्हरांडयात, केनच्या आराम खुर्चीत  माटे काका रेलून बसले होते. 

“अं, काय म्हणालात?   रिलीव्ह सर्टिफिकेट म्हणजे तूम्ही नोकरी सोडून चाललात की काय?” आरामात बसलेले काका ताडकन उठून बसले. 

“होय. नवीन ठिकाणी रुजु होताना मागितलेल्या कागदपत्रांमध्ये रिलीव्ह सर्टिफिकेटची पण मागणी केलीय.” रश्मी शांतपणे  उतरली.  

जड अंतःकरणांनी माटेनी रश्मीच्या हातात सर्टिफिकेट दिलं आणि पुनःश्च शाळेसाठी “शिक्षक पाहिजे”ची जाहिरात देण्याबाबत कार्यालयात बसलेल्या शिवम सराना सूचना दिल्या. 

*****************************

 वर्षभरापूर्वी इतिहास भूगोला विषय शिकविण्यासाठी नव्याने जॉईन  झालेल्या प्रज्ञा मॅडम या आपल्या रूम पार्टनरला  बाय करुन रश्मीनं  तडक बस स्टॅन्ड गाठलं. एक दीड किलोमीटरवर असलेल्या बस स्टॅण्डवर तिला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.  एका डोळ्यात खुशीचा आसू आणि एका डोळ्यात मुलांच्या विरहाचे अश्रु घेऊन रश्मी निघाली.   राहिलेला पोर्शन शुक्रवारी रात्री,  शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येऊन शिकविणार असल्याच वारंवार सांगूनही बस सुटेपर्यंत सर्वजण रेंगाळत राहिले. 
******************************
😇😇😇😇😇😇😇😇😇😇
जशी बस सुटली तसं पाच वर्षा पूर्वीचा काळ मनःचक्षूपुढे तरळला…. आठवत राहिला…
सार्वजनिक सुट्टी असली की रश्मी घरीच थांबून कधी मैत्रिणींना भेट, कधी विनिता आईला मदत कर. कधी राहिलेली कामं करतं राही. एक तर घरी मदत होई. रिकामं राहणं म्हणजे स्वतः बरोबर इतरांना त्रास.
आज रविवारी. सुट्टी असल्याने कोठेच जायचं नव्हतं. त्यामुळे रश्मीनं आईला घरकामात मदत करायचं आणि मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी निघाली. मार्केट जवळ गेली की, हमखास मैत्रिणीची भेट होई. अगोदर भाजी मार्केट, बॉम्बे स्टोअर, फुलपुडी आणि रेगुलर सामान घेऊन सोनाली रुपाली या खास लेडीजसाठी असलेल्या स्टोअरमध्ये शिरली. तिथून मधला रस्ता पकडून परतीच्या वाटेला लागली.
दत्त मंदिर दिसलं तसं रश्मी पिशव्या आणि पर्स सांभाळत आत गेली. देवळातील थंडावा शरीराला आणि देव दर्शन मनाला सुखावणार वाटलं. दत्त दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातल्या आणि हात जोडून डोळे मिटले. ओम श्री गुरुदेव दत्त 🙏🌺❗️ म्हणून जोडलेले हात मस्तका पर्यंत नेउन हृदयापाशी आणले आणि डोळेउघडून दत्त चरणावर नजर स्थिरावली. नेहमी सारखच आज पण स्वतःसाठी कांही मागण मागावं असं वाटलं नाही रश्मीला. हात जोडून मूर्तीकडे पहातं राहिली. पाठीमागून आलेल्या घंटेच्या आवाजाने आणि लहान मुलाच्या आवाजामुळे रश्मीनं बॅग उचलतं वळून पाहिलं. कॉलेजमधील मैत्रीण, नेत्राची ताई आपल्या छोटया मुलाबरोबर मंदिरात आली होती.
“ताई तुम्ही केव्हा आलात पुण्याहून? अनिकेत चालायला पण लागला? अगदी आईच्या चेहऱ्यासारखा चेहरा आहे त्याचा. मातृ मुखी सदा सुखी❗️”, रश्मी नेत्राच्या ताईकडे आणि ताईच्या अनिकेतबाळाच्या चेहऱ्याकडे पाहात बोलली.
चित्राताई एकदम खूष होऊन बोलली, “अर्थातचं, माझा चेहरा आहेच सुंदर आणि फ्रेश.🥰 लक्स ब्युटीक्वीन”. हसत हसत अनिकेत बाळाला आणि चित्राताईला बाय केलं. बॅग खांद्याला अडकवली आणि हातात भाजीची पिशवी घेऊन रश्मी  मंदिराबाहेर आली.
समोर भेटलेल्या व्यक्तीने आवाज दिला.   
“नाडकर्णी मॅडम,   तुम्ही परत भेटल्या नाहित.” हे आणि असंख्य इंटरव्ह्यू डोळ्यासमोरून सरकले.

****************
शेजारच्या वहिनी, वहिनी कसल्या ❓️ रश्मीच्या मदतीला धावून आलेली बिन पंखाची परीच ती. आकाशातून जमिनीवर उतरलेली तारका. ज्यांच्या मुळ इथं इतक्या सुंदर जागी कामं करण्याची संधी मिळाली. मनोमन रश्मीने वेळेवर मदत करणाऱ्या देवदूतांचे आभार मानले 🙏🌺
*****************
 “गगनस्थित,  जगाच्या ट्रस्टीकडे पहिलं” आणि खाली मान घालून आपल्या रस्त्याने निघाली. “ओळखीच्या वाटेवरून अनोळखी प्रवाशासारखी चाललेली रश्मी हे तिचं नं थांबणारं चालणं,  महाराजांच्या भूमीपर्यंत घेऊन आलं होतं आणि आता याचं जगाच्या ट्रस्टीनं महाराजांच्याचं भूमीत, महाराष्ट्राच्या राजधानीचा रस्ता दाखवला… 👣👣.
******************
स्वप्नांचं शहर हे. स्वप्नं पूर्तीचं शहर हे. आर्थिक राजधानी ही. असंख्य लोकांचं पोट भरणारी नगरी आहे ही. उत्तुंग इमारती इथेचं अन् जमीनीला सरपटून असलेल्या झोपड्या इथेचं. भामटे पण इथेचं आणि पोटभरेपर्यंत अन्नदान करणारे इथेचं. सोन्याचा धूर इथेचं वाहतो आणि गटारगंगा पण इथेचं. कसं होणार रश्मीचं इथं❓️ टिकणार का या मायावी शहरातं ..❓️


काय केलं रश्मीने पत्र पाहूनं ❓ नेमकं कुठं निघाली रश्मी ❓️ कांही अंदाज ❓️❓️❓️

———————————-

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

Artwork by VRatwork
Website: https://bit.ly/3g7MgOC
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3

8 Responses

  1. आदर्श शिक्षक किंवा शिक्षिका कशी असावी?चांगल्या शिक्षकाबाबत मुलांची इनव्हालमेंट कशी असते? खरा शिक्षक आणि पुस्तके यांच मेतकूट कस जुळत ते कथेत डोकावत.
    रश्मी टिचर च्या माध्यमातून आपण एक सर्व गुणसंपन्न
    अध्ययनाशी एकरूप झालेली शिक्षिका उभी करण्यात नक्कीच यशस्वी झाला आहात म्हणायला हरकत नाही.
    या कथेतुन आपणच तर डोकावत नाहीत ना? असे वाटते.

    1. नमस्कार🙏 मंगेश सर. “तू सदा जवळी रहा… “भाग -35 वाचून आपण अभिप्राय दिलेत. आपले अभिप्राय नेहमी प्रेरणादायी आणि संबंधित भागातील मुद्याला अनुसरून असतात आणि प्रेरणादायी असतात. आपण व्यक्त होतं असताना कल्पना आणि वास्तविक गोष्टींचा मेलं घालून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतेय मी.
      धन्यवाद सर 🙏🌈

    1. झरीन मॅडम 🙏🌈. आपण “तू सदा जवळी रहा… ” भाग – पूर्ण वाचून दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद. 🙏🌹

    1. जयवंत पाटील सर नमस्कार 🌈🙏. भाग 35 वाचून आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏.

  2. अनुभव समृद्ध लेखनातून उभा केलेले रेखाचित्र खूप मार्मिकपणे
    मांडले आहे.
    शब्द समृद्ध लेखन.

    1. नमस्कार जयश्री मॅडम. आपण मी लिहिलेला ब्लॉग वाचून आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. 🙏अनुभव आणि कल्पनेच्या राज्यात फेरफटका मारताना माता सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा लाभ शब्द समृद्ध बनवतो 🙏. 🌈🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More