“तू सदा जवळी रहा…” भाग -40 अर्थात: आकाशात पतीतं तोय्ं…


रंजना राव यांचे ,”तू सदा जावळी रहा …”मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇


अगोदर चे भाग वाचण्या करता लिंक वरती क्लिक करा 👉 भाग (क्रमांक)


👉भाग -31* अर्थात अडचणींवर मात,  पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺,  कैलास पैसे चो..  समस्या,  ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,  
👉भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू,  मेस मधली गजबज,  रश्मीचं भरलं वांगं,   कांदे पोहे.  
👉भाग – 33* एका वेलांटिचा फरक – दोन्ही प्रिय,  रश्मीला, हातात काठी का घ्यावी  लागली❓️  सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
👉भाग -34* बोबडकांदा, मीच शहाणी झाले‼️ मीटिंग, स्ट्रिक्ट टिचर.

👉भाग- 35* वाचन‼️ वाचन ‼️पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️
👉भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
👉भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
👉भाग – 38* क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
👉भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्ट लक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
👉भाग – 40 * मार्गशीर्ष, गैर समज दृड़ का झाला ? मैडम तूम्ही पुजा करा
. आकाशात पतिमतं तोय्ं….” 🙏🙏• मार्गशीर्ष

साधारणपणे नोव्हेम्बर एन्ड डिसेंबर दरम्यान येणारा मार्गशीर्ष महिना खूपच आल्हाददायक असतो. नुकतीच दिवाळी संपलेली असते. कार्तिक एकादशीला पंढरपूर वारी करून आलेला शेतकरी पीकांच्या कापणी, मळणीसाठी तयारी करत असतो. पावसाळा संपलेला असतो. पाऊस येऊन गेल्याच्या खुणा धरा धारण करते. पावसाच्या या सुंदर खुणांचा हिरवाईच्या रूपाने पृथ्वीला साज चढवलेला असतो आणि फुला, फळांनी लगडलेली वृक्ष, वेली दिसू लागतात. चिकू, सीताफळाच्या झाडांना छोटी, छोटी फळे लगडलेली दिसू लागतात. बाराही महिने, विविध रंगांची बहारदार फुले देणारे जास्वंद आपल्या हिरव्या बहारदार झाडांवर कळ्या, फुले आनंदाने लगडू देतात. शरीर आणि मन दोन्ही या थंड आणि आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत असतात.
शैक्षणिक क्षेत्रात दुसरे सत्र चालू झालेले असते. पहिल्या सत्रा पेक्षा तुलनात्मक दृष्टया, दुसरे सत्र लहान असते. सहशालेय उपक्रम आणि स्पर्धा, गॅदरिंग आणि इतर बरेच कार्यक्रम आणि अभ्यासाची रेलचेल असलेला असा हा सर्वाना आनंदित करणारा काळ असतो.
गॅदरिंग शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. गॅदरिंग
म्हणजे विशेष करून शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थी शिक्षक एकत्र येऊन केला जाणारा आनंद सोहळा. उद्देश्य असा की, विद्यार्थ्याच्या कला गुणाना प्रोत्साहन देणे, सुप्त गुणाना मुर्त रुपात प्रदर्शित करणे
. विज्ञान दृष्टी वृृृद्दींगत करण्यासाठी विज्ञान मंच, बाल विज्ञान मेळावा या अणि अशाच विज्ञानाशी संबंधीत कार्यक्रमांची रेलचेल असे.
शाळा प्रवेश, रजिस्ट्रेशन, रेकॉर्ड अद्यावत करणे आणि वर्गात नियमित अभ्यासक्रमावर भर देणे असे प्रकार विशेष करून पहिल्या सत्रात होतात. पण शिक्षक आणि मुलांमधील औपचारिक नातं गळून पडते ते सहशालेय उपक्रम आणि गॅदरिंग मुळे. औपचारिकता जाऊन सुंदर बंध निर्माण करायला अशी वातावरण निर्मिती हातभार लावते. मुलांमधील सुप्त कला गुणांना वाव देणारा, वाढवणारा आणि जोपासणारा काळ असतो. मुलांचा उत्साह कार्यक्रमातून दिसुन येतो. निसर्गाचा प्रफुल्लितपणा वेगवेगळ्या रानफुलांचे सौंदर्य अणि सुवास, वातावरण आल्हाददायी बनवायला हातभर लावतात.

@@@@@@@
अशाच एका आल्हाददायक, सुखद, प्रसन्न चित्त बनवणाऱ्या पहाटे रश्मी उठली आणि हातात ताम्हण घेऊन दुर्वा आणि फुले आणण्यासाठी चप्पल चढवून घरातून बाहेर पडली. पहाटेचा गारवा, किंचित झोंबणारा वाटला. पूर्वेला दिसणारा लालसरपणा लक्ष वेधून घेत होता. धुक्यामुळे नेहमी पेक्षा किंचित धूसर आणि अंधुक दिसत होते. घरा समोर डाव्या बाजूला असलेल्या पेरूच्या बागेतून दुर्वा घेऊन थोडे चालत घरासमोरच्या रस्त्यावरून सरळ पुढे आली रश्मी. संस्थेचे गेट पुढे ढकलून ठेवलेले दिसले. पेरूच्या गार्डनला वळसा घेतला. सरळ पुढे चालत राहिली. काम चालू असताना नेहमी वेगवेगळे आवाज करणारे वर्कशॉप, केन – बांबूचे प्रोजेक्ट ऑफिस, धूक्याची दुलई पांघरून; अंग आकसून शांतपणे पहुडलेले दिसत होते. पांढरी कळ्या, फ़ुले पेरूच्या झाडांच्या हिरव्या डहाळ्यांची शोभा वाढवत होती.
नेहमीच्या जास्वदांच्या झाडा जवळ, कोणीतरी उभे असल्याचे दिसत होते. थोडं पुढे गेल्यावर लक्षात आले की, भात संशोधन प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या रश्मीच्या शेजारी राहणाऱ्या वहिनी स्ननोत्तर केस मोकळे सोडून उभ्या दिसल्या. त्यांच्या लांब सडक काळ्या भोर केसाच्या शेंड्यावर पाण्याचे थेंब बल्ब सारखे लटकले होते. त्या अर्धोन्मीलित फुलांसहित डहाळी खूडताना दिसल्या. त्यांनी इतक्या पहाटे केसावरुन का अंघोळ केली असावी ? रश्मीच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
“वहिनी, इतक्या लौकर अंघोळ केलीत, आज कांही विशेष आहे का❓️” रश्मीने सहज विचारणा केली.
“मोठ्या मॅडम, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. सकाळीच पूजा करते मी”. वहिनी उतरल्या.
“आज; मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे ❓️❓️ ” खात्री करण्यासाठी रश्मीने पुनःश्च विचारणा केली.
“हं, आजच मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे.” समोरून उत्तर आले.
रश्मी आता मनातच स्वगत बोलली रश्मी, “मी पण करते उपवास आणि पूजा. आता मी पूजा कशी करणार ❓️ माझ्याकडे तर मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तक नाही आणि आता ते मिळण अश्यक्य. इतक्या वर्षाचा नेम चुकणार आज.” स्वतःशीच बडबडत रश्मी घरात शिरली

“तूम्ही पूजेची तयारी करा, मैडम ..”!🙏🙏


“कसला नेम चुकणार मॅडम ❓️ एवढ्या सुंदर सकाळी, चेहरा चिंताक्रांत का आहे तुमचा ❓️” हातातील ब्रशला टूथ पेस्ट लावत हिस्टरीच्या मॅडमनी विचारले.
रश्मीच्या काका आजोबांची सून, अन्नपूर्णा काकू श्रद्देने व्रत वैकल्ये करायच्या. अन्नपुर्णा काकूनी विनिताला, रश्मीच्या आईला मार्गशिर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तकं भेट देऊन, व्रत करायला सांगितले, तेंव्हा रश्मी लहान होती. प्रत्येक वर्षी रश्मीची आई मन लावून व्रत करताना, व्रत कथा वाचताना आणि उद्यापन करताना रश्मी पहात होती. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी विनिता कडून हे व्रत शद्धेने केले जाई. जसे रश्मीला समजायला लागले तसे, ती सुद्धा आई; विनिता बरोबर उपवास करतं होती. रश्मीच्या आईला जेव्हा, पूजा करणे आणि व्रत कथा वाचणे श्यक्य होत नसे; तेंव्हा या साऱ्या गोष्टी रश्मीकडून करून घेतल्या जातं होत्या. हे सर्व मनापासून आणि श्रद्धेने केले जाई. रश्मीशी बोलता, बोलता रूम पार्टनर असलेल्या मॅडमना पूर्वीचे संभाषण आठवले. “या वर्षी मात्र माझा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा नेम चुकणार”, असे बोलतना रश्मी नर्वस दिसली.
“रश्मी मॅडम, त्यात नाराज होण्यासारखे काय आहे ❓️,” हिस्ट्रीच्या मॅडमनी विचारले.
“उपवास आणि पूजा, आज पण करू शकता तुम्ही. नेमकी, समस्या काय आहे? फुले, फळे, झाडांचे डहाळे, हळद, कुंकू, धूप, दीप, कापूस, तांदूळ, कलश, नारळ, नवी साडी सगळेच तर आहे. उपवास, तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे. आता साडे सहा वाजताहेत. अंघोळ करून, पूजा करा.” मॅडमनी एका दमात पूजा साहित्य आठवून सांगितले. कांही केल्या, रश्मीच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ❓️ चिन्ह जसेच्या तसेच दिसत होते.
विचारात असलेल्या रश्मी कडे पाहत न बोलता, दोन्ही भुवया उंचावून मैडमनी प्रश्न विचारला ❓️
“व्रत कथा वाचण्यासाठी पुस्तकं मिळणे आज श्यक्य नाही.” रश्मीने नन्नाचा पाडा पुढे रेटला.
“तुम्ही अंघोळ करून पूजेची तयारी करा रश्मी मॅडम. तुम्हाला कथा मिळेल.” अतिशय विश्वसाने रूम पार्टनर मॅडमनी दिलेले आश्वासन ऐकून अंघोळ करून रश्मी सर्व तयारीनिशि पूजेला बसली.
दारात सडा, रांगोळी, घातली. घरात व्यवस्थित साफ सफाई केली. रांगोळी, धूप, दीप, कपूर, तांदूळ, पाणी, फळे, फुले, पत्री, कलश, श्रीफ़ळ, साडी, गेजावस्त्र सर्व साहित्य व्यवस्थीत जवळ ठेऊन घेतले. पाटावर तांदूळ आणि त्यावर कलश ठेवला. फळा, फुलांचे ड़हाळे कलशात व्यवस्थीत लाऊन घेतले आणि नारळ ठेउन पूजा मांडली.
मॅडमनी रश्मीच्या हातात एक वही दिली.

“वहिच्या उजव्या बाजूच्या पानावर सुर्वण आभूषण यूूक्त लक्ष्मीची रेखाकृती बनवीली होती. सुटसुटीत, मोत्या सारख्या सुंदर अक्षरांत वरती लिहिले होते,
“मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा’ अर्थात: लक्ष्मी महात्म्य”,
पुजा पूर्ण झाली. खणखणीत अणि स्पष्ट आवाजात कथा वाचन सुरु झाले.
“सौराष्ट्र देशात त्या काळी, भद्रश्रवा नावाचा राजा, राज्य करीत होता. त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती. त्या राजाराणीला सात मुलगे आणि एक मुलगी होती. मुलीचे नाव श्याम बाला.
शाम बाला मैत्रिणीं बरोबर राजोद्यानातं फिरायला गेली तेंव्हा राज वाड्यात वेगळीच घटना घडली…..

“काय ग थेरडे, गत जन्मीची काय कटकट लावली आहेस. चल, चालती हो इथुन,” म्हणून राणी सुरतचन्द्रीकेने म्हातरिच्या हातातील काठी हिसकाऊन घेतली आणि तिला ढकलून दिले……
शाम बालेने वृध्द रुपधारी लक्ष्मीची क्षमा मागितली. आणि लक्ष्मी व्रताचा विधी विचारला…….
‘अरे देवा!’ हा तर, राणी शाम बालेचा पिता आहे, हे कळताच दासी चित्कारल्या……
शाम बालेने भक्ती भावाने स्वत: लक्ष्मी व्रत केले आ आणि अपल्या माते कडूनही करविले…
लेकीने पित्यास कोळसे दिले आणि आपणास काहिचं दिले नाही हा राग सुरत चन्द्रीकेच्या मनात रटमटत होता…
“काय आणलास माहेराहुन?” मालाधरने पत्नीला विचारले…
उतू नये, मातू नये….

अशा तऱ्हेने वर्षानुवर्षे श्रद्धेने करतं असलेले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आणि व्रत कथा वाचन सफळ संपूर्ण झाले.
🙏🙏🍀🌹❗️🌷🎋🍀🌺🌹🥀🌷🍀🌹🌺🥀🎋🎋🙏🙏

भेदा भेद, अमंगळ..

हिस्टरी शिकवायला विज्ञान संस्थेत नव्या मॅडम जॉईन झाल्या आणि सर्वांच्या भिवाया उंचावल्या. दिसायला गोड, बोलायला गोड, सर्वांशी आदराने बोलण्याची हातोटी आणि विद्या्र्थ्यांची मैत्रिण. थोड्याच दिवसात संस्थेत आणि रश्मीच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले या गोड मॅडमनी. सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यात एक फरक होता. त्या मुंबई सारख्या शहरातून, आदिवासी भागात काम करण्यासाठी आल्या होत्या. स्वभावाने साध्या, मन मिळाऊ, मेहनती आणि अभ्यासू हे गुण
त्यांच्या इतर गुणांमध्ये आणखी भर टाकत होते. जेव्हा त्या जॉईन झाल्या तेंव्हा नव्या रूम पार्टनर म्हणून मुख्याध्यापक आणि शिवम सरांनी ओळख करून दिली. मॅडमनी त्यांचे आटोपशीर आणि आवश्यक सामान व्यवस्थित लावल्या आणि निवांत झाल्या. प्रथम त्यांनी सर्व घर न्याहाळून घेतले. वर सिमेंटच्या पत्र्याची शेड असलेले, स्वच्छ रांगोळी घातलेले आंगण. बाजूला कपडे सुकत टाकण्यासाठी बांधलेली दोरी. घराच्या दोन्ही बाजूला ओळीने लावलेली फुलझाडे. घराच्या पाठच्या दरवाज्याला लागून असलेले बाथरूम आणि संडास रूम आणि वेळू, बांबूची झुडुपे दिसलीं. अंघोळ करुन रश्मी; देवा जवळ समया, तुपचे निरांजन, अगरबत्ती लाल फुले, तुळसीं घालुन पुजा करत असे. सूर्योदय घरात बसून पाहता येई. सकाळची कोवळी लांब सुर्य किरणे अशा प्रकारे घरात प्रवेश करत की देवघरतील श्री दत्त आणि अष्ट लक्ष्मीला स्पर्श करुन आणि दर्शनाने दिवस सुरु करण्याची आज्ञा मागत आहेत. प्रसन्न सकाळी ध्यान धारणा, मनस पुजा करुन रश्मीचा दिवस सुरु होई.
“मोठ्यामॅडम, बाबांचा फोटो देवघरात ठेऊ का ?” असा एकदम हळू आवाजात पुजेच्या वेळी आलेला प्रश्न हवेतच विरला.
🌞🌞🌞🌞🌞🌞
मनाच्या तिन अवस्था असतात. मन न कळत पणे पाहिलेल्या; वाचलेल्या, ऐकलेल्या , स्पर्शलेल्या, वास घेतलेल्या, आणि चव चाखलेल्या या पन्चेद्रीया द्वारे मिळविलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आत्मासात करून साठवून ठेवत असते. मन आणि बुद्धी द्वारे अनुभवलेल्या आणि स्वत:च्या कल्पनेत, विचारात असणाऱ्या अनंत गोष्टी वेगवेगळ्या कप्प्यात स्वत:ला हव्या तशा ऍडजस्ट करुन ठेवण्याची किमया साधत असते. बऱ्याच गोष्टीचे दमन करत असतो. अशीच कांहिसी अवस्था रश्मिची झाली होती. “कर्माच्या गती असती गहन, जे होणार ते कदा चुकेना” हे महीत असुन सुद्धा बाबांच्या भक्ताच्या जीवनाला लागलेली करुण किनार पाहुन कुठेतरी मनात अशी भावना निर्माण झाली होती. ती भावना व्यवस्थित पणे समजतही नव्हती अणि व्यक्त ही करता येत नव्हती. नकारात्मक भावना रश्मी ना मनातून काढून टाकू शकत नव्हती.
कॉलेजला असताना, कपडे खरेदी केल्यानंतर, दुकानदार भय्याचे अगदी तसेच्या तसेच शब्द आठवले. “रश्मी बेबी, ये लो बाबाजी का कैलेंडर!” म्हणून दिलेले कैलेंडर. तालुक्याच्या ठिकाणी बाबाजींना रोज नमस्कार करुन कॉलेजला जात होती. रश्मिवर येऊ घातलेला, भयभित करणारा प्रसंग. कितिही नाही म्हंटले तरी मनात चाललेल्या चित्र, विचित्र भावनांच्या कल्लोळा मुळे प्रसंग, घटनांची न कळत जोडलेली कडी रश्मीला सावध बनवी. त्याचा परिणाम रश्मीच्या वागण्यातून दिसे. वरवर पहणाऱ्याला रश्मीच्या वागण्याचा राग येइल. पण….

गैर समज, दृड़ का झाला?

डोक्याला लाल कपडा गुंडाळलेले आणि लाल कपडे परिधान केलेले, आकाशा कडे दृष्टि वळवून उजव्या हाताच्या अंगठ्या जवळचे बोट आकाशाच्या दिशेने वर केलेल्या बाबांची तसबिर मॅडमनी बाहेरच्या रूम मध्ये ठेउन तिथेच पुजा केली.
जगभर बाबांचे भक्त विखुरलेले आहेत. मॅडमच्या घरी पंण बाबांचीच भक्ती केली जाई.
कोणताही महात्मा जेव्हा पृथ्वीवर अवतरतो तेव्हा सातशे वर्षापर्यंत त्याच्या सर्व शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात आणि अपल्या भक्तांवर कृपाप्रसादाचे छत्र धरतात,’ असे रश्मीने ऐकले होते. अनन्य भक्तीद्वारे भक्तांनी केलेला धावा ऐकुन, ऐहिक मागणे प्राप्त झाल्यावर भक्ती दृड़ होते. नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती होते. साधारणत: भौतिक सुविधांची आस धरलेल्या, भक्त जनांच्या जीवनातील सर्व ईच्छा त्वरित पुर्ण होतात असा त्यांचा लौकिक असतो. स्थनिक लोकांकडून चमत्काराच्या कथा सर्वदूर पसरतात आणि अवतारी पुरूषांच्या संस्थानाचे, साम्राज्यात रुपांतर होते. दर्शनासाठी रांगा लागतात. काही ठिकाणी बाजार होतो. देव, योगी किवा अवतार यापेक्षा कोणता देव, देऊळ श्रीमंत यावर चर्चा होत रहाते. देव भावाचा भुकेला म्हणता, म्हणता देवाच्या दर्शनासाठी भाव केला जातो. क्षणभर उभे राहुन नेत्रसूख घेता येत नाही की, त्याच्या समोर डोळे बंद करुन, मन:चक्षुनी पहाता येत नाही. कानात, ‘आगे चलोsss’ ची हाक आणि लोकल मध्ये चढता, उतरताना जसे धक्के देतात तसे मागचे लोक शरीराला पुढे, पुढे ढकलत रहातात. भक्त, भौतिक जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणी, दू:ख, आजार, आपत्ती, विपत्ती सारे बाबांच्या चरणी अर्पण करतात आणि निश्चिंत मनाने पुन्हा संसाराचा गाडा ओढ़त रहातात. बाबांच्या भक्तांकडे डोळे दिपवणारे ऐश्वर्य दिसते. अक्षरशः शून्यातून त्यानी संसार – विश्व निर्माण केल्याचे सांगतात. आता पर्यंत पाहिलेल्या, भेटलेल्या आणि ऐकलेल्या बाबांचे अनन्य साधारण भक्त आणि त्यांच्या नववीधा भक्तीचे प्रकार पाहुन मन प्रसन्न होई. भेटलेली व्यक्ती भ क्ता पूढे नतमस्तक होत असे . परिक्षित, शुक्राचार्य, प्रल्हाद, लक्ष्मी, पृथु राजा, अक्रूर, अर्जुन, हनुमंत, बली या सर्व श्रेष्ठ भक्तांनी आदर्श घालून दिलेत. पहिल्या तीन प्रकारात म्हणजेच श्रवण, कीर्तन, स्मरण भक्ती मध्ये नामाला महत्व आहे. श्रवण भक्ती मध्ये ईश्वराचे गुणगान, महात्म्य, यश सश्रद्ध भावनेने ऐकले जाते. तसेच इतर चार प्रकारच्या भक्तीमध्ये आपले ईश्वरा बद्धलचे प्रेम व्यक्त केले जाते. भक्त जनाबाईनी, दास्य भक्तीचे उदाहरण अपल्या समोर ठेवलय. ‘दळीता कांन्ड़िता तुज पाहीनं अनंता’, म्हणणारी जनी म्हणते, “माझा विठू, मला माझ्या कामात मदत करत नाही तर तोच सर्व कामे करत असतो.” नमस्मराणाच्या बदल्यात देवच भक्ताचा दास होतो. तो भावाचा भुकेला आहे. तूम्ही देव सोन्या, चान्दिचा घडावा, त्याला हिरे, मोती जडवा, त्याला पंच पक्वान्ने अर्पण करा पण मनात भक्तीभाव हवाचं. खरोखर श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वन्दन, दास्य, सख्य, आत्म निवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार सोडून कलियुगात दहावा प्रकार उदयाला आलाय. कोणता महीत आहे का? नवस – भक्ती. अगोदर निवेदन देणे, मग कार्यापूर्ती आणि नवस फेडणे. ‘एका हाताने दे, दुसऱ्या हाताने घे,’ या कलियुगातल्या उक्तितुन देव आणि अवतारी पुरुष पण सुटले नाहीत.

बाबांची अनन्य भक्ती करणारी रश्मीच्या परिचयातल्या व्यक्तीने सांगितलेली मन विषण्ण करणारी घाटना.

@@@@@@@@@@
गर्भ श्रीमंत स्त्री. दिसायला सौंदर्याची खाण, वागण अतिशय सालस, स्वभाव प्रेमळ, गरजवंताला मदतीसाठी धाऊन जाणारी अशी ही सर्व गुण संपन्न, अपल्या भरल्या कुटुंबात आनंदात राहणारी मध्यम वयाची स्त्री. गायन शिकण्यासाठी संगीत सराना आमंत्रण दिले. गायनातून बाबाना आळविता यावे या उद्देशाने गायन क्लास लावला. बाबांची निस्सीम भक्त आणि प्रसिद्ध स्नैक्सचे विक्रेते असलेल्या या भक्ताच्या सौभाग्याला दृष्ट लागली आणि लहान वयातच पतिला अर्धांग वायुने ग्रासले. मनात आर्त भाव घेऊन बाबांच्या दरबारात प्रश्न घेउन उभी. बाबा, माझ्याच बाबतीत का? बाबांची नजर आणि बोट आकाशाकडे…..
@@@@@@@@@@@@@@@@@@
घरात जेष्ट पुत्र म्हणून वाढलेला मुलगा. देखणा, आकर्षक व्यक्तिमत्व आणि चांगली नोकरी. बाबांचा निस्सीम भक्त. कृपेन सर्वकाही चांगले चालले होते. तशीच सुंदर अणि शिक्षित बायको आणि दोन गोंडस मुले. हम दो, हमारे दो, म्हणून नोकरीच्या ठिकाणी स्थिरावलेला पण घरची जबाबदारी समर्थपणे पेलणारा कर्तव्य दक्ष व्यक्ती. पती, पिता, पुत्र बिरुदवली मिरवणारा अlणि अचानक दुसरी स्त्री जीवनात येते आणि सार सुरळीत चाललेली घडी विस्कटून, नव्याने खेळ मांडला. एक दु:खी किनार संसाराला. “बाबा आम्हीच का?” बाबांच्या प्रतापा मूळे जन्मदात्रीच्या प्रेमाला मूकलेल्या मुलांचा, कारुण्यपुर्ण नजरेने बाबाना प्रश्न. बाबांची नजर अणि बोट आकाशाकडे …..

आकाशात पतितं तोय्ं….” 🙏🙏

आकाशात पतितं तोय्ं….” 🙏🙏 बाबत माहित असून सुद्धा का चूक झाली ❓️
जगभर बाबांचे भक्त विखुरलेले आहेत. मॅडमच्या घरी पण बाबांचीच भक्ती केली जाई. “आमच्या घरात, आम्ही सर्वजण बाबांचे अनन्य भक्त आहोत. मग मलाच का हे दु:ख ?” मैडमनी आपल्या अपंग अवयवा कडे पहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर कोणाकडेच नव्हते. विषण्ण मनाने जमिनिकड़े पाहत राहिली रश्मी. समोरच्या नजरेत नजर मिसळायची हिम्मतच नव्हती तिच्याकडे. न जाणे ती नजर वाचताच येणार नाही, सहनच होणार नाही. आर्त भक्तीचे भावही बाबा, मम नेत्री आले …

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥


गुरुवारची प्रसन्न सकाळ. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. सहाजिकच शाळेला सुट्टी होती. मॅडम आणि रश्मी लवकर उठुन शुचिर्भूत होऊन पुजेच्या तयारीला लागल्या. एकाच घरात स्वयंपाक घराच्या भिंतीला दत्तगरुंची सुंदर तसबिर होती. आणि बाहेरच्या खोलीत मॅडमनी बाबांची तसबिर मांडली होती. आणि त्या पण पुजा, ध्यान करत होत्या. दत्तगरुंची मनासारखी सुंदर पुजा झाली आणि रश्मीने निरान्जनाचे तबक उचलून आरती केली. अक्षता टाकुन तबक खाली ठेवले आणि रश्मी पद्मासनात बसली.

अनुलोम्, विलोम झाले आणि दिर्घ श्वास घेउन ओंकार उचार्ंण झाले. मिटलेल्या नेत्रा समोर आपल्या हृदयस्थ सिंहासनावर त्याच अद्भूत दत्त पादुकां वर लक्ष्य केंद्रीत केले. आणि मानस पुजा सुरु झाली. मनानेच, तुपाचे निरांजन प्रज्वलन करुन ठेवले. मनानेच पादुका प्रक्षालन झाले. पादुका कोरड्या करुन घेतल्या. चंदन लेपन, पुष्प, तुळसी अर्पण केले अणि सुन्दर पुजा झाली. आता निरांजन ओवाळायचे होते. रश्मी निरांजन हातात घेणार ईतक्यात, निरांजनातील प्रज्वलीत केलेली निळी ज्योत हवेत तरंगत, तरंगत हळू, हळू स्वैपाक घरातील देवपूजे पासुन बाहेरच्या खोलीकडे चालली. डोळे बंद असुन पण रश्मी नजर विस्फारुन पाहत रहिली. तिचा कशा वरच कण्ट्रोल नव्हता. फक्त पाहू शकत होती. पुजा सोडून निरांजनातली ज्योत हळू, हळू बाहेरच्या खोलीत गेली. जाई मॅडम ध्यानस्त बसल्या होत्या. समोर बाबांची तसबिर होती. बाबांच्या तसबिरीसमोर जाऊन निळी ज्योत स्थिरावली. तुपाच्या ज्योतीच्या मंद निळ्या प्रकाशात बाबा प्रसन्न पणे हसत होते. नेहमी आकाशा कडे असणारी बाबांची नजर आज समोर भक्तावर स्थिरावली होती. अणि नेहमी आकाशाकडे बोट दाखवणारा उजवा हात आशिर्वादचा प्रकाश पाझरत होता. बंद डोळ्यानी, भिंतीच्या पलीकडील ज्योत, ध्यनास्थ मॅडम, बाबांची तसबिर आणि त्या वरचे भाव सार काहीं रश्मी मन:चक्षूने पहात होती.

महाराज आणि बाबांनी वेगळ्या पद्दतीने रश्मीच्या
मनातील किल्मिष, भेदाभेद, अमंगळ विचार गाळून पाडले.

“मीच आहे दत्त महाराज अन मीच आहे बाबा, मीच आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक अन मीच सृष्टिचा कर्ता, सृष्टीचा धर्ता. आदी मीच अन अंत ही मीच,”
रश्मीने लावलेला दिप, दत्त गुरुंची तसबिर उजळवणार तसीच बाबांची पण तसबिर उजळवणार . रश्मीने दत्त महाराजांच्या तसबिरी वर वाहिलेले फुले बाबांच्या कानावर दिसतील .
“आकाशात पतीतं तोय्ं यथा गछ्ती सगर्ं, सर्व देव नमस्कार्ं केशव्ं प्रती गछती||” हे त्रीवार सत्यअसुन पून:प्रत्ययाने दाखवून दिले. त्या दिवसा पासुन दत्त गुरु आणि अष्ट लक्ष्मीच्या तसबिरी जवळ बाबांची तसबिर विराजमान झाली.
जुई
मॅडमच्या चेहर्यावर असणारे प्रसन्न भाव, त्याला कोणते बरे नाव…..?? रश्मी शोधत राहिली … या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची लीला अघाद…
भेदाभेद अमंगळ, इथेच सांडी तू सकळ || मी असे एक तत्व, चंद्र, रश्मी नाम अलग, नेत्र दोन्ही माझेची||
|| श्री गुरु अर्पण मस्तु
||
🌷🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-toमला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

Artwork by VRatwork
Website: https://bit.ly/3g7MgOC
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3

Spread the love

1 thought on ““तू सदा जवळी रहा…” भाग -40 अर्थात: आकाशात पतीतं तोय्ं…”

  1. Manali Manoj Patankar

    प्रत्येक कथेत काही तरी नाविन्यपूर्ण वाचायला मिळतं..
    खूप छान…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *