पुस्तकं वाचून, श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 1

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल“. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….

$$$$$$$$$$$$$$$$$
अशी कोणती “गोष्ट” आहे जीं, लहानांपासून मोठयां पर्यंत, चोरांपासून, थोरांपर्यंत सर्वाना आवडते? सर्वांचे लक्ष वेधून घेते, डोळ्यात चमक, मनगटात धमक आणि तना – मनात सणाणून उत्साह भरते. कष्टlने – मेहनतीने मिळते. चोरी – मारीने, लांडी – लबाडीने, खोटे – नाटे बोलून, डरवून – धमकावून मिळते. ज्याच्या हातात जाते, त्याची होते... आता पर्यंत लक्षात आलेचं असेल कदाचित सुजाण वाचकांच्या. मी कांही कोडं सोडवायला सांगत नाही. मात्र तुम्ही तर्क लढवू शकतात..
या अगोदर मी एक टिझर पोस्ट केले होते. त्याचे उत्तर मला मिळाले होते.
🤫🤫🤫🤫🤫

🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸
“जेव्हा बोलेल तेंव्हा बेडका सारखा र्रोक्कss र्रोक्कss करतं असतोय बघ तो.” या आई आणि ताई आजीच्या तोंडून बोललेल्या वाक्याचा अर्थ फारसा समजायचा नाही. (कन्नड मध्ये पैशाला र्रोक्कss म्हणतात ) पण “त्याचे” महत्व आपोआप अधोरेखित होत गेले. लहान असो किंवा मोठे, कमी – जास्त प्रमाणात सर्वचं आकर्षित होतात “त्या गोष्टी” कडे. “ती गोष्ट” म्हणजे सर्व कांही नाही पण बरेच कांही आहे. ते अन्न नव्हे पण अन्न मिळवून देणारे साधन नक्कीच आहे. “ती गोष्ट”, वस्त्र नव्हे, ना “ती गोष्ट” निवारा आहे, ना “ती चीज वस्तू” शिक्षण आहे. पण हे सारं मिळवण्यासाठीचे साधन मात्र होऊ शकते.
म्हणजेच सगळ्यात आहे पण कशातच नाही❓️असं तर म्हणायचं नाही ना…..
🍚🍚👕👖👕👖🏠🏠📃✒️📃✒️….

मध्यंतरी, एक जाहिरात चमकायची टी. व्ही. वर. बँकेच्या कॅश काउंटर वर चेहरा झाकलेल्या माणसाकडून एक चिट्ठी कॅशियरच्या हातात येते. “पैसा निकालो,” पैशासाठी हातात पिशवी पकडून, समोरून धमकी वजा; दटावणीचा सूर येतो. कॅशियर म्हणतो, “पीछे अकाउंट नंबर लिख दो.” बंदुकीतून सटा सट गोळ्या बाहेर पडतात आणि कॅशियर कडून समोरच्या पिशवीत नोटांचे बंडल्स भरले जातात. अलार्म वाजवून “सिक्युरिटीsss”, म्हणून बजरंगीला हाक दिली जाते आणि मास्क आड असलेल्या व्यक्तीचा, “जीं, मेम साब” म्हणून आवाज येतो. कुंपणच जेव्हा शेत खायचा प्रयत्न करते… तेंव्हा ❓️❓️❓️

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

शासकीय सेवेत वीस वर्षांपासून अधिकार पदावर काम करणाऱ्या रेखाला सातव्या वेतन आयोगा नुसार वेतन वाढ आणि थक बाकी मिळाली. मिळालेल्या ज्यादा रक्कमेस अनुसरून इन्कम टॅक्सच्या तीस टक्के स्लॅब मध्ये तिची कर कपात सुरु झाली. प्रचण्ड टॅक्स पाहिला आणि स्वतःचा असा वेगळा पुढील तीन महिन्याचा प्लॅन करून घरी सांगून टाकला. “मी; पुढच्या तीन महिन्या साठी सेकंड क्लासचा पास काढते. हॉटेलिंग आणि इतर सर्व खर्च बंद. तीन महिने सलग, माझ्या पगारातून टॅक्स कापला जाणार आहे. पगाराचे, इतकेच रुपये हातात येतील”, रेखाने घरात सांगून टाकले. तुम्ही हो, नाही काहीच बोलू शकतं नाही. तें शासन आदेश असतात. वर्षभर टॅक्स कापून घेतला जातोच. आणि उर्वरित सर्व टॅक्स डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मेहनतीने पगारातील पैसे टॅक्स रूपाने, हक्काने शासन कापून घेते.
🚌🚌🚌🚌🚌🚌

आता आपण दोघेही स्वतंत्र पणे व्यवस्थित कमावतो आहोत. त्यामुळे रेग्युलर खर्च तर स्वतः करूच पण ठराविक रक्कम भविष्यासाठी साठवणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना कधी इमर्जंसी मध्ये आर्थिक मदत लागली तर चार पैसे गाठीशी असावेत. या विचारांती रोहित- रिम्मी या जोडप्याने पगारातून टॅक्स कापून दिल्यानंतर काटकसरीने कांही रक्कम साठवली. त्याचं साठवलेल्या रक्कमेच्या एफ. डी. मधून जमा झालेल्या व्याजातून चांगली तीस टक्के रक्कम कापून, हातात उरलेल्या रक्कमेचा चेक मिळाला तेंव्हा रोहित रिम्मीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
😢😢😢 कर, कर, भर, भर, करभर 😥😥😥

“मुलीच्या लग्नात ऐनवेळी एकदम सोने घ्यायला कोठून पैसे आणणार?” प्रश्न पडला. सिया आणि राघव यांनी आपल्या अंकिता बेटीसाठी नियमित पणे काटकसर करून, रीतसर सोना भीशी लावून तोळा, तोळा सोन्याची वळी वॅट देऊन जमा केली. आता पोस्ट ग्रॅजुएशन नंतर जेव्हा लग्नाबद्दल बोलणी छेडली, तेंव्हा अंकिताने आपल्या दाक्षिणात्य बॉयफ्रेंड बद्धल सांगितले. दोन्ही कडचे पालक एकत्र बसून बोलणी करून लग्न पक्के केले. इतकी वर्षे जमा केलेली वळी नेहमीच्या सोनाराकडे दिली तेंव्हा, तूट काढली गेली. दागिन्यात रूपांतर केले तेंव्हा, परत टॅक्स द्यावा लागला. आणि या सर्व देवाण – घेवाणीत कित्तेक हजार रुपयाचे नुकसान झाले. त्यावर सोनार अप्पानी सांगितलेले गणित आणि हिशेब कांहीही 😇😇 समजण्या पलीकडे गेला होता. तूट आणि टॅक्स पाहून राघव सियाच्या डोळ्या समोर तारे चमकले.
🌟🌟🌟🌠🌟🌠🌠🌟🌠🌟🌟🌟

प्रायव्हेट कंपनीत गलेलठठ पगाराचे पॅकेज घेणारा
वरुण, त्याची बायको वरुणा आणि मुलगी करुणाचे 👨‍👨‍👧त्रिकोनी कुटुंबं.
मुक्काम पोस्ट डोंबिवली. सकाळ झाली. रामू उठला. कामाला लागला. रात्री उशीर पर्यंत खूप मेहनत केली. दमून घरी आला. झोपी गेला. साकाळ झाली. रामू उठला. कामाला लागला…..
“आई, आपल्या घरी आज कोणी पाहुणे आलेत का गं?” अंथरुणातून उठून ब्रश करण्यासाठी थेट बाथरूम मध्ये शिरणाऱ्या करुणा बेबीने जोरात ओरडून आई, वरुणाला प्रश्न विचारला.
“नाही तर, कोणी पाहुणे राउळे कोणी नाही आले. का गं करुणा बेबी ❓️ तुला असा प्रश्न का पडला?” करुणाचे केस सरळ करतं तिची आई वरुणाने प्रतिप्रश्न केला .
“मग, आपल्या बाथरूम मध्ये तो माणूस दाडी का करतोय? मला तयार होऊन म्युझिक क्लासला जायचे आहे.” करुणा बेबीला उठायला उशीर झाल्यामुळे पटापट आवरून निघायचा विचार करत असताना, नवीन माणूस पाहून आणखी गोंधळली. आणि क्लासला उशीर होतोय म्हणून रडकुंडीला आली.
“कार्टे, तें तुझे बाबा वरुण सावंत आहेत.” आई रागाने करुणा बेबीकडे पाहात बोलली पण पुढच्या क्षणी वरुणा आईचे डोळे भरून आले. करुणाचे वडील वरुण,
पहाटे लवकर उठून कामासाठी घर सोडून निघायचे आणि रात्री उशिरा घरी पोहोचायचे. बदलीमुळे नोकरीचा काही काळ दुसऱ्या राज्यात गेला होता. करुणाला पाहून; पितृ हृदयात कन्या करुणा बेबीच्या प्रेमाचे भरते आलेला
वरुण, मस्त गुळगुळीत दाडी करून बाहेर आला. “आज नो क्लास, नो ऑफिस. आज फक्त आपण तिघे एकत्र फिरणार. मजा करणार आणि बाहेरच जेवणार. खुश करुणाबेबी?” म्हणून पप्पी घ्यायला वाकलेल्या वरुणला बाबाला वळसा घालून, करुणा आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि दरवाजा जोरात बंद करून घेतला. वरुण आणि वरुणा एकमेकांकडे पाहात राहिले.

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

रोज घरातून ऑफिसला निघताना, हसत बाय बाय करणारा बाळ देवांग; आई दियाकडे आज वेगळाच हट्ट करत होता.
“आज तू ऑफिसला जाऊ नको ना मम्मीsss. प्लीज, आज माझ्या साठी घरी थांब ना. प्लीजsss, प्लीजsss, प्लीजsss.” बाहेर पडताना हातात घट्ट धरून ठेवलेली चुन्नी चिमुकल्या हातातून सोडवणं मनाला घायाळ करतं होते. हृदयातुन निघालेली सुक्ष्म कळ, हृदयातच दडपली दियाने. दुःखऱ्या मनाचे, चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि पाणावलेले डोळे दिसू नयेत म्हणून, बंद दरवाजा झटकन उघडुन बाहेर पडली. बाहेरून दरवाजा जोरात ओढून घेतला आणि क्षणभर दरवाज्या बाहेर थांबली.
देवांग बाळाला काल रात्री आलेला ताप सकाळी निवला होता. दिया पहाटे चार वाजेपर्यंत त्याच्या उशाशी बसून होती. देवांगचा ताप पूर्णपणे कमी झाल्याची खात्री झाल्यानंतर तिचा डोळा लागला. एक डुलकी घेऊन लगेचच दुसरे दिवशीची तयारी करू लागली. सर्व आवरून बाहेर पडायच्या वेळी देवांग डोळे चोळत बेडरूम मधून बाहेर आला. आणि आई दियाला घरी थांबण्याचा हट्ट करत होता
दिया, जसजशी जिन्याच्या पायऱ्या उतरत राहिली तस तसा, रडण्याचा आवाज कमीss, कमीsss होत; नाहीसा झाला. आता घर आणि जबाबदारी मागे राहिली होती. डोळ्या समोर कार्यालयातील कामाचा ढीग दिसत होता.
✒️✒️📒📃📙📓📄📜📒✒️✒️

सावीचा सहा आकडी पगार दिसत होता गिरीच्या घरच्यांना. तिने साठवलेले, सर्व पन्नास लाख रुपये नवीन घर घेणयासाठी दिले. “इतकेच पैसे” हा भाव 😏🤫 दिसत होता गिरी आणि घरच्यां लोकांच्या डोळ्यात. घर खरेदी झाली. नव्या घरात साजेसं फर्निचर आणि नवी गॅझेटस हवीत खर्चाची शेपूट वाढतच होती. घर, बिल आणि इतर खर्चावरून खटक्याचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. गिरीं आणि घरच्यांची अस्वलाची नखें बाहेर आली आणि घायाळ साविला घर सोडून बाहेर पडायला मजबूर करू लागले. “मोठ्या घराची हौस तुलाच होती ना?” हा; नव्या बेडवर लोळत पडून; मारलेला गिरीचा टोमणा मनाला लागून राहिला. घर व्यवहारासाठी चेक वर सहि घेताना लावलेली लाडीगोडी आणि आताच्या
आवाजातील बदल स्पष्ट जाणवत होता. सकाळ पासून किचन मध्ये उभी राहणारी गिरीजा दिवसभर नोकरी करून संध्याकाळी उशिरा घरी येऊन पुन्हा स्वयंपाकासाठी उभी राही.
सतत नव्या सोफ्यावर बसून, नवीन टी, व्ही.च्या रिमोटने सर्फिंग करणाऱ्या सासू, नणंदेचा निर्विकार चेहरा पाहून त्यांच्या निकम्मा पणाचा उबग येई. उच्च विद्या विभूषित सावी, गिरी आणि त्याच्या घरच्यां लोकांचे राजकारण समजण्यात कमी पडली. गिरीच्या,
विकृत आणि हावरट चेहऱ्यावर छद्मी हास्य दिसत होते.
🤢🤢🤢😏😏😏😎😎😎

“लीलाssss, माझ्या कपाटात ठेवलेले पैसे तू का घेतलेस¿¿”, जयचा आवाज टिपेला पोहोचला होता. जयची बायको, लीलाचा चेहरा खर्रकन उतरला. जय, आपल्या आई, बहिणी समोर आपली बायको, लिलावर चक्क चोरीचा आरोप करतं होता. हा आरोप दुसऱ्यांदा झाला होता. पहिल्यांदा हिऱ्याच्या बांगड्या कपाटातून गायब झाल्या वरुन जयची हात उगारण्यापर्यंत मजल गेली होती. आतां पण, लीला कळवळून सांगत होती, “जय, अरे मी, तुझ्या कपाटाला हातच लावला नाही”. आता पैशाच्या चोरीचा आरोप. जय, लीलांची बाजू ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. डॉक्टरांच्या साहाय्याने, सासरच्या सर्वांनी मिळून, लीला मानसिक आजारी असल्याचे पुरावे निर्माण करून, जाणून बुजून तिचे मानसिक आजारपण आपल्या पद्दतीने सिद्ध केले. जय 💔⚡️💔 लीलाच संसार तिथेच थांबला. प्रत्यक्षात बांगड्याही घरातच होत्या आणि पैसे पण मिळाले. आपली चांगली नोकरी सोडून संसारात रमू पाहणाऱ्या लीलांचे गणित कुठे चुकले❓️ ती पुन्हा सावरली का?
जय मात्र पुन्हा बोहल्यावर चढला आणि नवीन संसारात💏 रमाला.
1 + 1 = 2, + – + – +, 1 + 1 = 2, 1…..

म्हणजे नोकरी करणे वाईट आहे का ❓️❓️❓️
बिलकुल नाही.

सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे, सर्वां सारखे दुर्लक्ष करतो का ❓️आणि तसें असेल तर दुर्लक्ष होऊ नये यासाठी उपाय काय ❓️ ती सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती❓️ ती आहे “आर्थिक सक्षरता”.

आर्थिक साक्षरता केव्हापासून शिकायला पाहिजे ❓️ आज पासून आत्तापासूनच शिकायला हवी. त्या करता काय करायला हवे ❓️

Rich Dad Poor Dad हे पुस्तक वाचायला हवे.
नियोजनाचा आभाव, मिळकती पेक्षा खर्च जास्त, अनावश्यक गोष्टीची खरेदी, दिखावा आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला पैशाची तंगी निर्माण करतात. माणसाचा स्वभाव आणि तो ज्या वातावरण आणि संस्कारातून येतो त्याचा सुब्बतेवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक साक्षरतेचा आभाव आणि अज्ञान, खर्चावर स्वतःचा कंट्रोल नसणे या गोष्टी आपला भविष्य काळ अस्थिर करू शकतात.

लहान पणी आई, मस्करीत म्हणायची, “तू राणी, मी राणी, पाणी कोण आणि❓️” सगळेच हुकूम सोडायला लागले तर काम करायला कोण ❓️

कष्ट कोणाला सुटलेत? कष्ट केल्याशिवाय काय मिळणार का ? कष्टlला पर्याय आहे का ❓️ या सर्व प्रश्नाला एकच उत्तर – नाय, no, never. मग् काय केलं तर आपल्याला आर्थिक सुबत्ता आणता येईल ❓️ काय केलं पाहिजे? नोकरी आणि business चा सुवर्णा मध्य कसा साधायचा ❓️
याची उत्तरे शोधायचा प्रयत्न्य करायला हवा. एवढे कष्ट करून पण

पैसे अपुरे का पडतात ❓️ वेळ आणि पैशाचा मेळ कसा घालावा ❓️ यांचा उत्तम मार्ग आणि मार्गदर्शन कोण करणार ❓️ कांही पर्याय आहे का ❓️ होय, त्यासाठी वाचा 👇

Rich Dad Poor Dad हे पुस्तक


स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थिती, प्रसंग पूर्णपणे वेगळी असूनसुद्धा आहे त्या परिस्थितीतुन उत्तम उपाय कसा शोधायचा ❓️ याचा विचार करायला अगदी सहजतेनं प्रवृत्त करते. आपल्या समस्येत उपाय असतात. आपल्या जवळपास उपाय असतात. फक्त डोळे उघडे ठेऊन पाहायला हवे. चर्चा करायला हवी. प्रश्न विचारायला हवेत. स्वप्नं पाहायला हवीत. योजना आखायला हव्यात. योजना अंमलात आणायला हव्यात. मेहनतीला पर्याय नाही. पाट्या टाकणाऱ्याचे इथे काम नाही. “दिन जाने दो, पगार आने दो |” यांचे पण काम नाही. कामावर उशिरा जाणे, घरी लवकर परतणे, चहा साठी वेळ काढून चकाट्या पिटत बसणे. लंच टाइम् म्हणजे जेवणाचा सोहळा करणे आणि दिवस भरणे हे पण अपेक्षित नाही.

आपल्या कडे स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थिती, प्रसंग, वातावरण आणि गरजा पूर्णपणे वेगळ्या आहेत. आपण या पुस्तकाचा त्यातील विचाराचा, आणि उपायांचा अगदी हुबेहूब उपयोग करू शकू असेच कांही नाही; पण तत्त्वता काय सांगितलंय हे समजून घेणे गरजेचे आहे.
ढोबळ आणि चुकीच्या समजुतींचा पगडा इतका जबरदस्त असतो की डोळ्यावर बांधलेली झापड जाणून बुजून आणखी घट्ट केली जाते असे आपल्या मनात येते. पण पुस्तकं पूर्ण वाचावे, समजून घ्यावे, मतितार्थ लक्षात घ्यावेत. कोणत्याही गोष्टी साठी शिक्षण आणि अभ्यास महत्वाचे आहे हे लक्षात ठेवावे. सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे सर्वां सारखे दुर्लक्ष करतो का ❓️

कधीतरी, कोणीतरी भेटतात आणि अशाच कांही पुस्तकांचा संदर्भ देतात ज्यामुळे पूर्व ग्रह गळून पडतात आणि नव्या विचारांचे अंकुर फुटतात. विचार मंथन करा कळत पणे मनातच नव्या आणि जुन्या विचारांच्या चर्चा, वाद विवाद होतात. आणि जुन्यातील कांही चांगल्या गोष्टींचा नव्या चांगल्या गोष्टींशी मेळ बसवून आपला असा एक स्वतंत्र रस्ता तयार होतो. त्याला जोड असते लोकल राहणी आणि ग्लोबल विचारसरणीची यांचा एकत्र मेळ घालून ग्लोकल (ग्लोबल +लोकल) तसच काहीसे इथेही घडले. “नो एज बार फॉर हॅविंग एड्यूकेशन” अंतर्गत Rich Dad Poor Dad हे पुस्तकं मी पण मागविले.

(सोबत दिलेल्र क्लिक केल्यास आपल्याला पुस्तकं मागावीता येईल. )

का य आहे ❓️रिच डॅड पुअर डॅड

कोणत्याही वयात मतं बदलण्याची ताकत कांही पुस्तकात असते. त्यातले एक पुस्तकं म्हणजे रॉबर्ट क्यूयोसाकी यांचे, “रिच डॅड पुअर डॅड”.

रिच डॅड पुअर डॅड एक पुस्तकं असून कोणत्याही वयाच्या व्यक्तीने वाचावे असे मी सुचवेन. लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सुरवाती पासूनच त्याच्या दोन डॅड बद्धल म्हणजेच एकाच समजा मध्ये राहणारे दोन विचार, दोन प्रवृत्ती प्रतीकात्मक रूपात चितारल्या आहेत. त्यातून चाललेले विचार मंथन आणि लहानपणी प्रयोगात्मक मानसिकतेतु शिकत आणि चुकत आणि चुकांमधून शिकत कुठवर मजल मारली हे अत्यंत तरलपणे व्यक्त केले आहे.
आणि निष्कर्ष
जसे वाचनाला वयाची मर्यादा नाही तसेच कांही नवीन शिकायला सुद्धा वयाची मर्यादा नाही. रोजच्या जेवणाला जशी नाविन्याची फोडणी दिली तर जेवण रुचकर लागते तसें रोजच्या जीवनात कोणत्याही प्रकारे नवीनतेचा ध्यास घेतला तर जीवन डबक्या सारखे राहणार नाही.
पुस्तकं हातात घेतले की श्रीमंत आणि माध्यम वर्गीय पालक यांच्यात नेमका भेद आणि मर्यादा यांचा तुलनात्मक अभ्यास सुरु होतो. पुस्तका बद्धल कांही कीर्तिवंत आणि अभ्यासू, तज्ज्ञ आणि विचारवंतांचे अभिप्राय खचितच आपल्याला मार्गदर्शन करतात. हे पुस्तक मुलांनी वाचावे, पालकांनी वाचावे, मुख्याध्यापकांनी वाचावे शिक्षकांनी वाचावे. किंबहुना सर्वांनी वाचावे. आताच्या काळात अमर्याद लोकसंख्या आणि मर्यादित नोकऱ्यांची संधी दिसून येते. कौश्यल्याचा आभाव आणि प्रचण्ड स्पर्धा यामुळे शिकून फक्त नोकरीवर अवलंबून न राहता आपला दृष्टीकोन विशाल करण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळते. सेफ साईड म्हणून जॉबला पण प्राधान्य दिले आहेच. लेखकाने जॉब मध्ये खूप वर्षे न घालवता काहीच वर्षे काम केले. नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला. उच्चं शिक्षण घेऊन जॉब केला. काहीतरी नवीन आणि भविष्य काळात उपयोगी पडेल अशा गोष्टी शिकण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कमी पगाराची नोकरी स्वीकारली. शिक्षण, अनुभव, भटकंती, चर्चा, उत्तम मैत्री आणि उत्कृष्ट नियोजनातून नेमकं काय सद्य केले आणि कसे केले याचा उहापोह केला आहे. व्यवस्थित नियोजन करून आपण आपली परिस्थिती कशी बदलू शकतो याचा विचार करायला पुस्तकं, वाचकाला प्रवृत्त करते.
श्रीमंताची व्याख्या करताना श्रीमंत आणि श्रीमंती विचार पण गृहीत धरले आहेत. तसेच उद्योगपती बाबत बोलताना उद्योग आणि उद्योगी विचार ही बाब गृहीत धरली आहे.

पुढील भागात वाचा
मोठे व्यापारी असलेल्या, देसाई कुटुंबियांच्या घरातून
हल्ली पोळी भाजीच्या डब्ब्यांची डिलिवरी का होते❓️

इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळेतून महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शाळेत आपल्या दोन्ही मुलांना श्रीयुत पाटकर या उद्योगपतीने का ट्रान्सफर केले❓️

प्रचंढ फी भरून इतर मंडळाच्या, सेल्फ फायनान्स शाळांमधील पालक मध्येच दाखला घेऊन शिक्षण विभागात काउंटर साईन साठी का येतात❓️

“हाय शिरीन आज तू पैदल स्कुल क्यूँ जा रही हैं ❓️” हर रोज मर्सिडीझ बेंझ🚘 गाडी मे स्कुल मे आनेवाले राजने ऑडी🚗 मे स्कुल आनेवाली शिरीन को सवाल पूछा.
शिरीन ने राज को सेम सवाल पुच्छ
तो शिरीन और राज की मम्मा की नजरे क्यूँ झुक 😞 गयी❓️
हे आणि असेच कांही प्रश्न घेऊन
पुढील भागात येत आहे. तसेच पुस्तकातील प्रकरणावर प्रत्यक्ष भाष्य करणार आहोत. लवकरच भेटीस येत आहे जबरदस्त प्रभावी पुस्तकाचा आपल्यासाठी नेमका कसा उपयोग होतो तें पाहू… 🙏
http://www.ranjanarao.com या site वर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

Artwork by VRatwork

Spread the love

3 thoughts on “पुस्तकं वाचून, श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 1”

 1. पुस्तक परिक्षण मध्ये पदार्पणा बद्दल हार्दिक अभिनंदन!
  खूप सुंदर शब्द बांधणी .
  पुस्तकातील विचारांच्या मतीतारथाची सुंदर ओळख करून दिलीत.
  शब्द न शब्द मनापासुन वाचल्याचे जाणवते.

 2. नमस्कार मॅडम.
  मी आत्ताच तुमचं ‘रिच डॅड पुअर डॅड’ ह्या पुस्तकंबद्दलच विचार मंथन वाचलं.
  मी ते पुस्तक वाचलंय. पुस्तकाबद्दल न लिहिता तुमचं लेखन वाचून मला काय वाटलं ते लिहीत आहे.
  रॉबर्ट कियोसकी ह्या लेखकाला त्याच्या पुस्तकबद्दल एवढं विस्तृत लिहिलं जात असेल ह्याची कल्पना तरी असेल का?
  त्याना तुम्ही ई-मेल कराल का? माझी request म्हणून.
  खूप छान पद्धतीचा अभिप्राय वाच्यायला त्यांना सुध्दा आवडेल.
  पुस्तक आवडलं, छान आहे हे जनरल अभिप्राय आहेत.
  तुम्ही लिहिलेलं जसंच्या तस मेल कराल का? Please do not edit.

  1. नमस्कार मनीषा मॅडम. इतर ब्लॉग वाचकांप्रमाणे आपण स्वतः प्रगल्भ बुद्धीच्या व्यक्ती आहात. वाचून उत्स्फूर्त पणे नेमक्या शब्दात दिलेले अभिप्राय आणि प्रेरणा सल्ला शिरोधार्य. अशाच वाचत रहा. अभिप्राय आणि प्रेरणा देत रहा. धन्यवाद 🌹😊🙏.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *