चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्या
करडी🦅 चिऊताई  आली,
दोनचं दाणे चोचित पकडून
भुर्रकन उडून गेली.

गंमत मी पाहात होते
दारात शांत बसून
करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆
गालातल्या गालात 😊 हसून.

पुन्हा येणं, दाणे वेचणं,
भुर्रकन🦅 उडून जाणे, 
मनात माझ्या चिऊ विषयी
दया उपजली, का कोण जाणे ❓️

मी म्हंटल चिऊताईला,

थांब,  जरा  श्वास घे,
शांत जरा रहा.
पाणी ठेवलंय वाटीमध्ये
तहान🥛 भागवून पहा.

चिऊताई  लहानच आहेस 
मेहनत किती करतेस ❓️
दोनचं दाणे घेऊन चोचित 
फेऱ्या किती मारतेस ❓️

नाही गं ताई, थांबेन कशी ¿
वेळच नाही माझ्या पाशी
तहान, भूक पोटात घेऊन
लेकरं माझी उपाशी.

न्यायला हवा खाऊ🍚, पाणी 🥛
 माझ्या बाळांसाठी
जन्माला येणारा प्रत्येकजण
पोट आणतो पाठी.

बाळं माझी खूपच लहान
बळ हवे पंखात🦅
थोडी मोठी होऊ देत
घेतील भरारी गगनात🌈.

ऊन, पाऊस⛈️, थंडी वारा,
नाही करत बहाणे
मेहनत करतेय, बाळांसाठी
आईच, आईला जाणे.

मी म्हंटल चिऊताईला,

 चिऊताई तुझ्या घरट्यात
भरपूर धान्य🍚 ठेवते,
माझ्याच्यानं जमेल तेवढी
मेहनत कमी करवते.

चिऊताई बोलली,

तुझे विचार खूपच छान,
पण शोभतात फक्त माणसाला
गरजेपेक्षा जास्त मिळवून
अपंग बनवी पिढ्याना.

मी बोलले चिऊतल्या आईला

तुझे विचार चिऊताई
किती किती छान,
पिढ्यानं पिढ्या मेहनतिने
स्वतःचं करता पोषण.

प्रत्येक पिल्लू घेई भरारी
बळ मिळता पंखात
म्हणू म्हणते धन्यचा
संग्रह नको घरात.

काष्टाचे महत्व अन् किंमत
माझ्या बाळांना काळू दे,
संग्रहाचे लालच मुळी
दूर, दूर पळू दे.

सोस भारी, हव्यास अती,
नंतर लावेल संकटे पाठी,
अरेरे❗️हे नोको होते करायला,
म्हणून, नंतर खूप होशील कष्टी.

बोलता बोलता चिऊतली आई
मोठे तत्व सांगुन जाई,
कोण म्हणते चिऊना, लहान आहेत ❓️
चिऊ आईचे विचार मात्र महानच आहेत.

Ranjanarao. Com या साईट वर क्लिक करून खलाली link वर क्लिक करा 👇

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

Spread the love

25 thoughts on “चिऊ आई🐤🐤”

   1. नमस्कार  रश्मी madam. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद madam 🌹🙏

 1. कविता साधीच पण बोध खूप मोठा . हावरट माणसाला खूप काही सांगून जाते.जगायचं कसं कशासाठी जगायचं नवीन पिढीला मूल्यशिक्षण देण्यासाठी चांगली पाठ्यपुस्तकात अशाच कवितेची गरज आहे.
  खूपच छान.

  1. संगम सर नमस्कार 🙏 🌺 चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय दर्जेदार समाज उपयोगी साहित्य निर्मितीस उत्स्फूर्तपणे प्रेरणा देतील. 🙏 धन्यवाद सर 🌺

  2. NANDA Kulkarnli/Malbhage

   किती छान आहे कविता ! जगातल्या प्रत्येक आईला आपल्या बाळाला किती protect करायचे हे चिऊआईकडून शिकावे

   1. Nanda madam नमस्कार 🙏. चिऊ आई कविता वाचून कवितेमधील आपल्याला आवडलेला आशय आणि त्यावरील अभिप्रायासाठी धन्यवाद 💐🌹🙏

 2. हेमलता

  चिऊ आई कविता छानच रचनात्मक केली आहे . Excellent mam

  1. धन्यवाद हेमलता मॅडम. 🙏🌺🌹 कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मला नवसाहित्य निर्मितीला प्रेरणा देतील. 🙏

 3. Tribhuvan S.V.

  खुप छान कविता ,वाचतानां वाटत होते मीच चिऊताईशी बोलते …अप्रतिम, सहज आणि सुंदर काव्यरचना…..

  1. नमस्कार 🙏 संघमित्रा madam. आपल्या अभिप्रायमध्ये काव्य वाचताना तादात्म्य भाव दिसुन आला. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद madam 🙏🌹 🌺

  2. नमस्कार  संघमित्रा madam. आपल्या अभिप्रायमध्ये काव्य वाचताना तादात्म्य भाव दिसुन आला. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद madam 🌹🙏🌹

 4. DR Laxman Landge

  अप्रतिम राव मडम,
  तुम्ही असच लिहीत रहा. 💐👏👌👍🙏

  1. नमस्कार 🙏 संघमित्रा madam. आपल्या अभिप्रायमध्ये काव्य वाचताना तादात्म्य भाव दिसुन आला. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद madam 🙏🌹 🌺

  2. नमस्कार  लक्ष्मण सर. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. धन्यवाद sir 

  3. नमस्कार  लक्ष्मण सर. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. धन्यवाद sir 🙏🌺

 5. नमस्कार 🙏 लक्ष्मण सर. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. धन्यवाद sir 🌺

 6. नमस्कार 🙏 संघमित्रा madam. आपल्या अभिप्रायमध्ये काव्य वाचताना तादात्म्य भाव दिसुन आला. चिऊ आई कविता वाचून आपण दिलेले अभिप्राय मनात उत्साह निर्माण करतात आणि नावं निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद madam 🙏🌹 🌺

 7. सहज साध्या शब्दांतून लय पकडते कविता.
  अर्थात उत्तम आशय घेऊन

  1. हॅलो नामदेव सर 🙏 आपण चिऊ आई कविता वाचून मोजक्य आणि आशयघन शब्दात दिलेले अभिप्राय दर्जेदार साहित्य निर्मितीला प्रेरणादायी आहेत. पुनःश्च धन्यवाद.💐🙏

  1. “पुरे झाला भास ! आभास !” your comments cum opinion on the above poem are approved . Thnaks for the comments, Niranjan Giri sir.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *