पुरे झाला भास ! आभास !हॅल्लो गार्गी, हॅल्लो कश्यपी, हॅल्लोsss गुड्डी,
मैदानात खेळ खेळु खो – खो अन् कब्बड्डी,
शरीर अन् श्वासाला करूया जरा मजबूत,
मस्तीला वाट मोकळी, करू जरा शरारत.

संपला तुझा क्लास तरी मोबाईल का हातात ❓️
रूम मधून बाहेर येऊन आईला कर मदत.
टॅब, कॉम्पुटर, मोबाईलचा अती वापर घातक
लहान डोळ्यांना जाड भिंग मुळीचं नाही शोभत.

वेगवेगळ्या ऍप्सना तू भाव नको देऊ,
आभासी या खेळाना तू शरण नको जाऊ,
भास आभास सोडून तू खऱ्या जगात ये,
बैठ्या अन मैदानी खेळांची मजा तू घे.

ऐकेल माझे नेहमी सारखं बाळ माझा शहाणा,
जागा नाही, मैदान नाही पुरे झाला बहाणा,
घर, सोसायटीच्या आवाराचे मैदान तू बनव
मज्जा येईल खेळात अन पळून जाईल तणाव.

चला तर, काढा खेळणी, मोबाईलला विश्रांती,
भास, आभासी खेळांची करू आता गछन्ती,
इन्स्टा, ट्विट, फेस बुक अन् नको ते वॉट्सअप,
डोळ्यांचा अतिवापर अन् वाढे चष्म्याचा नंबर.

चेस, कॅरम, व्यापार, कवडया, सागरगोटे खेळू,
चोर-पोलीस, साप-शिडी, पत्त्या कडे वळू,
शिवबाची टोपी, आईच पत्र, संगीत खुर्ची साधी,
जुन्या, नव्या बैठ्या खेळांची भलिमोठी यादी.

टप्पा क्रिकेट, साखळी अन लेझीम पण खेळु
घाम येईल, श्रम होतील, थोडे धावू अन् पळू
नमस्कार सूर्याला अन् योगाभ्यास आचरू
दप्तर घेऊ, घाई करू शाळा झाल्या सुरु.

भरेल वर्ग, बोलू लागेल खडू अन्, फळा,
नव्यानेच फुलू लागेल मैत्रीचाही मळा,
नवे वर्ष, नवी पुस्तके, नवा अध्याय सुरु,
अभ्यास आणि बैठे अन् मैदानी खेळ झाले सुरु
.

🧦👕👖🎒🖊️🖋️✒️📋👣👣

💃💃💃💃💃

माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

Spread the love

5 thoughts on “पुरे झाला भास ! आभास !”

  1. एकदम भारी. पण माझ्याशी खेळायला कोणी नाही. सगळे गावाला गेलेत आणि आई सुद्धा नाही खेळत माझ्या सोबत.😕

    1. Dear Gargi
      after reading “पुरे झाला भास ! आभास !” you have shared your opinion. thanks for the same dear. Wait and watch first you have to take vaccine and let change this pendamic situation every thing will be fine.You can use your time to read good books .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *