” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्ट लक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष गुरुवार : तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितम् तोय्ंम्…” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळं मिळालं❗️शुभाने कोंडी फोडली❗️करणं मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बाल दिन ❗️
भाग – 46* ‘… मुखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महा गणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट,

नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️

निर्मल सईकडे पहात, रश्मीला म्हणाली, “चल ना गं रश्मी, आपण अक्षय कुमारचा सौगंध बघायला जाऊ”. बऱ्याच दिवसांनी भेटलेली निर्मल आग्रहाने बोलली. समोरून आलेल्या नेत्रा आणि लता हसतच😀😀 हातावर टाळी देत बोलल्या, “हॅल्लोsss रश्मी, केव्हां आलीस तू ❓️ कशी आहेस ❓️ भेटायला घरी का आली नाहीस❓️ बहुतेक आम्हाला विसरलीस वाटतं… 😴” शेवटच्या वाक्याला चेहरा पाडून रडण्याचा नाटकीपणा करत नेत्रा आणि लता एकाचं वेळी बोलल्या. “ऐया ❗️ दोघी एकाच वेळी सेम सेन्टेन्स बोललो आपण ❗️ ऐया, आत्तापण सेम. आज गोड 😋😋 खायला मिळणाsssर ‼️

“अरे वा ‼️ असं असेल तर घरी चला. आज आईने गोड शिरा बनवलाय नाश्त्यासाठी. जेवणात श्रीखंड आहे❗️” सई; निर्मल, लता आणि नेत्राला बोलली.
“वा ❗️छान.” पण आज नाही. नेक्स्ट टाइमला नक्की येऊ. विनिता काकिना विचारलंय म्हणून सांग.” ललिता हसतं उतरली.

“हं, आता बोल का नाही आलीस❓️” ललिताचा पुन्हा तोच प्रश्न आला. एक दीर्घ श्वास घेऊन रश्मीने हाताचा पंजा तोंडासमोर हलवत थांब थोडं, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील असा अविर्भाव चेहऱ्यावर आणला.
“चला नं, आपण गार्डन मध्ये बसू थोडावेळ,” निर्मल जवळच्या गार्डन कडे बोटं 👉 दाखवत सर्वाना उद्धेशून बोलली.
तशा सगळ्याजणीनी गार्डनमधील दाट सावली देणारे झाड पाहून बैठक मारली. गप्पा गोष्टीत बराच वेळ गेला होता. सगळ्याजणी कुठे ना कुठे कामात व्यस्त होत्या.
पण लता, तिचं काय…. ❓️❓️❓️ असलेली चांगली नोकरी सोडून बसली होती. एके ठिकाणी झालेले सिलेक्शन उदात्त कारणाने न बोलताच सोडून निघून गेली. लताचं मोठं मनं पाहून रश्मीला तिचं कौतुक करावं की, कींव करावी हेच समजत नव्हतं. “आत्मा राखून धर्म करावा❗️” म्हणतात.
पण मग ही अशी कशी ❓️ कोणत्या मातीची बनलीय लता❓️ आणि हिचं पुढे काय होणार …. ❓️ रश्मी खंतावली. प्रश्न तसेच राहिले. लता, गांव सोडून दूर जायला धजावत नव्हती. शेवटी तिचा निर्णय म्हणून सोडून दिले. पण… आपल्या जिवलग मैत्रिणीसाठी आपण काही करू शकतं नसल्याची बोच् , रश्मीच्या मनात तशीच राहिली.

सौगंध: रश्मीला चक्कर …?

तीनच्या शो ला गीतांजली मूव्ही थेटरला भेटायचं ठरवून सर्व जणीनी गार्डन मधून निघायाचे ठरविले आणि बाय बाय करून परतल्या देखील. पुन्हा एकत्र भेटण्याचा, एकत्र वेळ घालवण्याचा मुव्ही हा बहाणा होता.
अक्षयकुमारचा सौगंध पाहून झाला तरी रेंगाळत गप्पा चालू होत्या. जसा चौक आला तशा साऱ्याजणीच्या वाटा वेगळ्या झाल्या. प्रत्येकीने आपला रस्ता पकडला. चौका मधून सरळ पुढे जात, मुख्य रस्ता सोडून सई आणि रश्मी झपाझप पाऊले टाकत घरी निघाल्या होत्या. अचानक रश्मीची चाल मंदावली आणि डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागलं. एका क्षणी डोळ्यासमोर संपूर्ण अंधार पसरला सभोंवताल गोल फ़िरतयं 😇😇 असं वाटलं आणि शक्तिहीन शरीर उभं राहायला साथ देईना. प्रसंगावधान राखून सईने रश्मीला हात देऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या घराच्या पायरीवर बसवलं. “असं का वाटतंय आपल्याला ❓️ सई इतकी दूर का उभी आहे ❓️जवळ असूनही कसा दुरावा ❓️❓️”: जवळच उभी असलेली सई, खूप दुरून हाक मरत असल्याचं जाणवत होतं रश्मीला. सईला प्रतिसाद देण्यासाठी रश्मीच्या अंगात शक्तीच नव्हती. रश्मीचा आवाज एकदम क्षीण झाला होता. बंद डोळ्यातून सतत गरम अश्रू 😭😭 गालावरून
ओघळत होते आणि समोर सारं गोल गोल फ़िरत असल्याचे जाणवत होते.
रश्मी अक्का आणि आजार ¡¿, रश्मी अक्का आणि दुबळेपणा ¡¿, रश्मी अक्का आणि अशक्तपणा ¿¡ रश्मी अक्का आणि अश्रू ¡¿, कसं श्यक्य आहे ❓️ समीकरण कांही समजेना. काहीतरी वेगळं आणि अप्रिय वाटतंय. सईच्या डोक्यात विचार चमकून गेला. पण नेमकं काय होतय अक्काला❓️ सईचा चेहरा चिंतेन 😌 काळवंडला. अक्षय कुमारचे स्टंट्स, नम्रता – अक्षय जोडीची शरारत, राखीचा कणखर आईचा रोल; नवा पिक्चर पहिल्याचा आनंद 😊 कुठल्या कुठे मावळाला होता. सईने, हळुवारपणे रश्मीच्या चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. शिंपडलेल्या पाण्यामुळे का होईना, रश्मीने महत् प्रयासने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि सईचा जीव भांडयात पडला. हुशsss वाटलं सईला. पाच – सात मिनिटात बऱ्यापैकी हुशारी वाटली रश्मीला. पुढच्या दहा मिनिटात दोघी घरी पोहोचल्या.

“आई, आक्काला चक्कर आली होती आणि तीच्या डोळ्यातून पाणी वहात होते ” सईन घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या विनिता आईला सांगितलं. विनिताचा चेहरा एकदम उतरला. रश्मीच्या डोळ्यातून पाणी वाहण, चक्कर हे शब्द विनिताच्या काळजाचं पाणी, पाणी करत होते.
“आई, सई ; मी थोडावेळ आराम करते,” म्हणून रश्मी डोळेमिटून बेडवर पाडून राहिली. सई आणि विनिता जवळच बसून होत्या. झोपेत रश्मीचा चेहरा आनंदाने चमकत होता आणि अचानक चेहऱ्यावर वेगळे भाव दिसले. कोणीतरी आवडतं खेळणं हिसाकावून घेतल्यानंतर लहान बाळाचा चेहरा असतो तसा. “झोपेत, रश्मी अक्काला स्वप्न पडतय वाटतं…. ‼️” सई, विनिता आईकडे पाहात बोलली. तोंडावर बोटं ठेऊन आवाज न कारण्याविषयीं सईला सांगून विनिता रश्मीच्या केसातून आशीर्वादाचा प्रेमळ हात फिरवत राहिली.
असंख्य विचारांची गर्दी; रश्मी, सईच्या भविष्याची चिंता आई विनिताला पुनःश्च स्पर्शून गेली. बालपणापासून रश्मीवर आलेली संकटं, धैर्यानं त्यावर मात करून उजळून निघालेली रश्मी विनितानं पहिली होती.
आज रश्मीच्या डोळ्यात पाणी का ❓️प्रश्न डोकावतं अन टोकत राहिला विनिताला. संकट आले तरी रश्मीच्या संयमी आणि शांत स्वभावामुळे ती संकटाचा मुकाबला करून अर्धी लढाई जिकंत असे. आपल्या रश्मीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या व्यक्तीचं पुढे काय होते हे आपण पाहिलंय.
रश्मीच्या वाटेला जाऊन कोणी तिला दिलेल्या वेदनां आणि त्रास सहन करताना पहिले कीं, आई म्हणून विनिताची घालमेल होत असे. सई; रश्मीच्या चेहऱ्याकडे पहात विचार करत होती.

विनिता आईची झालेली घालमेल रश्मीला पाहवत नसे. आणि म्हणूनच आताशा रश्मी आपल्या आईशी स्पष्ट बोलत नव्हती. रश्मीला वाटतं, ‘आईला त्रास होईल, अशा कोणत्याही गोष्टी तिला सांगू नयेत’.

“पण विनिता म्हणतात मला. तुझा पेक्षा बरेच जास्त पावसाळे पाहिलेत मी. विनिता स्वतःच स्वतःशी बोलत होती.
“कळत असु दे किंवा नं कळत, माझ्या रश्मीच्या डोळ्यात दुःखा मूळे पाणी आणणाऱ्या लोकांची खैर नसते हे सत्य आहे. करणं नसताना शारीरिक, मानसिक त्रास देणाऱ्याचा अंत दुःखद असतो.” हे जळजळीत सत्य असलं तरी,
सरळ वाटेनं जाणाऱ्या माझ्या मुलींच्या वाट्याला त्रास का ❓️ सलणारा प्रश्न आणि साऱ्याच गोष्टी विनिताने त्या जगनियंत्यावर सोपविल्या. अवधूत चिंतन 🕉️ श्री गुरुदेव दत्त 🙏 म्हणून हात जोडले. रक्ष रक्ष परमेश्वर:🙏 म्हणून
विनिता, झोपलेल्या रश्मीच्या केसातून हात फिरवत राहिली.

चांदीच ताट ‼️

ताट म्हणजे जेवण. ताट म्हणजे अन्न. अन्न ही गरज सर्व प्राणी मात्रांची, वनस्पतीची. एखाद्याच्या हृदयात जाण्याचा मार्ग ताटातून जातो म्हणतात. ताट म्हंटले की क्षुधा शांतीचे प्रतीक. जेवण हे जिवंत ठेवण्याचे साधनं.
हे ताट रश्मीच्या स्वप्नात का आलं ❓️ हसली, अस्वस्थ झाली, मुसमूसली, रडली आणि शेवटचे क्षण. पुढे….

रश्मीच्या स्वप्नात ताट… ❓️

जुनं, नको असलेलं साहित्य ठेवलेली जागा. स्वप्नात सुद्धा रश्मीला ती जागा अपरिचित वाटली. आडगळीच्या जागेत परसात नको असलेलं बरच सामान होतं. एका जुनाट, लाकडी टेबलवर ओंगळवाणं ताट, वाटी, तांब्या आणि फुलपात्र अस्ताव्यस्त पसरलेलं दिसलं. ते ताट, रश्मीने हातात घेऊन न्याहाळलं. इथं कशाला ठेवलयं हे सर्व ❓️
“इतकं वाईट आणि टाकाऊ नाहीय हे ताट, वाटी तांब्या आणि फुलपात्र❗️,” रश्मी स्वतःशीच पुटपुटली. दुसऱ्या क्षणी ताटावरून हात फिरवला. क्षणभर, ताट आपल्याकडे पाहून हसतयं असं वाटलं रश्मिला. धूळ आणि मातीची पूटं बसून ते एकदम अस्वछ दिसतं होतं. रश्मीने पहिल्यादा पाण्याखाली धरून धूळ धुवून काढली आणि सर्व चारही भांडी घासून चकचकीत केली. आता आश्चर्य चकित व्हायची वेळ रश्मीवर आली. ते चांदीचं ताट पाहून डोळे दिपले.
😊😊😊

मोह

रश्मीने आज जेवणात पंच पक्वान्न बनवली. चांदीच्या पेल्यात काजू, बदाम, पिस्ता आणि केशर घालून मस्त मसाला दूध बनवलं. बसायला चंदनाचा पाट घेतला. ताटाभोवती सुंदर रांगोळी काढून रंग भरले. बाजूला अगरबत्ती लावली. अगरबातीच्या काडीतून निघणारी धूम्र वलये वातावरण सुगंधित करत होती. बाजूलाचं टीपॉय वर ठेवलेल्या टेप रेकॉर्डर मधून सनईच्या कर्णमधुर सूरांमुळे, सुंदर वातावरण प्रफुल्लित आणि प्रसन्न वाटत होते.

रश्मीने चांदीच्या ताटात एक, एक पदार्थ वाढायला सुरुवात केली. मिठाच्या उजव्या बाजूला लिंबू कोशिंबीर वाढली आणि वाटीत बासुंदी घेतली. बेसन लाडू, श्रीखंड, जिलेबी, सुधारस घेतला. बासमतीच्या तांदळाच्या फुललेल्या लांब सडक फुललेल्या भात शिताच्या मुदीवर
वरण आणि तूप वाढले. डोळे मिटून प्रार्थना
म्हंटली. “…., उदर भरण नोहे जाणींजे यज्ञ कर्म… “🙏
डोळे उघडले.
भरलेलं जेवणाचं ताट पाहून खुश होऊन रश्मीची जिवणी रुंदावली. चेहऱ्यावर हसू फुललं. खुशीतच बेसनाच्या लाडुकडे हात गेला.

वेळीच मिळाला धडा.

लाडूचा छोटा तुकडा मोडून तोंडात टाकणार इतक्यात, एका स्त्रीचा हात रश्मीसमोरचं भरलेलं ताट आणि मसाला दुधाचा ग्लास उचलून नाहीसा झाला. सावळा पुरुषी हात भरलेला पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र घेऊन नाहीसा झाला. फक्त आवाज आला, “हे ताट तुझं नाही,” आणि रश्मी समोरचे पंच पकवान्नाने भरलेल ताट कियाच्या हातात दिलं. कियाने ताटातील सर्व पदार्थ भिराकावून टाकले आणि त्यात मटण, अंडी आणि मासे वाढले आणि चांदीच्या पेल्यात मदिरा भरली.
रश्मीकडे पाहून ताट बोलले,
झाले गेले विसरून जावे,
पुढे पुढे चालावेsss,
हे जीवन गाणे, गातचं रहावे…

आता ताट कियाकडे बघून हसतं होतं.

विनितानं रश्मीला मुध्दामहून उठवलं नाही. झोपलेल्या रश्मीच्या डोक्यारून ती शांतपणे
हात फिरवत राहिली.

चुकीची शिक्षा

सर्व पाहुन पण रश्मी काहीच करू शकतं नव्हती.
आपलं पंच पकवान्नाने भरलेले चांदीचे ताट गेल्याने भुकेने कळवळत राहिली रश्मी. संपलं सगळं हाच भाव मनात घर करून राहिला.
स्वप्नांत रश्मी रडत होती पण अश्रू खरोखर वाहत होते. आता रश्मीने जेवण खाणं सोडून देऊन बरेच दिवस झाले. ती पाणी पण पीत नव्हती. बेडवर पडून होती रश्मी.
अगोदरच बारीक असलेली रश्मी खूपच निस्तेज दिसतं होती. आता शेवट जवळ आला होता. आज सकाळपासून ना सई घरात होती ना विनिता. शेवटचे काहीं तास कदाचित कांही मिनिटं. रश्मीचं अस्तित्वचं संपत आलं होतं. श्वास घ्यायला प्रयास पडू लागले.
क्षणभर अस्वस्थ वाटून गेलं रश्मीला आणि स्वतःची कींव वाटली.
आई विनिताने स्वतःचे आयुष्य चंदनासारखं झीजवलं होतं रश्मीला लहानाचं मोठं करण्यासाठी आणि ती ताटासाठी जीव पणाला लावतेय स्वतःचा. क्षीण आवाजात, “पाणीss”. एवढंच बोलली. ग्लानी आली रश्मीला.

मोह कुठे नेतो ❓️

रश्मीला लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. खेळतांना इतर कोणाच्या खेळण्याबरोबर खेळलीस तर ठीक. पण दुसऱ्याच्या खेळण्याची अभिलाषा मनात निर्माण होऊ देऊ नकोस. ‘जें आपलं नाही, ते आपलं नाही’ हे सत्य स्वीकार. खोटं बोलू नकोस. करणं त्यामुळे तू स्वतःच दुःखी होशील.
आईला सगळं कळत. मोह वाईट. खोटं बोलणं, खोटं वागणं, वाईट विचार करणं, वाईट वागणं. चोरीचा विचारही वाईट. या साऱ्या गोष्टीना सामाजात मान्यता नाही. जें समाज मान्य नाही, ते योग्य नाही. ज्यामुळे भविष्यात त्रास होऊ शकतो, अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. सारं जाणते रश्मी.
मग स्वतःच नसलेलं चांदीच ताट कोणीतरी काडून घेतलं म्हणून इतका टोकाचा विचार का केला रश्मीने.
नाही हे चुकीचं आहे हे. वेळीच सावरायला पाहिजे स्वतःला. आपल्या मूळे आई विनिताला कोणताही त्रास होता कामा नये. आणि एका ठाम विचारापर्यंत पोहोचली रश्मी. सर्व शक्ती एकवटून उठून बसली आणि बाजूच्या स्टूलवर ठेवलेलं फुलपात्र घेऊन पाणी प्यायली. बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हबका मारला. आता बरच फ्रेश आणि हलक वाटतं होतं. उशी भिंतीला टेकवून रश्मी डोळे मिटून बसून राहिली.

तुळसी पत्र आणि अर्थ

दार उघडण्याचा आवाज झाला. रश्मीने पहिले; आई विनिता हातात काहीतरी घेऊन रश्मीकडेच येत होती. आणि तिच्या पाठी ऍंथोनी मामा आणि रोझी मामीपण होती. विनितानं पाहिलं, रश्मी बेडवर डोळे मिटून बसलीय.”रश्मी बाळं, उठ❗️ हे बघ, आईने तुझ्यासाठी काय आणलायं❗️ पंच पाकवान्न भरून सोन्याचं ताट आणलंय तुझ्यासाठी. उठ लवकर ❗️ आणि तुला भेटायला कोण आलाय माहित आहे का ❓️ हे बघ डोळे उघड.”
सोन्याच्या ताटावर झाकलेला विणलेला शुभ्र रुमाल बाजूला केला विनिताने. आता सुवर्ण ताटाच्या प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. विनिताने रश्मीसाठी सोन्याचं ताट आणलं होतं. ‼️
ताटामध्ये पक्वान्ने आणि वरण, तूप, भातावर तुळशीचं पान होतं. सोन्याच्या ग्लासात वेलची, काजू, बदाम, बेदाणे आणि केशर मिश्रित मसाले दूध होतं आणि त्यावर ही तुळसीच पानं होतं. सोन्याच्या तांब्यात पिण्यासाठी पाणी आणि त्यात तुळशीच पानं तरंगत होते. आणि जवळच सोन्याचं फुलपात्र होतं.
रश्मी आईला बिलगून बसली आणि ते सोन्याचं ताट रश्मीकडे बघून हसतं होते.

‘सगळं असेल तुझ्याकडे. तुळशीपत्र ठेवल्यामुळे, “हे माझं आहे!” असं म्हणण्याचा मोह होणार नाही. आई विनिता कडून हाच संदेश रश्मीला द्यायचा असेल का ❓️ कदाचित हे जग आणि जगातील वस्तू ज्यानं निर्माण केल्या त्या जगनियंत्या श्रीकृष्णाला अर्पण करून स्विकाराव्यात अशी जाणीव करून द्यायची असेल❓️किंवा तिला काय अभिप्रेत असेल ते रश्मीला समजत नव्हतं. रश्मीला आई विनिताकडून कांहीही नं बोलता खूप मोठा संदेश मिळाला होता. झोपेत असताना रश्मीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतं होतं.

बाजूला बसून विनिता, रश्मीची झोपेतून उठण्याची वाट बघत होती.
तिने रश्मीला आवडणारा मलई्युक्त दही आणि तूप मिसळून मऊ दहिभात बनवला आणि वरून मसाला मिरचीचा तडका देऊन ठेवला होता. नेहमीचं जेवण तयार असताना सुद्धा रश्मी हे सारे पदार्थ खाईल किंवा नाही या बदद्ल विनिताला शंका होती.

खूपच फ्रेश वाटतय आता❗️

एकदम गाढ झोपेत होती रश्मी. किचन मध्ये भांडे पडल्याचा आवाज आला. आवाजामुळे रश्मीने डोळे उघडले. रश्मीने समोरच्या घड्याळात पहिले, रात्रीचे आठ वाजले होते. आराम केल्यामुळे रश्मीचा चेहरा आता बराच फ्रेश दिसतं होता.
सततचा प्रवास आणि फिराण्यामूळे शरीर, मेंदूला आलेल्या थकव्याचा दृश्य परिणाम, चक्कर येण्यामध्ये झाला होता. गाढ झोपेमुळे
आराम मिळाला आणि थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता.
“कित्ती गाढ झोप लागली होती मला. आई❗️झोपेत मला स्वप्न पडलं.” रश्मीने आईला सांगितले.
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वप्न पाडू शकतात नं आई❓️ आणि किती चित्र विचित्र असतात ही स्वप्नं. या स्वप्नांना अर्थ असतो कीं, सारं निरर्थक असते कांहीही समजत नाही.
“जेवणानं भरलेल्या ताटात तुलसीचं पान ठेवणं म्हणजे काय ग आई ❓️” रश्मीने विनिताला विचारलं.

स्वप्नांच्या दुनियेत कांहीही घडू शकतं. अगदी कांहीही. कॉलेजमध्ये असताना सावंत सर आणि सलडाणा सर म्हणायचे, दिवसा; डोळे उघडे ठेऊन जाणतेपणी पण स्वप्नं पाहिली जाऊ शकतं, त्याला दिवा स्वप्न म्हणतात. दिवास्वप्न जगातील अश्यक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवण्याला हातभार लावतात. आपल्या मनाला कांही अश्यक्यप्राय आणि अचंबित करणाऱ्या गोष्टीं असतात. आवाक्या बाहेरच्या गोष्टी आहेत असं आपण समजतो. आपल्या अफाट, प्रचण्ड शक्तीला आवाक्यात बांधतो. स्वतःच, स्वतःसाठी स्वतःच्या मर्यादा ठरवून, घालून घेतलेलं कुंपण म्हणतात येईल. आणि तेच स्वनिर्मित कुंपण पार करण्यासाठी आपल्याला अशा वेड्या दिवस्वप्नांचा आधार मिळतो. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा कामाला लावावी. उघड्या डोळ्यांनी, जाणीवपूर्वक स्वप्नं पाहावीत. तेव्हाच असद्य ते कष्टसाद्य होते. म्हणजेच चांगल्या गोष्टींसाठी स्वप्न जगतं, स्वप्नपूर्तीसाठी जो मनापासून प्रयत्न करतो त्याचं स्वप्नं साकार होते. दिवा स्वाप्नाचा उपयोग कसा करावा ❓️ कांही वेळेस स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी स्वप्नाळू असणं गरजेचं असतं. स्वप्नं इतकीच बघावीत ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. आपण स्वप्नांशी खेळावं, स्वप्नाने आपल्याशी नव्हे. स्वतःच्या मनावर इतक नियंत्रण असायलाच हवं.

“आता बरं वाटतयं ना ❓️ उद्या घरातून बाहेर नको पडू. पूर्ण दिवस आराम केलं की, बर वाटेल. एकदा मुंबईला गेलीस कीं, नेहमीची कामं सुरु होतील.” विनिता काळजीच्या सुरात बोलली.
“आई, आता एकदम फ्रेश वाटतंय मला. आत्ता कुठं जायचं असेल तर, निघू शकतो आपण.” रश्मी हसतं बोलली, जेणे करून आई विनिता टेन्शन फ्री होईल.
“कुत्ते कीं दुम | भटकी कुठली,” सई पुटपुटली
“मा साहेबांनी आदेश दिले ना आता, पूर्ण दिवस घरात राहायचं म्हणून. मग झालं तर,” सई दटावणीच्या सुरात आवाज चढवून बोलली.

रश्मीला नुकतेचं पडलेलं स्वप्न चांदीचे आणि सोन्याचं ताट, दुपारी पाहिलेला पिक्चर, मैत्रिणींची ख्याली खुशाली यावर प्रेमळ गप्पा मारताना समोर जेवण आलं. नेहमीच्या जेवणाबरोबर देवाणाम प्रिय असलेला आईच्या हातानी कालवलेला अमृततुल्य सायी सकट दहिभात म्हणजे रश्मीसाठी मेजवानीच होती.
रश्मीने पुन्हा मगाशीचाच प्रश्न विचारला.

“जेवणानं भरलेल्या ताटात तुलसीचं पान ठेवणं म्हणजे काय ग आई ❓️” रश्मीने विनिताला विचारलं.

जालिंदर राक्षस, हाहाकार❗️ माजवलेला त्रास, राक्षस पत्नी; पतिव्रता वृंदा, आणि महाविष्णूला राक्षसाला ठार मारण्यासाठी करावं लगलेलं कपट, विष्णुला मिळालेला शाप आणि वृंदाला मिळालेलं वाचन, वृंदाचं तुळशीत झालेले रूपांतर आणि विष्णुप्रिया तुळस आणि पुढील प्रत्येक अवतारात तादात्म्य भाव, विनितानं थोडक्यात मर्म सांगितलं तुळसीपत्राचं.

आपले आचार, विचार, बोलणं आणि पावित्र्य हेच आपल्या संस्काराचे मूळ असते आणि संस्काराचा दृश्य परिणामही असतो. तेच सांचित – पुण्य रूपाने मिळत राहात.


“आई, तु सी ग्रेट हो | स्वप्नात पण चांगलेचं संस्कार करतेस. कसं जमत गं तुला हे सारं ❓️” रश्मी अगदी भारावून बोलत होती. आईप्रति प्रेम, श्रद्धाभाव आणि आदरभाव दाटून आला.

विनिता फक्त एका बाजूचा ओठ मुडपून हसली आणि रश्मीच्या पानात दहिभाताची मूद वाढली.

🌺🌺🌺🌷🌷🌺🌺🌺

रश्मीच्या शोधक नजरेला ऍंथोनी मामा दिसला का ❓️
🌺🌺🌺🌷🌷🌺🌺🌺

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More