चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्या
करडी🦅 चिऊताई  आली,
दोनचं दाणे चोचित पकडून
भुर्रकन उडून गेली.

गंमत मी पाहात होते
दारात शांत बसून
करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆
गालातल्या गालात 😊 हसून.

पुन्हा येणं, दाणे वेचणं,
भुर्रकन🦅 उडून जाणे, 
मनात माझ्या चिऊ विषयी
दया उपजली, का कोण जाणे ❓️

मी म्हंटल चिऊताईला,

थांब,  जरा  श्वास घे,
शांत जरा रहा.
पाणी ठेवलंय वाटीमध्ये
तहान🥛 भागवून पहा.

चिऊताई  लहानच आहेस 
मेहनत किती करतेस ❓️
दोनचं दाणे घेऊन चोचित 
फेऱ्या किती मारतेस ❓️

नाही गं ताई, थांबेन कशी ¿
वेळच नाही माझ्या पाशी
तहान, भूक पोटात घेऊन
लेकरं माझी उपाशी.

न्यायला हवा खाऊ🍚, पाणी 🥛
 माझ्या बाळांसाठी
जन्माला येणारा प्रत्येकजण
पोट आणतो पाठी.

बाळं माझी खूपच लहान
बळ हवे पंखात🦅
थोडी मोठी होऊ देत
घेतील भरारी गगनात🌈.

ऊन, पाऊस⛈️, थंडी वारा,
नाही करत बहाणे
मेहनत करतेय, बाळांसाठी
आईच, आईला जाणे.

मी म्हंटल चिऊताईला,

 चिऊताई तुझ्या घरट्यात
भरपूर धान्य🍚 ठेवते,
माझ्याच्यानं जमेल तेवढी
मेहनत कमी करवते.

चिऊताई बोलली,

तुझे विचार खूपच छान,
पण शोभतात फक्त माणसाला
गरजेपेक्षा जास्त मिळवून
अपंग बनवी पिढ्याना.

मी बोलले चिऊतल्या आईला

तुझे विचार चिऊताई
किती किती छान,
पिढ्यानं पिढ्या मेहनतिने
स्वतःचं करता पोषण.

प्रत्येक पिल्लू घेई भरारी
बळ मिळता पंखात
म्हणू म्हणते धन्यचा
संग्रह नको घरात.

काष्टाचे महत्व अन् किंमत
माझ्या बाळांना काळू दे,
संग्रहाचे लालच मुळी
दूर, दूर पळू दे.

सोस भारी, हव्यास अती,
नंतर लावेल संकटे पाठी,
अरेरे❗️हे नोको होते करायला,
म्हणून, नंतर खूप होशील कष्टी.

बोलता बोलता चिऊतली आई
मोठे तत्व सांगुन जाई,
कोण म्हणते चिऊना, लहान आहेत ❓️
चिऊ आईचे विचार मात्र महानच आहेत.

माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

Blogger/ Assistant Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️

भाग -1*  एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं; 

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 52

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More