भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळं मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करणं मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बाल दिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महा गणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯प्रेम♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯,घर सोडण पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाहीं पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नाहीं जाना हैं ❗️, दिदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्विन्स नेकलेस ‼️ रश्मी साठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., अण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्.
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडंसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
भाग – 52 * कल 👩🦳 – आज💃 – कल 👶, विश्वास – बिश्वास 🤔❓️”कोणती ऐकणार❓️चांगली 👌की वाईट👎‼️” तुमचा हात पकडणार नाहीं, मॅडम ‼️यांच्या पासून सावध रहा, सूची‼️
भाग – 53* अर्थार्जन अन् अर्थ साक्षर, तुळसीमाळेतील मणी हसले ‼️
निरक्षरता ❓️ कोणती ❓️❓️ परिणाम 🤭
भाग – 54 * विवाह ❤ विचार, संस्कार 👏‼, अम्हाला माहित आहे रश्मी‼😃😀, गीत ने शब्दातुन काय उलगडले❓, मळवट भरतोस का तू पूर्वेच्या भाळी?, सांभाळा तुमची फळे‼🥭🍈🍊🍎, नाते नितळ, लखलखीत‼, चेहरा 🎃 वाचणे, माणसे 👩🦰🤰👨🦱🤵जाणणे ‼, मी – आम्ही‼ तुझे👈🤰 – 👫👉आपले ‼, ‘दी मॉरलं ऑफ दी स्टोरी इज…..”‼😊
विवाह ❤ विचार, संस्कार👏‼
चांगले करणे, शुद्ध करणे, वस्तू किंवा मनुष्यातील दोष, वैगुण्य दूर करणे म्हणजे संस्कार. शरीर, मन आणि आत्मा तिन्हींचे शुध्दीकरण करणे म्हणजे संस्कार.
प्रतेक संस्काराचे कारण अन् महत्व वेगळे असेल पण ऊद्देश्य एकच. सात्विक कृती व्हावी, आपत्त्यामध्ये सात्विक सद्गुणांचा विकास व्हावा अन् आणि संस्कारांची जपणूक व्हावी हाच सोळा संस्करणांचा ऊद्देश्य आहे.
मानवी मुल्यांशी निगडीत असणाऱ्या संस्कारांचे सोहळ्यात रुपांतर झाले तरी त्याचे महत्व कमी होत नाही. पण संस्काराचे किंवा विधीच्या कार्यक्रमाचे व्यापारीकरण झाले की, त्या मागे असलेली शुद्ध भावना झाकोळली जाते आणि उरतात फक्त कोरडे सोपस्कर.
संस्कार आणि सोपस्कार मध्ये खुपच
धुसर असलेली रेषा नकळतपणे आणखी अस्पष्ट होते जेव्हां कर्मकांडाला अधोरेकीत केले जाते. आणि हे समजण्या इतपत राजेश रश्मी दोघेही सूद्न्य होते.
जन्माच्या अगोदर पासुन सुरु होणारे संस्कार मृत्यू नंतर संपतात.
विवाह: अन्तेष्टीपुर्व म्हणजेच पंधरावा संस्कार.
विवाह म्हणजे दोन मनांचा, दोन कुटुंबांचा आणि त्या अनुषंगाने एकत्र येणाऱ्या सर्वांसाठी साजरा करण्यासारखा विशेष आनंदी दिवस.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
पुढच्या घटनेने रश्मीची विचार शृंखला तुटली. अशी कोणती घटना घडली रश्मीने स्वत:च घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा वाटला?
जवळपासच्या दिडशे, दोनशे गावचे लोक लग्नाचा जत्था आणि आवश्यक कार्यासाठी कपडे खरेदीसाठी रश्मीच्या गावी येत असत. तिथे टैक्स नसल्याने स्वस्त आणि उत्तम दर्ज्याचे कपडे मिळतात असा सर्वदूर पसरलेला विश्वास होता. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातून लोक खरेदीसाठी हेच गाव निवडत असत. कपड्यांची अनेक प्रसिध्द दुकाने होती रश्मीच्या गावी. पण एका प्रसिध्द दुकानात नेहमी गर्दी होत असे. वेगवेगळ्या सणा समारंभाना लागणारे आणि नियमित वापरासाठी स्त्रिया, पुरुष, मुले, मुली सर्वाना सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे ठिकाण होते. चंडू लाल मोहनलाल हेच प्रसिध्द व्यापारी होते. याच दुकानात रश्मीच्या लग्ना साठीच्या साड्या खरेदी झाल्या होत्या.
“सई, माझे विचार चुकीचे तर नाहीत ना गं ?” रश्मी थोडी ओशाळवाणी होत बोलली.
छोटी बहिण सई आणि रश्मीमधे सहा वर्षे वयाचे अंतर असले तरी रश्मीला ती बरोबरीची वाटे. मैत्रीण वाटे. रश्मीला स्वत:च्या मनातील विचार, गोष्टी बोलताना संकोच वाटत नसे. त्यामूळे रश्मीने आपल्या मनात चाललेली घालमेल सई जवळ प्रश्न रुपाने व्यक्त केली.
“रश्मी अक्का, नेमके कोणत्या विचाराबद्दल बोलतेस तू ?” सईने रश्मीला विचारले.
सई, मला स्वत:ला अपराधी वाटतय. माझा निर्णय चुकला असचं वाटतय” पैंजण, अंगठी, कर्ण फुले, जोडव्या, छल्ला, कुन्कवाचा करन्ड़ा, देवी अन्न्पुर्णा, बाळकृष्ण मुर्ती, चांदीची वाटी, मुहूर्त मणी आणि इतर गोष्टींची खरेदी करुन दलीचंद व्होट्मलच्या दुकानातून बाहेर पडताना शेवटी रश्मी बोललीच. खरेदीची शेपूट लांबतच होती.
रश्मीला दोन महिन्यापूर्वीचा मरिन लाईन्सच्या कट्ट्यावर बसुन फेसाळणाऱ्या लाटां कडे पहात राजेश बरोबर केलेला संवाद आठवला.
“रश्मी, लग्न कोणत्या पाध्दतीने करायचे आहे ? रजिस्टर की वैदिक ?” या राजेशच्या प्रश्नावर रश्मीने प्रश्नार्थक मुद्रेने राजेश कडे पहिले.
“अर्थातच, मला वैदिक पध्दतीनेच लग्न करायचे आहे राजेश.” क्षणाचाही विलंब न लावता रश्मी पटकन व्यक्त झाली.
“सध्या कार्यालयाद्वारे चालणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी दररोज आठशे ते हजार सह्या करतेय मी. त्यात विवाह नोंदणी साठी आणखी एक सही करायची की, झाला विवाह. सहिद्वारे विवाह करताना कोणतीही वेगळी भावना निर्माण होणार नाही, वेगळा फील जाणवणार नाही. लग्नासारखे पवित्र कार्य देव, ब्राह्मण, आप्त, नातेवाईकांच्या साक्षीने करावे असा ठाम विचार आहे माझा. शॉर्टकट मार्ग स्विकारण्याचा विचार मुळीच केला नाही. त्यामूळे विधिवत विवाह सोहळाच आवडेल मला” रश्मी, राजेशच्या प्रश्नाला उत्तर देताना सहज पण ठामपणे आपला विचार आणि कारण भाव बोलली होती. लहानपणा पासुन विचार स्वतांत्र्य असलेल्या वातावरणात रश्मी वाढली होती. स्वतंत्र्यपणे निर्णय घेणे ते अमलात आणणे आणि भल्या वाईट परिणामांची जबाबदारी स्वत:वर घेणे हा विनिता आईचा रश्मीवर केलेला संस्कारच होता. राजेशला, रश्मीचा निर्णय प्रमाण 👍वाटला. त्याने त्या बाबत पुन्हा प्रश्न ❓️केला नाही. राजेशसह सर्वजण तयारीला लागले.
रश्मी, राजेश आणि तिच्यामध्ये विवाह पध्दत आणि त्याबदल झालेला संवाद अन् निर्णय याबद्दल बहिण साई अन् विनिता आई बरोबर बोलली. रश्मीला बहीण सई आणि आई विनिता यांच्या प्रतिक्रीया काय असतील या बाबत विचार करताना तिचा बार एकदम फुसका निघाला
अम्हाला माहित आहे रश्मी‼😃😀
“वैदिक विवाह पाद्द्ती बद्दल तुझा विचार राजेश भाऊजीनी अम्हाला पुर्वीच सांगितलय. सर्व माहित आहे अम्हाला. तू नविन काहीही सांगत नाहीस. विवाह पध्दती बाबत तुझा विचार किंवा निर्णय कांहीही चुकलेल्ं नाहीय. घेतलास न निर्णय? आता पुन्हा विचार कशाला करायचा? आता निर्णया प्रमाणे तयारी चालू झाली आहे. किंबहुना ऐंशी टक्के तयारी झाली सुददा.” बहिण सई आणि विनिता आई एकत्र उतरल्या
राजेश, राजेशचे लग्न आणि त्यासंबंधीत सर्व गोष्टी त्याच्या कुटुंबियांसाठी महत्वाच्या होत्या. सर्व भावंडांना काय करू आणि काय नको असे झाले होते. राजेश घरामध्ये सर्वांचा लाडका भाऊ, त्यामूळे बाकी सगळ्या गोष्टी एकिकडे आणि राजेशच्या लग्नाची तयारी एकीकडे. असाच दृष्टिकोन दृढ झाला होता. कपडे, दागिने, चपला पासुन मेंदी, हळद आणि इतर गोष्टींची तयारी जोरात चालू होती.
“रश्मी,आज चारुने तुझ्या साठी कानातील टॉप घेतले.” इती राजेश.
“आज टीनाने तुझ्या साठी लेदर बैग घेतली, रश्मी.” इती राजेश.
“शिखाने तुझ्या साठी अंगठी आणि साडी घेतली.” मोठया दादाने अमुक घेतले.
“छोट्या दादाने लग्न विधीसाठी हॉल बुक केला. रिसेप्शन साठी लॉन बुक केले.”
मेन्यू फिक्स केला.
घरच्यासाठी कपडे खरेदी, मुलांसाठी खरेदी आणि …..
राजेश रोज नवीन कांहितरी सांगत राही.
सगळ्या बाह्य शोच्या गोष्टींना सर्वानी खुप महत्व दिले असे तर नाही ना होत आहे? रश्मीच्या मनात विचार चमकून गेला. दुसर्या क्षणी तिच्या मनात आले लग्नाच्या निमीत्ताने हौस मौज करताहेत. करू दे त्याना. त्यामूळे कोणाला त्रास तर नाही ना होत. मग विचार करुन, हौस, मौज बध्दल हटकून, कार्यक्रमांचा बेरंग का करायचा तीने विचार झटकून टाकला.
गीत ने शब्दातुन काय उलगडले❓
“रश्मी हे सारे ठीक आहे. विवाह म्हणजे सोळा संस्कारा पैकी एक संस्कार.
“विवाह: ग्रह – ताऱ्यांच्या, देवा, ब्राम्हणांच्या, आप्त – स्वकियांच्या साक्षीने आपुलकीने सुरु करावयाच्या नव्या भावनेचा उत्कर्ष बिन्दू गाठणारा संस्कार सोहळा. खरेदीचा उमाळा. नात्यांचा मेळा. आपुलकीचा जिव्हाळा.” रोज अगदी जीव ओतून आपली मैत्रिण रश्मीला समजावत होती.
“विवाह म्हणजे स्वेच्छेने स्वीकारलेले गोड बंधन अन् निरंतर असणाऱ्या खुप साऱ्या जबाबदाऱ्या.” रायमा थोडे वस्तवा कडे झुकणारा विचार बोलली.
“तू कवी मनाची आहेस रश्मी. निसर्गात रमतेस. पाने🌱☘🌿🍃🍂 फुले⚘🌷💐🌺🌹🥀, फळे🍎🍊🍓, झाडे🏕🏝🏜, पाणी🌊, वारा🌀, सुर्य🌞, चंद्र🌛🌕, तारे🌟⭐ अन् माणसे 🤰🤵👩🦱🦸♂️पाहुन कोमल भावना निर्माण होतात.” गीतने तिला स्वत:ला समजलेली रश्मी शब्दातुन उलगडली.
रश्मीच्या डोळ्यासमोर मळ्यातील प्रसंग तरळला.
गीतचे बोल ऐकुन रश्मीनें सूर्याला केलेली काव्यात्मक विनवणी आठवली.
नारळाच्या 🥥 आणि आंब्याच्या🥭 झाडाला मोडक्या – तोडक्या, तोकड्या शब्दातील काव्यात्मक सुचना वजा आदेश आठवला…. आणि तिच्या मुखातून त्याच ओळी बाहेर पडल्या.
मळवट भरतोस का तू पूर्वेच्या भाळी? 🛑🌞
रश्मी साधारणता दहा, अकरा वर्षाची असेल. मळ्यातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. ☺️
नुकताच पाऊस पडून गेला होता. उन्हाने तापलेल्या कळ्याभोर जमीनीवर सरसरुन पडलेल्या पावसाचे🌦🌧🌨 पाणी घटा घटा पिऊन जमीन तृप्त झाली होती.
तापलेल्या मातीवर पडलेल्या पहिल्या पावसाचा वेगळाच सुगन्ध, वारा आसंमतात पसरवत होता. मंद वारा वहात होता आणि सुर्य मावळतीला झूकुन सारा मळा उजळवत होता. सूर्याची क्षितिजा पलिकडे जाण्याची तयारी लहानग्या रश्मीला
भाऊक बनवत होती आणि आपल्याकडील अपुर्या असणारया शब्दानी रश्मी सूर्याला विनवणी करत होती.
तुझ्याच असंख्य किरण🌞⚡ स्पर्शानी,
मिळली उब 🌤🌍अन् उजळली धरती ||
सुर्य बाप्पा 🌞नको ना होऊ दृष्टी आड,
आज तुज़ा नियम ठेव जरा पल्याड||
खुप साऱ्या प्रकाशकणांनी दूर होतो तम,
आणि दूर दूर पळते अंधाराची भिती ||
तू गेलास की सारे शांत शांत होते,
तुझ्या आगमनाची आशा मनी उमलते||
सकाळी जेंव्हा दिसतोस🌞 तेव्हा
मला आई 🤱भेटल्यचा आनंद होतो ||
जाताना पश्चिमेला पसरवतोस तू अमाप 🔴लाली,
उगवतना मळवट 🔴भरतोस का तू पूर्वेच्या भाळी?
खुप नारळ घेउन अन् अंग भरुन कच्च्या हिरव्य्ग गार कैरया घेउन जोरजोरात वहाणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या आम्र आणि नारळ वृक्षाना पाहुन रश्मी आपली कविता स्वत:च बडबडत राही. तिच्या कवितेत उन, वारा, पाऊस, झाडे, फुले, पाने, पक्षी, प्राणी, सुर्य, चंद्र, तारे, आकाश, जमीन असेचं काहीतरी असे. आता गीत बोलल्या मुळे रश्मीला मोडक्या तोडक्या आणि तोकड्या शब्दातील कविता आठवली.
सांभाळा तुमची फळे‼🥭🍈🍊🍎
रिकामटेकडा वारा झाडानां म्हणतो माझ्या संगे पळा।
एकाच जागी उभे राहुन नाही का येत कंटाळा?
कित्ती हलतात जोरजोरात❓ सांभाळा तुमची फळे।
खट्याळ वारा काढ़तोय खोड्या नका हलऊ मुळे ॥
वाऱ्याचे काय ऐकतात❓एका ठिकाणी टिकतोय का?
तुमच्यासारखे अचल वृक्ष, पाळेमुळे हलवताय का❓
ना योग्य शब्द मिळायचे, ना ताल जुळायचे फक्त भावनांचे उमाळे फुटायचे अन् तसच मन गात रहायचे. निसर्गात हुंदडत रहायचे. अर्धे, कच्चे, बच्चे, बिना चालीचे गाणे. बिना तालाचे, बिना सुरांचे गाणे अपल्या बेसूऱ्या आवाजात गात राही रश्मी.
आता जीवन गाणे सुरु होइल रश्मी स्वगत बोलली.
नाते नितळ, लखलखीत‼
“तू तर नाते जपणारी आहेस. जीवाला जीव लावणारी आहेस. ‘नाते’, मग ते रक्ताचे असो की, जोडलेले असो तू निभावतेस मनापासून. त्या बद्धल शंकाच नाही. जबाबदारी घेतलीस की ती निभावणार शंभर टक्के. विश्वासाने दिलेले कोणतेही काम ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या जबाबदारीने करणार. मोकळेपणाने तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोललीस का ❓️ तुझ्या मन सरोवरामध्ये मध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्न तरंगाना समोरून येणाऱ्या उताराच्या शांत वायुने संथ केलेस का ❓️ शंकाबाबत चर्चा केलीस का ❓️” जीत प्रश्न विचारत होती. तिचा उद्ध्येश स्पष्ट होता आणि हेतू शुद्ध होता.
रेक्टर काकू आम्हां मुलींच्या चर्चेत अगदी अलगद्पणे आणि सहज सामिल झाल्या. अपल्या विचारांची लडी खोलतं, मनातील विचार – मोती घरंगळू देत होत्या. “विवाह : एका नाजूक नात्याची सुंदर सुरुवात. रेशमाच्या लडीसारखे तलम, मोत्याच्या ओंजळीसारखे मुलायम. हिऱ्यासारखे तेजस्वी, शुभ्र, लखलखीत अन् पाण्यासारखं नितळ झळझळीत. बंदा रुपयासारखे खणखणीत.” एका दमात बोलून काकूनी सर्वांच्या विचारला चालना दिली. नव्या नात्याचा नजुकपणा सोपे पण अर्थपूर्ण दाखले देत, योग्य शब्दात काकूनी व्यक्त केला.
“नात्याला उत्तम संस्काराच्या शिंपणाने शिंपून; निर्मळ, स्वच्छ आणि प्रेमळ ओलावा निर्माण करणे तुझ्या हातात आहे. एकदा का एखाद्या व्यक्तीशी जन्माचे नाते जोडले की, तिथे इतर गोष्टी गौण होतात.” रेक्टर काकूंच्या वाक्याला पुष्टी देत शिवगंगा सहज आणि ओघवत्या भाषेत बोलत होती.
“दोन्ही कडील माणसे अनमोलच असतात. आपल्या जवळ असलेल्या रक्ताच्या नात्याबरोबर स्वेच्छेने जोडलेले नाते आपल्या भावनिक कक्षा रुंदवतात. त्यांना रुंदावू देणे नव विवाहितेच्या हातात असते. या गोष्टी मनापासुन करणे अपेक्षीत असते. भावनिक कक्षा विराटपणे रुंदावायला काहीच मर्यादा नसतात. त्यामुळे गोंधळून जाऊ नकोस.” बोलत असताना शिवगंगाने सर्व मुलीवरुंन नजर फिरविली. रश्मीच्या चेहर्यावर नजर स्थिर करत शिवगंगा बोलली. रश्मी बरोबर सर्वजणी विवाह आणि संसाराचे सार ऐकत होत्या.
“स्त्रियांना अनेक वरदानं असतात. त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांचे ऍड्जस्ट होणे. त्याचा अफलातून फायदा म्हणजे स्त्रियांचे मनाने माहेरी रमणे अन् भावनेने आणि शरीराने सासरी रुळणे. तुझ्या अष्ट पैलू स्वभावात हा नाववा पैलू अलगदपणे खुलव आणि तुझा संसार मळा फुलवं ‼” असे विनिता आई लग्न ठरलेल्या दिवशी बोलली होती.’ भाऊक होत रश्मीने विनिता आईने बोललेले वाक्य जसेच्या तसे उच्चारले.
“वॉऊ रश्मी‼ कित्ती अनमोल बोल आहेत तुझ्या, विनिता आईचे” जीत आणि रोज एकाच वेळी एकमेकीकडे पहात बोलल्या.
“तू कित्ती नशीबवान आहेस रश्मी. तुला नाते सम्बधावर सकारात्मक विचार रुजवायला, विचाराने प्रगल्भ अन् अनुभवाचे बोल सांगायला वेगवेगळी माणसे आहेत. जितचा स्वर ओला झाला आणि आवाजात जडत्व होते.
कधी रोज, कधी गीत, कधी जीत, रेक्टर काकू, कधी विनिता आई, शेजारच्या वाहिनी कधी कार्यालयातील सहकारी कधी अजून कोणी रश्मीला नाते आणि ते टिकविण्यासाठी करावी लागणारी मनाची तयारी याबद्धल खूपच रोचक अन सूचक दाखले देऊन समजावत होते.
चेहरा 🎃 वाचणे, माणसे 👩🦰🤰जाणणे ‼
“तूम्ही सर्वजण किती मानसतज्ञ अहात नं ? तूम्ही पुस्तके वाचता, पेपर वाचता मैगझिन, वीकली इत्यादी वाचता. तसेच चेहरा वाचता. तुम्हाला माणसे आकळतात. माणसे जाणता. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता. तूम्ही माणसे अभ्यासता. जीवन शिक्षण म्हणजे अणखी वेगळे काय असते?” रश्मी भराऊन बोलत होती.
सर्व नाती टिकावूच असतात. मग एव्हडी चर्चा का करतोय आपण सर्व जणी? रश्मीला प्रश्न पडला❓❓
रश्मी व्यक्त होत रहिली.
“बहीण, भाऊ, आई, वडिल, काका, काकू, मावश्या, आत्या ही पण रक्ताची नातीच आहेत. ती टिकतातच वर्षानुवर्षे. जन्मभर बांधील असतो आपण.
वाद विवाद झाला म्हणजे तणाव निर्माण होतो. राग, लोभ, क्रोध, मद आणि मत्सर या भावना मन आणि विचारांचा ताबा घेतात तेव्हा शरीरावर त्याचे परिणाम दिसतात. “कोणतीही अतिरेकी भावना, विचाराचे संतुलन बिघडवते. बिघडलेल्या गोष्टीतून आणि चिघळलेल्या परिस्थितीतून कांहीही चांगले निष्पन्न होत नाही.” त्या भावना, नॉर्मल होण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक असते. काळ हाच सर्व समस्यावर उपाय होऊ शकतो. कांही वेळे नंतर परिस्थिती निवळते. वातावरण पुर्ववत होते. समस्या सोडविणे सोपे होते.
पण मग लग्नाच्या वेळी नात्या बध्दल एवढी चर्चा का होतेय ? मित्र, मैत्रिणी, शेजारी ओळखीचे ही जोडलेली नाती दृढ भावनेने बांधलेली असतात. जोडलेली नाती विना अट निभावत असतो आपण. उलट अशी नाती निरपेक्ष भावाने जोडलेली असतात. निखळ आनंद वाटणारी असतात.
रक्ताच्या नात्यात प्रीती, माया, आसक्ती आणि अपेक्षा असतात. आणि इथेच सारी मेख असते. अपेक्षा असते तिथे अपेक्षा पूर्तीची आस असते किंवा ती भंग होण्यची श्यक्यता असते.
संसार म्हणजे या साऱ्या गोष्टी आल्याच की.
मी – आम्ही‼ तुझे👈🤰 – 👫👉आपले ‼
राजेश, रश्मी दोघेही मॅच्युअर होते. दोघांच्या विचाराची बैठक ठाम होती. त्या विचारांची देवाण, घेवाण होणे अपेक्षित होते. एकमेकांना पूरक असणेचं अपेक्षित होते. दोन, चार तास एकमेकांसोबत घालवणे वेगळे अन् आयुष्यभर एकत्र राहणे वेगळे.
माणूस; ऋतू नाही पण तो बदलतो. नशीब; मैत्रीण नाही पण ते रुसते. आलेल्या छोटया; छोट्या बदलाना कसे झेलायचे अन् संकटांचा, अडचणींचा सामना कसा करायचा हे प्रत्येकाने परिस्थिती नुसार ठरविणे अपेक्षित आहे.
लग्न ठरल्यापसून राजेशच्या वागण्या, बोलण्यातून ‘मी’ जाऊन ‘आपण’ ही भावना रुजली होती, त्यामानाने रश्मी जरा अलिप्त होती. तिच्या बोलण्यातून असे काही जाणवले की, तो दुरूस्त करत असे.
“राजेश तुमच्या ऑफ़िस मधील सर्वाना अपल्या लग्ना निमीत्त कपडे घेण्यासठी पैसे दिलेत का?” रश्मीने समोरच्या दुकानाकडे पहात राजेशला प्रश्न विचारला.
“तुमच्या ऑफिस मधील काय म्हणतेस रश्मी❓️ आपल्या ऑफिस मधील म्हण” आग्रहाने राजेश बोलला.
“अरे, आज तूम्ही, तुमची गाडी नाही आणलीत? ही ओम्नी कोणाची आहे ?” बुधवारी सन्ध्याकाळी राजेश कडे वेगळी गाडी पाहुन रश्मीने राजेशला विचारले.
“तूम्ही, तुमची गाडी हे काय चालवलय रश्मी ? आपली गाडी म्हण.” राजेशने पुन्हा दुरूस्ती केली.
राजेशने अपल्या वागण्या, बोलण्यातून रश्मीला आपले मानले होते, स्विकारले होते. रश्मी अजुन राजेश बरोबर त्याच्या इतर गोष्टीना आपले म्हणण्यासाठी मनाने तयार होत होती.
“विवाह बंधनात वागण्या बोलण्यात, विचारात बदल अपेक्षीत असतात. ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ अधोरेखीत होते.” रश्मीने स्वानुभव सांगितले.
तसं पाहायला गेले तर सगळ्याजणी चर्चा करताना थोड्या गंभीर अन् भावुक झाल्या होत्या.
“रश्मी, तुला दूध फ्रीझ मध्ये ठेवले का ❓️ गॅस, फॅन चे बटण व्यवस्थित बंद केले का ❓️ दाराला कुलूप व्यवस्थित लावले का ❓️ सकाळी ऑफिसला निघताना हे सारे चेक करून निघायला लागेल ना गं ?” रोजनें एकदम लग्नानंतरच्या दैनंदिन कामा कडे मोर्चा वळवीला.
” हं रोज, तू म्हणतेस ते बरोबर आहे. करू साऱ्या गोष्टी. आम्ही एकत्र राहतो. अडचण नाही येणार या साऱ्या गोष्टींसाठी.” रश्मी सहज उतरली.
“होss, रश्मी. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. हे पण लक्षात ठेवायला हावे की कामं व्यवस्थित अन् वेळेवर पार पडले ना❓️ नाहीतर अकबराच्या मेव्हण्यासारखी अवस्था व्हायची.” तेजू बोलली.
“अकबराच्या मेव्हण्यासारखी अवस्था व्हायची असे का बोललीस तेजू?” शिवगंगाने तेजूला विचारले.
“म्हणजे काय ग तेजू ❓️ सांग नं, नेमकं काय म्हणायचे आहे तुला ❓️” गितने तेजुला सविस्तर सांगायला सांगितले.
“मॉरलं ऑफ दी स्टोरी इज…..”‼😊
“अगं कांही नाही ग गीत. नेहमी प्रमाणे चाणाक्ष बिरबल अकबरला संकटातून सोडवतो त्या बद्दलची गोष्ट आहे” तेजू उतरली.
“तेजू, जस्ट डोन्ट टेल अस ‘मॉरलं ऑफ दी स्टोरी’. टेल अस दी स्टोरी.” जीत स्टोरी शब्दावर जोर देत बोलली.
तेजूनें खरंच गोष्ट सांगायला सुरुवात केली
“मेरे भाई जान को अपने साथ मे रखिये |” ही बेगमची मागणी दुर्लक्ष्य करत बादशहा, बिरबललाच स्वत: बरोबर ठेवत असे. त्या बाबत बेगम नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. बादशहाने बेगमच्या भावाला धान्याच्या कोठारात धान्य वाढविण्यचे महत्वाचे काम दिले तेव्हा बेगम थोडी शांत झाली होती.
एकदा काय झाले, राजा अकबर आणि प्रधान बिरबल यानी नेहमीसारखे फेरफटका मारायला वेष पालटून निघायचे ठरविले.
प्रधान बिरबल, राजा अकबर बरोबर बोलतना नेहमी, “जहाँपना,” म्हणून सुरुवात करायची सवय होती. तशीच “प्रधान जी बिरबल,” अशा शब्दाने राजा अकबर बोलणे सुरु करत असे.
दोघेही शेतकऱ्याचा वेष परिधान करून राजवाड्या बाहेर पडताना, राजा बोलला, ” प्रधान जी बीर…. ” पूर्ण शब्द बाहेर पडायच्या अगोदरचं समोरून दासिं बरोबर बेगम येताना दिसल्या. अकबर आणि बीरबल यांची शेतकऱ्यांची वेशभूषा इतकी बेमालूम ज़मली होती की खुद बेगमने सुद्धा बादशाला ओळखले नाही.
पण समोरच्या शेकऱ्यांच्या तोंडून ऐकलेला ओघवता आवाज आणि अर्धवट बोलणे बेगम जीं च्या भिवया उंचावायला कारण ठरले. पण राजवाड्यात हे दोन शेतकरी आले कुठून आणि कसे ? हा बेगमच्या चेहऱ्यावर उमटलेला प्रश्न चाणाक्ष बिरबलाच्या नजरेतून निसटले नाही.
जर बेगमने समोरच्या शेतकऱ्याना प्रश्न विचारले तर नक्किच पोल खोल होइल हे जाणून शेतकरी वेशातील बिरबल राजाला हाताच्या कोपराने ढोसत बोलला, “अरं चल की, बिगी बिगी. राजाने राणीसाठी कच्च्या कैर्या अन् ताजा रानमेवा अणाय सांगितलय न, मंग एळ कशापायी काडतुयास?” आणि दोघांकडे कोणी पहात नाही याची खात्री करुन बिरबलने स्वत:च्या दोन्ही कानाच्या पाळ्याना पकडून एकेरी बोलल्याबद्दल बादशहाची माफी पण मागितली.
प्रथम आड मार्गाने चालून मगच जवळच्या गावी जावे लागत असे. सुर्य तळपत होता. चालून बादशहा दमला होता. त्याला तहान लागली होती. घशाला कोरड पडली होती.
एकदम शांत होते सर्वत्र. फक्त चालताना येणारा पायांचा आवाज जाणवत होता. जवळ तलाव होता. तलाव पाहुन बाद्शहा खुश झाला. चालण्याचा जोर वाढवून तलावा जवळ पोहोचणार ईतक्यात बिरबलाने बादशहाचा हात पकडून जोरात मागे खेचले. तसा बादशहा आडवा झाला आणि त्याला बाजूचा दगड खरचटला आणि बादशहाचे रक्त वाहिले. बादशहा
रागाने लाल झाला. बादशहा बिरबलला जोरात ओरडण्यासाठी आ केला. बिरबलने जवळची तीन इन्च काटकि बादशहाच्या तोंडात अशी काही ठेवली की बादशहचा आ तसाच राहिला. आता बादशहा काहीच करू शकत नव्हता. खरचटलेल्या जागी रक्त सुकले होते. डोळे सताड उघडे होते. आणि जे पाहिले ते शब्दातीत होते.
तलावात मोठा अजगर पाणी पिण्यासाठी आला असताना दबा धरून बसलेल्या मोठया मगरिने अचुक निशाणा साधला आणि अजगरला गिळून तळ्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन सुस्तवली. तसा बादशहा उठायचा प्रयत्न करु लागला.
“जहांपना उठना नही | वैसेही लेटे रहो | और सामने पेड के निचे देखो |” समोरुन सहाफूटी वाघ त्यांच्या दिशेने येत होता.
काळजाचे पाणी करणारे दृश्य होते ते. बादशाहाचे डोळे मोठे आणि सताड उघडे राहिले. तो प्राणी जवळ येत होता. एका क्षणी तो इतका जवळ होता की त्याचा फुर फुर गरम श्वास आणि उग्र वास दोन्ही असह्य झाले. त्याने बादशहाला झालेली 0जखम हुंगली आणी तो बिरबला कडे वळला. निपचिप आणि श्वास बंद पडलेल्या बिरबलला हुंगून तळ्याच्या काठा काठा ने दहशत निर्माण करणारी डरकाळी फोडून तो दूsssर निघुन गेला.
बिरबलाने उठुन दिर्घ श्वास घेतला. बादशहच्या तोंडात अडकलेली काटकि काढत बिरबल बोलला, ” उठीये जहांपना”
“आपण बेगमचे ऐकुन तिच्या भाई जान ला बरोबर ठेवलो असतो तर…..” बादशहच्या मनात विचार चमकून गेला.🌹🌹🌹🌹🌺🌺🌹🌹🌹🌹
पुढील भागात वाचा 👇 घोड नवरी असं कोणी म्हंटले ❓️ प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया 🌹🌹🌹🌹🌹
site वर वाचनासाठी उपलब्ध साहित्य…🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAiUl5
story time : https://bit.ly/2Z1r33उ
poems : https://bit.ly/3lP8OI4