आज – काल❗️

             

अमूल्य मूल्ये ❗️😊

आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का सोडतात इतके भयानक परिणाम ही घसरलेली जीवनमूल्ये ❓️  काय परिणाम आहेत ज्या मूल्यांचे पालन न केल्यामुळे पिढ्या घडण्या ऐवजी बिघडतात❓️ समाज ढवळून निघतो, संबंध सुटतात, नाती उसवतात आणि जीवन  यातनानी भरून राहते आणि सर्वत्र अंधःकार होतो या अमूल्य मूल्यांच्या अध:पतनाने.  काय करू हे सावरायला ❓समाजघडी विस्कटू नये म्हणून कोणता स्टॅन्ड घेऊ ❓️ नेमकी कोठून आणि कशी सुरुवात करू ❓️ वाचा छोट्या छोट्या स्वतःला करता येणाऱ्या गोष्टीपासून. मूल्यवर्धन अवघड आहे पण अशक्य नाही. चला तर पाहूया…

गरजवंताला मदत ❗️

पालक आणि शिक्षक यांनी ठरवले तर…. साऱ्याच चांगल्या गोष्टी करणे श्यक्य होते.

चिंटूच्या गोबऱ्या गालावरून घळघळ वाहणारे अश्रू पाहून आई  लीनाला गलबलून आले होते. आपल्या काळजाच्या तुकडायची अवस्था पाहून नकळतपणे हृदयातून दुःखद, सूक्ष्म कळ गेली. “मी, माझ्या मुलाला ‘गरजवंताला मदत करण्याचा’ आग्रह धरून” त्याचे नुकसान तर करत नाही ना ❓️ अशी शंकेची पाल मनात चुकचूकली, परंतु क्षणभरच. दुसऱ्या क्षणी मनातला अभद्र अन कोता विचार आणि शंका दूर करून लीनाने लहानग्या चिंटूला हृदयाशी कवटाळले.
Well done Chintu ❗️ you are the hero ❗️  Mamma appreciates  your  heroic deed ❗️ आई लीनाने अगदी supportive mood मध्ये येऊन उत्स्फूर्तपणे दाद देत टाळीसाठी लहानग्या चिंटूपुढे हात  केला आणि क्षणात चिंटूच्या चेहऱ्यावर हसू फुलले.  समोरचे दुधाचे दोन दात पडलेले असले तरी चेहऱ्यावर  पूर्वीचेच निरागस हास्य दिसले. आणि गरजूला मदत करण्याचे संस्कार चिंटूच्या मनावर घट्ट बिंबवले गेले.
इतक्यात  मुख्य दरवाजावर थाप पडली आणि बाहेर कलकलाट झाला तशी चिंटूची आई लीना बाहेर आली.
“काकू तुमच्या चिंटूने कमाल केली आज ‼️  सीमा आजींची सोन्याची साखळी ओढून पळून जाणाऱ्या चोराच्या दिशेने हातातील बॅट मारून त्याला जखमी केले आणि पाठीमागून येणाऱ्या पोलीसांना चोर पळून गेल्याची दिशा पण दाखवली.
त्या धावणाऱ्या चोराच्या, “ए चिंट्या, तुला बघून घेईन,” म्हणून रागाने बघणाऱ्या चोराला न घाबरता  सीमा आजीला हाताला धरून जवळच्या  कट्ट्यावर बसवून  स्वतःच्या छोट्या बाटलीतले पाणी प्यायला दिले.

   आम्ही सर्वजण घाबरून जवळपास असलेल्या कोयनेलच्या कुंपणमागे लपलो होतो.

पोलीस त्याला शोधत  गार्डनकडे येताना पाहून मात्र चिंटू घाबरून रडायला लागला आणि धावत घरी आला.

पोलीस याला शोधत होते आणि विचारत होते. पण आम्ही सांगितले नाही त्यांना चिंटूचे नाव. आम्ही खोटे बोलुन त्या पोलिसांना  पाठवून दिले.”
सर्व मुलांचा म्होरक्या पक्क्या त्याच्या घोगऱ्या आवाजात लीना काकूंना सांगत होता.
“ए चला, बाजूला व्हा रे.”
पाठीमागून आलेल्या कडक आवाजाने पक्क्या आणि इतर मुले बुजून बाजूला झाली.

“लीना तुझं छोटं पिल्लू खूप मोठं काम करून आलय. गेले कित्तेक दिवस महिला, मुलींच्या गळ्यातील चेन स्नॅचरला पकडायला पोलिसांना मदत केली चिंटूने. घाबरलेल्या मला म्हातारीला हाताला धरून उठवून  कट्ट्यावर बसवले, प्यायला  पाणी सुद्धा दिले. गुणाचं बाळ आहे गं. त्याची दृष्ट काढ.” सीमा आजी थरथरत्या आवाजात बोलताना  चिंटूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या.
पोलिसांनी लीना आणि चिंटूला  दुसरे दिवशी पोलीस स्टेशनला बोलावून  सत्कार केलाच पण त्याचे  प्रसंगावधान, धाडस आणि  त्याने सीमा आज्जीला केलेली मदत न्यूज पेपरमध्ये अगदी पहिल्याच पानावर फोटोसहित झळकली.

चिंटूचे जीवनमूल्य दृढ झालेच पण त्याच्या सर्व मित्रांची गरजूनां मदत करण्यासाठी टीमच तयार झाली.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आपण बिना दिक्कत आपले अभिप्राय देऊ शकता.

लवकरच भेटूया एका नवीन जीवन मुल्यासोबत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे,

Read More

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More